मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शतशब्दकथा स्पर्धा] शयना

अत्रुप्त आत्मा · · स्पर्धा
अज्जिब्बात येत नाही ती,पूर्वीसारखी! एक काळ होता... ती माझी वाट बघत असायची. कधी येतोस रे माझ्या बाहुपाशात? असे म्हणत ! माझाहि रुबाब काही कमी नव्हता तेंव्हा . पण तो असायचा काही क्षणांपुरता. नंतर मी कधी विरघळून जायचो तिच्यात ? कळायचंहि नाही मला! कारण तेंव्हा मुळातच ती होती शयना. आणि मी??? केवळ शयनी! पण आता मात्र काळंहि बदललाय ,आणि वेळंहि. आता येते ती,तशी केंव्हातरि..अधूनमधुन येते.जुन्या क्षणांचि सोबत घडतिये असं वाटलं...तर! पण एरवी? ढुंकुनहि पहात नाही . आणि झालीच सामील अर्ध्या रात्री..तर? रुपडे पार बदललेले असते तिचे . 'आधीना' झालेली असते ती ही. आणि मी ही हल्ली होतो मग तिचा.., आधीन!

वाचने 7881 वाचनखूण प्रतिक्रिया 35

In reply to by अभ्या..

नाव आडनाव 11/08/2015 - 10:33
लई कंफ्युजिंग आहे - शायनी (आहुजा) - नावाचा बाबा (हे बाईंचं नाव वाटतं). शायना (एनसी) - नावाची बाई (हे बाबाचं नाव वाटतं). शयना - गुरूजिंची गोष्ट :)

पैसा 11/08/2015 - 10:34
+१ अवांतरः बुवा, सत्यकथा आहे का? स्काईपवरून दोन पूजा जास्त सांगा उसातल्यांना हाकानाका!

नाखु 11/08/2015 - 10:42
पण आम्ची शाळा वयात झोपेची व्याख्या अशी होती "जी रात्री येण्यापेक्षा दिवसा (खास करून वर्गातच जोरदार येते तीच खरी झोप) बाकी सारी "भ्रमरकल्पना". शाळेतला झोपाळू नाखु

दिपक.कुवेत 11/08/2015 - 12:25
आधी कळलीच नाहि. मग सावकाश वाचल्यावर आशय कळला. मस्त!

+१ छान ! पण
अज्जिब्बात येत नाही ती,पूर्वीसारखी!
ह्या वाक्यावर जरा हसुच आले... सांप्रदायिक कथा आहे की काय असे वाटले =))