Skip to main content

विहीर - कथा

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 16/08/2015 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
गावाबाहेरच्या माळाजवळ सदूची चहाची टपरी होती . शेजारच्या रस्त्यावरून जाणारे वाहनचालक , प्रवासी हेच त्याचे गिरहाईक. एरवी मोकळ्या वेळात सदू त्या माळावर चालणारे मुलांचे खेळ , दंगा पाहात बसे . त्या माळावरच एक जुनाट पडकी विहीर होती . एखादी खोडसाळ पोरे जर खेळताना त्या विहीरीच्या फार जवळ जात असेल ,तर , सदू त्या पोरांवर जोरात ओरडत असे " ए पोरांनो , त्या ईहिरीच्या जवळ जाउ नका . आरं , त्या ईहिरीमध्ये सात आसरा हाईती . त्या माणसाला भूलवून पार पाताळात घेऊन जातात . पळा तिथनं " . सदूच्या ओरड्यामूळे आणी त्या विहीरीच्या भीतीमूळे पोरं तिथून लांब पळून जात . आज सदू खूप अस्वस्थ होता .

ज्योतिष .......

लेखक झंडुबाम यांनी रविवार, 16/08/2015 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिष शास्त्र . यामध्ये विज्ञानाचा भाग किती हा खरच एक कुतूहलाचा विषय आहे . कुठलाही माणूस असू देत आस्तिक किंवा नास्तिक पण आपलं भविष्य कसं असलं पाहिजे या बद्दल एक विलक्षण कुतूहल ,जिज्ञासा . त्यानंतर भविष्य समजलं कि मग ते खरं मानायचं कि खोटं ते मात्र आपण ठरवायचं ,म्हणजे कोणी चांगलं सांगितलं तर ते छाती ठोकपणे सगळ्यांना सांगणार , आणि तेच जर काही वाईट समजलं तर मात्र हे सगळं थोतांड ठरवून मोकळं व्हायचं . मुळात जन्मवेळ देण्यात येते ती किती योग्य असते ? नर्स चे घड्याळ चुकीची वेळ दाखवत असेल तर ? लिहिताना चूक झाली तर? एक न अनेक बर्याच शक्यता .

माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग १० - व्हेनिस

लेखक अजया यांनी रविवार, 16/08/2015 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग८, भाग९ बघताबघता आमच्या सहलीचे आठ दिवस उडून गेले. आता वेध लागले होते व्हेनिसचे. इटलीला येण्याआधी प्रत्येक जण मी व्हेनिसला जाणारेना याची चौकशी जरूर करत असे.

द स्केअरक्रो - भाग ‍१८

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 16/08/2015 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १७ द स्केअरक्रो भाग १८ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) पहाट जवळपास संपत आली होती. आता कधीही उजाडलं असतं. कार्व्हरला दूरवरच्या पर्वतांच्या शिखारांमागचं आभाळ हळूहळू गुलाबी होताना दिसत होतं. तो एका मोठ्या दगडावर बसला होता, आणि समोर काम करणाऱ्या स्टोनकडे पाहात होता. तो खड्डा खोदत होता. भुसभुशीत माती संपून आता कठीण मुरूम लागला होता. त्यामुळे स्टोनला खणणं कठीण जात होतं. त्या दगडावर त्याच्या कुदळीचा आवाज येत होता.

प्रवास (कथा)

लेखक सिरुसेरि यांनी शनिवार, 15/08/2015 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
हैद्राबादच्या इमलीबन स्टेशनवरून रात्री ११ वाजताची महाराष्ट्र परिवहन मंडळाची सोलापूरला जाणारी एस.टी. बस निघायच्या बेतात होती . काही प्रवासी शेवटच्या मिनीटाला चढत होते .त्यानंतर बस लगेच निघाली . सुरेश हा नुकताच या रूटवर कंडक्टर म्हणून बदली होउन आला होता . तो प्रवाशांना तिकीटे देण्यात गुंतला होता . काही नवख्या उत्साही प्रवाशांनी सुरेशला विचारले 'मास्तर , बस सोलापूरला कधी पोचते हो ? ' . गेले काही दिवस अनुभवलेल्या ट्रॅफिकमूळे सुरेश या प्रश्नाला उत्तर द्यायला फारसा उत्सूक नव्हता . त्यामुळे त्याने काहिशा निरुत्साहानेच ' पोचु सकाळपर्यंत . ते आता ट्रॅफिकवर आहे ' असे गूळमुळीत उत्तर दिले .

अमेरिकेत स्वातंत्र्यदिनाच्या संचलनाला ३८,००० जणांची उपस्थिती !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 15/08/2015 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेतल्या न्यु जर्सी राज्यातील एडिसन नावाच्या शहरातील भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या संचलनाला ३८,००० जणांनी उपस्थिती नोंदवली ! या संचलनात २० चित्ररथ, डझनावारी जथे, ११० सभासद असलेल्या वाद्यवृंदाने आणि शंभराहून जास्त संघटनांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाला अनेक नामांकीत व्यक्तींची उपस्थिती होती. समारंभाची काही क्षणचित्रे...

.

[शतशब्दकथा स्पर्धा] "ती" चा विजय

लेखक शि बि आय यांनी शनिवार, 15/08/2015 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
आईमागून तीही चालत होती. अगदी सावधपणे पाऊले टाकत होती. रस्त्यावर चालण्याचा तीचा पहिलाच अनुभव.... आजपासून तीची शाळा सुरु होणार होती आणि गम्मत म्हणजे..... आईच शिक्षक होती. अभ्यासक्रम सुरु झाला.... आता पुढे मात्र खरी कसोटी होती... तीने प्रत्याक्षिकाला सुरुवात केली. तीने वाकून पण हळूच लपून पहिले…. त्यानेही तसेच केले… तीला अंतराचा अंदाज येईना…. तीने जागा बदलली. तो गोंधळला… ती अचानक कुठे गेली…. डावीकडे …… उजवीकडे…... मागे ……. अरे ! आत्ता होती गेली कुठे...??? तो घाबरला…. ती …. अतिसावध … शांत … आणि एकाग्र …. आणि अगदी तयारीत … तीने निमिषार्धात अंदाज घेतला ……. आणि.....

[शतशब्दकथा स्पर्धा] माझिया प्रियाला प्रित कळेना----

लेखक त्रिवेणी यांनी शनिवार, 15/08/2015 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
ती एक स्वप्नाळू, स्वप्नांच्या दुनियेत रमणारी सामान्य मुलगी. करिअर, अभ्यास यापेक्षाही चारचौघांसारखा घर, संसार, आपण आणि आपली माणसं यातच आपला आनंद मानणारी. एक दिवस तिच्या स्वप्नातला राजकुमार तिच्या आयुष्यात येतो. पण... अगदी तिच्या विरुद्ध स्वभावाचा. शांत, भिडस्त आणि अभ्यासू. फक्त अभ्यास आणि करियर यांचा विचार करणारा. आपल्या मनातल्या भावना, विचार कधीही बोलून व्यक्त न करणारा. प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायालाच हवी का? असा प्रतिप्रश्न करणारा.

६९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 15/08/2015 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
. सर्व मिपाकरांना ६९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ! .

 ...............

.

[शतशब्दकथा स्पर्धा] बायकोचा फोन!

लेखक टिल्लू यांनी शनिवार, 15/08/2015 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो " "..............." "हा, हॅलो" ".................." ".. कुठे म्हणजे? ऑफिसमधे ! ", चिडलेला आवाज. "..............." " ..... पाहिला नाही, बिझी होतो" "........" थोडावेळ शांतता. "सॉरी राणी, आता ह्या वेळेला कुठे बर असणार आहे मी ", "........" " ... बरं" "........" "........" " ..हो" "............" "............" " ..ह्म" "...................." "........" " ....ह्म" "............................" "........" "...ठिकय" "........" "......................" ".... ८ वाजेपर्यंत " "........" " नाही, खुप काम आहे आज" "........" "बर, लावतो काहितरी शेंडी." "..