परीकथा २ - (सव्वा ते दीड वर्ष) (facebook status)
...
परीकथेचे सव्वा वर्ष .. - http://misalpav.com/node/32062
.....
२० जुलै २०१५
लहान मुले खरंच किती निरागस असतात..
जिथे गल्ली क्रिकेटमध्ये सारे जण बॅटींगसाठी मरत असतात,
फिल्डींग करतानाही आपली बॅटींग कधी येणार याचीच वाट बघत असतात,
अगदी टॉसही जिथे कोणाची बॅटींग पहिली असणार, हे ठरवण्यासाठीच उडवला जातो,
तिथे आमची परी बॅट पप्पांच्या हातात देते आणि स्वत: बॉलिंग टाकायला धावते.
खरंच., लहान मुले किती निरागस असतात :)
.
.
२२ जुलै २०१५
कधी तिला शांत करणे अशक्य होते, तेव्हा शेवटचा मार्ग म्हणून आम्ही तिला जेली देण्याची लालुच दाखवतो.
मिसळपाव