बाप्पाचा नैवेद्य : मोदक
गणेशोत्सव असल्याने मोदकांच्या पाककृती देत आहे.
१) आंब्याचे मोदक
सारणासाठी साहित्य-दोन वाट्या खवलेले ओले खोबरे, एक वाटी आंब्यांचा मावा (साटे), चिमुटभर मीठ, अर्धा चमचा साजूक तूप
पारीसाठी साहित्य- दोन वाट्या तांदूळाचे पीठ, एक टेबलस्पून लोणी किंवा तेल, अर्धा चमचा मीठ, पाणी
कृती- एका पातेल्यात खोबरे, आंब्याचा मावा, तूप आणि चवीसाठी मीठ एकत्र करून गॅस वर ठेवावे. चांगले ढवळुन एक वाफ आणावी. खाली उतरवून गार होउ द्यावे.
एका पातेलीत दोन वाट्या पाणी घेउन त्यात मीठ, लोणी किंवा रिफ़ाइंड तेल (हवा असल्यास केशरी रंग) घालून उकळी आणावी.
मिसळपाव