Skip to main content

तुला मी आठवतो का गं?

लेखक एक एकटा एकटाच यांनी शनिवार, 19/09/2015 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
आजही जेव्हा स्वप्नांत तुझ्या.... रात्र रंगुनी जाते, एकएकट्या नभात तुझ्या अनोळखी रंग भरुनी जाते, दूर लुकलुकणाऱ्या चांदण्यात मग स्वत:ला हरवताना तू खरं खरं सांग तुला मी आठवतो का गं? आजही जेव्हा येण्याने तुझ्या.... आसमंत मोहरून येतो, नुसत्या चाहुलीने तुझ्या अलवार गंधाळुन जातो, धुंद मदहोशणाऱ्या निशिगंधात मग स्वत:ला विरघळवताना तू खरं खरं सांग तुला मी आठवतो का गं? आजही जेव्हा ओढीने तुझ्या.... बेलगाम वहावत येतो, हरएक अदेवर तुझ्या बावरा खुळ्यागत होतो, त्याच्या आसुसलेल्या आवेगात मग स्वत:ला भिरकावताना तू खरं खरं सांग तुला मी आठवतो का गं? आजही जेव्हा इशाऱ्यावर तुझ्या.... बेधुंद बरसत जातो, नाजुक स्पर्शाने तुझ्या चिंब शहारत जातो, ओंजळीत साठलेल्या त्याच्यात मग स्वत:ला पहाताना तू खरं खरं सांग तुला मी आठवतो का गं? आजही जेव्हा क्षितिजावर तुझ्या.... सांज रेंगाळुनी जाते, जाताना मागे आठवांच्या सावल्या सोडुनी जाते, आयुष्याच्या अश्या सांजरातीत मग स्वत:ला शोधताना तू खरं खरं सांग तुला मी आठवतो का गं?
लेखनविषय:

वाचने 5082
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

सुंदर आहे! पण ३र्‍या कडव्यात वार्‍याचा आणि ४थ्या कडव्यात पावसाचा उल्लेख पाहिजे होता, असे वाटते. कारण त्याशिवाय अर्थ थोडा संदिग्ध होतोय.

In reply to by मांत्रिक

मुद्दामून डायरेक्ट उल्लेख टाळला..... वहावणं,बरसणं ह्या क्रियापदातुन वाऱ्याचे आणि पावसाचे अस्तित्व जाणवेल असं दाखवायच होत. तरी पुढच्यावेळेस काळजी घेईन.

तिला खरंखरं काही विचारू नका. आणि प्रेमात पडला असाल तर विचारू नका की तुला मी आठवतो का म्हणून ! तुमची आठवण येईल तिला अगदी फुरसतीच्या वेळात जेव्हा तिचा वेळ जात नसेल तेव्हा तुमची आठवण येईल तिला. तुम्ही बसा च्युत्यासारखी तिची वाट पाहात ! :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डिट्टो. ;) बरं झालं सरांनीच टाकला प्रतिसाद. बाकी सब भूल के सर तुम्हाला एक पार्टी लागू. (प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं.)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही बसा च्युत्यासारखी तिची वाट पाहात ! :) सरांचा आयडी हॅक तर झाला नाही नं!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारीच प्रतिसाद ओ सर. काय पण म्हणा पण तुम्ही भारी, तुमचं लॉजिक भारी. एकूण्च लै भारी. जिंदगीभर पेडस्टल फ्यान बनून उभा केलेत तरी मुंडी हलवीत उभा राहीन. :) आपले मित्र आजच ऐकवलेत हे तत्वज्ञान. पोरी फक्त स्वतःची सोय पाहतात. अहाहाहाहा. अप्रतिम.

In reply to by ज्योति अळवणी

सौमित्र ची ती कविता मला ही खुप आवडते. बहुतेक दोन्ही कवितेचा भाव सारखा असल्यामुळे तसं वाटत असेल. पण तरीही सौमित्रच्या कवितेची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. तसाही आता बाहेर मस्त पाऊस पडतोय, ती कविता ऐकायचा मस्त चान्स जुळुन आलाय.

का हो, का? अशी, भरलेल्या जखमेवरची, खपली काढलीत?

ही कविता वाचल्यावर मला का कुणास ठाऊक ' हम दिल दे चुके सनम ' मधलं हरिहरन यांनी गायलेलं ' झोंका हवा का ' हे गीत आठवलं. प्रेमभंगी माणसांची भावना अचूक पकडणारे दोन्हीही आविष्कार!

अरेरे, गेले ते दीन गेले....नकाहो

आठवणींच्या जगात घेऊन जाणाऱ्या ओळी आहेत या सगळ्या....