Skip to main content

पायजमा

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 01/10/2015 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
(शाळेमध्ये असताना शांता शेळके यांची "पैठणी" खुपच आवडली होती. त्याचेच हे विडंबनामृत. लाभ घ्यावा. चुभुद्याघ्या) फडताळात एक गठुडं आहे, त्याच्या खाली अगदी तळाला जिथे आहेत् भरपुर चिंध्या मफलर चड्डी घोंगडं नाडा त्यातच आहे अस्ताव्यस्त बावरुन पसरलेला एक पायजमा चटेरीपटेरी फुलबॉटम रंग त्याचा काळपट भुरटा माझ्या आज्ज्याने लग्नामध्ये हा पायजमा घातला होता पडला होता सा-यांच्या पाया कमरेवर खेचत हाच पायजमा पायजमाच्या अवती भवती दरवळणारा उग्र वास जाणीवे नेणीवेची ओळख अजिबातच नाही त्यास चिकन मटन खेकड्यांतुन वरपत गेल्या किती गटारी पायजम्याने पाहीले ना शाकाहारी...

मराठी चित्रपट - "तू ही रे"

लेखक समीर_happy go lucky यांनी गुरुवार, 01/10/2015 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
तू हि रे (मराठी) मराठी चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा निर्विवादपणे तो "प्रेम" या सदैव बहारदार विषयावर बेतलेला असतो पण जर उत्तम दिग्दर्शन अन अप्रतिम संगीत (गीतांसकट आणि पार्श्वसंगीतासह) यांची साथ लाभली तर वर वर ठिसूळ वाटणारी कथा अप्रतिमरित्या चितारल्या जाऊ शकते याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे "तू हि रे" . मराठी चित्रपट हा बर्याच वेळा प्रेक्षकांना आजूबाजूला घडणाऱ्या वास्तविकतेशी साधर्म्य सांधणारा जाणवतो. आणि याच कारणामुळे कदाचित बरेच मराठी चित्रपट तग धरतात कारण मराठी मानसिकता स्वप्नाळू नाही. तुम्ही काहीही दाखवलं तर ते चालून जाणार नाही.

अतूट काही...

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 01/10/2015 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
पाप पुण्य अन् काल आजच्या पल्याडही जर असेल काही, अनादि, आदिम त्या तत्वाशी नाळ जोडली आहे माझी ... काळाची विक्राळ कातरी कापू पाहते त्या धाग्याला.. जळजळीत कधी चटके देतो तीव्र अतीव दु;खाचा प्याला.. गळ्यात बेडी अंध भक्तीची प्राण तिचे कंठाशी येती.. डोळस, निर्दय नास्तिकतेचे घाव बैसती माथ्यावरती .. पण अतूट आहे टिकून अजुनी जीर्ण बकुळीसम ती ताजी.. अनादि आदिम त्या तत्वाशी नाळ जोडली आहे माझी..
काव्यरस

पुडुचेरी: अरविंद, योग आणि समुद्र

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 01/10/2015 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
योगी अरविंद किंवा श्री अरबिंदो यांनी स्वतःविषयी म्हटले होते “मी आधी कवि आहे, नंतर क्रांतीकारी आणि मग योगी” (Spiritual Leader). आज जगाला त्यांची ओळख मात्र उलट आहे. आज पाँडिचेरी किंवा पुडुचेरी म्हटले की डोक्यात येतो तो अरविंदांचा आश्रम. शालेय इतिहासात वाचलेले क्रांतीकारी अरविंद घोष म्हणजेच योगी अरविंद हे कित्येकांना माहीती नसते. निदान मला तरी बरीच वर्षे हे माहीत नव्हते. अलीपूर बॉम्ब केसमधे इंग्रजांनी अरविंद घोष यांच्यावर खटला भरला. चित्तरंजन दास मग अरविंदांच्या मदतीस धावले आणि त्यांची आरोपातून मुक्तता केली. या काळात जेलमधे असताना त्यांना काही आध्यात्मिक अनुभव आले.

साखरचौथीचा गणपती

लेखक जागु यांनी गुरुवार, 01/10/2015 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोष! या दिवसांत बाजारपेठांतील गल्ली अन गल्ली मंगलमय रूप धारण करते. जिकडे तिकडे अत्तर, उदबत्त्यांचा सुगंध, फळांच्या गाड्यांवर फळांच्या सुबक राशी, फुलमार्केटमध्ये सजावटीची फुले, कंठ्या नी दूर्वा, सुगंधी फुलांनी मार्केट इतके मंगलमय झालेले असते की तिथून पाय पुढे निघत नाहीत. काही सजावटीची दुकाने तोरण, माळांनी घरा-घरांतील गणेशाचे स्वागत करायला सज्ज झालेली असतात. हलवायांच्या दुकानांत मोदकांच्या सुबक राशी रचल्या जातात. सीडींची दुकाने गणेश भक्तीच्या गीतांनी सुरेल झालेली असतात. गणपतीच्या आगमनापूर्वीचे दोन दिवस तर बाजारपेठ तुडुंब भरलेली असते.

औंध कास भटकंती-भाग १

लेखक अजया यांनी गुरुवार, 01/10/2015 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीबाप्पा त्यांच्या घरी परतले आणि आम्हाला भटकंतीची ठिकाणं खुणावायला लागली. मात्र दिवसाचे गणित काही जुळेना.मला क्लिनिक एक दिवसावर बंद करणे अशक्य होते.मग रविवार सोमवार कुठेतरी जायचंच ठरवलं.नेमकं तेव्हाच पेपरमध्ये कासचे फोटो येऊ लागले.गणपतीच्या दिवसात जो थोडाफार पाऊस झाला त्यानंतर फुललेले पठार.ते बघून कासला जाण्याचे निश्चित केले.रविवारी कास टाळायचे होते.

दिवाकरांच्या नाट्यछटा

लेखक खेडूत यांनी बुधवार, 30/09/2015 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी! शतशब्दकथा लिहून आणि वाचून आपणा सर्वांना भरपूर विरंगुळा मिळाला असेल.असाच काहीसा, पण शब्दमर्यादा नसलेला, मराठी साहित्यातला एक वेगळा अन जुना प्रकार म्हणजे दिवाकरांच्या नाट्यछटा. का कोणास ठाऊक, पण शतशब्दकथा आणि नाट्यछटा यांच्यात काहीतरी नातं- साम्य तरी आहे असं नेहमी वाटतं . मागे २०१२ मधे पुण्याला सकाळ वृत्तपत्रातर्फे मुले आणि मोठ्यांसाठी एक नाट्यछटा स्पर्धा घेण्यात आली. त्यात दिवाकर यांच्या मूळ आणि काही नव्या लेखकांच्या नाट्यछटा सहभागी झाल्या होत्या. हे अन्य लेखक प्रसिद्ध नसल्याने असेल, पण मोठ्या संख्येने सहभाग असूनही त्या नाट्यछटा वाचकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत.

ओलसर भिंतिंच माजघर

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 30/09/2015 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
ओलसर भिंतिंच माजघर खांबास टेकुन ति बसलेली कंदिलाच्या धुरकट प्रकाशात काय शोधतेस समोरच्या पत्रांत?? कसा शोधते गंध त्या निर्माल्यात?? झाडावर पिंगळ्याच्या चालल्या गप्पा, तु तशाच ऎकत रहाणार.. अन सकाळपासुन परत वाट पहात रहाणार.. त्याच्या न येणा~या पत्राची,,

कालचक्र

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 30/09/2015 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
कोण्या एका काळी एका दुरदेशी एक महान तपस्वी एका निबिड अरण्यात एकाकी भटकत होता. त्याची गृहस्थी सर्वदुर प्रदेशात एका कुटित आपल्या मुलांना घेऊन त्याची वाट पाहत अश्रुंचे ताटवे फुलवत राहीली. दऱ्या डोंगरे चिखल दलदल आणि ऊष्ण वाळवंट तुडवणारा तपस्वी आता या दिशाहीन प्रवासाला थकला होता. एके दिवशी एका चवदार तळयाकाठी त्याला एक बंदिस्त शुभ्र मडके सापडले. वैफल्याने ग्रासलेल्या आपल्या मळकट झोळीत त्याने ते ठेऊन दिले. एका अवाढव्य शिळेवर चढुन त्याने ते खोलुन पाहिले.