Skip to main content

बेळ्ळी

लेखक ऊध्दव गावंडे यांनी गुरुवार, 29/10/2015 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
. . जोळी डंगर्‍या बैलाची झालं कचूमचू गाळं वाटं उतरेलं चाकं असे जिंदगी चे हालं जो येते तो बोलूनचं निर्‍हा गामनं ठेवते होनं जानं काई नाई फक्त चकोन्या दाखोते कायं कोनाच्या पोटातं नाई होटावरं दिसे जातो भरळल्या आमी दाने जात्यातले जसे कई फुटीलं भोपया निंगतीलं ह्या झापळा भिता सारोल्या जातीलं कई खचूनं पोपळा आमी बापा साधे सुधे नाई समजतं कावा नोका चितं पाऊ आता बेळ्ळी लागली रे बावा

हॅपी अवर्स

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 29/10/2015 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
. . मुंबईतली एक नेहमीचीच सकाळ उजाडते. खरे तर तिची ही दुसरी सकाळ असते. पहिली तो फिरायचा पोशाख चढवून उतरतो ती आणि ही दुसरी. तिची सकाळ. आळस झटकत रेडिओ बंद करत ती उठतॆ. तो खाली फिरायला गेलेला असतो, एव्हाना तो वर यायची वेळ झालेली असते. आवरून आटपून ती बाहेर येते, मोबाईल चार्जरला लावते. दुधाची पिशवी आत आणते, चहा टाकते. तिच्याबरोबर तिचा रेडिओपण स्वयंपाकघरात येतो. तो येतो.

फुल सांगे काट्याला ………

लेखक एकप्रवासी यांनी गुरुवार, 29/10/2015 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
फुल सांगे काट्याला किती आनंद देतो मी सगळ्यांना माझ्या रूपाच, रंगाच अन सुगंधाच किती ओढ साऱ्या जणांना गोड गाण्यांत, केसांच्या वेणीत किती गुंफतात मला देवाच्या चरणाशी वाहण्याच भाग्य मिळेल काय तुला? थोडस हसून काटा बोलला फुलाला मी असताना सहज कोण छेडील बरं तुला एक काजळाचा ठिपका समज तू मला लागो ना नजर कुणाची तुला कुणाच्या चरणाशी वाहण्याच भाग्यं कधी नाही मिळणार मला ह्या कळ्याफुलाचं, वेलीपानाचं सौदर्य पाहण्याचं भाग्य काय कमी आहे मला.

विठ्ठल : शामल गरुड

लेखक दिवाळी अंक यांनी गुरुवार, 29/10/2015 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
. . माझी गंजली मुळाक्षरं साऱ्या उतान्याच ओळी पाय दुमडून बसले पाषाण देहात दडुनी कोण ठोकतं दार खुट्टा उघडेना माझा नाभी मध्ये गुत्थी आई सोडीना नाळ कानी आले अफाट चढला सादळल्या भिंतीवर मोडला रेड्याचा पाय कच्च्या जानव्याचं दोर कसं ओढलं धूड दात घुसले जीभाडात कण्ह कण्हत बसला मनचंद्या कुठल्या भोकातून वेद पडला बाहेर माझ्या अंगणात जत्था चोख्या तुक्याचा गजर जनी सोवळीच उभी कोरे घेऊन अभंग सारे

जगू द्या की त्यांना ! : शामल गरुड

लेखक दिवाळी अंक यांनी गुरुवार, 29/10/2015 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
. , जगू द्या की त्यांना जगण्याची खाज म्हणून जे-जे भोगायचं भोगतील त्या धडपडतील-सावरतील-राहतील पुन्हा उभ्या आतल्या उर्मीने ठासून मारणाऱ्या व्यवस्थेचे काढू द्या की भाऊ-बाप भर चौकात मारतील गप्पा, लग्नसंस्थेच्या तुंबलेल्या गटाराचे खोलतील मेनहोल सडलेल्या संस्कृतीचा करू द्या ना त्यांनाही विटाळ किती दिवस ओरपणार विटाळातूनच गोल गरगरीत झालेला त्यांचा देह दोन पायांमध्ये बाईपण शोधणाऱ्यान्ना मारू द्या त्य

एक माणूस मिशी काढून..............

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 29/10/2015 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
एक माणूस मिशी काढून शाळेमध्ये पोहचला बघता बघता खिडक्यांमधून वर्गात जाऊन बसला. वर्ग भरला मुलामुलींनी सुरेख हसणे पानांमधूनी हळूच पाही शाई सांडूनि, बघते का ती मान वळवूनी! हातचा राखून गणित चुकले नजर चकवून भाषा हुकली कितीक राजे आले गेले इतिहासाच्या पानोपानी.... छंद जीवाला एकच लागे रिबिनीमागचे भोळे कोडे! इकडे तिकडे बघून झाले मास्तर सगळे येऊन गेले मधली सुट्टी चिंचा बोरे मैदानावर सुटली पोरे..... वर्गासहित उठून गेले साधेभोळे हळवे कोडे! भान आले, बाहेर आला.... एक मुलगा मिशी लावून शाळेबाहेर पडला हरवलेले हळवे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला .

थोडी सागरनिळाई.. थोडे शंख नि शिंपले...!!

लेखक गवि यांनी गुरुवार, 29/10/2015 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
. . सेशल्समध्ये पहिल्यांदाच कार चालवणार्‍यासाठी बरेच लोक बर्‍याच सूचना देतात. शंभर वर्षं जगलेला मनुष्य जसा आपल्या दीर्घायुष्याचं रहस्य म्हणून दही, दोरीच्या उड्या किंवा ब्रह्मचर्य यांपैकी काहीही सर्टिफाय करू शकतो, तसं सेशल्समधे राहत असल्याच्या अनुभवावर कोणतीही सूचना ही एकदम कमांडमेंट ठरते. पण पण पण..

वाडा- लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक खुणा

लेखक pradnya deshpande यांनी गुरुवार, 29/10/2015 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
वाडा- लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक खुणा vada बीड जिल्ह्यातील माजलगावतालुक्यातील तालखेड हे छोटेशे गाव. निजामकालीन तालुका म्हणून त्याची ओळख आजही टिवूâन आहे. दहा हजार लोकवस्तीच्या या गावात नुकताच एका प्रोजेक्टच्या निमित्ताने जाण्याचा प्रसंग आला. शेतकNयांची मिटींग घ्यावयाची होती. बोळातून जाणाNया छोट्या रस्त्यावरुन आत शिरलो तसे समोर घडीव दगडात बांधलेला भला मोठा दरवाजा समोर आला.

वाडा- लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक खुणा

लेखक pradnya deshpande यांनी गुरुवार, 29/10/2015 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
वाडा- लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक खुणा वाड्याचे प्रवेशद्वार बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील तालखेड हे छोटेशे गाव. निजामकालीन तालुका म्हणून त्याची ओळख आजही टिकवुन आहे. दहा हजार लोकवस्तीच्या या गावात नुकताच एका प्रोजेक्टच्या निमित्ताने जाण्याचा प्रसंग आला. शेतकर्‍यांची मिटींग घ्यावयाची होती. बोळातून जाणाऱ्या छोट्या रस्त्यावरुन आत शिरलो तसे समोर घडीव दगडात बांधलेला भला मोठा दरवाजा समोर आला.

।। बरे झाले स्वातंत्र्य मिळाले ।।

लेखक सचिन जाधव यांनी गुरुवार, 29/10/2015 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
बरे झाले आपणास स्वातंत्र्य मिळाले ते गोरे साले रस्त्यामध्ये थूंकू देत नव्हते वेड्यासारखे रोज पाण्याने... रस्ते धूत होते. आपण किती भाग्यवान गुटका पान तंबाकू खाऊन रस्त्यात कुठेही थूंकू शकतो. छान झाले स्वातंत्र्य मिळाले ते इंग्रज साले धान्यामध्ये भेसळ करू देत नव्हते मूर्खासारखे रेशनवर सकस धान्य देत होते. आपण किती पुण्यवान दूध अन्न औषधामध्ये बेमालूम भेसळ करू शकतो. बेस्ट झाले स्वातंत्र्य मिळाले ते ब्रिटीश साले शिक्षणाचा धंदा करू देत नव्हते अडाण्यासारखे दर्जेदार शिक्षण फुकटामध्ये देत होते आपण किती विद्वान शिक्षणाचा बाजार मांडून पिढ्या बरबाद करू शकतो चांगले झाले स्वातंत्र्य मिळाले ते जुलमी साले अनाथ