Skip to main content

असचं काहीतरी

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 03/11/2015 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
पप्पूने इन्फ़िल्ड ला किक मारली ,नारायण पेठेतली एवढीशी गल्ली,इफील्डचे इंजिन रोंरावू लागले  मग फिल्मी स्टाईल ने पाय फिरवून पप्पू गाडीवर बसला, नेहमीप्रमाणे आपली सर्व समावेशक नजर अवतीभवती टाकली  रजनीकांत सारखा गोगल डोळ्यासमोर धरून त्यातल्या प्रतीबिम्बातून पाठीमागे काय चाललाय ते पाहिले, मग सर्र कन फिरवून डोळ्यावर चढवला, दारातून आत नजर  फेकली तर आजी काहीतरी बडबड करत धडपडत येतांना दिसली .  आजी काय म्हणतेय ते गाडीच्या फायरिंग मध्ये काहीच कळेना.मग चावी फिरवून इंजीन बंद केले.  "काय म्हणतेस, आजी .

कवितेवर केलेली कविता (विडंबन)

लेखक दमामि यांनी मंगळवार, 03/11/2015 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता वाचून , फार पूर्वी म्हणजे मी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाआमच्या शेजारी रहाणाऱ्या कविता नावाच्या एका तरुणीची आठवण आली. *****कविता***** कविता म्हणजे माझ्या प्रेमजीवनाचे पहिले पान कविता म्हणजे पिंजारलेल्या केसांचे सोनेरी रान कविता म्हणजे ममता कुलकर्णीचे प्रतिबींब कविता म्हणजे वाढणारे टिंब टिंब टिंब कविता म्हणजे हलवत झोपवणारी खाट (विदा सरकाईलो खटिया) कविता म्हणजे भल्याभल्यांची लागलेली वाट कविता म्हणजे सग्गळ्ळीकडून ब्युटीफुल्ल कविता म्हणजे नेहमी हरवणारा सोनेरी डूल (विदा बुगडी माझी सांडली ग, झुमका गिरा रे) कविता म्हणजे ओष्ठद्वयी

इष्टाप ( शतशब्द्कथा )

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 03/11/2015 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
दिपवाळीच्या सुट्ट्या लागल्या. सकाळधरनं लय खेळलो . किल्ला कराय अजून टाईम हाय . दिप्या म्हनला लपाछपी खेळायची . कसं म्हाईत नाय , पन दर खेपेला माज्यावच पैलं राज्य येतंय. चला, धा - इस -तीस - चाळीस - पन्नास- साट- सत्तर --- रेडी का? कोनच बोलंना ! लागलो हुडकाय … पार नाना सुताराच्या वखारीपस्नं परीट आळीपत्तर -कोनच घावंना ! गोठ्यात -गंजीत घुसून बगितलं. नानाची म्हातारी लई कावली. आता मला भुका लागल्या. लपा म्हनलं लेकांनो, म्या जातो जेवायलाच . घरला जाऊन जेवलो, बचाकभर शेंगा घिउन निगलो . नाथाच्या देवळापाशी आलो. लपाछपी इसारलोच हुतो. तर समदी पोरं दिसली माज्याफुडच चालल्याली.

गोल-गोल सोनेरी रंगाचे अनारसे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 03/11/2015 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
“माझी आजी किचनमधे माझ्या जवळ बसल्याचा मला भास होणार.आणि डायनींग-टेबलाच्या पलिकडे माझ्या दोन्ही मुली एकाग्र होऊन मला पहात असणार” सुलभा मला म्हणाली. सुलभाकडे मला दरदिवाळीला फराळासाठी बोलावलं जातं.मला अनारसे आवडतात हे सुलभालाही माहित आहे.त्यांच्या फराळात अनारसे निक्षून असायचे.मी ते आवडीने खाताना सुलभाची आजी मला टक लावून पहायची.आणि माझ्या चेहर्‍यावरचं समाधान पाहून तिही खूश व्हायची. “वाः! काय सुंदर झालेत अनारसे” असं मी म्हटल्यावर, “मोठे कष्ट पडतात बाबा!

दोन लघुतमकथा .

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 03/11/2015 07:14 या दिवशी प्रकाशित केले.
दोन लघुतमकथा .. .......................... १)एका लहानशा खेड्यात तो एकान्तवासांत राहतं होता... साथीला त्याचा लाडका इमानी कुत्रा... पुढे तो महानगरात शिफ्ट झाला.. महानगर म्हणजे वेगवान जीवन..माणसांची गर्दी.. तो हळूहळू माणसात मिसळू लागला... जस जसा तो माणसात मिसळू लागला संवादु लागला.... तसतसे त्याला आपला लाडका कुत्रा जास्त आवडू लागला ......... २)तरुणपणीच त्याला असाध्य अश्या हृदय विकाराचा रोग मागे लागला.. सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्या घेत आयुष्य कंठत होता.... आईस खूप काळजी वाटायची.

केस विस्कटलेले, ओघळले काजळ गाली

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 03/11/2015 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
केस विस्कटलेले, ओघळले काजळ गाली रागाने चेहरा लाल,आठी शोभते भाळी किती समजवू,किती सांगू?तुज पटवू कसे? भार्ये,तुज वाचून ,मम ह्रुदयी दुसरी कोण वसे? काल भेटली ति मम कार्यालयीन सहकारी होती, रीत म्हणून थांबलो, बोलायची तसदी घेतली होती मोजून १० मिनिटे पण तिच्याशी नाही बोललो सखे तरी तासभर "गुलुगुलू" चालले होते तुज का वाटे असे? जनरीत म्हणून स्मित हास्य करून तिच्यासंगे बोललो तरी का म्हणते "दात काढून, लघळ पणे" वागलो? कार्यालयीन कामात सहकार्य देईन असे मी म्हटले, तरी "निर्लज्या सारखा पुढे पुढे करतो" तुज असे का वाटले? ति सुमार रूपाची, साधारण तरुणी असे, तरी"मेली,चटक चांदणी, नट मोगरी" का तुज भासे? मी सभ्

शब्द गोठून गेले अर्थाविन ............

लेखक एकप्रवासी यांनी सोमवार, 02/11/2015 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द गोठून गेले अर्थाविन हरवून गेले सूर तालाविन गातो रोज तेच गाणे आळवतो त्याच पक्ती चित्तावीण वाटे सौदर्य पाहून मोगऱ्याचे घेयील जवळ कोण त्यास गंधावीण पडती थेंब अंगावरती पाण्याचे भिजून ही न भिजलो सरीवीण सरळ जगणे मग काय कामाचे अर्थ ही ना उरे त्यास वळणावीण

अरसिक?

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी सोमवार, 02/11/2015 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
नवीनच लग्न मधुच॑द्राची रात फुटे कवीस कवीतेचा उमाळा अहो आश्चर्य काय त्यात? करे कल्पना॑ची बरसात उडवे उपमा अल॑कारा॑ची खैरात फुट्ती लाह्या॑सारख्या कविता काही ख॑ड न त्या॑त एकएकूनी कविता तयाच्या पत्नी जाई क॑टाळून ला॑बलचक देई जा॑भया मुखच॑द्रमा अन ताणून रात्र तशी फार न झाली डोळे मात्र जडावले कविता तयची निद्रानशावर रामबाण उपाय दिसे पत्नीचा चेहरा पाहून अखेर तो था॑बला जाणवूनि निरुत्साह तिचा तो थोडसा चिडला ''एव्हढी कशी तु अरसीक?'' तो बोलला रागाऊनी एकून बोलणे ते रागावली मग तीही ''मी अरसीक काय?'' बोलूनी तिने, त्यास मिठी मारली! तिच्या रसीकतेची त्यास अहा! पुरेपुर खात्री पटली!
काव्यरस