Skip to main content

केस विस्कटलेले, ओघळले काजळ गाली

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 03/11/2015 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
केस विस्कटलेले, ओघळले काजळ गाली रागाने चेहरा लाल,आठी शोभते भाळी किती समजवू,किती सांगू?तुज पटवू कसे? भार्ये,तुज वाचून ,मम ह्रुदयी दुसरी कोण वसे? काल भेटली ति मम कार्यालयीन सहकारी होती, रीत म्हणून थांबलो, बोलायची तसदी घेतली होती मोजून १० मिनिटे पण तिच्याशी नाही बोललो सखे तरी तासभर "गुलुगुलू" चालले होते तुज का वाटे असे? जनरीत म्हणून स्मित हास्य करून तिच्यासंगे बोललो तरी का म्हणते "दात काढून, लघळ पणे" वागलो? कार्यालयीन कामात सहकार्य देईन असे मी म्हटले, तरी "निर्लज्या सारखा पुढे पुढे करतो" तुज असे का वाटले? ति सुमार रूपाची, साधारण तरुणी असे, तरी"मेली,चटक चांदणी, नट मोगरी" का तुज भासे? मी सभ्य, संयमीत,साधारण पुरुष ,हे तुज ज्ञ्यात आहे, असे "बावळटच" त्यांना आवडतात ,असे का सुनावत आहे? विधिवत पाणी ग्रहण करून,मी हातात घेतला हात कशी सोडीन मी, सखे, मधूनच तुझी साथ ? हे विधात्या, तू हिला,लावण्य, सौंदर्य बहाल केले पण, रुख्मीणी ऐवजी भामेचे मन का दिले? अविनाश..
लेखनविषय:

वाचने 2953
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

प्रतिक्रीया जरी तद्कालीन घटने बद्दल असली तरी अशी प्रतिक्रीया येण्यासाठी इतिहास जास्त जबाबदार असतो. किंवा दुसर्या शब्दात जिकडे दूर असतो तिकडे आग ही असतेच. पैजारबुवा,

आज अकुंची कविता चक्क आवडली आहे. कमाल आहे! दमामि, तुमचा असा अनुभव येऊ द्या. आय एम व्हेरी शुअर यू हॅव अ डॉक्टरेट इन धिस सब्जेक्ट! :=))

असे "बावळटच" त्यांना आवडतात
. . . . खरी सद्य परिस्थिती आहे,म्हणूनच आमच्यासारखे "सभ्य" अजून सिंगल आहेत