Skip to main content

घोरणारा आत्मा.........

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 12/11/2015 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
घोरणारा आत्मा......... "कांदे पोहे" चा रीतसर कार्यक्रम झाला.. मंदार ला वसुधा पसंत पडली.. मंदारने होकार कळवला व साखरपुडा झाला.. लग्नाची तारीख ठरली व वसु च्या घरी लग्नाची तयारी सुरु झाली.. मंदार नगर पालीकेत लीपीक म्हणुन काम करत होता..सरकारी नोकरी.शांत नीवांत जीवन..२ रुमचा स्वत:चा फ्ल्याट होता.. मंदार ला आई वडील नव्हते.. वसु त्याला मना पासुन आवडली होती.. भेटी गाठीत मंदार चा शांत स्वभाव वसुला आवडला.

माझी चादर कोनी चोरीयली

लेखक सतिश गावडे यांनी गुरुवार, 12/11/2015 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : माझा कोंबरा कोनी मारीयला माझी चादर कोनी चोरीयली नं माझी चादर कोनी चोरीयली माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २ सोलापूराशी मिनी आनीली नं मयतराने मना भेट दिली सोलापूराशी मिनी आनीली नं मयतराने मना भेट दिली नं माझी चादर कोनी चोरीयली माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २ माझ्या चादरीच्या फुल्या माझ्या चादरीच्या फुल्या नं त्या मी निरमाने धुतल्या नं त्या मी निरमाने धुतल्या माझ्या चादरीच्या फुल्या नं त्या मी निरमाने धुतल्या नं माझी चादर कोनी चोरीयली माझी चादर कोनी चोरीयली...
काव्यरस

शब्द-जोड्शब्द

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 12/11/2015 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्नाला उत्तर द्यायचे काही कारण होते का? ते सुद्धा भर पंक्तीत. गप्प बसायचे. मोठ्याने विचारला म्हणुन काय झाले? इतरांचा विचार करायला नको. किती ठसके? किती उचक्या? अन्न नलिकेत कण गेला असता तर किती वांधे झाले असते? ..... सकाळी नाश्त्याला गुळ,मध आणि कुमठा मसाला चे कालवलेले(शहाळ्याच्या पाण्यात भिजवलेले) पोहे २ प्लेट. मिक्स ग्रेन तिखट पुर्या ६ (३इंच व्यास) वांगी बोंडा २ (६ इंच व्यास) वांगी खास गावावरुन मागवलेली मोठ्या पपईच्या आकाराची. पण ३ वाजलेले होते.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय: निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 12/11/2015 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, छायाचित्रणकला स्पर्धेच्या १४व्या भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. प्रवेशिका व स्पर्धेसाठी नसलेली छायाचित्रेही एकाहून एक होती. मत नोंदवणार्‍या अनेक मिपाकरांनीही हीच भावना व्यक्त केली आहे. तृतीय क्रमांक मिळाला आहे, मिनियन यांच्या येलोस्टोन तलावाच्या छायाचित्राला.

अंजीर बर्फी

लेखक Mrunalini यांनी गुरुवार, 12/11/2015 02:40 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः सुकामेवा = १ कप सुके अंजीर = १५-२० (४ तास पाण्यात भिजवुन) खजुर = ७-८ तुप = ३ चमचे वेलची पावडर = १ छोटा चमचा जायफळ पावडर = १ छोटा चमचा कृती: १. एका पॅनमधे सुकामेवा मंद गॅसवर परतुन घ्यावा. b1 २. मिक्सरमधे भिजवलेले अंजीर आणि खजुर बारीक वाटुन घ्यावे. b2 ३.

सांज प्रहरी

लेखक तिमा यांनी बुधवार, 11/11/2015 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
राम प्रहरी, या सुंदर गाण्याचे एक करुण विडंबन. सर्व पीडित स्त्रियांना अर्पण मूळ गाणे: http://www.aathavanitli-gani.com/Song/Ram_Prahari_Ram_Gatha सांज प्रहरी मार गाथा, वेदना ओठांवरी या वळांनी आसूडाचे चित्र हे पाठीवरी आवडीने चोळितो तो मीठ हे जखमांवरी मार खाता क्षीण काया कोसळे या भूवरी एककल्ली, संशयी तो, नशाधुंदी ज्या सदा भोगदासी मी तयाची दु:ख साही सर्वदा तोचि तारण, तोचि मारण, तोचि माझा सोयरी
काव्यरस

पुणे भेट

लेखक अद्द्या यांनी बुधवार, 11/11/2015 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी सुट्टी असून सुद्धा काम देतात च्यायला . लाज लज्जा शरम सगळं विकून आलेत हे लोक. कॉम्प ऑफ आणि एक्स्ट्रा पे ची लालूच दाखवून काम करवून घेतात . आणि आम्ही त्याला बळी पडलो . पण जाऊदे . संपलीच दिवाळी . तर , मुद्दा असा कि लैच कटाळा येतोय . आणि कोकणात जाण्यास सोबती मिळत नाहीये . पण बेळगावातून बाहेर पडायचं आहे , आणि पुण्याशिवाय दुसरी जागा सुचत नाहीये . त्यामुळे , पुढल्या रविवारी(म्हणजे २२ नोवेंबर ला ) पुण्यात येणे होईल . होऊन जाऊद्या एक कट्टा . काय म्हणता ?? वेळ :- सकाळी ५ - ६ दरम्यान पोचेन .

भूतकथा - किल्लेदार

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 11/11/2015 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
(*सूचना - फेसबुक वरील लोकप्रिय पेज भुताटकी (4400+LIKES) या पेज वरील लोकप्रिय कथा इथे देत आहे .

पेढे

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 11/11/2015 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या देशात पेढे, चितळ्यांची बाकरवडी असले काही पदार्थ मिळत नाहीत मग असे काही खायचे असेल तर दोन पर्याय उरतात एक म्हणजे मायभूत गेले की खाऊन, बांधून घ्या नाहीतर इथे घरी करा. लक्ष्मीपूजनासाठी नैवेद्याला पेढे करायचे म्हणजे खवा घरी करण्यापासून तयारी, मग काहीतरी आयडिया लढवता येते का पाहिले आणि जादूची कांडी फिरून अवघ्या ५ मिनिटात पेढे फक्त वळायचे बाकी राहिले. तर आजच्या लक्ष्मीपूजनासाठीचे हे पेढे- साहित्य- १ कप मिल्क पावडर(मी नेस्ले ची निडो घेतली.), ५ ते ६ चमचे मिल्कमेड(नेस्लेचे मिलकमेड घेतले), २ टेबलस्पून साजूक तूप, २ टे स्पून पिठीसाखर (मिल्कमेड गोड असते त्यामुळे साखरेची गोडी आवडीनुसार कमी जास्त

चीनमधील "अकेले अकेले" - आज आहे ११/११

लेखक शेखरमोघे यांनी बुधवार, 11/11/2015 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज आहे ११/११ - चीन मधील एक महत्वाचा दिवस, आणि बहुतेक जगात इतरत्र कुठेही "साजरा" न होणारा दिवस (निदान चीन मध्ये होतो तितक्या जोरात) ! तुम्हालाही बहुतेक माहीत नसेल आज चीनमध्ये काय धमाल होते आहे - तेव्हा सांगतो.