Skip to main content

कॅलरी

लेखक दमामि यांनी मंगळवार, 24/11/2015 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्ना गॅलरी एक हात ढेरीवर ठेऊन, अन दुसरा उगाच पाठीमागे घेऊन, मी उभा आहे, गॅलरीत! तुझ्या झुलत्या एअरवॅाकर बरोबर पाय दमून गेले फार! इथेच बसून नाही का लावत तुझ्या ट्रेडमिलचा पट्टा पायाला! नाही.....बारीक नव्हतोच कधी गुटगुटीत होतो खूप म्हणून कॅलरीज नाही उतरत आजही! मला नाही जमत पळायला, त्या कॅलरीज जाळायला! इतकं सारं पोहूनही स्लिमबिम होणं नाही जमत मला ! पण....तू तिथे भजी बनवलीस कि इथे माझा डाएटमोड होतो एवढेच बारीक जाणवते! अन, अवेळी उठून मी एक हात ढेरीवर ठेऊन उभा राहतो गॅलरीत तू हाक मारेपर्यंत.....!
काव्यरस

बिहारचा प्रवास उलट ?

लेखक shawshanky यांनी मंगळवार, 24/11/2015 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
बिहार विधानसभा निवडणुकीचे कवित्व अद्याप संपलेले नाही. नीतिशकुमार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आणखी काही काळ सुरू राहणार आहे. त्यास कोणाची हरकत नसावी कारण नीतिश हे अत्यंत मवाळ आणि नेमस्त नेते आहेत.बिहारचा विकासदर देशाच्या विकासदरापेक्षा जास्त करून दाखविण्याची किमया त्यांनी साधली होती. मात्र चेहऱ्यासाठी बिहारी जनतेने मतांचे भरघोस दान केले त्या नीतिश यांचा चेहरा गेल्या काही दिवसांत भाजपच्या कमळापेक्षाही जास्त कोमेजलेला दिसतोय.

महापौर बंगल्याचे सेनेला चॉकलेट !!

लेखक अनिकेत एस जोशी यांनी मंगळवार, 24/11/2015 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
सरता सप्ताह दीपोत्सवाचा होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. जरी बिहारमध्ये भाजपाचा सपशेल पराभव झालेला असला तरी कल्याण डोबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी चांगल्या जागा मिळवल्या असल्यामुळे ‘वर्षा’वरचे वातावरण बरे होते. शिवाय तिकडे कोल्हापुरातही ताराराणी आघाडी समवेत भाजपाचा महापौर बसू शकतो अशी एक शक्यता सुरुवातीला वाटू लागली होती. त्यामुळे त्याही आघाडीवर भाजपात वातावरण आनंदाचे होते. असा या साऱ्या आनंदमयी वातावरणात त्या आधीच्या पंधरा वीस दिवसांचे सारे राजकीय कवित्व विसरून जाण्याचेचे संकेत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांनी दिलेच होते.

ढकलपत्रे....

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 24/11/2015 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
ढकलपत्रे करा, पण केवळ ढकलपत्रेच वाहिली तर माथाडी कामगार बनाल. स्वत:चे काही लिहा रे please ! ईश्वराने लिहिण्याची शक्ती फक्त माणसालाच दिली आहे. ती लोप होऊ देऊ नका. मिसळपाव चा पुर्ण फायदा घ्या आणि लिहिते व्हा ! ------------------ कोणीही स्वत:चे लिहू शकतो.. त्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय कसे होणार? ------------ आज असेच आणखी एक ढकलपत्र समोर आले, त्याला हे माझे उत्तर--> ..................................... काहीच बदललेले नाही. बदलली आहे ती फक्त ऑफीसची जागा. पूर्वी ऑफीस सिमेंटच्या भिंतीत होते, आता आभासी आहे. त्यामुळे आता देखील, 'Window' म्हणजे स्क्रीन वरील एक 'खिडकी' च आहे.

जंटलमन्स गेम - ४ - फायर इन बॅबिलॉन

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 24/11/2015 05:54 या दिवशी प्रकाशित केले.
१९७६ चा फेब्रुवारी महिना... गयानामधल्या आपल्या घरी बसून तो विचारात बुडून गेला होता.. नुकताच अत्यंत दारूण पराभव त्याच्या पदरी पडला होता! चाणाक्षपणे लावण्यात आलेल्या एका मोठ्या सापळ्यात सापडल्याने अक्षरशः वाताहात झाली होती.. काय करावं? या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं? आपल्या पराभवाला नेमकं कोण कारणीभूत ठरलं असावं? आपले डावपेच चुकीचे ठरले! त्यांनी बरोबर आपली शिकार साधली! एकदा! फक्तं एकदाच! पुन्हा कधीही अशी संधीही कोणाला द्यायची नाही! ज्या तंत्राचा वापर करुन त्यांनी आपला पराभव केला तेच तंत्रं आपण वापरलं तर कोणालाच आपल्यापुढे उभं राहणं जमणार नाही! येस!

दिवाळी कुणाची?

लेखक आनंद कांबीकर यांनी सोमवार, 23/11/2015 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
"ये आये, दिवाळी कधीच्याला हाय गं!" "हाय उंद्याच्याला" "आये, मंग तू दाळीचे लाडु कव्हा करणार हैस" "करतीना उंद्याच्याला" "आये, त्वा रोजच् उंदया उंदया म्हंतीस" "मंग जाय रासन आलं का नय ते यी बघुन. रासनात दाळ येणार हाय " __________________________________________________________________________ रातपासुन पांधीत दबा धरून बसलेले दोन ट्रक नानासाहेबाच्या मळयाकड़े निघाले. त्यातला एक ट्रक अजुन तसाच होता, अगदी सीलबंद. दुसऱ्या ट्रक मधली अर्धी निम्मी पोती पांदितच काढुन ट्रॅक्टरणे गावांत पाठवली. ट्रॅक्टर राषन दुकानसमोर येताच, राषन आल्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. थांबलेल्या दिवाळीत उत्साह संचारला.

अन्नदाता सुखी भव भाग ६ - आज काय बरे खावे - सामिष का निरामिष? का पुठ्ठा किंवा गवतच बरे ?

लेखक शेखरमोघे यांनी सोमवार, 23/11/2015 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 शीर्षकच गोन्धळवून टाकणारे वाटते ना ?

आठवणी अज्ञातांच्या

लेखक निशदे यांनी सोमवार, 23/11/2015 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात किती लोकांना भेटतो आपण? जन्माला आल्यापासून सुरू झालेली भेटीगाठींची शृंखला अगदी मरणापर्यंत चालू असते. यातले काही लोक अगदी चटकन आयुष्याचा एक भागच होऊन जातात तर काही तितक्याच सहजपणे विस्मरणात जातात. प्रत्येकाच्या स्वभावाची, विचारांची आणि सहवासाची वेगळी छाप आपल्या मनावर पडून जाते. अशा सुहृदांच्या सहवासात गेलेले अनेक क्षण नंतरच्या आयुष्यात आठवणींच्या रुपाने आपल्याला आनंदी करत असतात, पण इतक्या सहजतेने जगू देईल ते मन कसले!!! ज्ञात-अज्ञाताच्या सीमारेषेला सहज पार करून मन एखाद्या सुप्त आठवणीने अशी हुरहुर लावते की काही केल्या मन शांत होत नाही.

चाललो मी आता टॅम्पोत बसुनी

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 23/11/2015 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
चाललो मी आता टॅम्पोत बसुनी खाऊनी मिसळ, आनंदाने वर्षाव फुलांचा होई तिन्ही लोकी टाकुन गियर, भक्तिभावे सांगा रे सांगा रे जाऊ कुठे आता फिरुनी गावे, दमला जीव काढुनी तलवार हे द्वंद्व माजे पेटवुनी दिले, रान सारे नाही रे नाही रे आता भिती कसली भिडलो मी साक्षात, यमराजाशी काढा रे टॅम्पो बसतो मी तयात जाऊद्या आता, काढीतो लक्तरं शोधिला मी स्वर्ग सुनासुना टाकितोय तेथे, आयटमबॉम्ब येईल परतोनी नव अवतार घेऊनी विरझन, कहर कहर -घंटेश

स्वप्न सुंदर

लेखक माहीराज यांनी सोमवार, 23/11/2015 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नातल्या फुलांची स्वप्नात भेट झाली,  हलकेच पापणीला हळूवार जाग आली. रातराणीचा गंध वेडावून गेला मना जीवनाला नवा रंग आला खुलावल्या कळ्यांना आशा नवी मिळाली अन् हलकेच पापणीला हळूवार जाग आली. धुके हे अनामिक मनी साठलेले स्वच्छंद स्वप्न हे उरी दाटलेले ओलावल्या क्षणांना छेडून आस गेली अन् हलकेच पापणीला हळूवार जाग आली. पहाट ही ओली सुखावून जाते बावरे मन हे मग शहारून जाते गोड त्या स्वप्नांनी मने भारावून गेली अन् हलकेच पापणीला हळूवार जाग आली.
काव्यरस