Skip to main content

पर्सनल स्टाईल ब्लॉग

लेखक रसिकामहाबळ यांनी मंगळवार, 12/01/2016 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठून कपाटातील कपड्यांकडे 'आज काय घालाव' असा विचार करत तुम्ही बराच वेळ उभे राहिले आहात? काही गोष्टी चढवून न आवडल्याने ३-४ वेळा बदलाबदली केली आहे? मी अस बऱ्याच वेळा केल आहे. माझ्या मते तुमच्या पैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आला असणार आहे. पर्सनल स्टाईल ब्लॉग काय असतो? लोक त्यांचे फोटो ब्लॉगवर पोस्ट करून त्या वस्तू कुठून घेतल्या आहेत ह्याची माहिती पुरवतात, ही माहिती मग इतर चौकस मंडळी वापरू शकतात.

एका सायकल चा शोध...

लेखक sagarpdy यांनी मंगळवार, 12/01/2016 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
श्री मोदक दादा व मार्गी साहेब व अन्य मिपाकर सायकल प्रभृतींना वंदन करून "सायकल कशी निवडावी?" हा विषय हाती घेत आहे. चू.भू.दे.घे. सायकल नियमितपणे चालवून बरेच दिवस झाले होते. ज्यू. कॉलेज संपल्यावर माझी सायकल कनिष्ठ बंधूंच्या हाती सोपवून रेल्वे/बस ने प्रवास सुरु झाला. नंतर मोटर सायकल आली. सायकल ने 'गरज' म्हणून प्रवास थांबलाच. विकांताला मनोरंजन / भटकंती म्हणून ट्रेकिंग सुरु होतेच. अशात ओळखीतल्या २-३ लोकांनी भारीतल्या सायकली घेऊन भटकंती सुरु केली. आणि सायकल बद्दल परत आकर्षण निर्माण झाले. मोदक दादांशी ट्रेकिंग च्या माध्यमातून ओळख होतीच.

दुरचा कट्टा (भाग २)

लेखक कविता१९७८ यांनी मंगळवार, 12/01/2016 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दमल्यामुळे छान झोप लागली तिघींना. दुसरा दिवस उजाडला, उठल्या उठल्या नाश्ता बनवण्याच्या विचारात होते कारण त्यासाठी स्पेशल पराठे तर ठरवले होते पण ऐनवेळी बटाटे विकत घ्यायचे विसरल्याने आता काय नाश्ता करावा या संभ्रमात होते, कारण पोहे, उपमा, इडली यासारखे पदार्थ तर कॉमन आहेत नेहमीच खाल्ले जातात, मला असा काहीसा नाश्ता बनवायचा होता जो या दोघींना खुप आवडेलही आणि बरेच दिवस लक्षातही राहिल. मग सुरुवात केली फक्कड चहाने आणि ब्रेड टोस्टने. सुरंगीताई नॉनवेज असल्याने मस्त माझ्या इनोवेशन स्टाईलने तीला गावठी कांद्याची पात घालुन ऑमलेट बनवुन दिलं. स्वरा साठी काहीतरी नवीन करायचं म्हणुन मग खाकरा भेळ केली.

पत्रं

लेखक मनीषा यांनी मंगळवार, 12/01/2016 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
( काही वर्षांपूर्वी लिहिलेली आहे ... आत्ता आठवली ) पत्रं लिहिण्यास कारण कि ... आजची सकाळ खूप छान होती कसलीच मला घाई नव्हती घड्याळाचा बंद करून गजर ठरवले लवकर उठायचेच नाही | रोजची धावपळ , गोंधळ गडबड ऑफिसची वेळ गाठायची धडपड त्यातच सतत वाजणारा फोन माझ्यासाठी अजिबात नसते सवड | संध्याकाळची ही न्यारी तऱ्हा सगळेच प्लान्स - तीन - तेरा अर्जंट मिटींग , कॉन्फरन्स, कॉल्स संपता संपता रात्रीचे बारा | आज मात्रं तसे काहीच नाही कारण तुझी ती अमेरिकावारी .. स्वैपाकाला सुट्टी, शाळेला बुट्टी आनंदी आनंद - घरी अन दारी | पण माहीत नाही असं का ?

शेवटी संपन्न हा वनवास झाला..

लेखक drsunilahirrao यांनी मंगळवार, 12/01/2016 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
जो जसा झाला तसा, पण खास झाला शेवटी संपन्न हा वनवास झाला पाप माझे राहिले शाबूत अवघे पुण्यकर्माचा त्वरेने र्हास झाला मी जरी अध्यात ना मध्यात होतो केवढा दुनियेस माझा त्रास झाला देव प्रत्यक्षात नाही पाहिला मी पण मला दगडात त्याचा भास झाला जीव कोठेही कधी रमलाच नाही मग असा नुसताच टाइमपास झाला डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

सोशल नेटवर्किंग (भाग ६)

लेखक लाडू. यांनी मंगळवार, 12/01/2016 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
'sorry पण सध्या मी इथे नसणार आहे दोन महिने. एका कामासाठी जर्मनीला जातोय परवा. परत आल्यावर बोलूच. see you.'मल्हारचा हा असा मेसेज सिद्धांतला अनपेक्षित होता. त्याने फक्त दोन शक्यता गृहीत धरल्या होत्या. एकतर हो किवा नाही. पण आता मल्हारला भेटण्यासाठी दोन महिने वाट पहावी लागणार होती. या एकूण प्रकरणातच काहीतरी प्रोब्लेम आहे असे सिद्धांतला वाटत होते. इथे मयंकही गाल फुगवून बसला होता. त्याचे चित्त थाऱ्यावर आणणे गरजेचे होते. त्याने कॉम्पुटर लावला. आणि मयंकला हल्लीच store केलेले नवनवीन wallpaper दाखून लागला. हा सिद्धांताचा छंद होता.

गोमांस

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी मंगळवार, 12/01/2016 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
सगळं सगळं ओरबडुन घेऊन रात्र कणाकणाने वाढते जोश, उर्मी......नष्ट करून ! चूरगळलेले भडक ओठ आक्रसलेला पावडरच्या पुटांचा चेहरा...

बाथरूमचे सौंदर्य सोप ...

लेखक मार्मिक गोडसे यांनी मंगळवार, 12/01/2016 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याच्याशिवाय बाथरूम अपुर्ण आहे अशा आंघोळीच्या साबणाला बाथरूमध्ये मानाचे स्थान असते. बाथरूममध्ये त्याच्या बैठकीची खास व्यवस्था केली जाते. जितक्या प्रकारचे बाजारात साबण आहेत त्याहूनही अधिक प्रमाणात त्याच्या बैठकीचे प्रकार आहेत. टाईल्समधील सोप डिश्,प्लॅस्टिक ते स्टेनलेस स्टीलपर्यंत विवीध आकारच्या आकर्षक सोप डिश मिळतात. शरीर स्वच्छ ठेवणारा हाच साबण आपल्या अस्तित्वाच्या खुणा सोप डिशवर सोडतो. ही डिश वेळच्यावेळी स्वच्छ केली नाही तर साबणाचे ओघळ व डिशला चिकटलेले साबणाचे तुकडे डिशचे व पर्यायाने बाथरूमचे सौदर्यच खराब करुन टाकते.