दुरचा कट्टा (भाग २)
खुप दमल्यामुळे छान झोप लागली तिघींना. दुसरा दिवस उजाडला, उठल्या उठल्या नाश्ता बनवण्याच्या विचारात होते कारण त्यासाठी स्पेशल पराठे तर ठरवले होते पण ऐनवेळी बटाटे विकत घ्यायचे विसरल्याने आता काय नाश्ता करावा या संभ्रमात होते, कारण पोहे, उपमा, इडली यासारखे पदार्थ तर कॉमन आहेत नेहमीच खाल्ले जातात, मला असा काहीसा नाश्ता बनवायचा होता जो या दोघींना खुप आवडेलही आणि बरेच दिवस लक्षातही राहिल. मग सुरुवात केली फक्कड चहाने आणि ब्रेड टोस्टने. सुरंगीताई नॉनवेज असल्याने मस्त माझ्या इनोवेशन स्टाईलने तीला गावठी कांद्याची पात घालुन ऑमलेट बनवुन दिलं. स्वरा साठी काहीतरी नवीन करायचं म्हणुन मग खाकरा भेळ केली. खाकरा भेळ खुप चविष्ट लागते म्हणुन जास्तच बनवली , गप्पा मारत असताना ती अंमळ जास्तच खाल्ली गेली. मग आवरुन गेलो बोईसरच्या मासळी बाजारात.
रावसाचं ओलं खारं घेतल्यावर सुरंगीताईने शिवंड्याकडे मोर्चा वळवला , मग सोललेली छोटी करंदी आणि नंतर जिळा कोलंबी अशी छान खरेदी करुन बाहेर आलो, स्वरा वेज असल्याने तिने मासळी बाजारात पाय टाकण्याचा प्रयत्न तर केला पण तो तिला फार काळ टीकवता आला नाही आणि आम्ही आत मासळीबाजारात बागडत असताना तीने मासळीबाजारातुन काढता पाय घेतला. नंतर स्वारी वळाली आमच्या जुन्या घरी. तिथे आवभगत झाल्यावर गप्पा मारत आम्ही निघालो वसतीस्थानाकडे. तोपर्यंत १२ वाजले होते. आता खरी माझ्या कसोटीची वेळ होती. स्वरामुळे आधी वेज शिजवण्याचा बेत होता, रावसाचं खारं बनवायला बहीणीकडे दिलं होतं , आणि सुरंगीताईने जिळा कोलंबीचं थोडं सुकं बनवते असे सांगितले म्हणजे आता वेज प्रकार चविष्ट बनवण्याची जबाबदारी माझी होती. भराभर हात चालवले, मटारची भाजी , वरण - भात बनवला. तो पर्यंत सुरंगी ताईने सर्व प्रकारची कोलंबी साफ करुन घेतली. मधे मधे ती स्वराला ताजे मासे कसे ओळखावे याचे धडे देत होती जणु काही स्वरा इतक्या कौतुकाने ऐकत होती जशी काही आता लगेचच टोपली - पाटी घेउन बोटीवर मासे विकत घ्यायला जाणार होती.
जेवण झाल्यावर वाढुन घेतले, तो पर्यंत बहीणीकडुन रावसाचे कालवण आणि तळलेले तुकडे दोन्ही घेउन आले. जेवायला बसलो, पाने घेतली ती धाकधाकुनेच कारण सुरंगीताई सारख्या सुगरणीपुढे आपण ते काय? काय वाटेल सुरंगीताईला? इथली लोकल पद्धत आवडेल की नाही? या विचारात होते नव्हतेच तोच सुरंगीताईने माझ्या बहीणीने केलेलं रावसाचं कालवण चाखलं आणि...............................................
वाह , मस्त असे उद्गार निघाले तिच्या तोंडातुन, एवढे बरे वाटले म्हणुन सांगु. ती तर एकदम फॅनच झाली, म्हणाली पुढच्या वेळी तुझ्या बहीणीच्या बाजुला उभी राहुन शिकुन घेईन ही पद्धत. एका सुगरणीकडुन मिळालेले अॅप्रिसिएशन काही औरच! माझ्या सुदैवाने वेज प्रकार ही चांगला झाला होता आणि सुरंगी ताई ने बनवलेले जिळ्याचे सुके ही अप्रतिम झाले होते. यथेच्छ ताव मारला आम्ही तिघींनी जेवणावर. जेवण संपल्यावरही बराच वेळ तिथेच बसुन आम्ही खुप गप्पा मारल्या अगदी उष्टा हात सुके पर्यंत. ३ वाजले मग उठलो कारण ४ वाजता दोघींना परत जायचे होते, मग तयारी करुन बॅगा भरुन खाली उभ्या असलेल्या गाडीत सामान भरुन निघालो माझ्या बहीणीकडे. तिथे कॉफी घेउन मग निरोप समारंभ झाला. जड मनाने निरोप दिला. पण स्वरा आणि सुरंगी ताईने पुन्हा येउच असे सांगितल्याने बरे वाटले. माझ्या कडुन त्यांच्या सरबराईत काही कमी पडले असेल तर............................................................................. त्यांनी ते अज्जिब्बात सांगु नये. नाहीतर पुढच्या वेळेस स्वराला नॉनवेज आणि सुरंगीताईला वेज खायला लावीन. समजलं काय??????????????????

वाचने
6486
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
फोटु काही दिसेचिना!! :(
In reply to फोटु काही दिसेचिना!! :( by सूड
दिसतायत मला तर
वा!! छान वॄतांत! मजा केली
स्लर्र्र्र्र्र्र्प!
कविताची आक्का सुगरण आहेच,अगदी
कवितानेही वेज छानच बनवला
अरे वा,
चलो बोईसर कट्टा करेंगे,
लै भारी!
फोटू व वर्णन चांगले झाले आहे.
रेवाक्काशी बाडिस!
मस्त मस्त कट्टा. आता कवीकडे
भारी फोटो
मस्त मजेत झालेला कट्टा !
मस्त वृत्तांत. मजा केलीत कि