ज्याच्याशिवाय बाथरूम अपुर्ण आहे अशा आंघोळीच्या साबणाला बाथरूमध्ये मानाचे स्थान असते. बाथरूममध्ये त्याच्या बैठकीची खास व्यवस्था केली जाते. जितक्या प्रकारचे बाजारात साबण आहेत त्याहूनही अधिक प्रमाणात त्याच्या बैठकीचे प्रकार आहेत. टाईल्समधील सोप डिश्,प्लॅस्टिक ते स्टेनलेस स्टीलपर्यंत विवीध आकारच्या आकर्षक सोप डिश मिळतात.
शरीर स्वच्छ ठेवणारा हाच साबण आपल्या अस्तित्वाच्या खुणा सोप डिशवर सोडतो. ही डिश वेळच्यावेळी स्वच्छ केली नाही तर साबणाचे ओघळ व डिशला चिकटलेले साबणाचे तुकडे डिशचे व पर्यायाने बाथरूमचे सौदर्यच खराब करुन टाकते. खासकरून पावसाळ्यात काही साबण हवेतील आर्द्रता खेचून लिबलिबीत होतात व घरातील एखादा तरी सदस्य त्या गोळ्याचा 'मुटका' बनवतोच. अस साबण हाताळायला व बाघयलाही किळसवाणे वाटते.
१० वर्षापूर्वी लोहार चाळीत एका दुकानात सोप डिश बघायला गेलेल्या माझ्या बाबांना त्या दुकानदाराने 'मॅग्नेटीक सोप होल्डर' दाखवले बाबांना ते पसंद पडले व ते त्यांनी खरेदी केले. ह्या सोप होल्डरला मॅग्नेट असते व साबणाला कोल्ड ड्रींकच्या बाटलीचा 'बिल्ला' दाबून बसवायचा, बिल्ल्याकडील साबणाची बाजू ह्या सोप होल्डरला लावली की साबण त्या सोप होल्डरला चिकटून बसतो. साबणाचा कोणताही भाग थेट सोप होल्डरला चिकटत नसल्यामुळे सोप होल्डर खराबही होत नाही व साबण हवेत लटकल्यामुळे चारही बाजूने हवेशी संपर्कात राहिल्यामुळे साबण लवकर वाळतो, पावसाळ्यातही साबण नरम पडत नाही. ह्या मॅग्नेटीक सोप होल्डरमुळे बाथरूमच्या सौदर्यात नक्कीच भर पडते.
परवा त्या दुकानात ह्या मॅग्नेटीक सोप होल्डरची चौकशी केली तेव्हा कळले की मागणी नसल्यामुळे त्या दुकानदाराने हे मॅग्नेटीक सोप होल्डर ठेवणे बंद केले. संपुर्ण लोहार चाळ पालथी घातली तरी कोणत्याच दुकानात हे मॅग्नेटीक सोप होल्डर मिळाले नाही. एका हार्डवेअरच्या दुकानाच्या बाहेरील शोकेसमध्ये मॅग्नेटीक सोप होल्डर सारखी वस्तू दिसली. चौकशी केली असता कळाले की ते मॅग्नेटीक डोअर स्टॉपर होते. विचार केला ह्यालाच मॅग्नेटीक सोप होल्डर म्हणून वापरले तर? जो स्टॉपर दरवाजा पकडून ठेवू शकतो तो साबण नक्कीच पकडू शकेल. फार विचार न करता ५० रुपयाचा PVC चा एक मॅग्नेटीक डोअर स्टॉपर खरेदी केला. घरच्याघरी बाथरूममध्ये फिट केला
सूचना- बाथरूमध्ये नळाची PVC कंसील फिटींग असेल तर ड्रिल मारताना काळजी घ्या, कदाचीत आतील पाईपला छिद्र पडून पाण्याची गळती होउ शकते. ह्यावरही सोपा उपाय आहे, परंतू शक्यतो काळजी घेणे योग्य.
१) चित्रातील मॅग्नेटीक डोअर स्टॉपरचा डाविकडील भाग वापरायचा आहे.
२) पेन्सिलने होल पाडायच्या खुणा करुन घ्या.
३) दोन स्क्रुने भिंतीवर फिट करा.
४) साबणात बिल्ला घट्ट दाबून बसवा.
५) साबणाची बिल्ला लावलेली बाजू मॅग्नेटला लावा. बघा कसा रुबाबात बसतो साबण.
बराच शोध घेवूनही 'हा' सापडला नाही म्हणून वरील जुगाड करावा लागला.

२) पेन्सिलने होल पाडायच्या खुणा करुन घ्या.
३) दोन स्क्रुने भिंतीवर फिट करा.
४) साबणात बिल्ला घट्ट दाबून बसवा.
५) साबणाची बिल्ला लावलेली बाजू मॅग्नेटला लावा. बघा कसा रुबाबात बसतो साबण.
बराच शोध घेवूनही 'हा' सापडला नाही म्हणून वरील जुगाड करावा लागला.

वाचने
14265
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त जुगाड.
हेच म्हणतो
In reply to मस्त जुगाड. by मृत्युन्जय
+१
In reply to हेच म्हणतो by स्वच्छंदी_मनोज
छानच!
हि बरय पन साबन संपुन दिसेनासा
बरोबर!
In reply to हि बरय पन साबन संपुन दिसेनासा by भीमराव
झकास आयडिया
साबणाचे उरलेसुरले लहानसहान
In reply to झकास आयडिया by पैसा
आम्ही धुवायच्या साबणाचे तुकडे
In reply to साबणाचे उरलेसुरले लहानसहान by सुबोध खरे
आम्ही धुवायच्या साबणाचे तुकडे
In reply to आम्ही धुवायच्या साबणाचे तुकडे by कॅप्टन जॅक स्पॅरो
आम्ही हात टेकले कोपरापासून
क्या बात है
छान जुगाड. बाथरुमच्या
एक सूचना करावीशी वाटते "कोल्ड
मस्त जुगाड...
ठीके.
बुचाला साइडला एक भोक करून दोरा बांधायचा.
In reply to ठीके. by खेडूत
फारसा उपयोग होणार नै
In reply to बुचाला साइडला एक भोक करून दोरा बांधायचा. by बबन ताम्बे
साबणाला दोरी नाही अडकवायची.
In reply to फारसा उपयोग होणार नै by पैसा
गोल्डफिश???
In reply to साबणाला दोरी नाही अडकवायची. by बबन ताम्बे
च्चः
In reply to गोल्डफिश??? by राजेंद्र मेहेंदळे
गोव्याला गेलो असताना आणला
In reply to फारसा उपयोग होणार नै by पैसा
हा:हा:
In reply to गोव्याला गेलो असताना आणला by मार्मिक गोडसे
ही साबणवडी चपटी झाल्यावर
हायला
हे चित्र डकवायचे होते
In reply to हायला by राजेंद्र मेहेंदळे
आयडीया मस्त आहे, मुख्य म्हणजे
.पण एव्ह्ढा खटाटोप न
माफ करा
किडा
लिक्विड सोप
In reply to किडा by माहितगार
BodyWash मिळतो ना. तो वापरायचा.
In reply to लिक्विड सोप by राजेंद्र मेहेंदळे
हां तेही आताशा वापरात आले आहे
In reply to लिक्विड सोप by राजेंद्र मेहेंदळे
होय..हम तो लिक्विड सोपच
In reply to लिक्विड सोप by राजेंद्र मेहेंदळे
खेड्यातली माणसे काय पुढे
In reply to होय..हम तो लिक्विड सोपच by खेडूत
=))
In reply to खेड्यातली माणसे काय पुढे by प्रसाद१९७१
अशाच
#अशाच जुगाड आयडियांचा नवीन
these iit engineers work as
चांगलंय..
आधीचा अनुभव परत घेण्यासाठीची
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हम तेरे बिन कही रह नहीं पाते ... :- Sadakसौंदर्यानुभव घेण्यास आलो पण ....