Skip to main content

'पुरुष' ... हवा आहे पण कशाला !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी बुधवार, 13/04/2016 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुषाचा नराचा खरंच काय उपयोग असतो पुरुषाचा उपयोग काय तर फक्त मुलांना जन्म देण्यापुरताच... एका अभिनेत्रीचे वाक्य ऐकले. मोठी गंभीरपणे घेण्याजोगी ही गोष्ट आहे. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषाच्या बरोबरीने वावरते आहे. काही ठिकाणी तर पुढेही गेलेली आहे. आजच कशाला जुन्या काळीही झाशीच्या राणीने उत्तम युद्ध नेतृत्त्व करून दाखवले होते. तिच्या सैन्यात अनेक स्त्रिया लढत होत्या. अशी अनेक उदाहरणे दाखवून देता येतील. कुठलेही क्षेत्र स्त्रीने सोडलेले नाही. पोलिसात ती आहे. विज्ञानात ती आहे. ती डॉक्टर आहे. ती इंजिनीयर आहे. ती सॉफ्टवेयर मधे आहे. तिथे 'ती' 'त्या'ची बॉसही आहे.

मातृभूमीला 'माँ' म्हणण्याची गरज का?

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 13/04/2016 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् वर्ष तत् भारतं नाम भारती यत्र संततिः समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेतल्या भू भागाला भारत असे म्हणतात. या भारतभूमीची संतति इथे निवास करते. अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. हे लक्ष्मणा, सुवर्ण लंकेचा राजा बनण्यापेक्षा अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त कारण माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा हि महान आहे. पुरातन काळापासूनच आपण आपल्या भरत भूमीला आई म्हणतो. युरोपियन लोक हि देशाला पितृभूमी म्हणतात.

लघुकथा – नवी कल्पना

लेखक उल्का यांनी बुधवार, 13/04/2016 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या कथेचे नायक आहेत साने आजोबा. साने आजोबा हाडाचे शिक्षक. त्याना निवृत्त होऊन जरी बरीच वर्षे लोटली असली तरी त्यांची कडक शिस्त अजूनही तशीच होती. दोन वर्षांपूर्वी घरच्यांनी उत्साहात पंच्याहत्तरी साजरी केली होती. मुले, नातवंडे आपापल्या व्यापात मग्न असल्यामुळे साने आजी-आजोबांना करमत नसे. सतत नवीन विरंगुळ्याच्या नाहीतर गप्पा मारायला माणसांच्या शोधात दोघेही असत. आजोबाना नवनवीन कल्पनाही खूप सुचत.

सदाफुली

लेखक अभिषेक पांचाळ यांनी बुधवार, 13/04/2016 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी आयुष्यात , सदाफूली व्हावं सुख बनून मातीत , आनंदाने फुलावं अंत स्वतःचा , माहीत असून देखील भेटणाऱ्या प्रत्येकाला , आनंदी करावं - अभिषेक पांचाळ

तुझं माझं नातं

लेखक अभिषेक पांचाळ यांनी बुधवार, 13/04/2016 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
रुसवे फुगवे काढण्यात नाते फुलत जाते न तुटण्याच्या आशेत ते सदा झुलत राहते भरती ओहोटी तर येतच असते माझी , तर कधी तुझी यात मती फसते - अभिषेक पांचाळ

कॅलिफोर्निया मधील काही अनवट जागा

लेखक मानसी१ यांनी बुधवार, 13/04/2016 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, उसगावातील एक लोकप्रिय राज्य म्हणजे कॅलिफोर्निया. बरेच लोकांना (यात पर्यटक देखील आले) कॅली म्हणजे फक्त सॅन फ्रान्सीस्को ,एल ए ही शहरं आणी योसेमीटी नॅशनल पार्क, नापा व्हॅली ह्याच ठळक जागा माहीत असतात. पण या शिवाय तिथे अनेक अतिशय सुरेख बघण्या सारखी स्थळं आहेत. मला नैसर्गिक सौंदर्य शहरांपेक्षा जास्त आवडते. अशीच काही मला आवडलेली स्थळं मी खाली देते आहे. टीप:- सर्व फोटो जालावरुन साभार. १. लेक टाहो (lake Tahoe) - आम्ही उन्हाळ्यात येथे प्रथम आलो आणी याच्या प्रेमात पडलो. कॅली आणी नेवाडाच्या सीमांना लागून असलेला अती प्रचंड तलाव. चारी बाजूंना डोंगर आणी मध्ये हा अती खोल तलाव.

शृँगार ९

लेखक अनाहूत यांनी बुधवार, 13/04/2016 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाला बस लागते , कुणाला गाडी लागते पण कोकणात कुणाला बोट लागत असेल अस वाटल नव्हत . असो असेल कोणीतरी माझ्यासारखा बाहेरचा . बाकी कोकणातून परतताना या अथांग सागरातून प्रवास करण्याची कवी कल्पना दूर होऊन मला वास्तवात आणण्याच काम केल होत त्या बोट लागलेल्याने . बाकी पुर्वी लोक घोड्यावरून प्रवास करायचे त्यांच काय ? त्यांनाही .... असो. इतर वेळी आयुष्यात फार काही होत नाही , होत नाही म्हणता म्हणता किती काही घडलय गेल्या काही दिवसांमधे . अथांग समुद्र दूरपर्यंत पाहील तिथपर्यंत अगदी क्षितीजापर्यंत . काय आहे क्षितीज ? फक्त एक आभास.... कधी आकाश आणि समुद्र किंवा आकाश आणि जमीन भेटतात का ?

माझी ज्यूरी ड्यूटी ५

लेखक शेंडेनक्षत्र यांनी बुधवार, 13/04/2016 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ४ अमेरिकेतील कोर्टातील एक विचित्र जुनाट पद्धत म्हणजे जे काही कामकाज होते आहे ते एक लेखनिक अर्थात स्टेनोग्राफर लिहून घेत असतो. त्याला कोर्ट रिपोर्टर म्हणतात. अगदी शॉर्टहॅंड वापरले तरी तासनतास असे लिहिणे दमवणारे असणर. त्यामुळे कोर्टाचे कामकाज एक दीड तासापेक्षा जास्त सलग चालत नसे. जज छोटी का होईना पण सुट्टी देत असे. त्यामुळे ज्युरीचे काम फार दमवत नसे. अशी जुनी पद्धत आज अमेरिकेत का आहे हे एक न उलगडलेले कोडे आहे. सगळ्या कामाचे ध्वनी वा चित्रमुद्रण करणे व ते संग्रह करणे हे सहज शक्य आहे. पण तसे केले जात नाही.

लघुकथा - इच्छापूर्ती

लेखक उल्का यांनी बुधवार, 13/04/2016 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
(कथा लिहायचा पहिलाच प्रयत्न आहे. कुठेतरी वास्तवाशी मिळताजुळता प्रसंग. सहअनुभूतीतून सुचलेली काल्पनिक कथा आणि काल्पनिक पात्रे.) भर दुपारी रस्त्याच्या कडेकडेने इकडे तिकडे बघत, वाटेत येणाऱ्या छोट्या छोट्या दगडांबरोबर फुटबॉल खेळत, हातातल्या काठीने चालता चालता मातीवर रेघोट्या ओढत चालणारा सुम्या (सुमीत) अचानक थबकला. त्याच्यापुढे काही अंतरावर चालणाऱ्या काकांच्या खिशातून रुमाल काढताना पाकीट पडलेले त्याने पाहिले. धावत जाऊन त्याने ते उचलले आणि काकांना हाक मारली. "ओ काका, पाकीट पडलं बघा." काकांच्या डोक्यात कामाची घाई होती. त्यामुळे असेल कदाचित त्यांच्या कानातून मेंदूत हे वाक्य झिरपले नसावे.