माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग - २
भाग पहिला भाग दुसरा -
आणि अखेर तो दिवस आला ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होते २३ January २०१६. सगळी तयारी झाली होती. हिवाळ्यामध्ये UK फिरायला जाणार असाल तर भरपूर गरम कपडे न्यावे लागतात. आणि हो तिथे लेयर्स मध्ये कपडे घातले म्हणजे एकावर एक ३/४ कपडे घालायचे आणि सगळ्यात वरचा लेयर म्हणजे तुमचं जाकीट किंवा स्वेटर. हे सगळं घातल्यावर मग तुम्ही आरामात फिरू शकता. आमचा तिथे राहायचा प्रश्न नव्हता कारण नवऱ्याला कंपनी कडून सर्विस अपार्ट्मेण्ट मिळणार होतं तिथे राहणार होतो आम्ही. सगळी तयारी झाली होती आणि आता फक्त घरून निघायचीच वाट बघत होतो.
मिसळपाव