सैराट...
चित्रपट बघणं हा आमचा सगळ्यात आवडता उद्योग त्यामुळे असे फार कमी चित्रपट असतात जे आमच्या तावडीतुन सुटतात. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात तो पाहिला नाही असं फार कमी होतं. दुर्दैवांन हा योग सैराटच्या बाबतिही जुळुन आला. सैराट्बद्दल बर्याच जनांकडुन ऐकत होतो. वाचत होतो. 'सैराट' नाव फारच कॅची होतं त्यामुळे उत्सुकता होतीच पण अजुन एक कारण होतं ते म्हणजे नागराज मंजुळे. फँड्री पाहील्यानंतर या माणसाकडुन अपेक्षा वाढल्या.पहिल्याच बॉलवर सेहवागने जर छक्का मारला तर आपोआपच त्याच्या पुढच्या खेळीविषयी एक वेगळीच अपेक्षा निर्माण होते तसचं काहीसं नागराजच्या बाबतित झालं.
Holiday मेंबरशिप कंपन्यांबद्दल माहिती हवी आहे
मंडळी नमस्कार __/\__
मला व सौ ला भटकायची आवड आहे.
आता थोडी सवड आणि पैस्याची जुळणी झालीये, त्याचवेळी एका कंपनीच्या २५ वर्षांच्या membership बद्दल ऐकल.
आपल्या मिसळ्पाव नग्रीत कुणी अशी membership घेतली आहे का?
मार्गदर्शनाच्या व भल्या बुर्या अनुभवान्च्या प्रतिक्षेत...
शिवाय, दुसरी कुठली संस्था चांगली-वाईट असेल तर कृपया कळवा...
-सुखी
(काही भाग संपादित)
प्रश्न मधमाश्या आणि मिपा मोहोळ
अनुभव आणि पुढच्यास ठेच मागचा शहाणा
"नाही नाही ही कुठलीही प्रश्न मंजुषा नाही की सैराट बद्दल महाचर्चासाठी काढ्लेला धागा नाही.
सैराट : माझीही एक भर
हा सैराटचा रिव्ह्यू नाही. या सिनेम्यामुळे आलेले मनातले असंबद्ध विचार तितक्याच असंबद्ध रितीने मांडायचा प्रयत्न समजा.
असंबद्ध का तर..
सिनेमाबद्दल लिहायचं तर त्यातले कुठलेही कोर्सेस केलेले नाहीत. स्वयंपाक जमत नाही पण खायला जमतं, त्यामुळे मीठ मसाला कमी जास्त झालाय हे कळतं त्याच कुवतीने सिनेमाबद्दल लिहीणार आहे. सिनेमाबद्दल लिहीलं की सिनेक्षेत्राशी संबंधित काही जण अगदी वेड्यात काढत असतात. खरं म्हणजे इतकी वर्षे सिनेमा पाहत आल्यावर समोर जे दिसतं त्याबद्दल आपणही बोलावं असं वाटतंच की. पण त्या त्या व्यक्तीचा त्या क्षेत्रातला अधिकार मान्य असतो.
दुष्काळ निर्मुलनासाठी ग्राम स्वराज्य अभियानचा खारीचा वाटा व आवाहन
मंडळी,
सध्या दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळतोय. मराठवाड्यात तर फार विदारक परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी देखील मैलोनमैल पायपीट करावी लागतेय. यावर काही करावं म्हणून ग्राम स्वराज्य अभियान टीम
चे दुष्काळावर आणि एकंदरीतच जल/मृदा संधारणावर कामे करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन गेल्या दोन ते अडीच वर्ष्यापासून लोकसहभागातून बोरवंड, परभणी येथे काम सुरु आहे.
ग्राम स्वराज्य अभियान टीमने गावकऱ्यांना ग्रामसभेचं महत्त्व पटवून देऊन सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याला चांगलंच यश मिळालं. आता गावात दर महिन्याला ग्रामसभा होते आणि गावासाठीचा प्रत्येक निर्णय हा ग्रामसभेत घेतला जातो.
..तुला पाहण्याचा मला छंद राणी..
..तुला पाहण्याचा मला छंद राणी..
दिव्यांना नको तू करु मंद राणी
तुला पाहण्याचा मला छंद राणी
पुरे सर्व निर्बंध टाळूनि इथले
खुली मुक्त हो आज स्वच्छंद राणी
मला घे मिठीच्याच कैदेत आणि
नको गे करु तू खुले बंध राणी
तुला मी मला तू असे प्राशवावे..
पुरी रात व्हावी मधू धुंद राणी..
तुला लागला सावळा रंग माझा
तुझ्या मोगर्याचा मला गंध राणी
- कानडाऊ योगेशु
आधी सोसायचे ,मग हासायचे
आधी सोसायचे ,मग हासायचे
आधी रुजायचे, मग फुलायचे
स्वप्न पेरायचे, अश्रू वेचायचे
अश्रू पाजायचे, स्वप्न पोसायचे
खेळ मांडायचे, जरी मोडायचे
मांडणे-मोडणे, एक मानायचे
तारे माळायचे, नभ नेसायचे
आपलेच रूप, मग बघायचे
वाट चालायचे, तुला शोधायचे
स्वत्तःला हळूच , मागे सोडायचे
बेधुंद (भाग ९ )
परीक्षा जवळ आल्याने अक्षाने 'शिवेकाला' भेटायचे अन अमित चे फोन उचलायचे सोडून दिले ! तसाही काहीही फायदा नव्हता !
त्याच काळात 'MPSC' चा निकाल लागला होता . त्याच्याच जिल्ह्यातील त्याचा एक M.Tech करणारा सिनिअर - सचिन MPSC परिक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झाला होता , वर्ग- २ ची 'पोस्ट' मिळाली तरी त्याचे काही वाईट वाटत नव्हते . त्याचबरोबर M.Sc चे विद्यार्थी ढिगाने पास झाले होते . काहीजण उपजिल्हाधिकारी ,काहीजण मुख्याधिकारी तर काहीजण जिल्हा पोलिस अधिक्षक !
M.Tech करणाऱ्या ११ पैकी ७ जन पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले होते .
विद्यापीठात नुसता धिंगाणा होता !
मिसळपाव

