....थांबले ट्राफीक आता...
थांबले ट्राफीक आता.
माग लवकर भीक आता.
शांततेचा पॅक्ट झाला
वाढले सैनीक आता
जा पुरा व्यवहार झाला
तुझि नको जवळीक आता!
लग्न झाले..ते हि झाले
चांगले सोशीक आता..
दु:ख झाले भोगुनीया
हासणे ऐच्छिक आता.!
(प्रश्न झाले मांडुनिया
उत्तरे ऐच्छिक आता!)
लागु केली कर्जमाफी
काढ लवकर पीक आता!
उंच त्याचा भाव नेला
वाढले भावीक आता...!
विसर सारे शीकलेले
एवढे तू शीक आता
चेहरा सभ्य दिसावा
शिकुन घे ही ट्रीक आता.
हा लढा अंतिम आहे
फक्त थोडे टीक आता
- कानडाऊ योगेशु
मिसळपाव
.
खरे तर मोठया सार्वजनिक कार्यक्रमांत ’मुख्य पाहुणे’ या नात्याने सामील होण्याचे मी सहसा टाळते. तरीही अनेकदा अनेक छोटया मोठया कार्यक्रमांमध्ये दीपप्रज्ज्वलन आणि प्रतिमा पूजन अशी कामे मला करावी लागतात. दत्तगुरू, सरस्वती, अंबाबाई, गणेश....अशा अनेक देवतांना फुलांचा हार घालणे, त्यांच्या प्रतिमांना हळद कुंकू वाहणे, त्यांची आरती करणे...