Doodhsagar - Where milk flows..
अॅनिमेशनने ओतप्रोत भरलेला बाहुबली पाहण्याचा योग आला.सिनेमा आवडला,कथा तशी काल्पनिक असल्याने नक्कीच सुसह्य आहे.पात्रांची मांडणी आणि निवड योग्य वाटते.एकूण काय तर तीन तास निखळ मनोरंजन करण्याची क्षमता यामध्ये नक्कीच आहे.या तीन तासानंतर जेव्हा आपण थियेटरच्या बाहेर पडतो तेव्हा सर्वजण आपापल्या विचारानुरूप आठवणी घेवून तिथून बाहेर पडत असतात.
या तीन तासाने मला काय दिले याचा हिशोब जमवत असताना सुरुवातीला दाखवलेला धबधबा आणि सर्वात शेवटी दाखविलेली लढाई या दोन गोष्टींना झुकते माप गेले.अर्थात दोन्ही गोष्टी ग्राफिक्सच्या सहाय्याने भव्य दाखविल्या आहेत यात शंका नाही.पण या गोष्टी ज्या प्रकारे समो
मिसळपाव
