Skip to main content

तुझे नाव

लेखक माहितगार यांनी शनिवार, 02/07/2016 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे नाव नी केवळ भितीने गारठून जायला होते पानांवरून ओघळून गेलेला प्रत्येक थेंब डागांची लांबच रांग दुखण्याचीही थांबलेली अन तुझी आठवण म्हणजे स्मरण शब्दातील रण, सरण आणि मरण जसा सडलेल्या समुद्राने त्याच्या उदरातून ओकलेल्या सड्याचा किनार्‍यावर पसरलेला ऊग्र वास ज्या मोत्यांच्या आशेने तुम्ही एक एक शिंपले उघडत जाता त्यातून ओघळणारे रक्ताचे थेंब आणि जखमींचे आणि मृतांचे आर्त स्वर तुझ्या नावाने एक एक उचलत माळ कवट्यांची पुढच्या बळीच्या गळ्यात घालण्यासाठी आणि तुझ्या नावाच्या दहशती खाली दातखीळ बसल्यावर उच्चारून दाखवायचे 'बेहद खुबसूरत', एकच जल्लोश तुझ्या नावाचा घ्यायचा शेवटचा श्वास आणि हुतात्म्या

आरास...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 02/07/2016 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
ती दुरून दिसली जेव्हा वठलेल्या झाडाखाली मातीच्या गालावरती उमटली लाजिरी लाली... ती थोडी जवळी येता हलकेच हासला वारा गाभाऱ्यात मनाच्या सजविला सुवक देव्हारा... गुंफिली महिरपी ओठी शतताऱ्यांची आरास बरसुनी अंगणी गेली चंद्रचांदण्यांची रास..

तेरा नाम ( हिंदी ऊर्दू कविता व भावानुवाद)

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शनिवार, 02/07/2016 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
तेरा नाम कागज पे उतारनेसे अब डरसा लगता है तय-ब-तय सारी याँदे ऐसे खुलने लगती है जैसे दर्याने अपनी पोटली से हर रंग कि सिपीया निकालकर किनारेपें बिछा दि हो . फिर एक एक सिपी खेालते जाओ एक एक याद पिरोते जाओ देखते देखते वो एक बेहद खुबसूरत माला बन जाती है उसे गौरसे देखो तो फिर तेरी यादे घिर के आती है .... तेरा नाम कागज पे उतारने से अब डरसा लगता है |- मिसळलेला काव्यप्रेमी-| (२७/०६/२०१६) –-------------------------------------------------------- चाणाक्य यांचा भावानुवाद आताशा टाळतोच मी शक्यतो तुझं नाव लिहीणं कारण नंतर फार पसारा होतो तुझ्या आठवणींचा... समुद्राच्या लाटा कश्या शंख शिंपले उधळून टाकतात
काव्यरस

मी बाई होते म्हणुनी .. भाग -११

लेखक ५० फक्त यांनी शनिवार, 02/07/2016 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
राजसभेतुन बाहेर पडल्यापासुन माझ्या दालनात येईपर्यंत माझ्या कानांत काकांचं शेवटचं वाक्य घुमत होतं ‘ तुम्हांला तिघींना तुमचा निर्णय घेण्यासाठी उद्या सुर्यास्तापर्यंतची वेळ आहे, उद्या सुर्यास्तानंतर आपण सर्वजण इथं जमु आणि तुमचा निर्णय ऐकु. त्यानंतरच्या दिवशी चवथ्या प्रहरी राजा दशरथांना भेटायला आपणा सर्वांना जायचं आहे, तुमचा निर्णय काहीही असला तरी..’ 'हेच आपलं स्वयंवर कसं होईल, - मांडवी शक्य तेवढ्या रागानं बोलत माझ्या दालनात आली. तिच्या मागोमाग श्रुतकिर्ती आणि ताई पण आल्या.

द रेड ट्रँगल

लेखक बोलघेवडा यांनी शुक्रवार, 01/07/2016 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार, दु. ४:३४ आजची सभा बनारस मधल्या त्या विस्तीर्ण मैदानात होती. मैदानाकडे जाणारे सर्व रस्ते माळा आणि तोरणे लावून सुशोभित करण्यात आले होते. व्यासपीठावर साहेबांची भव्य प्रतिमा उभारण्यात आली होती. तुडुंब गर्दी. लोकांना पाय ठेवायला जागा नव्हती. लाउडस्पीकरवरून होणाऱ्या घोषणा आणि जयजयकाराने सर्व मैदान अगदी दणाणून गेलं होतं. हा प्रचंड जनसमुदाय म्हणजे कार्यकर्ते किंवा भाडोत्री गर्दी नव्हती तर “लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करणारा नेता” अशी ख्याती असलेल्या ह्या लाडक्या नेत्याचे भाषण ऐकण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी लोकं उस्फुर्तपणे लांबून आले होते.

राणी दुर्गावती वर लिहिलेली कविता हवी आहे..

लेखक राघव यांनी शुक्रवार, 01/07/2016 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस खाली नमूद केलेली एक हिंदी कविता शोधतो आहे पण सापडत नाहीये. नेट वर ४-५ ओळी सापडतात.. पण पूर्ण कविता काही सापडली नाही. कुणास माहित असेल तर कृपया सांगावी. कवितेचे बोलः "दुर्गावती जब रण में निकली हाथ मे थी तलवारें दो.." माहिती हवी असल्यास कोणता सदाहरीत धागा वापरतात का ह्याची कल्पना नाही. तसे असल्यास कृपया हा प्रश्न त्यात विलीन करावा ही विनंती. राघव

एक संघ मैदानातला - भाग १५

लेखक शि बि आय यांनी शुक्रवार, 01/07/2016 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
काही अपरिहार्य कारणांमुळे हा भाग टाकायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.. --------------x--------------x---------- बाकीचे संघ हळूहळू येऊन बसत होते. स्पर्धेचा दुसरा दिवस असल्यामुळे सगळ्या टीम्स हजार होत्या. आमचा टाइमपास चालूच होता पण आम्हाला सगळ्यांना खर तर कोल्हापूर वि. वसई ह्या मॅचची उत्सुकता होती. सामने सुरू होत होते संपत होते. काही अपेक्षित तर काही अनपेक्षित निकाल लागत होते. एकूणच माहोल संथ ही नव्हता आणि फार धसमुसळाही नव्हता. जे जे जिथे जिथे हवं तसं तसं ते ते होतं... पण काही तरी मिसिंग होतं. आता शेवटची मॅच सुरू झाली होती. आम्ही वाट पाहत होतो ती ह्याच मॅचची...

सांस्कृतिक महाराष्ट्र

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 01/07/2016 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे महाराष्ट्रात इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 225 पर्यंत सातवाहनांचे राज्य होते. त्यांनीच महाराष्ट्राची स्थापना केल्याचे ऐतिहासिक दाखले मिळतात. याच काळात साक्षरता संस्कृती व कला या क्षेत्रात चांगली प्रगती केल्याचे पुरातत्व पुरावे मिळतात. शैक्षणिक, धार्मिक व कलेच्या क्षेत्रात महाराष्ट्राची प्रगती झाली. अजिंठा येथील लेणी प्रसिध्द आहेच. वाकाटक राजवटीनंतर काही काळ कलाचुरी घराण्याचे राज्य होते. नंतर चालुक्य, राष्ट्रकुट आणि यादव व शिलाहारांचे राज्य होते. काही काळ बहामणी साम्राज्य सुध्दा. छत्रपती शिवाजींकडून एकसंध महाराष्ट्राचा उदय झाला.

रिमझिम पावसात बारवी धरण परिसरात!

लेखक शान्तिप्रिय यांनी शुक्रवार, 01/07/2016 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
या मंगळवारी मी काही कामानिमित्त बदलापूर ला गेलो होतो. तेव्हा रिमझिम पाऊस बरसत होता. सृष्टी हिरवेगार वस्त्र नेसून अतिशय सुंदर दिसत होती. मग काय? ठरवले बारवी धरण परिसर पाहण्याचे. त्याआधी काही मित्रांबरोबर गप्पा मारताना या मोसमात बदलापूर जवळील परिसर किती सुंदर असतो ही माहिती मिळाली. तसेच बदलापूर हे नाव कसे पडले याची रंजक माहिती मिळाली ती अशी: शिवाजी महाराज रायगडावरून सुरत किंवा त्या दिशेला स्वारी करताना याच दिशेने येत. तेव्हा त्याचे घोडे अतिशय थकलेले असत. मग याठिकाणी घोडे बदलले जायचे आणि मग सुरत कडे प्रयाण सुरू. यावरून या ठिकाणाला बदलापूर असे नाव पडले.