Skip to main content

बैदा रोटी

लेखक गणपा यांनी रविवार, 03/07/2016 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी पावसाळ्यातच एके रात्री बडेमियाँला भेट दिली. त्यावेळी हा पदार्थ पहिल्यांदा चाखला. खरपूस भाजलेली ती बैदा रोटी अन रिमझिम बरसणारा पाऊस कायम आठवणीत राहिल. काल ते जुने फोटो चाळताना, लेकीने फरमाईशवजा प्रश्न टाकला 'बाबा तुला बैदा रोटी येते का रे?' गेले दोन आठवडे इथे पाऊस ठाण मांडून बसलाय. मनात म्हटलं मौका है, मौसम भी है, फिर दस्तुर तो निभानाही पडेगा ना.

मिपा तल्या प्रतिक्रियांमध्ये

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 03/07/2016 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिपा तल्या प्रतिक्रियांमध्ये कायम ‘ब्लॉगची जाहिरात’ असं काहीतरी माझ्या ब्लॉगबद्दल म्हटलेलं असतं. संपूर्ण ब्लॉग (लेखच) मी इथं देत असल्याने ब्लॉगची जाहिरात करतो असं कसं म्हणता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे विकावू माल खपवण्यासाठी जाहिरात करावी लागते. माझे लेख म्हणजे विकाऊ माल नाही. ब्लॉगला मी कोणाचेही प्रायोजकत्व घेतले नसल्याने जितके जास्त लोक ब्लॉग वाचतील तेवढा प्रायोजकाचा फायदा होईल असंही काही नाही. म्हणून ब्लॉगची जाहिरात केली जाते असं का म्हणतात ते मला कळत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे, आपले विचार मांडणे म्हणजे जाहिरात करणे असं होत नाही. लेखांतून विचार मांडलेले असतात.

मॉडेस्ट रिसेप्शन

लेखक पिशी अबोली यांनी रविवार, 03/07/2016 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
अ‍ॅब्सर्डिस्ट परंपरेतलं किंवा ब्लॅक कॉमेडी प्रकारचं असलं काही मी कधी बघेन असा कधी विचारही केला नव्हता. पण पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि एनएफएआय यांनी आयोजित केलेल्या इराणी चित्रपट महोत्सवात दाखवल्या गेलेल्या 'मॉडेस्ट रिसेप्शन’ या अशा प्रकारच्या चित्रपटाने चक्क १ तास ४० मिनिटं खिळवून ठेवलं. त्यामुळे त्याबद्दल इथे लिहायचं धाडस करावं का असा विचार आला आणि तो जायच्या आत कृतीत आणायचा हा प्रयत्न आहे. मनी हाघीगी या इराणी दिग्दर्शकाच्या या चित्रपटात स्वत: तो(कावेह) आणि तारानेह अलीदूस्ती(लैला) ही अतिगोड चेहऱ्याची अभिनेत्री मुख्य पात्रे आहेत.

रहाट

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 03/07/2016 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
झुंजूमुंजू झालं कोंबडं आरवलं बामनाला जाग आली सडा सारवन पंचारती धडाडून चूल पेटली घुगऱ्या पुरण पोळी पहिला निवद अंबाबाईला मग येडाय रुकड्याय माळावरचा म्हसोबा शेवटून बाभळीखालचा वेताळ खांद्यावर जानवं हातात परात नैवैद्याची रिकामी, उदबत्तीचा धूर सुगंधी केवडा रामप्रहरी, रांगोळीतला मोर आणि हळदीकुंकू उंबरठ्याशी, शेणाचे गोळे ताटलीभर निवद वळचणीला, उनउन लाप्शी प्रसादाला बामन देवळात गेला घंटानाद अखंड दुग्धाभिषेक साडी चोळी खण ओवाळणी बाकी निर्माल्य, कपाळाला अष्टगंध पवित्र, याखेपेस गणपती वाटणीचा? नंदीबैलावर डोळा चिल्लर खुर्दा देवीचा 'वार' जणू दिवाळी दसरा फूलात फूल जास्वंदाचं मोगरा चमेली शोधून सापडेना सिता

बांग्लादेशची सुरक्षास्थिती आणि भारता समोरचे आव्हान

लेखक माहितगार यांनी रविवार, 03/07/2016 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
बांग्लादेशात असुरक्षीतता नवीन नसावी, कडवे लोक हिंसेच्या माध्यमातून व्यवस्था हातात घेण्यास आतूर होताना दिसतात. गेल्या दोन दिवसा पुर्वी ढाक्यातील परदेशी दूतावास क्षेत्रातील परदेशी लोकांचा वावर असलेल्या बेकरीवरील दहशतवादी हल्ला, बांग्लादेशातील सुरक्षा व्यवस्थेची समस्या हाताच्या बाहेर जात नाहीए ना अशी साशंकता निर्माण करतो. सहसा कोणत्याही देशात परदेशी दूतावास असलेला एरीआ सहसा उच्चतम सेक्युरीटी दिलेला असतो आणि तिथे अतीरेक्यांचे यश हि त्या देशाची एकुण सुरक्षा व्यवस्था आतून पोघरली गेली आहे का असा प्रश्न उपस्थित करते.

व्हेज बार्बेक्यू - भरली वांगी आणि भरली भेंडी

लेखक मोदक यांनी रविवार, 03/07/2016 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
गोपाळरावांनी खड्डा कोंबडीची लैच सोपी पाकृ दिल्याने घरच्या कोळशाच्या शेगडीवर सुरू असणारे कणीस, भरीत करण्यासाठीचे वांगे, कांदे, बटाटे, रताळी वगैरे भाजण्याचे प्रयोग पुढच्या श्रेणीला नेणे क्रमप्राप्त होते. सकाळी एका हार / फुलेवाल्याकडून केळीची पाने मिळवली आणि तयारी सुरू केली. साहित्य - . १) केळीची पाने आणि अ‍ॅक्युमिनीयम फॉईल २) भाजीसाठी वांगी, बटाटे आणि भेंडी (नंतर चव बघण्यामध्ये

इंग्लंड भटकंती - भाग 2 - स्टोनहेंज, ओल्ड सेरम आणि सॅलिसबरी

लेखक अभिजीत अवलिया यांनी शनिवार, 02/07/2016 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागात डर्डल डोअर आणी लुल्वर्थ कोवची माहिती दिली होती. त्याची लिंक इथे - इंग्लंड भटकंती - डर्डल डोअर आणी लुल्वर्थ कोव ह्या भागाची सुरवात एका फोटोने.  ह्या वर्तुळाकार पद्धतीने ठेवलेल्या घोड्याच्या नालेसारखी रचना असलेल्या दगडांच्या ठिकाणाचे नाव आहे 'स्टोनहेंज' आणि ते आहे इंग्लंडच्या 'Wiltshire' इथे. ह्याची गणना 'वन ऑफ द सेव्हन वंडर्स ऑफ मेडिएवल वर्ल्ड' मध्ये होते.

माझ्या मना....

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 02/07/2016 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मना हास जरा कालच्यापेक्षा आज बरा हाही दिवस संपून जाईल नवा उद्या घेऊन येईल आठवणींचे डोस कडू गिळत कुढत नको रडू नवा दिवस साजरा कर आयुष्यात आनंद भर डोळे उघड पहा नीट झटकून टाक सगळा वीट पुसून टाक रात्रीचे भास मोकळा कर दबलेला श्वास कानावरचे काढ हात आतल्या सुराला दे साथ आतला आवाज हाच खरा माझ्या मना हास जरा ऐक आता गाणीच गाणी गालावरचे पूस पाणी अन्यायाची सारी भुते जातील पळून कुठल्या कुठे नवी वेळ अशी येईल खतातून सोने होईल या उद्याचा विचार करा माझ्या मना हास जरा.

परीकथेची सव्वा दोन वर्षे - भाग ९

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 02/07/2016 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
३ जून २०१६ जेव्हा केव्हा रस्त्याने येता जाता आम्हाला डॉगी दिसतो .. अर्थात मुंबईच्या रस्त्यावर दर चौथ्या पावलावर कुत्रे दिसतेच .. तेव्हा त्याला बघून परीची बडबड अशी असते, "मम्मा भूभूऽऽ ... मम्मा भूभूला घाबरते माऊ भूभूला घाबरते अर्चू माऊ भूभूला घाबरते अप्पू माऊ भूभूला घाबरते .. परी भूभूला घाबरत नाही . . (कारण...) .... ... .. परीचे पप्पा भूभूला फाईट देतात :) फिलींग सुपर डॅड .. :) (फक्त भूभूला आमची भाषा समजत नाही हे माझे नशीब!) . . ६ जून २०१६ रात्री झोपण्यापूर्वी, बेडवर पडल्यापडल्या, तासदिड तास, झोप येण्यापूर्वी, रोजच आमची काही ना काही धमाल असते.

त्याची आठवण,

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 02/07/2016 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
त्याची केव्हाही आठवण आली तरी, सर्वांगावर सरकन् काटा येतो, डोक्यावरचा केस न केस उभा रहातो, आणि थंडीच्या दिवसातही दरदरुन घाम फुटतो, अंधारलेल्या डोळ्या समोर, नाचतात आकृत्या भेसुर, जिभेला पडते कोरड आणि काना मधून निघतो धुर, कित्येकांना याने लाचार बनवले, भिकारी बनवले, याच्या दहशती मूळे कित्येक पापभिरु दूराचारी झाले, तो आहेच असा भितीदायक, आता पर्यंत भेटलेला सर्वात मोठा खलनायक, मी मी म्हणणा-यांची त्याच्या पुढे टरकायची, नुसत्या आठवणीने कित्येकांची बोलती बंद व्हायची, वर्ष सहा महिन्यातुन तो एकदा कधीतरी यायचा, पण त्याचा बोलबाला मात्र वर्षभर असायचा, किती उपाय झाले, नवस झाले सायास झाले, पण याच्या समोर