Skip to main content

रत्नागिरी कट्टा.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 04/07/2016 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस बराच व्यस्त होतो आणि शेती विकत घ्यायला किती प्रयास पडतात ह्याचा अनुभव पण घेत होतो.वडीलोपार्जित शेती नसल्याने त्रास जरा जास्तच होत होता. शोधा-शोध करत असतांनाच आमच्या एका ओळखीच्या मित्राकडून देवरूखला एका जणाला शेती विकायची आहे, असा निरोप मिळाला.आता देवरूखला जायचेच आहे तर बसणीला पण जावून येवू म्हणून मग रत्नागिरीत मुक्काम करायचे ठरवले.साहजिकच आमच्या शिरस्त्याप्रमाणे, रत्नागिरीत कुणी अहे का?

केनोपनिषद

लेखक शरद यांनी सोमवार, 04/07/2016 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== उपनिषदे : (१)...

मी एक शेतकरी.....भाग १.... शेतीसाठी लागणार्‍या मुलभूत गोष्टी....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 04/07/2016 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : ह्या लेखांत शेती कशी निवडायची आणि कमीत कमी पैशांत शेतीची राखण कशी करायची?

भग्न शरीरे - 1

लेखक रातराणी यांनी सोमवार, 04/07/2016 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविक: कथेतील भाषा आणि प्रसंगाचे वर्णन काहींना आक्षेपार्ह वाटू शकते. मानवी शरीर आणि त्याच्या गरजा हा दुर्लक्षिला गेलेला विषय. अनेकांच्या बाबतीत (स्त्री आणि पुरुष दोन्ही) लग्न झालं की घोड गंगेत न्हाल अशा भावनेने आयुष्यातल्या इतक्या सुंदर आनंदाला बळी दिले जाते. पण काही क्षणांपुरते का होईना शरीर बंड करतेच. त्या बंडाशी हात मिळवून काही गुरप्रीत आणि सौमित्र तो आनंद मिळवत जातात. काही जान्हवी बंड पुकारायच्या आधीच कोसळतात. अशा दोन स्त्रियांची ही कहाणी.

शेती ह्या विषयासाठी वेगळा विभाग असावा....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 04/07/2016 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेली २०-२२ वर्षे मी शेती ह्या विषयावर माहिती गोळा करत होतो आणि अजूनही माहिती गोळा करत आहेच. मिपावर पण ह्या विषयावर बरेच लेख असावेत.पण "शेती" ह्या विषयासाठी स्वतंत्र विभाग नसल्याने, ह्या विषयावरील माहिती शोधतांना खूपच वेळ वाया जातो. सुरंगी, नाखू ह्यांनी ह्या विषयावर बरेच लिखाण पण केले आहे.

मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 03/07/2016 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
दिलखेचक! रापचिक! धमाल! हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा! सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला.

चॉकलेट - ४

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 03/07/2016 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
चॉकलेट-१ चॉकलेट-२ (क्लिक!) चॉकलेट-३ (डबलक्लिक!) ≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈ क्लिक! हे काय? मी अजून दरवाज्यात उभा? शंकेची पाल चुकचुकली. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. दरवाज्यात मी उभा होतो. न्यू सेंट्रलवरुन रेल्वे निघाली तसं मी आणि पक्यानं जागेची शोधाशोध करायला सुरु केली. एक भिकारी त्याचं बोचकं उचकाटून मध्येच बसला होता.

हायकू (?)

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 03/07/2016 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
दूर डोंगराच्या माथी आले उतरू आभाळ ... झाडावर पानगळ दूर क्षितिजरेषेला फुटे प्रकाशाचा पंख .... मनावर काळा डंख निळ्याशार तळ्याकाठी गूज प्रेमाचे वाजते चैत्रचांदणी लाजते... झुंजूमुंजू पहाटेला किरणाचा सूर्यरंग ... ओथंबले ओले अंग

शागिर्द

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 03/07/2016 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
शागिर्द ---------- कथा ( काल्पनीक ) दुरवर बघावे तिकडे विस्तीर्ण वाळवंट पसरले होते . दिवस वर सरकू लागला तशी उन्हाची तलखीही वाढत चालली होती . सुर्य वाळुला अक्षरशः भाजुन काढत होता . वाळुमधुन उष्ण वाफा निघत होत्या . अशा वाढत्या उन्हात त्या वाळवंटामधुन एक घोडा संथपणे चालत होता . घोडयाच्या पाठिमागे एक चार चाके असणारी लाकडी पेटी बांधलेली होती . घोडयाच्या मागे मागे त्या पेटीचाही प्रवास चालु होता . त्या पेटीमध्ये घोड्याचा मालक पहुडलेला होता . उन्हाचा त्रास नको आणी तोंडावर माशा घोंघावू नयेत म्हणुन त्याने आपला चेहरा हॅटने झाकलेला होता .