Skip to main content

रिमझिम रिमझिम

लेखक सुधीरन यांनी रविवार, 24/07/2016 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
रिमझिम रिमझिम पाऊसधारा न्हाऊनी निघाला आसमंत सारा बेधुंद अशा या क्षणी साथ तुझी हवी साजणी ओले ओले वृक्ष अन वेली पानांवरून टपटपते पाणी त्यात आठवली तुझी कहाणी ओलावली मग डोळ्यांची पापणी खळखळत वाहणा-या या नद्या मिळतात सागराला सा-या का न मग होई आपले मिलन प्रश्न पडे हा फार गहण भरारत वाहणारे हे वारे आले अंगावर शहारे दुःखाने मी कळवळतो हृदयाच्या वेदनेने विव्हळतो चिंब चिंब झाले माझे तन दुःखाने भिजले माझे मन आसवांचा आला आहे पूर सापडेना आयुष्याचा सूर
काव्यरस

मी बी काय तरी लिहीन म्हणतो : औरंगाबाद तडका. ;)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 24/07/2016 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा) मूळ कवीची क्षमा मागून. मीबी काय तरी लिहीन म्हणतो. पांढर्‍या कागदावर काळे शब्द पाहीन म्हणतो. मीबी काही तरी लिहिन म्हणतो. कवितेला रास्त प्रतिसाद भेटले काय, न भेटले काय कवीला उपासमारीत जगायची सवयच हाय तरीबी मी आपलं जमवून घेईन म्हणतो. मीबी काय तरी लिहीन म्हणतो.
काव्यरस

एक कप कॉफी...

लेखक निखिल निरगुडे यांनी रविवार, 24/07/2016 02:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज तो बराच वेळ कसल्याश्या विचारात मग्न होता. आपण बराच वेळ टेबलावरच्या paper-weight शी उगाचच खेळतोय ह्याचं त्याला भानंच नव्हतं. अचानक मनाशी काहीतरी निर्धार करून तो जागेवरून उठला आणि थेट एका desk पाशी जाऊन थांबला. ताज्या फुलांचा मंद सुगंध त्या डेस्क पासून सुरु होऊन ऑफिस भर दरवळत असावा, असे त्याला उगाचच वाटले.

रिफील (शतशब्दकथा)

लेखक निओ यांनी रविवार, 24/07/2016 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
रिफील बापाच्या उजव्या हाताची थप्पड खाडकन त्याच्या कानशिलात बसली. थपडीच्या धक्क्याने गेलेला तोल सावरायची कसरत करत भरल्या डोळ्याने त्याने बापाकडे पाहिले. बॉलपेनची 25 पैशाची रिफील पोराने एका दिवसात हरवली म्हणून बापाचा राग अनावर झाला होता. रडक्या आवाजात तो काही सांगणार इतक्यात दुसरा धपाटा पाठीत बसला. दिवसभर ST चालवून आलेला वैताग बापाने त्याच्यावर काढला होता. झरर्कन त्याला सारे आठवून गेले. ते बाजूला सारत CBSE पॅटर्नमध्ये शिकणाऱ्या आपल्या पोरांना त्रासिकपणे तो म्हणाला.. "काय करता रे!

कबाली

लेखक समीर_happy go lucky यांनी शनिवार, 23/07/2016 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण भारतीय चित्रपट तुम्ही बघता तेंव्हा एक तर ते बाय डिफॉल्ट नायक प्रधान असतात आणि कथा\पटकथा एक अतिशय जास्त "हे समजून घ्या, ते समजून घ्या" टाईपची असते. एखादी कथा नीट उलगडून सांगण्यात किंवा नीट एक्सप्लेन ऑन स्क्रीन करण्यात काय काठिण्य असते देव जाणे!! पण असं असते खरं. हे बहुतेक अति-जास्त नायकप्रधान वळण कहाणीला दिल्यामुळे असं होत असावं, अर्थात असं मला वाटते. कबाली हा सुपरस्टार (शब्दश:) रजनीकांत चा असल्यामुळे हा अपवाद असण्याचा प्रश्नच उठत नाही. साध्या शब्दात "सब कुछ रजनीकांत" या तीन शब्दांत कबालीची कहाणी सांगता येते.

कवी हूँ मैं

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शनिवार, 23/07/2016 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
"कवींनी धुमाकूळ घातलाय निव्वळ उच्छाद जिकडेतिकडे ब्लॉगचा कट्टा ,फेसबुकची भिंत ते ट्विटरची टाइमलाईन कवीच कवी सापडतात इकडेतिकडे चोहीकडे एक जागा मोकळी सोडली नाही.. गझला काय, चारोळ्या काय अरे दीर्घकाव्य लिहून उप्पर से हायकू कायकू लिखनेका बाबा? 'कवी इलो' ची हाकाटी ऐकू आली की पळत सुटतात सगळे सैरावैरा कवींना दिलंय आपण मोकळे रान आपले व्हाट्सऍप खुले सोडले दिली आपली व्यासपीठं आंदण.. व्यासा, तू पण कवीच होतास ना रे? आता यावर एकच उपाय उरलाय......" वरच्यासारखं कुणी परत लिहताना दिसलं तर त्याला पार उद्ध्वस्त करायचे.. शीघ्रकवितांचे धरण फोडून मुक्तछंदांचा महापूर आणून घरात त्याच्या सोडायचे शेरोशायरींचे झु

सोबतीण भाग १

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 23/07/2016 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
अपर्णा आणि पृथा एकाच ऑफिस मध्ये होत्या. दोघी एकत्रच जायच्या ऑफिसला. अगोदर अपर्णाने ऑफिस जॉईन केल त्यानंतर पृथाने. पृथाने जरी थोड नंतर ऑफिस जॉईन केल तरी तिच्या बडबड्या स्वभावामुळे तिची अपर्णाशी पटकन दोस्ती झाली. तशी अपर्णा अबोलच होती. त्यामुळे तिची आणि पृठाची मैत्री झालेली बघितल्यावर ऑफिसमधल्या इतरांनी अपर्णाच्या अपरोक्ष पृथाकडे आश्चर्य व्यक्त केल होत. "कमाल आहे हा पृथा तुझी. आम्ही अपर्णाला तुझ्या अगोदर पासून ओळखतो. पण आजवर तिने कधी आमच्याशी गप्पा नाही मारल्या. अग, लंचला सुद्धा ती आमच्याबरोबर नाही बसत. तुझ्याशी मात्र मस्त मैत्री झाली आहे. काय जादू केलीस ग तिच्यावर." एकाने पृथाला विचारल होत.

नेत्याईसाठी बी CET चालु कराले पाहीजे....

लेखक Sanjay Kokare यांनी शनिवार, 23/07/2016 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
गण्या रस्त्यान चालला होता तेवढ्यात त्याले राम्या येताना दिसते, गण्या: कुठ चाल्ला बे! राम्या: कुठ नइ मयी CET ची परिक्षा आहे न त्याचेच पुस्तक आणाले चाल्लो. गण्या: अबे राम्या हे CET म्हणजे काय होते रे! राम्या: काय राजा गण्या तुले CET म्हणजे काय महीत नही काय, अबे माय d.ed. झाल न् झाल नोकर्याच संपल्या राज्या मग सरकारन पात्रता परिक्षा ठेवली हुशार तपासुन नोकरी लावासाठी त्याच परिक्षाले राज्या CET म्हणते. गण्या: हुशार पोरं तपासुन लावा साठी हे पात्रता परिक्षा होय मग?

शोभिवंत होळी

लेखक शब्दबम्बाळ यांनी शनिवार, 23/07/2016 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
शोभिवंत होळी निरव शांततेच्या मिट्ट रात्र वेळी, आली झोपडीत माझ्या 'लाघवी' लुटारुंची टोळी वदले नकोत चिंता आता तुझ्या कपाळी, खाऊन भाजलेली माझीच गोड पोळी पाहुन तारका ते भलतेच तृप्त झाले, श्रीमंत पामराची झोपडी चंद्रमोळी करुनी दानधर्म ते पुण्यवंत झाले, परी पापसमुच्चयाने फाटली दीन झोळी जखमा करुन ताज्या ते दाविती जगाला, चितेचीही माझ्या केली शोभिवंत होळी विझले जसे 'निखारे' झाले पसार सारे, तीच तीच दुःखे कोणी कशा ऊगाळी भोगले जे ही होते लिहीले माझ्याच भाळी, सावध असा गड्यांनो येता आपुली पाळी... आशिष

समंदर के लुटेरे

लेखक लोनली प्लॅनेट यांनी शनिवार, 23/07/2016 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्री लुटेरे म्हटले कि सर्वात पहिले डोळ्यासमोर येते ते मानवाची कवटी असलेले काळे निशाण, तो एक डोळा निकामी झालेला जहाजाचा कप्तान व त्यांनी लुटलेला खजिना. 1 इतिहासात नोंद झालेली सर्वात पहिली समुद्री लुटीची घटना इ स पूर्व १४ व्या शतकात घडली, समुद्री चाच्यांनी त्या वेळेस भरभराटीस आलेल्या एजियन व मेडिटेरिअन व्यापाऱ्यांची जहाजे लुटली.