Skip to main content

शेवटची भेट - (काल्पनीक)

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 07/08/2016 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटची भेट - (काल्पनीक) आज त्याला खुप उदास वाटत होते . त्याच्या गावातील सिनेमा थिएटर आज पाडण्यात येणार होते . थिएटरची इमारत जुनी झाल्यामुळे गेले सहा महिने ते बंदच होते . ते थिएटर पाडुन तिथे एक भव्य शॉपिंग मॉल बांधला जाणार होता . या थिएटरमध्ये पिक्चर्स पाहायला लहान असल्यापासुन ते थिएटर बंद पडेपर्यंत तो बरेचदा गेला होता . कधी आपल्या कुटुंबियांबरोबर , कधी शाळा , कॉलेजातल्या मित्रांबरोबर , तर कधी ऑफिसमधल्या कलिग्सबरोबर . अनेक गाजलेले हिंदी , मराठी चित्रपट त्याने या थिएटरच्या सिनेमा हॉलमध्ये पाहिले होते . इंग्रजी हॉलिवूडपटांच्या अचाट दुनियेशीही याच थिएटरमध्ये त्याची ओळख झाली होती .

प्रेम

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 07/08/2016 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम कस जगता आल पाहिजे... मोकळेपणान अनुभवता आल पाहिजे... थोड़ समजून.. थोड़ समजावता आल पाहिजे... वेड बनून.. वेड करता आल पाहिजे.. सगळ्यांना हे जमतच अस नाही... पौर्णिमेचा चंद्र मन जाळतोच अस नाही... पावसातून रोमान्स घडतोच अस नाही... 'प्रेम' नावाचा शब्द 'भाव' बनतोच अस नाही... तरी आजही प्रेमावर जग चालत.. सगळ काही असूनही आपल् माणूस लागत.. 'प्यार में पागल दीवाने को' आजही जग हासत.. आणि मग लपून-छपुन प्रत्येकजण 'प्यार' करत...
काव्यरस

४० वर्षाच्या मुलाचा हट्टीपणा कसा कमी करु?

लेखक त्रिवेणी यांनी रविवार, 07/08/2016 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
माझा ४० वर्षाचा नवरा प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. तो कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती त्याला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते. त्याला म्हणे मी रागावते आणि शाब्दिक फटके देते याची भिती वाटते.हे अस बोलून तो त्याच्या आई-बाबांची सहानुभूती मिळवतो आणि शेवटी सगळं त्याच्या मनासारखे करतो. मला वाटते माझा नवरा खरंच भयंकर नाटकी आहे.त्याला खरच भिती वाटली असती तर तो चांगल्या नवर्यासारखा वागला असता. १.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? २. त्याच्या वागण्यात काय बदल घडवून आणू?

अर्थक्षेत्र : ट्रेडिंग फंडा

लेखक ज्ञानव यांनी रविवार, 07/08/2016 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रेडिंग हा शेअर मार्केटचा अविभाज्य घटक आहे. कुणी कितीही नावे ठेवली तरी ट्रेडिंग करणारे आहेत म्हणून बाजार आहे. ट्रेडिंग कसे करायचे हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. न्यूनतम पातळीला घेऊन उच्चतम पातळीवर विकायचे हे तत्व सांगितले जाते. पण बाजार काही कुठल्याही तांत्रिकदृष्ट्या विकसित केलेल्या पातळ्यांचा बांधील नाही. तुम्ही शोधलेला रेझिस्टन्स आणि सपोर्टला गद्दारी कशी करायची? असे काही बाजाराला वाटत नसते त्यामुळे त्याची भ्रमंती सुरूच असते. तो अगदी वारकर्यांच्या भक्तीभावाने दोन पावले पुढे आणि दोन पावले मागे असा टाळ वाजवत तल्लीन होऊन पुढेच सरकत असतो.

बादलीयुद्ध ४

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 07/08/2016 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
बादलीयुद्ध एक , दोन , तीन ------------------------------------------------------------------------------- चपातीयुद्ध मेसमधल्या जेवणात सुकी भाजी जास्त मिळत नाही या एकाच कारणास्तव आम्ही मेस बदलली. चांगली मेस गावात होती. म्हणूनच आम्ही काकाला दुपारी होस्टेलवर डबे घेवून यायची शिफारस केली. डब्यात सुकी आणि पातळ अशा दोन्ही भाज्या जास्तच चविष्ट असायच्या.

प्रतिक्षा......

लेखक एक एकटा एकटाच यांनी शनिवार, 06/08/2016 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
******************************************************************************************** नमस्कार मित्रहो..... मी माझी नवीन कथा तुमच्यासमोर सादर करतोय. माझ्या इतर कथेप्रमाणेच ही कथा ही एकसलग आहे त्यामुळे कथेची लांबी जास्त आहे. निवांत वाचा................ धन्यवाद एक एकटा एकटाच ******************************************************************************************** आकाश ऑफीसमधे आपल्या टेबलावर हातातलं पेपरवेटशी चाळा करीत विचार करीत बसला होता. ऑफिसनी दिलेल्या ऑफरने त्याला एका संकटात टाकलं होतं.

धर्म, विज्ञान आणि समाज

लेखक अंतरा आनंद यांनी शनिवार, 06/08/2016 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
खरंतर ह्या धाग्याला प्रतिसाद म्हणून लिहीत गेले परंतू ते लांबलं. म्हणून स्वतंत्रच टाकतेय. तरिही त्या धाग्याशी संबधीत असल्याने सुरुवात बदलत नाही. एक डोंबिवलीकर म्हणून मुविंच्या उद्वेगाशी सहमत. पण एक नागरिक म्हणून या गोंधळाची जबाबदारी आपल्याकडेही येते असं मला तरी वाटतं. त्याबद्द्ल थोडंसं (१) मी बर्‍याच वर्षांपासून कचरा वाटेत टाकणार्‍यांना थोडं सुनावते. त्यासाठीची भाषाही आवर्जून चांगली वापरते. कधी कधी कचरा टाकणारी व्यक्ती शरमेने गप्प बसते कधी "तुम्हाला काय करायचयं" म्हणत अंगावर येते.

जिना यहा मरना यहा....

लेखक चिनार यांनी शनिवार, 06/08/2016 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
राम्याचा दिनक्रम तसा ठरलेला होता. सकाळी उजाडण्याआधी उठायचं. आवरून झाल्यावर, अंबादेवी संस्थानाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उघडायचे, हळूहळू इतर कक्ष उघडायचे. मग मंदिराचा पूर्ण परिसर, सर्व कक्ष,सभामंडप,महाप्रसादाचा कक्ष,गाभाऱ्यासमोरचे प्रार्थनाकक्ष झाडून स्वच्छ करायचे. भक्तांसाठी लागणारे पाणी भरून ठेवायचे, देवीच्या गाभाऱ्यात लागणारे पाणी आवारातल्या विहिरीतून शेंदून ठेवायचे. गाभाऱ्यातील साफसफाई त्याला सांगितली तरच तो करायचा. गाभाऱ्यात स्वतःहुन तो कधीही जात नव्हता. अर्थात त्याच्यावर असे कोणतेही बंधन नव्हते. पण गाभाऱ्यात जाताना नेहमीच त्याला एक अनामिक भीती वाटायची.

हरवलेलं विश्व (भाग २)

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 06/08/2016 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
होणा-या अनाऊन्समेंटमुळे जयूची झोपमोड झाली. विमान कैरो विमानतळावर उतरत होते. जाग आल्यावर क्षणभरासाठी जयु गोंधळली आणि मग एकूण परिस्थितीचा अंदाज आल्यावर तिच्या चेहे-यावर मंद स्मित तरळल. आयुष्यात पहिल्यांदाच ती अशी पूर्णपणे एकटी बाहेर पडली होती. आणि ते ही परदेशात. ती सुशुक्षित होती त्यामुळे ती एकटी फिरू शकेल याचा तिला आत्मविश्वास होता... आणि म्हणूनच ती स्वतःवरच खूप खुश होती. विमानातून उतरून तिने स्वतःचं सामान ताब्यात घेतल आणि बाहेर आली. तिच्यासाठी तिथे एक स्पेशल टॅक्सी उभीच होती. साधारण सकाळचे 8/8.30 झाले होते. पण वातावरण चांगलच तापायला लागल होत.