Skip to main content

वेड्या आईची वेडी माया

लेखक ताजे प्रेत यांनी शनिवार, 25/04/2026 16:49 या दिवशी प्रकाशित केले.

आई मेलीय माझी! असे रोहन म्हणायचा.


खरे तर आई होती त्याला पण तो तिला एकटीला सोडून दूर आला होता .
रोहन - गणितात जबरी असलेला इंजिनिअर. असा इंजिनिअर कि ज्याच्या नावाचा विचार इंजिनिअरिंगमधील नोबेल साठी होत होता


पण त्याची आई - ती जरा सरकलेली होती आणि तिचे वेड वाढत होते 
तो वीस वर्षांचा झाला तेव्हा तिचं मोठ्याने हसणं त्याला त्रासदायक वाटू लागलं, तिचा गोंधळ थकवणारा वाटू लागला, ती नावं विसरायची, भाजी जळवायची, आणि टीव्ही तिच्याशी “हळूच बोलतोय” असं म्हणायची. डॉक्टरांनी हे बरे होणार नाही, हे  वाढतच जाणार असे म्हटले

नजीकची क्षितिजे - 'ऊर्जाणू' (The Energions): भाग 2

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 24/04/2026 12:45 या दिवशी प्रकाशित केले.

वाचकांनो, तुम्हाला काय वाटते? जर मानवाने कधी 'शुद्ध ऊर्जापाहण्याची क्षमता विकसित केली तर आपण या भौ

घाव

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 23/04/2026 22:53 या दिवशी प्रकाशित केले.

 

संध्याकाळ झाली. रवी झोपेतून उठला. त्याला चांगलीच झोप लागली होती ; पण जेव्हा तो बेडवर उठून बसला तेव्हा त्याचं डोकं गरगरत होतं . त्याच्या  मनामध्ये असंख्य भोवरे फिरू लागले होते . लहान पोरं भोवरा खेळतात आणि मध्येच तो हवेत फेकून तळहातावर झेलतात . तसंच त्याचं होत होतं ; पण इथे भोवरे  अनेक होते . आणि - एखादा  भोवरा उचलून घेतलाच तर तो  थेट हृदयाला सलत होता .

 

नि:शब्द

लेखक चौथा कोनाडा यांनी गुरुवार, 23/04/2026 20:36 या दिवशी प्रकाशित केले.

पुण्याच्या 'वैकुंठ स्मशानभूमीत' गेल्या तीस वर्षांपासून 'महादेव' हे मृतदेह जाळण्याचे काम करायचे. अंगावर एक मळकट धोतर, राखेने माखलेले शरीर आणि कपड्यांना येणारा जळक्या लाकडांचा व मांसाचा उग्र वास... हीच महादेव यांची ओळख होती. त्यांच्या या कामामुळे त्यांना समाजात कोणीही जवळ करत नसे.

महादेव यांचा एकुलता एक मुलगा, 'केदार', हा अतिशय हुशार आणि महत्त्वाकांक्षी होता. पण केदारला स्वतःच्या बापाची आणि त्यांच्या त्या 'स्मशानातल्या' नोकरीची भयंकर किळस यायची.

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ६: ईशा आदि योगी (कोईम्बतूर) ते वडक्कनचेरी ११७ किमी

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 23/04/2026 14:08 या दिवशी प्रकाशित केले.

✪ कोईम्बतूरजवळच्या शाळेत विद्यार्थ्यांसोबत भेट 
✪ तमिळनाडूतून केरळ प्रवेश
✪ वडक्कनचेरी, पण ते नाही हे!
✪ “ते वालं" हॉटेल नको, राहण्याचं हवं!
✪ पेडलिंगपेक्षा हॉटेल शोध मोहीम जास्त दमवणारी
✪ दक्षिण भारतीय लोकांची आत्मीयता!