Skip to main content

वळीव

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 26/04/2026 09:51 या दिवशी प्रकाशित केले.

तुझ्या कवितेच्या ओळी
काळजात रुतलेल्या
अवचित ओथंबून
आज कंठात दाटल्या

कंठी दाटता दाटता
शब्द शब्द विखुरले
काही ओठी उमटले
काही पापण्यांचे झाले

ओठावरल्या शब्दांना
ओठंगून अर्थ आले
तरी वेड्या वळीवाला
पापण्यांनी थोपविले

आज सरीवर सरी
कशी करू मोजदाद
कोलाहलात दुरून
तुझ्या कवितेची साद

लेखनविषय:

वाचने 73
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया