Skip to main content

बौद्धधर्मप्रसारक... भाग-५

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 23/09/2016 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
‘‘ फो ’’ बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह. Simple, Free Image and File Hosting at MediaFire बौद्धधर्मप्रसारक... भाग-१ बौद्धधर्मप्रसारक... भाग-२ बौद्धधर्मप्रसारक... भाग-३ बौद्धधर्मप्रसारक...

शब्दभूली

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 23/09/2016 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक कधीतरी, तू उमलून येतेस. काळ वेळ न पाहता, राग लोभ न जाणता. पापणीतल्या पाण्यात कोणाच्या मुग्ध हास्यात, चुकार निवांत क्षणी कोण्या विस्कटल्या मनी. शब्दांचा आधार घेतेस तशी मौनातही बोलतेस उलगडतेस, तरीसुद्धा अलगद मिटू मिटू होतेस... तुझा सूर, तुझा नूर कधी फटकून दूर, गूज जीवाचे सांगण्या शब्द कधी महापूर. सभोवताली वावरत रहा शब्दांची नक्षत्रं पेरत, गावा शब्दभूलीच्या जाईन माग नक्षत्रांचा काढत.

होता का मानूस ?

लेखक पथिक यांनी शुक्रवार, 23/09/2016 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
कोनी म्हन्ते मी मराठा कोनी म्हन्ते मी बामन कोनी म्हन्ते मी हिंदू त कोनी म्हन्ते का मी मुसलमान कोनाले काही व्हाचं आहे त कोनाले काही पन मानूस व्हाचं नाही आहे राजेहो कोनालेच मानूस व्हाले भेतात सगळे काहून का मानूस होनं म्हंजे सोपं काम नाही जाती धर्माच्या मांडीवर बिनधोक बसून दूध पिन्यासारखं मानूस होनं म्हंजे एका बाईची जोखीम घेऊन तरास सहन करून सोतालेच जनम देनं आहे. सांगा आता - होता का मानूस ?

चिबडाची दह्यातली कोशिंबिर

लेखक अनन्न्या यांनी शुक्रवार, 23/09/2016 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्यात कोकणात ठरावीक फळभाज्या मोठ्या प्रमाणात येतात. पडवळ, दुधी, काकडी, भेंडे, भोपळा, शिराळी, पारोशी त्यापैकीच एक चिबूड! ही काही फार वेगळी पाकृ नाहीय. पण ज्यांनी चिबूड पाहिला नसेल त्यांच्यासाठी!

मनाचा एकांत - चिमण्या

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 23/09/2016 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
डाव्या हाताच्या मुठी एवढ्या चिमण्या हा हा करतात या जीवघेण्या ओसाडीत.... कुठे दाणे टिपत असतील? कुठे पाणी शोधत असतील? घरटे कुठल्या आडोशाला असेल? यांच्यात यांचे दफन कसे करत असतील? कोण करत असेल? चिमण्या निमित्त असतात............ आपल्याच छाटलेल्या मनाचे हे तासनतास भिरभिरणे असते..... . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! ---- शिवकन्या

कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं..

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 22/09/2016 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं.. ओळखीचं हसून बोलायला हवं.. किती ती धूळ गैरसमजांची, मनाला स्वच्छ झाडायला हवं.. कुठंतरी आत सलतंय का काही? समजूतीचं मलम तिथं लावायला हवं.. जे झालं ते झालं, ते होणारच होतं अपराधीपणाचं ओझं फेकायला हवं.. पूलाखालून खूप पाणी वाहून गेलंय आनंदानं जीवन आता जगायला हवं.. अर्ध्यावर सोडू नये, गोष्ट किंवा नातं एकदा वेळ काढून ते संपवायला हवं..

मी कोणालाच काही सांगणार नाही...

लेखक bhavana kale यांनी गुरुवार, 22/09/2016 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
तुज्या प्रेमाच्या ओलाव्यात चिंब भिजेन एवढं प्रेम करू नकोस.. प्रीतीच्या सागरात वाहून किनाऱ्याला येऊ शकणार नाही एवढं प्रेम करू नकोस... तुझ्या सौदर्यांने घायाळ फक्त स्वप्नातच असतो मी आजकाल.. म्हणून तुझ्या मनात काय आहे ते सांग मला, मी कोणालाच सांगणार नाही.. खरं खरं सांग मला, मी कोणाला सांगणार नाही.. डोळ्यावर झोप अशी नसतेच कधी स्वप्नात तुझी सोबत हवी हवीशी वाटते.. गजबजलेल्या गर्दीतून वाट काढताना तुझ्या हळुवार स्पर्शाचा आधार घ्यावासा वाटतो.. तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय आणखी मला काही सुचतच नाही.. म्हणून तुझ्या मनात काय आहे ते सांग मला, मी कोणालाच सांगणार नाही.. खरं खरं सांग मला, मी कोणाला सांगणार न

रिहॅब चे दिवस भाग २!!

लेखक वरुण मोहिते यांनी गुरुवार, 22/09/2016 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
चांगल्या नोकरीचा विचार न करता राजीनामा दिला .फॅमिली बिझीनेस होताच जोडीला चिंता नव्हती. . एक असतं बाजू भक्कम असली कि लांबचे लोक बोलू शकत नाही आणि जवळच्यांचे आपण ऐकत नाही .कळत असतं पण समजत नाही .आई मुख्याध्यापिका होणारी बायको लेक्चरर आणि माझा हे असा वागणं मलाच लाज वाटत होती पण लाज फक्त सकाळी उठताना .एकदा एक पेग झाला कि संपला सगळं .पब पार्टी नेहमीच होतं पण प्रमाण वाढला दारूचं तेव्हा नकळत बहाणे देणं चालू झालं. जवळच्या मित्रांना. कारण एकच ते काय विचार करतील,जेव्हा त्यांच्यासोबत हि असायचो तेव्हाही घरी जाऊन परत ड्रिंक करणं आलच. रात्री २ ला येउदे केव्हा ३ ला कोणाला न सांगता परत एकटा ड्रिंक.

मोहिम-ए-संपादक

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 22/09/2016 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी झालं असं की मिपाराज्यात अनागोंदी माजली. कोण कुणाचा डू आयडी, कोण कुणाचा खरा आयडी काही म्हणता काहीच ताळमेळ लागेना. एक दिवस असंच रमत गमत आम्ही खरडफळा गल्लीमध्ये डोकावलो. एरवी छान गुण्यागोविंदाने नांदणारे प्रजाजन अंगात वारं भरल्यासारखे खरडी टाकत होते. सहसा धुराळी धाग्यांना वळसा घालूनच आम्ही जनातलं मनातलं, जे न देखे रवी या गल्ल्यांमध्ये पोचत असल्याने खरडी वाचून वाद कोण घालतंय आणि कोण सरळ बोलतंय हेच आमच्या निरागस बुद्धीला झेपेनासे झाले. अरे काय चाललंय काय? असं बसल्या जागेवरूनच आम्ही ओरडलो.