Skip to main content

ओढ घरट्याची

लेखक माहीराज यांनी रविवार, 16/10/2016 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
पाखरे उडता आकाशी या    घरटे सुने सुनेच उरते.. परतीची ही ओढ लागता    तसे पाऊल मागे वळते.. कानोसा घेऊ राञ निघाली.. कात टाकुनी पहाट ही आली.. रानपाखरे घरट्यातुन या उंच भरारी घेऊ लागली... उन्हे दाटता डोक्यावरती  घरटे आतुर रडु लागले... डोळे शिणले वाट पाहुनी काळजीचे मग बांध ही फुटले... तु असा गेलास कुठे की हरवलास या वाटेवरती... शोधलास तु मार्ग नवा की विसरलास ही माझी प्रिती.....
काव्यरस

भांडण

लेखक वटवट यांनी रविवार, 16/10/2016 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्राचे नि माझे एकदा लागले भांडण.. भलताच भावनिक मुद्दा आणि भलतंच अवघड प्रकरण.. बाह्या सरसावून भांडू लागलो आम्ही एकेकाळचे दोस्तं.. भांडणाचं कारण एवढंच कि "त्याचं प्रेम श्रेष्ठ कि माझं प्रेम श्रेष्ठं...." चंद्र म्हणे, "बघ मी आणि रात्र कसे भेटतो..? आमच्या नुसत्या चाहुलीने सारा आसमंत कसा पेटतो..? अश्या उसळतात लाटा आणि बेभान होतो समुद्र...." बोलता बोलताच अजून उत्कटतेनं सांडू लागला चंद्र.. ऐक म्हणे, "आम्ही भेटताच होतं तारांगण लुप्त.. उरतो फक्त शुक्र, जो आधीपासूनच विरक्त आणि अलिप्त.. सारी सृष्टी गाऊ लागते मग आमचंच गुणगान.. मग मीही भरभरून देऊ लागतो त्यांच्या झोळीत चांदणदान.. सांग...

हिरकणी (कविता)

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी रविवार, 16/10/2016 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
आसमंत तो काळोखाने पूर्ण व्यापला होता रायगडावर अडकुन पडली सैरभैर ती माता मावळतीला गेला सूर्य बंद जाहली दारे दंडक होता शिवरायांचा शिस्त पाळती सारे कष्टकरी ती नार अपूर्व नाव जाणती हिरा गडाखालती राहत होती वाळूसरेतील घरा दूध विकाया रायगडावर ती मायमाऊली जाई उरकुन जाता काम रोजचे घरास परतुन येई एके दिवशी गड सोडण्या वेळ जाहला तिला उघडण्याला बंद ती दारे त्यांनी नकार दिला घरास होते बाळ तान्हुले कंठ दाटुनी आला राहावयाचे कसे लेकरु गलका मनात झाला भिरभिर फिरली रायगडावर शोधित तिथल्या वाटा उंच कडा एक दिसला जेथे ना पहारा फौजफाटा उतरु लागली मरणकडा तो बाळासाठी जीव तुटे खरचटला तो सारा देह तिला परंतु भान कुठ
काव्यरस

वेळ ही निराळी (भाग - एक)

लेखक कऊ यांनी शनिवार, 15/10/2016 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
"वेळ ही निराळी" "यार हे readings बरोबर येतच नाही. कँडी वोल्टमीटरकडे बघ ग जरा. सर पण कुठे गायब झाले. 5.30 झाले ना यार" सेजलची ही बडबड ऐकून डोक दुखायला लागलं.आधीच 10.40-2.40 lectures 2.45 ला लगेचच practical .

लोकसंस्कृतीच्या आकाशात

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 15/10/2016 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाकडून लवकरच प्रकाशित होत असलेल्या ‘...सहज उडत राहिलो’ या माझ्या आत्मकथनातून...) मी तसा आज आमच्या विरगावपासून खूप लांबवर राहतो असे नाही. मी स्थायिक झालेल्या सटाण्यापासून अवघ्या दहा किमी अंतरावर विरगाव आहे. तरीही विरगावातल्या आठवणींनी मी व्याकुळ होतो. आज मनात आले तेव्हा मी दहा मिनिटात विरगावला जाऊन येऊ शकतो. मात्र बालपणीचे हरवलेले दिवस आज विरगावला जाऊनही सापडत नाहीत, हे माझं खरं दु:खं आहे. बालपणी विरगावात मित्रांसोबत जे दिवस घालवले ते पुन्हा येणे आज शक्य नाही. गाव तेच असले तरी बालपणीचे मित्र दूर गेले आहेत.

प्रश्न

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 15/10/2016 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुला जर कधी काही प्रश्न पडलेच... उदाहरणार्थ, रात्र नेमकी किती मोठी असते अंधार म्हणजे काय त्यात नक्की काय आणि कसं बघायचं असतं धुक्यात आपला आपला रस्ता कसा शोधायचा अवेळी पाऊस कसा पडतो आणि त्यावेळच्या एकटेपणाचं काय करायचं लांबच लांब प्रवास न थकता कसा करायचा समांतर रेषा म्हणजे काय वगैरे वगैरे तर, . . . . . . तर मला विचार

हळवा कप्पा..

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 15/10/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मनात एक ‘कप्पा’ असतो. ‘आठवणींचा कप्पा’!.. उभ्या आयुष्यातल्या असंख्य आठवणी त्या कप्प्यात खचाखच भरलेल्या असतात. भरपूर साठवणक्षमता असलेल्या एखाद्या ‘पेन ड्राइव्ह’मध्ये वेगवेगळा ‘डाटा’ आपण ‘सेव्ह’ करून ठेवतो, तशा.. कधीतरी आपण तो पेन ड्राइव्ह ओपन करतो आणि जुना डाटा समोर येतो. तोपर्यंत या साठवणुकीतल्या अनेक गोष्टींचा आपल्याला पत्ताही नसतो. अचानक एखादी सेव्ह करून ठेवलेली ‘फाइल’ समोर येते, आणि ती न्याहाळताना आपण हळवे होतो.. आठवणींच्या या कप्प्याचेही तसेच असते. या कप्प्यात इतक्या आठवणी भरलेल्या असतात, हेच आपल्याला आठवत नसते. अचानक त्या कप्प्यातल्या आठवणींच्या एखाद्या फाइलवर नकळतच ‘क्लिक’ होते.

भूत

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 15/10/2016 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
डोईवर माझ्या नाही टोपी तरी जगण्याची रीत सोपी नाही ... खांद्यावर माझ्या नाही जरी झेंडा कधीमधी दांडा तिरडीचा... हातामधी माझ्या नाही तलवार कसे झेलू वार देव जाणे... पायामधी माझ्या उरले ना त्राण आवरतो प्राण कंठाशी खिळले... मला नाही ठावे काय माझी जात तरी नाही जात भूत ते भयाचे...

शत शब्द कथा - भाव कि किंमत

लेखक विअर्ड विक्स यांनी शनिवार, 15/10/2016 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
सई नि साहिल चांगले मित्र होते. पदव्यूत्तर शिक्षणासाठीसुद्धा साहिलने सईसोबत प्रवेश घेतला होता. वेलीवर फुल उमलणार का ? याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. पदव्यूत्तर अंतिम परीक्षेच्यावेळी दोघे एकाच वर्गात होते.पेपर सुरु होण्यास ५ मिनिटे बाकी होती. अचानक सईचे घड्याळ बंद पडते,नि ती निरागसपणे साहिलकडे त्याचे घड्याळ मागते. साहिल एक क्षणभर विचार करत आपले घड्याळ तिला देतो.वर्गातील सर्वांचेच लक्ष त्या दोंघाकडे जाते. पण फिकीर नव्हती , साहिलला त्याच्या वेळ नियोजनाची नि सईला .... अनेक वर्षांनंतर सई नि साहिल परत भेटतात. सई साहिलसाठी भेट म्हणून घड्याळ घेऊन येते.

मक्केतील उठाव ४

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 15/10/2016 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग ३ मशिदीचा नकाशा सौदी अरेबियाच्या वेळेनुसार बुधवारी (२१ नोव्हेंबर १९७९) रात्री उशिरा दळणवळण बंदी (अर्थात कम्युनिकेशन ब्लॅकआउट) उठवण्यात आली. मग थोडी फार खरी हकीकत लोकांच्या कानावर येऊ लागली. सौदी अरेबियाचे राज्यकर्ते ह्या नात्याने सौदी राजघराणे हे इस्लामच्या सर्वात पवित्र स्थळाचे विश्वस्त बनलेले आहेत. त्यातून त्यांना प्रत्येक वर्षी अब्जावधी डॉलर्स महसूल मिळतो.