गर्यांच्या पिठाची आंबीलः खास उपासासाठी!
मे महिन्यात जेव्हा खूप फणस तयार होतात तेव्हा कच्च्या फणसाचे गरे सोलून बारीक चौकोनी फोडी करून वाळवले जातात. अगदी चांगले वाळले ही डब्यात भरून ठेवतात. या गर्यांचे पीठ केले जाते. हे पीठ चार पाच महिने चांगले टिकते. पावसातल्या उपासाला उपयोगी येते. अर्थात गर्यांचा थोडा वास कळतो. या पिठाची थालिपीठे, आंबील असे प्रकार होतात.
साहित्यः
एक वाटी ताक, एक वाटी पाणी, मीठ, दोन चमचे गर्यांचे पीठ, पाव चमचा जीरे, एक चमचा तूप, एक ओली मिरची, चिमुटभर साखर.
फोटो आंतरजालावरून साभार.
मिसळपाव