बंगळी
सपरीवर झुलत रायते एकटी बंगळी बही
झुल्वत जात होते तिले हात थे थांबले कई?
माह्या बी घराले कुलूप लागला गाव सामसूम
चिमन्या बी मयालीत आता बसून रायल्या नही
जीवच काडते गा असे सोंग झाले सनाइचे
डीजे वाजते, कापते भीत थरथर तई तई
दोस्तीची जुनी येल सुकते असी लागते नजर
का होते? जडीसीन कोनी कसा टाकते मही?
गेली जिन्दगी
केसरिया बालमा
केसरिया बालमा
हळूच खुणवे
लिहिता लिहिता
कोपर्यातला
हिरवा ठिपका
दोन दिशांना
दोघे आपण
नव्हती ओळख
नव्हते नाते
ऑर्कुटवरुनी
संवादाचे
इथेच रुजले
हिरवे पाते
व्हर्च्युअल जरी
भांडण अपुले
किती अबोले
लटके रुसवे
पण
केसरिया तो
हिरवा होता
अंतर सारे
क्षणात मिटवे
रंग बदलला
जगण्याचा मग,
फूलपाखरू
झालो आपण,
नवीन क्षितिजे
नवीन नाती
नवरंगातच
न्हालो आपण
.....
.....
.....
अजूनही
(ओम नमः) शिवाय
हिन्दी चित्रपट बघायच्या बाबतीत मी फार चोखंदळ आहे. सहसा परीक्षण वाचल्याशिवाय पहात नाही. तरीही कित्येकदा अपेक्षाभंग होतोच. तर नेहमीच्या पद्धतीला फाटा देऊन एकतरी अॅक्शन चित्रपट, परीक्षण न वाचता, कुठलाही पूर्वग्रह न ठेवता पहायचा असे ठरवले होते. त्यामुळे 'शिवाय' ची जाहिरात बघितली आणि सरळ तिकीटेच बुक केली.
नरकचतुर्दशीच्या सुमुहूर्तावर थेटरात स्थानापन्न झालो. रिकाम्या खुर्च्या मनांत धडकी भरवत होत्या. पण एकदा चित्रपट सुरु झाला आणि आम्हाला, दर क्षणाला, साक्षात त्या भगवान शंकराचे दर्शन होऊ लागले. अजय देवगण हा साक्षात 'शिवाय' म्हणजे शंकराच्या रुपात हिमालयाच्या उंच शिखरांमधे लीलया बागडत होता.
प्रवास २
आधीचा भाग: प्रवास १
"हो आई सगळं व्यवस्थित आहे इकडे, मस्त चाललंय"
"हो हो जेवण पण चांगलं असतं गं"
"तू काळजी नको करू, आय थिंक रजा मिळेल थोड्या दिवसात, मी कळवेन तसं"
"बाय"
आईने मुलगी बघितली असणार लग्नासाठी आणि म्हणून सुट्टी काढून ये लवकर म्हणून मागे लागली होती. आपल्या साध्या सरळ घराबद्दल आठवून त्याला मजा वाटत होती. आई तर काल परवा पर्यंत म्हणत होती कोणत्याही कंपनीत वगैरे चांगली नोकरी मिळेल, सोड आर्मीचा नाद म्हणून, पण तिने कधी त्याच्या जिद्दीला लगाम सुद्धा घातला नव्हता.
मॉरल ऑफ द स्टोरी
सुट्टीचा दिवस....
दबाके खाना खाया.... दमआलु और रोटी
(पोळीच पण रोटी म्हणालं की त्या पोळीला स्टेटस वाढल्या सारखं,शिवाय त्या दमआलु ला पण उगीच इन्सल्टिंग वाटत नाही )....
आणी आफ्टरनून वॉक साठी बाहेर पडलो..
नदीपात्रा च्या काठावर एक दोन जणं वाकून काहीतरी करत होते...
ती पोरं काय करतायेत?..... नको तिथं माझं कुतूहल जागं होतं....
मोस्ट एलिजिबल बॅचलर...2016
मोबाइलची बेल वाजली. नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, ‘०२२’ आणि पहिले चार डिजिट… अरे हा तर ‘बॉंबे हाऊस’ मधून आलेला, म्हणजे टाटा मोटर्स मधील कुणा मित्राचा फोन असणार.
‘हॅलो…’
आता कुणा मित्राचा परिचित आवाज कानावर पडणार म्हणून आनंद झाला.
‘हॅलो, इझ जयंथ कार्निक देअर?’ – जयंत कर्णिक ची एवढी वाट लावली म्हणजे मित्रांपैकी कोणीच नाही.
क्षणाचे सोबती....
क्षणाचे सोबती....
कशाला हवेत नगारे नौबती
आपण सारे क्षणाचे सोबती
जुळुनी येती जेव्हा प्रेमाची नाती
कशाला हवीत रक्ताची नाती
नुसतेच फोफावती वृक्ष सारे
भगवंताच्या माथी तृणाचीच पाती
वृथा तळपती सूर्याची किरणे
तिमिरात तळपती समईच्याच ज्योती
रोवून दाव एकतरी निशाण
जगात आहेत मोजकेच जगज्जेती
राजेंद्र देवी
काव्यरस
Nature's Thoughtful Trail
Nature's Thoughtful Trail
असंच एका पहाटे - अर्थातच सुट्टीच्या दिवशी, पाठीवर छोटी बॅग (पोटापाण्याची सोय) अडकवून आणि आवडत्या गाण्यांची playlist load केलेला फोन बरोबर घेऊन अगदी एकटीने पायी बाहेर पडले. ठरवलं असं काहीच नव्हतं. म्हणायला तरी, रस्ता नेईल तिकडे पाय वळवणार होते… पण पायाखालची माती अगदीच अनोळखी नव्हती, त्यामुळे नेहमीच्या रस्त्याने गावाबाहेर पडले. बाहेर पडताना आजवर चिकटलेले किंवा चिकटवून घेतलेले सगळे मुखवटे, सगळ्या जबाबदार्या, सगळी लेबलं तात्पुरती तरी काढून ठेवून, निदान तसा प्रयत्न करून घराबाहेर पडणार होते.
मिसळपाव