Skip to main content

१०,००० पाऊले रोजची

लेखक निओ१ यांनी सोमवार, 07/11/2016 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
वयाच्या १४-१५ व्या वर्षी कधीतरी सवय लागली व मी स्मोक करु लागलो, व वयाच्या २२-२३ व्या वर्षीपासून हार्ड ड्रिन्क देखील सुरु झाले. रोज ३०-४० सिगरेट, सिगार. किमान ३६०mL ड्रिक. वयाच्या ३८ व्या स्टेप पर्‍य्न्त हे सगळे सोडण्यासाठी अनंत उपाय केले चालू आहेत. पण गेल्या २०१२ मध्ये मला कुठे तरी वाचताना समजले की रोज किमान १०,००० पाऊले चालावेत जेणे करुन तुमची आज पर्य्न्त झालेली हानी भरुन निघते. १३०० नियमित पाऊले म्हणजे १ किलोमिटर. वाचले व सोडून दिले, पण एकदा शरिराने सगळ्याच गोष्टीला नकार देण्यास सुरुवात केली, अगदी पाणी देखील पिले तर बाहेर येत होते वेळ होती २०१५ जुलै.

प्रेम....?

लेखक Bhagyashri satish vasane यांनी सोमवार, 07/11/2016 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
भेटत....ती पण नाही, भेटत....मी पण नाही... निभवणे तिला जमत नाही, आशेवर ठेवणे मला पटत नाही. फसवत ती पण नाही, फसवत मी पण नाही... तिला रुसण्याचे दु:ख आहे, मला एकटेपणाची भीती आहे... समजत...ती पण नाही, रागवत... मी पण नाही... कुठल्यातरी वाटेवर भेट होत असते नेहमी बघत... ती पण नाही... थांबत... मी पण नाही... जेंव्हा पण बघतो तिला, ठरवतो काहीतरी बोलेन तिच्याशी... ऐकत... ती पण नाही, सांगत.. मी पण नाही... पण एक गोष्ट मात्र खरी आहे, प्रेम माझे आजही आहे तिच्यावर नाकारत.. ती पण नाही, सांगत.. मी पण नाही...!
काव्यरस

एकमेकांना सोडून जातांना...!

लेखक Bhagyashri satish vasane यांनी सोमवार, 07/11/2016 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
एकमेकांना सोडून जातांना एक गोष्ट माझ्यासाठी करशील, आयुष्याच्या सायंकाळ पर्यंत माझी आठवण जपून ठेवशील, जातांना फक्त शेवटी मला तुझा चेहरा मन भरुन बघू देशील, स्मरणात तो न मिटण्यासाठी... जाता जाता तुझा हात माझ्या हातात देशील, तुझ्या स्पर्शाची ऊब जपून ठेवण्यासाठी... जाता जाता तुझ्या डोळ्यातील अश्रु मला वेचायचे आहेत पुढील जीवनात विस्तवाच्या निखार्यावर .....शिंपडण्यासाठी.....
काव्यरस

सलोना सा साजन है और मै हूँ

लेखक शान्तिप्रिय यांनी सोमवार, 07/11/2016 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
एका वाग्दत्त वधूचे किंवा प्रेयसीचे भावविश्व व्यक्त करणारी एक सर्वश्रेष्ठ गझल ! सलोना सा साजन है और मैं हूँ आता माझा सुंदर सजणा आणि मी हेच माझे विश्व आहे असे सांगत आपल्या भावविश्वाचे सुंदर वर्णन या गजलेत ही तरुणी करते. शबी अब्बास यांचे शब्द , गुलाम अली यांचे स्वर्गीय संगीत आणि आशा भोसले यांची अष्टपैलू गायकी यांनी सजलेली हि गजल रसिकांना भावून गेली नाही तरच नवल! व्हायोलिन चा लाजवाब प्रयोग संगीतात आहे. मिराज ए गजल या अल्बम मधील ही गजल !

वैज्ञानिक दृष्टीकोण

लेखक सोहम कामत यांनी सोमवार, 07/11/2016 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
चला आज दाखवतो तुम्हा विज्ञानाची प्रगती.. Video games मुळे होणारी मैदानी खेळांची अधोगती.. Robots मुळे माणूस स्वत:चे अवयव विसरलाय.. Machines च्या वाढत्या किंमतींमुळे रुपयाचा भाव घसरलाय.. Whatsapp आणि Facebook मुळे मुक्तसंवादाला बसलय टाळं.. Computer वरील  प्रकाशामुळे जग दिसू लागलय काळं.. वाहनांच्या धुरामुळे Oxygen Traffic मध्ये अडकला.. Mileage Cars च्या अतिवापरामुळे Petrol चा भाव भडकला.. विज्ञानाच्या भुतांनी मिळवला अध्यात्मिक देवांवर विजय.. मुंबईसारख्या मायानगरीमुळे झाला गावच्या निसर्गाचा पराजय.. Television वरील बातम्यांमुळे झाले वर्तमानपत्रांचे निधन.. जहाज

काटा रुते कुणाला…..भाग ३

लेखक Jabberwocky यांनी सोमवार, 07/11/2016 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
मी दार उघडून आतमध्ये गेलो, तोच आई समोर आली. फ्रेश हो, जेवण वाढते, आई म्हणाली. मी आत जात म्हणालो, नाही भूक नाहीये,आम्ही जेवलोय रुश्याच्या घरी. खरं का? आई मी म्हणालो खरच ग विचार त्याच्या आईला फोन करून. ती फोन करणार नाही हे मला माहित होत म्हणून मी थाप मारली. माझं डोकं खूप दुखतंय, मी झोपतो. कुणी आलं तर सांग झोपलोय. मी म्हणालो मी माझ्या रूम मध्ये गेलो ते थेट बिछान्यावर आडवा झालो.खूप थकून गेल्यासारखं वाटत होत. पण हा थकवा शरीराचा नव्हता, हा मनाचा थकवा होता.

व्हेंन्टीलेटर

लेखक नाखु यांनी सोमवार, 07/11/2016 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळः बागेच्या दाराशी असलेली नेहमीची भेळेची गाडी.

पळीचा सोडा

लेखक अजया यांनी रविवार, 06/11/2016 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी उठुन अचानकच कुठे तरी फिरायला जाऊया विचार करायला लागलो.आमच्या रायगड जिल्ह्याचं एक बरं आहे एका दिवसात जाऊन परत येता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं आहेत. मग जवळच अलिबागला जाऊन येऊ ठरवलं. पुणा हायवे आमच्या गावाच्या अंगणात तर गोवा हायवे परसात आहे.जातानाचा आमचा रसायनी ते आपटामार्गे खारपाडा रस्ता माझा अतिशय आवडता रस्ता आहे.दुतर्फा गर्द झाडी,डोंगर,बाजूने लांबून छान जवळून पूर्ण प्रदूषित नदी! एकदा का पेणचा रस्ता सुरु झाला की सगळी हाडं खिळखिळी व्हायला सुरूवात होते ती थेट वडखळ जाईपर्यंत. वडखळला मिसळ वडा स्टाॅप घ्यावाच लागतो असा अलिखित नियम आहे!

काटा रुते कुणाला…..भाग २

लेखक Jabberwocky यांनी रविवार, 06/11/2016 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
काटा रुते कुणाला.... भाग १ हा विशाल हा माझा इयत्ता पहिली पासून ते दहावी पर्यंतचा मित्र. नंतर मात्र तो वेगळ्या कॉलेज ला आणि मी वेगळ्या. तशी गेल्या दोन अडीच वर्षात याची आणि माझी भेट फारच कमी झाली होती. आणि आता हा अचानक असा धूमकेतू सारखा माझ्यासमोर प्रकट झाला होता, माझी उत्कंटा वाढत होती. काय बोलायचं असेल याला आणि ते हि हा खूपच सिरीयस मूड मध्ये दिसतोय. नक्की काय ते पत्ता लागत नव्हता. एकदाचे आम्ही त्या लहान मुलांसाठी असलेल्या कॉलोनीच्या छोट्या उद्यानात पोचलो. आजूबाजूला लहान पोर खेळत होती.