Skip to main content

कडबू

लेखक गम्मत-जम्मत यांनी गुरुवार, 31/08/2017 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
कडबू हा पदार्थ आमच्याकडे पुराणपोळ्यांसह गौरीच्या जेवणाला करतात. म्हणजे साधारण पणे पश्चिम महाराष्ट्रातला नेहमीचा मेनू.. पुपो, कटाची आमटी, वरणभात , लोणकढं तूप, काकडीची गोडसर कोशिंबीर, बटाटा भाजी, मटकीची उसळ, कुरडया सांडगे वगैरे.. यात पुपो करायचा कुणा गृहिणी ला कंटाळा आल्याने कडबू चा शोध लागला असावा असं माझं लॉजिक!!

श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ६ : माझा मी जन्मलो फिरुनी

लेखक Kishan Vasekar यांनी गुरुवार, 31/08/2017 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
२० जुलै २०११ - माझ्या मागच्या जन्मातील शेवटचा दिवस आणि कदाचित ४० दिवसांनंतर मी आयसीयूमधून बाहेर पडून पुनर्जन्म. हो, मी जे आता लिहीत आहे, तो मानला तर विज्ञान व अध्यात्म यांच्या संयोगाचा एक चमत्कारच आहे. २० जुलै २०११ रोजी ऑफिसमध्ये काम करत असताना मी कोसळलो व १० मिनिटांत जवळच्या हॉस्पिटलमध्ये मला दाखल करण्यात आले. दोन तासांत निदान होऊन मला सांगितले गेले की दोन दिवसांपूर्वी सायलेंट हार्ट अटॅक येऊन माझे हृदय डॅमेज झाले आहे. रक्ताची मोठी गुठळी आत अडकली आहे. माझ्यावर उपचार करणारे सर्जन ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यानंतर अक्षरशः चालत आले. मला बेशुद्ध करून ऑपरेशन करण्यात आले.

बाप्पाचा नैवेद्यः मणगणं

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 31/08/2017 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
माझं माहेर म्हणजे " नारळाचं खाणार त्याला देव देणार " वालं. त्यामुळे सगळ्या पदार्थात नारळ असतोच. तर गणपतीसाठी अशीच नारळात आकंठ बुडालेली रेसिपी.

श्री वडा-पाव स्तोत्र

लेखक चामुंडराय यांनी गुरुवार, 31/08/2017 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
इंडियन पोटॅटो बर्गरम् जगप्रसिद्ध स्नॅक डिशम् । बॉइल्ड मॅश्ड बटाटम् स्मॉल गोल आकारम् ।। बेसनस्य बॅटर लपेटम् तेलात डीप डीप फ्रायम् । बर्गर बन सँडविच पावम् मिर्ची चटणी सवे सर्व्हम् ।। मराठी व्हेज फास्ट फूडम् क्रिस्पी वडा अन लादीपावम् । स्वस्त गरीबस्य खाद्यम् सर्वत्र हातगाडीस्य उपलब्धम् ।। तेलात पुनर पुनर तळनम् हायजीनस्य पर्वा न करनम् । वन मोअर वन मोअरम् त्वरित चट्टामट्टा करनम् ।। इति श्री वडा-पाव स्तोत्रम्

आवेग

लेखक अमित रेडीज यांनी बुधवार, 30/08/2017 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
तिला भेटायला जाताना वेगावर नियंत्रण जमतं मला पण तिला भेटल्यावर आवेग आवरला जात नाही

राजमाची - सोलो!!

लेखक रणभोर यांनी बुधवार, 30/08/2017 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या डायरी मधली काही खास पानं... १९ सप्टेंबर २०१३ गुरूवार काल होती अनंत चतुर्दशी.. १० दिवस गणपती भूतलावर येऊन गेले. ती विसर्जन मिरवणूक दर वर्षी बघायला जायच हे बहूतेक ठरूनच गेलेल असत. सकाळी लवकरात लवकर जाऊन शगुन किंवा कुंटे चौकात जाऊन वाट पहात ऊभ रहायच. पण या वेळेला माझा काही वेगळा प्लँन ठरलेला. पण मध्ये असा काही झालं त्यामुळे तो प्लँन फिसकटला नुकतच मी गो.नी. दांडेकरांच 'स्मरणगाथा' वाचून संपवलं. ज्या धैर्याने १३ व्या वर्षी घरातून पळून गेले. आणि जाणीवपूर्वक स्वतः च आयुष्य घडवत गेले, ते स्मरणात होतं. सेम विवेकानंद, रामदास.. मला पण त्याच प्रमाणे देश पहायची ईच्छा झाली होती.