Skip to main content

ह्रदयातुनी

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी सोमवार, 18/09/2017 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
धावत्या पायास माझ्या लाभु दे आता विसावा भाबड्या माझ्या मनाला श्रावणाचा साज यावा अंतरी आहेत ज्याही वेदना जाव्या विरुनी लाभुनी हळुवार माया घावही यावे भरुनी शोधतो आहे निवारा त्या रुपेरी काळजाचा वाटते यावा जरासा गारवा आता सुखाचा अंतरी वाहे झरा जो माझिया ह्रदयामधुनी अमृताचा गंध त्याला ओंजळीने घे भरुनी उगवु दे सूर्यास पुन्हा जाळुनी अंधार सारा संपण्या आता उन्हाळा बरसु दे श्रावणधारा सोसुनी चटके हजारो वाट मी चाले कधीचा शमविण्या ये तू खरोखर दाह माझ्या अंतरीचा - शार्दुल हातोळकर
काव्यरस

प्रिय घरास

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 18/09/2017 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय घरास, नाही, तुझी आठवण येत नाही. बाई आहे मी. जाईन तिथे चूल मांडीन. रांधेन. खाऊ घालीन. चार फुले लावीन. शेज सजवीन. संग करीन. पोरं जन्माला घालीन. संसार थाटीन. वाढवीन. इथेही नवे घर करीनच की. नव्हे नव्हे केलेच आहे. नाही, तुझी आठवण येत नाही. इथे मी पायी कुठे जात नाही. गाडीत जाते. पायी चालले असते तर थबकले असते. वळून पाहिले असते. मग एखादे घर तुझ्यासारखे दिसले असते. मग खिडकीतून आत शिरले असते. पडद्यामागे लपून बसले असते. नाही नाही ते आठवले असते. उगीच तो दिवस रडून घालवला असता. म्हणून मी इथे गाडीतून गालिच्यावर, गालिच्यावरून गाडीत एवढेच पाय खाली ठेवते.

लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!!

लेखक मार्गी यांनी सोमवार, 18/09/2017 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज तू चक्क तीन वर्षांची झालीस! वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत! तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास! दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस! गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे! अलीकडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस! जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस! तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात! माणसं चांगले लक्षात राहतात! गेल्या वर्षभरातल्या अनेक आठवणी आहेत! अजूनही तू आरशासारखी नितळ आहेस. अजूनही तू आमचे तसेच लाड करतेस! समोर येणा-या सर्व गोष्टी तू आनंदाने स्वीकारतेस.

सामाजिक कार्य करायचे आहे,सामाजिक संस्था/NGO सूचवा!!

लेखक सिंथेटिक जिनियस यांनी रविवार, 17/09/2017 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी याआधीच्या अनेक लेखात माझी पार्श्वभुमी लिहीली आहे.नविन लोकांसाठी परत लिहीतो.मी शेतकरी आहे .सातार्यात राहतो.मी अल्पभूधारक शेतकरी आहे.माझ्यापुरतं मी कमावतो.आठवड्यातील पाच दिवस मी रिकामा असतो.एखादी नोकरी व कामधंदा केल्यास वेळ जाईल असे वाटल्याने एक धागा काढला होता.त्यात मी लीहील्याप्रमाणे मला सोशल फोबिया आहे.त्यामुळे सोशली इंटेंन्सीव्ह काम मला जमेल असे वाटत नाही.त्यामुळे रिकामा वेळ जावा व सत्कारणी लागावा यासाठी मी सध्या एखाद्या सामाजिक संस्थेत काम करावे असा विचार करत आहे.जेणेकरुन माझा वेळही जाईल आणि समाजाला काहीतरी मदत होईल.आणि माझा सोशल फोबिया कमी होईल हा आणिक फायदा. तर मला अश्या NGO मध्ये काम

सुगरणी च्या पाक गृहातुन.. एक रेसिपी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 17/09/2017 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
सुगरणी च्या पाक गृहातुन.. एक रेसिपी ............... केळीचे शिकरण साहित्य.. केळी..(जळगावची..पिकलेली..पिवळ्या सालिवर ठिबके असलेली) तापवुन थंड केलेले दुध...(शक्यतो चितळे यांचे) साखर कृति स्टील चे पातेले घ्यावे.. केळी सोलुन कुस्करुन त्यात ठेवावी.. स्टील च्या चमच्याने मॅश करावी.. योग्य प्रमाणात साय व दुध घालावे.. चवि प्रमाणे साखर घालावी.. चमच्याने मिश्रण ढवळुन एक जीव करावे.. केळीचे शिकरण तयार.. तुम्ही जर चंगळवादी असाल तर मटार उसळ सोबतिला हवी.. शिकरण..मटार ऊसळ व मऊसुत पोळ्या... म्हणजे चंगळवादा ची परिसिमा... ... निवेदन..समुहावरील सुगरण कदाचित म्हणतील.."केळीचे शिकरण ही काय सुगरण रेसिपी आहे का?

पत्र...

लेखक प. शी. यांनी रविवार, 17/09/2017 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय, तु विचारत होतास, कि corporate life कशी आहे. मुळात नाटकात आणि यात जास्त काही फरक नाही. फरक फक्त इतकाच, कि नाटकात तु होतास आणि इथे manager आहे. नाटकाचे प्रयोग असायचे, इथे projects असतात. इथे ही उशिर झाला कि बोलणी बसतात, बर का... उलट ११ चे १२ झाले कि तु फार शिव्या घालायचास... इथ मात्र manager फक्त "Good Morning" असा टोमणा मारतो. इथली लोक यास sarcasm म्हणतात... इथे हि नाटकाप्रमाणे night shifts असतात... फरक फक्त इतकाच, नाटकात सोबती ला चहा असायची इथ मात्र coffee असते. पण इथे night shift ला झोप येते रे... कदाचीत इथल्या coffee त अापल्या चहा सारखी किक् नाही...

माझी मॅक्रो फोटोग्राफीशी ओळख

लेखक उदय आगाशे यांनी रविवार, 17/09/2017 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
तसा माझ्याकडे DSLR कॅमेरा 2010 पासून होता आणि त्यावर वेगवेगळे फोटो मी काढतही असे. पण मागच्या वर्षी (2016) मधे हा विषय जरा seriously घ्यावा असे वाटू लागले. मग त्या दृष्टीने हालचाल सुरू केली. अर्थात ह्या बरोबर थोडी जास्त investment सुद्धा लागणार होती हे लक्षात आल. २०१६ च्या मे महिन्यात मग नवीन advanced कॅमेरा घेण्यापासून सुरूवात केली. लगेच जून मध्ये माथेरान येथे फोटोग्राफी विशेष ट्रिप ला गेलो. ही अर्थात मॅक्रो विशेष सहल होती आणि मला तर ह्या विषयाची काहीच माहिती नव्हती. पण जाउन तर बघू म्हणून गेलो. सकाळी लवकर उठून लोकल ने नेरळ गाठल आणि जवळच न्याहारी करून तुफान पावसातच माथेरान येथे पोहोचलो.

आठवणीतला घरचा मेवा -१

लेखक जेडी यांनी शनिवार, 16/09/2017 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
एकाने ऑफीसमध्ये फुटाणे घेऊन आला होता, चार वाजता खायला. ते विकत आणलेले नव्हते हे स्पष्ट दिसत होते . कोठून भाजून आणले रे ? मी विचारले. सासुरवाडीकडून आलेत , तो म्हणाला . अर्थातच मला पूर्वी कधीतरी आईने केलेल्या अगदी तशाच फुटण्याची आठवण आली . हरभरे, हळद , मीठ घालून रात्री आई हरभरे भिजवायची . सकाळी त्यातले पाणी काढून दुरडीत नितळत ठेवायची . मग थोडे सुकवून चार वाजता पिशवीत बांधून ते भट्टीत भाजायला द्यायची , कोणीच भट्टीत घेऊन जायला मिळाले नाही तर सरळ तव्यावर भाजून घ्यायची . डबाभर फुटाणे तयार , फुटण्याच्या बरोबरीने शेंगदाणे पण खारवले जायचे . आठवडी बाजारातून चिरमुरे आणलेले असायचे .

समांतर विश्व

लेखक ओरायन यांनी शनिवार, 16/09/2017 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
समांतर विश्व : ऐक तर्क ( Parallel Universe) आपल्याला जवळपास सर्वांनी मानलेला वा गृहित धरलेला ' महास्फोटातून विश्वनिर्मिती ' ( Big bang theory)हा सिद्धांत माहिती आहे. ऐका बिंदुवत जागेतून महा प्रचंड स्फोट होऊन , प्रचंड उर्जा निर्माण झाली व त्याचबरोबर विश्व( Universe) निर्माण झाले. म्हणजेच अवकाश (Space) व काळ ( Time ) हे आस्तित्वात आले. ही क्रिया संपली का हो ? नाही..विश्व ( Universe) अजूनही वृद्धिंगत होत आहे. Universe is expanding.म्हणजे नविन अवकाश व वेळ निर्मिती चालुच आहे..त्याचा वेग संशोधकांना माहित झाला असून तो Hubble Constant मध्ये मोजतात.