योग ध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना
अपयशातून शिकताना
रामराम! सायकल नव्याने सुरू करून चार वर्षं झाली आहेत. सायकलीच्या सोबतीत इतकं काही शिकायला मिळालं, नवी दृष्टी मिळाली! ह्या पूर्ण प्रवासात सायकलसह अनेक दिग्गज सायकलपटू, फिटनेस क्षेत्रातील मातब्बर आणि प्रेरणा देणारे लोक सतत भेटत आहेत! हे निवेदन सुरू करण्यापूर्वी ह्या सर्वांना एकदा नमन करतो.
माझी मागची शेवटची सायकल मोहीम किंवा मोठी राईड २०१५ डिसेंबरमध्ये होती. तेव्हा दुस-याच दिवशी मी पूर्ण गळून गेलो होतो. वाटलं होतं की, सायकलिंग सोडूनच द्यावं. प्रत्येक सायकलिस्टला हा अनुभव अनेकदा येतोच. पण असो, सायकल काही सुटली नाही.
मिसळपाव