डेव्हीड शेफर्ड बाद.... :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
29 Oct 2009 - 12:04 pm

डेव्हीड शेफर्ड क्रिकेटमधील दरारा असणारा आणि एक लोकप्रिय पंच. क्रिकेट अकरा खेळाडूंचे असते पण पंचाचे पारडे इकडे devid 9 तिकडे झुकले की क्रिकेटचे विजय,पराभवाचे समीकरण बदलून जाते. क्रिकेट चालू असतांना पायचीतचा निर्णय, बॅटीचा बारीक स्नीक लागून झेलबाद चा निर्णय जेव्हा शेफर्ड घेत असतील तेव्हा खेळाडूबरोबर प्रेक्षकांच्या मनातही धडधड वाढलेली असायची. क्रिकेट पंचाचे झेलबाद, पायचीत हे निर्णय सतत वादाचे असतात. तसेच नोबॉल, वाइड, हेही निर्णय त्यांचेच असतात आणि ब-याचदा त्यात चुकाही होत असतात. पण तीक्ष्ण नजर आणि अचूक-सर्वमान्य निर्णय घेण्यात शेफर्ड पुढे होते. आधुनिक कॅमेरे येण्याअगोदर सर्व निर्णयाचा जवाबदारी या दादा पंचाची होती. मैदानावर सतत लयबद्ध हालचाली करणारा डेव्हीड शेफर्ड आपली एक वेगळी ओळख ठेवून असायचे.असा डेव्हीडDevid 3 स्थूल शरिरामुळे मोठ्या फटक्यांवर भर देणारा हा फलंदाज होता. शेफर्ड यांनी ''आपल्या क्रिकेट कारकिर्दीत २८२ सामन्यात ४७६ डावात १२ शतक आणि ५५ अर्धशतके केली. दहा हजार ६७२ धावा आपल्या खात्यावर नोंदवल्या ही बातमी एक खेळाडू, रसिक म्हणुनही माहिती नव्हती. [बातमीतून साभार] क्रिकेटमधील उत्तम फलंदाज म्हणून निवृत्त Devid 6झाल्यानंतर त्यांनी पंचगिरी सुरु केली. पंचाच्या कारकिर्दीवर आक्षेप हे असतात, पण फार कमी आक्षेप त्यांच्यावर असावेत. फलंदाज गोलंदाजांना पंचाचे अनेक निर्णय आवडत नसतात. पण तटस्थ पंच क्रिकेट खेळाचा सर्वोच्च आनंद देतात. नवशिख्या पंचानी अशा पंचाकडून निर्णय घेण्याचे शिकले पाहिजे. . मनमिळावू आणि कर्तव्यकठोर पंच असे नावलौकिक असलेले शेफर्ड कर्करोगाने आजारी होते. पंच डेव्हीड शेफर्ड यांची कारकिर्द परमेश्वराने त्यांना बाद करुन त्यांची इहलोकाची खेळी [६८ वर्षावर]संपवली. डेव्हीड शेफर्ड यांना माझी क्रिकेट खेळाडू , एक चाहता, क्रिकेट रसिक म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली.

क्रीडाविचार

प्रतिक्रिया

Nile's picture

29 Oct 2009 - 12:24 pm | Nile

एका पायावर उभे राहुन विनम्र श्रद्धांजली.

अवलिया's picture

29 Oct 2009 - 12:35 pm | अवलिया

एका पायावर उभे राहुन विनम्र श्रद्धांजली.

१११ धावांचा फलक लागला की ते छोटी ऊडी घेत.
पंच म्हणून त्यांनी कामगिरी खूप छान झाली.
त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली..!

प्रमोद देव's picture

29 Oct 2009 - 1:03 pm | प्रमोद देव

१११ धावांचा फलक लागला की ते छोटी ऊडी घेत.
सहमत आहे. :)
ह्या डेव्हीड गुराख्याला माझीही श्रद्धांजली.

कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

बाकरवडी's picture

29 Oct 2009 - 12:36 pm | बाकरवडी

भावपुर्ण श्रध्दांजली..!

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

प्रभो's picture

29 Oct 2009 - 12:46 pm | प्रभो

एका पायावर उभे राहुन विनम्र श्रद्धांजली.

अनामिका's picture

29 Oct 2009 - 12:57 pm | अनामिका

काल शेफर्ड यांच्या निधनाच्या बातमीने धक्काच बसला.
मला ते नेहमी सॅन्टाक्लॉज सारखे भासत.
भावपुर्ण श्रद्धांजली!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

टारझन's picture

29 Oct 2009 - 1:01 pm | टारझन

कालंच कळालं होतं ... वाईट वाटलं !!
डेव्हिड शेफर्ड ऐवजी तो भारतीय प्लेयर्सना कारण नसताना आउट देणारा अंमळ येडझवा स्टिव्ह बकनर गचकला (पक्षी: खपला) असता तर बरं झालं असतं !!

शेफर्डच्या आत्म्याला शांती मिळो.

- (पंच) टार्झन शेफर्ड

मॅन्ड्रेक's picture

29 Oct 2009 - 1:25 pm | मॅन्ड्रेक

at and post : janadu.

मदनबाण's picture

29 Oct 2009 - 1:26 pm | मदनबाण

विनम्र श्रद्धांजली...

मदनबाण.....

झकासराव's picture

29 Oct 2009 - 1:39 pm | झकासराव

विनम्र श्रद्धांजली.
त्यांनी काढलेल्या धावांची माहिती आजच कळाली.
उत्तम फलंदाज असावेत असे आकडेवारीवरुन वाटत.

सहज's picture

29 Oct 2009 - 2:20 pm | सहज

डेव्हिड शेफर्ड यांना माझीही विनम्र श्रद्धांजली.

चतुरंग's picture

29 Oct 2009 - 5:59 pm | चतुरंग

वर केलं आणि मेंढपाळ तंबूत परतला! :(

चतुरंग

दशानन's picture

29 Oct 2009 - 6:06 pm | दशानन

एकदम मनातील भावना व्यक्त केल्यात तुम्ही सेठ.

*****

नि३'s picture

30 Oct 2009 - 1:17 am | नि३

त्याचा फलंदाजांना पायचित देण्याचा निर्णय क्वचीतच चुकत असे.
ग्रेट पंच... :-)
विनम्र श्रद्धांजली...

---नि३.

संदीप चित्रे's picture

30 Oct 2009 - 2:10 am | संदीप चित्रे

क्रिकेटमधल्या सर्वांत जास्त थँकलेस जॉब (यष्टीरक्षकापेक्षाही थँकलेस जॉब) करणार्‍या ह्या अंपायरला विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या फलंदाजीबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्स !

विकास's picture

30 Oct 2009 - 6:13 am | विकास

चांगली माहीती करून दिल्याबद्दल धन्यवाद!

डेव्हीड शेफर्डना माझी श्रद्धांजली...

स्पंदन's picture

30 Oct 2009 - 7:44 am | स्पंदन

डेव्हीड शेफर्डना माझी श्रद्धांजली...

"नेल्सन नंबर" म्हणून ओळखल्या जाणार्‍या १११ या अंकावर तर शेफर्ड उडी मारून तो आकडा बदलेपर्यंत एका पायावर उभे रहातच, पण २२२ किंवा ३३३ अशा आकड्यावरही तेच करतांना मी त्यांना TV वर एक-दोनदा पाहिल्याचे स्मरते!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

नि३'s picture

31 Oct 2009 - 4:34 am | नि३

१११ च नाही तर १११,२२२,३३३ ..ईत्यादी अश्या सर्व आकड्यांना क्रिकेट जगतात नेलसन्स स्कोअर म्हटल्या जाते. जेव्हा फलंदाजी करण्यार्या संघाचा स्कोअर हा नेलसन्स नंबर होतो तेव्हा तो दुर्भाग्यपुर्ण असा समजला जातो आणी एखादी विकेट पडु शकते असे म्हट्ल्या जाते.म्हणुनच जो पर्यंत तो आकडा बदलत नाही शेफर्ड उडी मारून एका पायावर उभे रहात.

अवांतरः जेव्हा ह्या भल्या माणसाने क्रिकेट मधुन निव्रुत्ती घेतली तेव्हाही आम्हाला खुप वाईट वाट्ले होते.

---नि३.

हर्षद आनंदी's picture

31 Oct 2009 - 6:32 am | हर्षद आनंदी

ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांती आणि सद्गती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना !!

भडकमकर मास्तर's picture

31 Oct 2009 - 9:21 am | भडकमकर मास्तर

ग्राउंडवरचा तणावाचा प्रसंग योग्यवेळी कमीतकमी शब्दांत हस्तक्षेप करून / जोक मारून वगैरे टेन्शन डिफ्यूज करायची त्यांची फार चांगली सवय होती...
ऑनफील्ड अम्पायरला गेम कंट्रोल करता येणे फार महत्त्वाचे अस्ते.... थर्ड / फोर्थ अम्पायर /रेफ्री वगैरे प्रकार नस्ताना खूप मॅच अम्पायरिंग केलेला हा अनुभवी माणूस होता......

.......((एका इंग्लंड पाकिस्तान टेस्ट मॅचमध्ये सकलेन मुश्ताकचे अनेक नो बॉल पहायला काका विसरल्याचे स्मरते. त्यांवर काही २ की ३ विकेट्सही पडल्या होत्या आणि इंग्लंड हरले होते...
ओके लिन्क सापडली .. चार नो बॉल आणि प्रत्येकावर विकेट पडली... त्या टेस्ट मॅचनंतर भयंकर व्यथित हो ऊन ते निवृत्ती घेणार होते)

डिकीबर्डचा लेख वाचा...
http://www.expressbuzz.com/edition/story.aspx?Title=David+Shepherd+had+t.......

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

चतुरंग's picture

31 Oct 2009 - 9:10 pm | चतुरंग

धन्यवाद मास्तर! :)

चतुरंग