डेव्हीड शेफर्ड क्रिकेटमधील दरारा असणारा आणि एक लोकप्रिय पंच. क्रिकेट अकरा खेळाडूंचे असते पण पंचाचे पारडे इकडे
तिकडे झुकले की क्रिकेटचे विजय,पराभवाचे समीकरण बदलून जाते. क्रिकेट चालू असतांना पायचीतचा निर्णय, बॅटीचा बारीक स्नीक लागून झेलबाद चा निर्णय जेव्हा शेफर्ड घेत असतील तेव्हा खेळाडूबरोबर प्रेक्षकांच्या मनातही धडधड वाढलेली असायची. क्रिकेट पंचाचे झेलबाद, पायचीत हे निर्णय सतत वादाचे असतात. तसेच नोबॉल, वाइड, हेही निर्णय त्यांचेच असतात आणि ब-याचदा त्यात चुकाही होत असतात. पण तीक्ष्ण नजर आणि अचूक-सर्वमान्य निर्णय घेण्यात शेफर्ड पुढे होते. आधुनिक कॅमेरे येण्याअगोदर सर्व निर्णयाचा जवाबदारी या दादा पंचाची होती. मैदानावर सतत लयबद्ध हालचाली करणारा डेव्हीड शेफर्ड आपली एक वेगळी ओळख ठेवून असायचे.असा डेव्हीड
स्थूल शरिरामुळे मोठ्या फटक्यांवर भर देणारा हा फलंदाज होता. शेफर्ड यांनी ''आपल्या क्रिकेट कारकिर्दीत २८२ सामन्यात ४७६ डावात १२ शतक आणि ५५ अर्धशतके केली. दहा हजार ६७२ धावा आपल्या खात्यावर नोंदवल्या ही बातमी एक खेळाडू, रसिक म्हणुनही माहिती नव्हती. [बातमीतून साभार] क्रिकेटमधील उत्तम फलंदाज म्हणून निवृत्त
झाल्यानंतर त्यांनी पंचगिरी सुरु केली. पंचाच्या कारकिर्दीवर आक्षेप हे असतात, पण फार कमी आक्षेप त्यांच्यावर असावेत. फलंदाज गोलंदाजांना पंचाचे अनेक निर्णय आवडत नसतात. पण तटस्थ पंच क्रिकेट खेळाचा सर्वोच्च आनंद देतात. नवशिख्या पंचानी अशा पंचाकडून निर्णय घेण्याचे शिकले पाहिजे. . मनमिळावू आणि कर्तव्यकठोर पंच असे नावलौकिक असलेले शेफर्ड कर्करोगाने आजारी होते. पंच डेव्हीड शेफर्ड यांची कारकिर्द परमेश्वराने त्यांना बाद करुन त्यांची इहलोकाची खेळी [६८ वर्षावर]संपवली. डेव्हीड शेफर्ड यांना माझी क्रिकेट खेळाडू , एक चाहता, क्रिकेट रसिक म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली.
|
![]() |
![]() |
वाचने
5451
प्रतिक्रिया
23
मिसळपाव


प्रतिक्रिया
एका पायावर
एका पायावर
भावपुर्ण श्रध्दांजली.....!
सहमत!
In reply to भावपुर्ण श्रध्दांजली.....! by sneharani
भावपुर्ण
एका पायावर
सॅन्टाक्लॉज
कालंच
भावपुर्ण श्रद्धांजली!
विनम्र
विनम्र
विनम्र श्रद्धांजली
देवानं बोट
एकदम
In reply to देवानं बोट by चतुरंग
त्याचा
विनम्र श्रद्धांजली
माहीतीपूर्ण
श्रद्धांजली...!!
पण २२२ किंवा ३३३ अशा आकड्यावरही.....!
१११ च नाही
श्रध्दांजली
माझीही श्रद्धांजली...
डिकी बर्डचा सुरेख लेख!
In reply to माझीही श्रद्धांजली... by भडकमकर मास्तर