या दोन्ही पुस्तकांवर आधारित एक जास्त सविस्तर लेख लिहिण्याचा विचार मात्र पक्का आहे.
जरुर लिहा.
अमेरिकन लोक आणि अमेरिकन सरकार यांत खूप फरक आहे
हॅ हॅ हॅ... जमायला लागलं तुम्हाला विनोदी लिहिणं :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
अमेरिकन लोक आणि अमेरिकन सरकार यांत खूप फरक आहे
हॅ हॅ हॅ... जमायला लागलं तुम्हाला विनोदी लिहिणं
हे वाक्य मला तरी विनोदी नाही वाटत. स्वानुभवावरुन ते वास्तवाच्या जवळ आहे असे वाटते. तसा सामान्य पाकिस्तानी माणूसही चांगला आहे असे तिथे जाऊन आलेल्या(क्रिकेटच्या सीरीजवेळी) अनेकांनी त्यावेळेला लिहिले आहे.
लिहायचा विचार तर आहे! "भट्टी" जमली तर एकाद्या मराठी मासिकात प्रकाशनासाठी द्यायचाही विचारही आहे. पण त्या आधी "मिपा"वर चढवेन कारण इथले वेगवेगळे शेरे वाचल्यावर त्यातल्या सकारात्मक शेर्यांचा वापर करून लेखात जरूर त्या सुधारणा मी नेहमीच करत आलेलो आहे.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
हे पुस्तक वाचून संपल्यावर या दोन्ही पुस्तकांवर आधारित एक जास्त सविस्तर लेख लिहिण्याचा विचार मात्र पक्का आहे.
वाचायला नक्कीच आवडेल...
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
आजच्या टाइम्समधे आलेली ही बातमी वाचून मी सुन्न झालो! "Opium, organized crime & Pakistan intelligence feed Taliban's war chest"
"म्हणजे आंधळं (अमेरिका/ओबामा) दळतंय आणि कुत्रं (तालीबान/मुल्ला ओमार) पीठ खातंय" अशातलीच गत! "आपलं काय जातंय?" असं म्हणायचीही सोय नाही! कारण आज जे पाकिस्तानात होतंय ते उद्या आपल्यालाच भोवणार आहे.
हे जे ISI प्रकरण आहे त्याची व्याप्ती पहाता मला तर वाटतं कीं प्रत्येक लफड्याच्या दोन्ही बाजूस ही संघटना उभी असते! त्यांचं कर्तृत्व परमेश्वराच्याही पेक्षा जास्त असावे असं मला कधी-कधी वाटतं - अगदी omnipresent आणि omnipotent! पाकिस्तानात कोण राज्य करतो - त्यांचं सरकार की ISI - असाही प्रश्नही वारंवार पडतो!
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
सुधीरभाऊ,
असे काही वाचले कीं असे वाटते की अमेरिकन सरकारला इतके साधे गणीत कसे समजत नाही.
असे काही वाचले की वाटते की हे पाकडे तर दोन्ही बाजूनी लोणी ओरपत असतात पण ओबामासारख्या जरा समजूतदार वाटणार्यालाही हे कसे समजत नाही?
का तोही CIA, STATE Deptt किंवा Pentagon सारख्या 'हम करेसो कायदा' छाप संघटनाना शरण जातो? सरकार या सघटनाच चालवतात कीं निवडून आलेले सरकारच चालविते? व या संघटना देशाचे हित वगैरे न पहाता त्यांच्या लॉबीमास्टर सांगेल तसे बोलतात!
मग ते जुनं गाणं आठवतं: "कुणी सांगा या येड्याला"
भापू
कधी-कधी मला आश्चर्य वाटतं कीं वॉटरगेट प्रकरणी (प्रत्यक्ष कांहींही गुन्हा केलेला नसूनही) केवळ आपल्या मदतनिसांना वाचविण्याच्या प्रयत्नात खोटे बोलण्याबद्दल महाभियोगाचा (impeachment) बळी होऊ घातलेला व शेवटी अख्ख्या अमेरिकन इतिहासात राजीनामा देण्याचा 'सन्मान' मिळवणारा एकुलता एक राष्ट्राध्यक्ष निक्सन व मोनिका लेविन्स्कीप्रकरणी खोटे बोलण्याच्या आरोपाबद्दल महाभियोगाला सामोरा जाता-जाता जेमतेम वाचलेला पण एरवी अशक्य वाटणारी आर्थिक तूट आपल्या आठ वर्षात भरून काढण्याचे उत्तुंग कर्तृत्व दाखविलेला क्लिंटन हे दोघे एका बाजूला व "पाकिस्तानकडे अण्वस्त्रे नाहींत व ते अशी अण्वस्त्रे बनवू पहात आहेत असा कुठलाही पुरावा सरकारकडे नाहीं" असे वर्षानुवर्षें काँग्रेस व सिनेटपुढे धादांत खोटे बोलणाराच नव्हे तर लेखी प्रतिपादन करणारा रेगन दुसर्या बाजूला पाहिला कीं अमेरिकन लोकशाही प्रथांमध्ये किती तृटी आहेत याची व तिथले लोक "काय भुललासी वरलिया रंगा" या चोखामेळाच्या अभंगाची आठवण करून देणार्या दिखाऊपणाला कसे भुलणारे आहेत याची तीव्रतेने जाणीव होते.
CIA कडे असे भरपूर पुरावे होते, पण रेगनकडून तिकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्यात आले. ज्या लोकांनी ते उघडपणे जाहीर करण्याचे पाप केले त्यांना वाळीत तरी टाकण्यात आले किंवा रिच बार्लोसारख्या तरुणाला नोकरी व बायको गमावून एकाद्या फकीरासारखे आयुष्य कंठायला लावले गेले. अशा खोटारड्या राष्ट्राध्यक्षाचे चित्र असलेल्या डॉलर-नोटा काढायचा घाट अमेरिकन सरकार कसा काय घालू शकते व असा घाट अमेरिकन लोक कसा काय स्वीकारतात हे एक आश्चर्यच आहे.
ज्या निक्सनने चीनबरोबरच्या दोस्तीचे धाडसाचे पाऊल टाकून सोव्हिएट रशियाचे "evil empire" नष्ट करण्याची श्रेष्ठ भूमिका बजावली त्याला लाजिरवण्या परिस्थितीत घालवायचे व "आयत्या बिळात नागोबा" या नात्याने सोव्हिएट रशियाला भूगोलाच्या नकाशावरून पुसून टाकल्याचे (चुकीचे) श्रेय बळकावणार्या खोटारड्या राष्ट्राध्यक्षाचा उदो-उदो करायचा हे सगळे अमेरिकन सरकारच्या विक्षिप्तपणाचे बीभत्स प्रदर्शनच आहे!
आपल्या मिपा सभासदांत अनेक भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. त्यांचे वाचन माझ्याहून प्रगल्भ व जास्त विस्तृत असेल. त्यांना या गोष्टीबद्दल काय वाटते हे जाणून घ्यायची मला खूप इच्छा आहे. तरी त्यांनीही या दुव्यात भार घालावी ही विनंती.
माझ्या लिखाणात कांही मूलभूत चुका असतील तर त्या जरूर माझ्या ध्यानात आणून देण्याची कृपा करावी व त्या दरम्यान "चूक-भूल द्यावी-घ्यावी"!
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
जसजसे मी Nuclear Deception हे पुस्तक वाचतोय तसतशी माझ्या मनातली पाकिस्तानची व अमेरिकेची प्रतिमा डागाळू लागली आहे. काल जो भाग वाचला त्यात बेनझीरबाईंच्या पहिल्या टर्ममध्ये गुलाम इशाक खान, ज. बेग व ज. हमीद गुल यांनी त्यांना कसं एकाद्या बाहुलीसारखं वागवलं याचं भायनक चित्रण आहे. त्यांना काहीही माहिती मिळू द्यायची नाही, खास करून अण्वस्त्रांच्या प्रगतीबद्दल, असा त्यांनी चंगच बांधला होता. त्या अमेरिकेत बुशना भेटायला गेल्या तर बुशनी त्याबद्दल सांगितलेली पाकिस्तानबद्दलची माहिती बेनझीरबाईंना नव्हती!
शिवाय नवाझ शरीफ हा एके काळी तरी लष्कराच्या सहाय्याने वर आला होता व त्याचा अतिरेक्यांशीही संबंध होता अशी माहितीही त्यात वाचली. नंतर लष्कराशी दोन हात करायला गेला व परिणामी अनेक वर्षें त्याला सौदी अरेबियात अज्ञातवासात काढावे लागले हे आपण जाणतोच.
जरदारी काय, नवाझ काय व बेनझीरबाईं काय, लष्करापुढे कुणाचंही काहींही चालत नाहीं असंच लक्षात येतं.
अमेरिकेला रेगन, बुश-४१ व बुश-४३ यांच्या कारकीर्दीत केलेली पापे फेडावी लागतीलच असंच वाटतंय!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!
प्रतिक्रिया
या दोन्ही
हम्म्
लिहायचा विचार तर आहे!
लय भारी म्हाइती कळली!
बरीच नवीन माहिती कळली या लेखावरून!
मस्त लेख
अभास्यपुर्ण लेख्
लेख लिहिण्याचा विचार
पाकिस्तानात कोण राज्य करतो - त्यांचं सरकार की ISI
असे वाचले कीं.....
काळे साहेब्..........अजुन एक अभास्यपुर्ण लेख्....खुपच छान !
धन्यवाद
कधी-कधी
लेख आवडला
अमेरिकेला रेगन/बुश४१/बुश४३ यांनी केलेली पापे फेडावी लागतील?