मी तक्रार केलेला जो प्रतिसाद दाखला म्हणून देत आहात तो आत दिसत नाही कारण मूळ प्रतिसादच साफ झाला आहे. तुम्ही तुमची जळ्जळ उगाळत राहा.मला हरकत नाही. इनो हवे असेल तर सांगा..
यात आक्षेपार्ह काय आहे? खरे बोलणे हे?
अतिशय सुरेख व समतोल लेख. विजुभाऊंचे अभिनंदन करावेसे वाटते. बंद पडलेल्या मिपा संपादकीय या सदराला पुनरुज्जिवीत करण्यासाठी हा उत्तम लेख आहे.
संघ ही फॅसिस्ट विचारसरणीचीच संघटना आहे. घातपात करण्यासाठी, दंगली पसरवण्यासाठी त्यांना बजरंग दल, विहिंप, आक्रस्ताळी दुर्गा वाहिनी, त्याचबरोबर एकमेकांचा पायपोस नसलेल्या पतित पावन संघटना, वंदे मातरम संघटना अशा दहशतवादी संघटना लागतात. ही संघाचीच वेगवेगळी रुपे. पुराणात रावणाला जशी दहा तोंडे पण एकच शरीर आणि आत्मा होता तसाच हा दहा तोंडाचा एक राक्षस आहे. सिमी, तालिबान लष्कर ए कायदा आणि संघ यांच्या कार्यपद्धतीत फरक असला तरी विचारसरणीचे सूत्र मात्र एकच आहे. किंबहुना अधिक संभावित आणि चलाख असल्याने संघ तुलनेने धोकादायक आहे. सावरकरांनी केलेले दलितांसाठीचे कार्य, आंबेडकरांच्या चळवळी याच्याशीही संघाचा काहीही संबंध नाही. संघ प्रसिद्धीसाठी हपापलेला नाही असे म्हणत ठिकठिकाणच्या चर्चांमध्ये वनवासी कल्याण आश्रमाचे पिलू सोडून स्वतःच स्वतःच्या टे-या बडवायच्या यातही संघ सराईत आहे. वास्तविक पाहता देशभरात निस्पृहतेने कार्य करणा-या अनेक संघटना आहेत. राष्ट्र सेवा दलापासून वैयक्तिक पातळीवर अथक काम करणारे अवचट, दलवाई, बंग, बाबा आढाव, बावस्कर अशी अक्षरश: आकाशाएवढे कर्तृत्व असणारी माणसे कोणताही राजकीय अजेंडा न घेता निरलसपणे कार्य करत होती, आहेत. त्यांच्याशी संघाची तुलना कशी करायची हा प्रश्नच पडतो.
संघाचे मुख्य कार्यालय नागपूर, महाराष्ट्र येथे आहे. गोळवलकर गुरुजींपासून ते करंदीकर, दाते, देवरस, भागवत ही मराठी माणसे या जातीयवादी संघटनेच्या प्रमुखपदी विराजमान असल्याने आणि गांधींच्या खुनात संघिष्ठांचा हात असल्याने मराठी माणसांबाबत इतर देशवासीयांच्या मनात अप्रीती, अविश्वास आणि भीती निर्माण करण्यासाठीही संघच जबाबदार आहे.
वरील प्रतिसादात 'संघाची फारशी माहिती नाही पण जे लिहिले आहे ते नक्कीच चुकीचे आहे' छाप प्रतिक्रिया वाचून हसू आले'. हेही लिहिले होते. कदाचित त्यामुळे प्रतिसाद उडाला असावा.
राष्ट्र सेवा दलापासून वैयक्तिक पातळीवर अथक काम करणारे अवचट, दलवाई, बंग, बाबा आढाव, बावस्कर
संघाचे मुख्य कार्यालय नागपूर, महाराष्ट्र येथे आहे. गोळवलकर गुरुजींपासून ते करंदीकर, दाते, देवरस, भागवत
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
क्षणभर तर मला सुमार साहेबांचे "लोकसत्तेचे" संपादकीयच वाचतोय असा भास झाला.
सर्वसामान्यांच्या नावावर खपवलेली वैचारिक दिवाळखोरी मात्र चांगलीच करमणूक करून गेली ह्यात काहि वाद नाहि.
पुढील लेखनास शुभेच्छा.
देव (मानत असा/नसा) तुम्हाला चांगले लेख लिहिण्याबद्दल सदबुध्दी देवो एवढीच इच्छा.
मुत्सद्दि.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भुमीका बरेच वेळा बदलत असते.
संघाची मूळ भुमिका (संघटन आणि कार्यकर्ता निर्माण) बदलत असताना दिसत नाही. राष्ट्रासाठी आणि समाजासाठी काम करताना कालानुरूप बदल घडवण्याची लवचिकता नक्कीच संघाने दाखवलेली आहे. नाहीतर उद्या म्हणाल की आता इंटरनेट वापरतात, फोनवरून एसएमएस करतात वगैरे...संघातून प्रेरणा घेऊन जर कोणी कामे करत असले तर ती वेगळी संघटना असते आणि त्यात त्या संघटनेच्या उद्दीष्टांप्रमाणे त्या संस्थे संघटक भुमिका ठरवणार...
राजीव गांधींच्या काळात सुरुवतीला त्याना नक्की कसा विरोध करायचा हा संघीयाना एक मोठा प्रश्नच होता. त्या काळात भाजपने जाहीररित्या गांधीवादी समाजवादाचा स्वीकर करु असे जाहीरपणे सांगितले होते
गांधीवादी समाजवाद हा इंदिरागांधींच्या अखेरच्या काळात आला होता. ते वाजपेयींचे विचार होते. त्यातून एक नक्की दिसते की संघाचे विचार काही असले (अथवा वाटले) तरी भाजपाने स्वतंत्र भुमिका घेतली होती. आणि अर्थातच त्या आधी म्हणजे बांग्लादेश मुक्तीयुद्धाच्या वेळेस इंदीरा गांधींची भुमिका पाहून तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरसांना त्यांना "दुर्गा" असे कौतुकाने म्हणत संघाचापाठींबा देण्यास कमी वाटले नव्हते.
पण नन्तर राजकारणात मंडल आयोगाच्या अस्त्राला उत्तर देण्यासाठी तितकेच विघातक असे रामजन्मभूमीचे अस्त्र संघाने बाहेर काढले. त्या विषयावर एक राजकीय पक्ष म्हणून त्यानी नेहमीच दुटप्पी भुमीका ठेवली. भाजप म्हणजे संघ नव्हे असे म्हणताना मात्र भाजपतर्फे संघाचा अजेन्डा चालू ठेवला.
रामजन्मभूमीचा प्रश्न मंडलच्या आधी नवा नव्हता. तो आधीपासूनच होता, जरी मधल्या काळात निद्रीस्त झाला असला तरी. तो परत जागृत होण्याचे कारण हे शहाबानो प्रकरणात अल्पसंख्यांकाचे लांगुलचालन करत जी घटनादुरूस्ती करून सर्वोच्च न्यायालयाला देखील कमी पणा आणताना काही वाटले नव्हते, ते होते.
भारतीय राजकारणातील बदलेल्या परीस्थीत संघाने नेहमीच धरसोड भुमीका घेतली आहे.
उदाहरण दिल्यास समजेल की यात तथ्य किती आहे. ४२ च्या आंदोलनात करा अथवा मरा म्हणताना गांधीजींनी स्वत:ची भुमिका बदलली असे म्हणतात. वास्तवीक ती परिस्थितीनुरूप होती असे म्हणायला हवे. तीच कथा कदाचीत आपण उदाहरण दिल्यास स्पष्ट करता येईल. नाहीतर उगाच पोकळ वल्गना आहे.
संघ म्हणजे भाजप नव्हे. संघ म्हणजे विश्वहिन्दु परिषद नव्हे संघ म्हणजे बजरंग दल नव्हे असा प्रत्येक संघटनेशी स्वतःचा संबन्ध नाही असे संघ वारंवार म्हणत असतो. पण मग सम्घ म्हणजे नक्की कोण? असा साहजीक प्रश्न पडतो.
अहो गांधीटोपी घालणारी प्रत्येक व्यक्ती गांधीवादी असते का? (असते असे जरी कोणी म्हणाले तरी ते गांधीवाद किती पाळतात आणि "पुरूष" नाटकात दाखवल्याप्रमाणे आवाज उठवण्याऐवजी, तोंडात कोंबून बंद करायला किती लावतात हा अजूनच वेगळा प्रश्न आहे). विहिंप, बजरंगदल आदी संघटनांपैकी किमान काही (सगळ्याच असतील असे नाही) या संघाच्या सहकार्यातून तयार नक्कीच झाल्या. मात्र त्या स्वतंत्र संघटना आहेत. त्यात अनेक जण किंबहूना बहुतेक जणांनी कधी खाकीचड्डी घातली नाही की "नमस्ते सदा" म्हणले नाही. थोडक्यात जो शाखास्थानी आला नाही, ध्वजप्रणाम केला नाही तो स्वयंसेवक नाही आणि तशी संस्था म्हणजे संघ ही नाही...कायद्याने नाही असे नाही तर वैचारीक आणि आचारानेपण.
गांधीजी स्वतःला काँग्रेसचे चार आण्याचे सदस्य पण नाही असे म्हणायचे पण त्यांचा प्रभाव काँग्रेसवर होताच की. भाजपा जर चालू करण्यात स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला तर त्यात संघाच्या वैचारीक छटा दिसल्या तर आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.
मोदींचे हिटलरी स्टाईलचे हिन्दुत्व कदाचित भावले त्यामुळेच की काय स्वतःचा कट्टर शत्रु असलेल्या संजय गांधींच्या मुलाला पावन ठरवले गेले.
अजूनही मोदी लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. तसेच टाटा-अंबानीसकट त्यांच्या राज्यात आणि सरकारबरोबर धंदा करायला कोणालाही कमीपणा वाटत नाही. आणि सगळ्यात महत्वाचे, गेली पाच+ वर्षे विरुद्ध सरकार केंद्रस्थानी असूनही मोदींच्या विरोधात अजून काहीच आरोपपत्र नाही. हा मुद्दा मांडायचे कारण मोदी बरोबर की चूक हे नसून जे विरोधकांकडूनही सिद्ध झालेले नाही ते होई पर्यंत हिटलर वगैरे म्हणणे अयोग्य वाटते. संजय गांधी जरी कट्टर शत्रू होता तरी मनेका गांधी या अनेक वर्षे भाजपात आहेत आणि मंत्रीही होत्या. तरी देखील राहून राहून एक वाटते की जेंव्हा आपण अजूनही त्याचे आई-बाप काढून मुलाची ओळख करावी का? कुठेतरी आपण घराणेशाहीत रमून जातो...
भाजप सत्तेत असताना बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. संघाच्या बर्याच स्वयंसेवकानी सत्तेची चव नव्याने चाखली. पण संघाला अजूनही स्वत:ची नक्की अशी ध्येय धोरणे ठरवता अली नाहीत.
संघाच्या बर्याच स्वयंसेवकांनी सत्तेची चव चाखली असेल पण जे स्वयंसेवक सतेत गेले त्यांना संघात काहीच दायीत्व राहीलेले नव्हते. संघाचे ध्येयधोरण म्हणाल तर एकच राष्ट्राला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी संघटन करणे आणि त्यासाठी कार्यकर्ता निर्माण करून तो राष्ट्रप्रवाहात सोडून देणे. त्यापासून ते कधीच ढळले नाहीत. आणि हा काय प्रकार आहे हे कधी त्याचा अनुभव जाउंदेत पण अभ्यास न केलेल्याला समजले नाही...
कधी सोनियाना विरोध कर त्यासाठी स्वतःचे मुंडण करु असे आक्रस्तळेपणे सांगून हसे करुन घे.
असे विधान सुषमा स्वराज यांनी केले होते. रा.स्व.संघ ही जन्मापासून केवळ "पुरूषांची" संघटना होती/आहे. त्यात सुषमा स्वराज नव्हत्या...
मध्यन्तरी पाकिस्तानात जाऊन अडवाणीनी जीनांची स्तुती केली. त्यावरही संघाने मौन राखले. जसवंतसिंगानी जीनांवर काहितरी लिहिले आणि अचानक खळबळ उडाली. संघाच्या नेत्याना( स्वयंसेवकाना) साक्षात्कार झाला आणि ते दोन वेगवेगळ्या बाजूने बोलु लागले.
बातम्या पाहील्यातर यात तथ्य नाही हे समजेल.... आत्ताच्या बातम्यात तर माजी सरसंघचालक काय म्हणाले हे वाचले नसेल तरच आश्चर्य...
संघाची नक्की ध्येयधोरणे काय ही स्वयंसेवकानाच आता कळेनासे झाले आहे.
याला काही आधार नसावा. कारण जर ध्येयधोरणे समजत नसतील तर स्वयंसेवक संघापासून फारकत घेतील. तशी ते घेताना दिसत नाहीत.
संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य लोकाना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंसेवक तयार होत नाहीत.
या दोन्ही वाक्यांचा एकमेकांशी संबंध नाही. संघ संघटना काय आहे हे मला सामान्य असून आणि (लहानपणी कधीपण न जाता) अभ्यास, निरीक्क्षण करून समजू शकते. ते जर इतरांना समजू शकले नाही तर एकतर आधीच डोक्यात काहीतरी आहे तसेच संघातील ज्या व्यक्तींशी संबंध आला त्या हे सांगायला कमी पडल्या असा अर्थ होऊ शकतो. "त्यामुळे नवे प्रभावी स्वयंसेवक तयार होत नाहीत" या वाक्यातून पुर्वीचे स्वयंसेवक प्रभावी होते असे आपल्याला म्हणायचे आहे असे दिसते. चांगले आहे... बाकी आत्ताची काळजी करू नये, अनेकजण प्रभावी आहेत. पण ते प्रसिद्धीसाठी काम करत नसल्याने एकतर माध्यमांमधे दिसत नाहीत आणि त्यांच्यावर टिका झाली तरी ते खचत नाहीत.
बाकी तेहलका मधील हा लेख काहीतरी सनसनाटी असेल असे वाटले पण त्यातून काहीच उलटसुलट ते लिहू शकलेले नाहीत असे वाटले...एक केवळ संघ भाजपाला झोडपतोय इतकेच काय ते. आता त्यातील किती खरे ठरते त्यावरून तेहलकाची वृत्तपत्रीय आचारसंहीता समजेल नाहीतर नसतेच सनसनाटी आणि कुणाच्या तरी बाजूने कुणाच्या तरी विरुद्ध ओरडणारे इतकेच काय ते...
सध्या आम्ही जहाल आणि मादक पेयाचा आस्वाद घेतो आहोत. सर्वसामान्य नागरीकांच्या वैचारिक दिवाळखोरीकडे नंतर वळू.
बाकी सगळ्यांचे प्रतिसाद त्यांच्या त्यांच्या ख्यातीनुसारच आहेत. (एक्सेप्ट फॉर वनः नीलकांतचा नेहमीचा सौम्यपणा कुठे गेला?)
-- मिसळभोक्ता
बाकी सगळ्यांचे प्रतिसाद त्यांच्या त्यांच्या ख्यातीनुसारच आहेत
बाकी सर्वांचे माहित नाही, पण विकासचा प्रतिसाद मात्र त्याच्या (ब्रेन वॉशींग) ख्यातीनुसारच आहे ;)
असो..जोक्स अपार्ट, विकासने आण्णा चिंबोरींच्या प्रतिसादाचाही प्रतिवाद करावा अशी विनंती. तो पर्यंत त्याचा वरील प्रतिसाद नीट वाचून घेतो.
विकासचे प्रतिसाद मी वाचत नाही. एक तर चार ओळी पेक्षा मोठे प्रतिसाद मी वाचतच नाही. (कुणी लिहिला आहे ते बघून फक्त +१ म्हणतो.) दुसरे म्हणजे असे प्रतिसाद वाचून स्वतःची विचार करण्याची शक्ती नष्ट होण्याची भीती असते. विकासचे प्रतिसाद वाचण्याचे काम मी विकी ला आउटसोर्स केलेले आहे.
-- मिसळभोक्ता
विकासचे प्रतिसाद वाचण्याचे काम मी विकी ला आउटसोर्स केलेले आहे.
हाहाहाहा मीही तेच करावे म्हणत आहे. वाचायला वेळ पुरत नाही तिथे इतके टंकायला कसा काय वेळ मिळतो ह्याचाच विचार करत होतो.
असे प्रतिसाद वाचून स्वतःची विचार करण्याची शक्ती नष्ट होण्याची भीती असते. हे मात्र अगदी लाखमोलाचे बोललात.
बाकी सर्वांचे माहित नाही, पण विकासचा प्रतिसाद मात्र त्याच्या (ब्रेन वॉशींग) ख्यातीनुसारच आहे
तुम्ही जरी विनोद म्हणून लिहीले असले आणि त्याअर्थाने मी जरी हलके घेत असलो तरी डिसक्लेमर करावासा वाटला. लहान मुले भांडताना एकाचे मुद्दे संपतात आणि मग उत्तर देता आले नाही की तो म्हणतो, "तू वेडा आहेस" आणि मग वाद दुसरीकडेच भरकटतो. मी ब्रेन वॉशिंग करतो असे म्हणणे हा यातीलच एका अर्थी प्रकार वाटतो...
मी माझा वरील प्रतिसाद हा संघाचा प्रचार करायला लिहीला नसून मूळ लेखातील तृटी आणी कमतरता दाखवण्यासाठी लिहीला होता. इतके दिवस गांधीचे मारेकरी असे बोंबलत त्यांच्या विरोधकांनी स्वतःचे (चुकीचे) शस्त्र बोथट केले, परीणामी आता जनतेला त्याचा काही फरक पडत नाही. याचा अर्थ सर्व स्वयंसेवक झाले अथवा संघाचे झाले असा नसून साम्यवादी आणि तथाकथीत समाजवादी यांची खरी प्रतिमा आता जनतेला समजून चुकू लागली आहे. मग आता बाकी कशावरून तरी झोडा असा हा प्रकार आहे.
असे विचार पसरवणार्या संस्था/विचारवंत, काही न करता बोटे मोडत आणि कागाळ्या करत बसतात आणि वास्तवीक इतरांचे ब्रेनवॉशींग करण्याचा प्रयत्न करतात. केवळ संघाच्या संदर्भातच नाही तर एकूणच समाज, राष्ट्र, संस्कृती सगळ्याच्याच संदर्भात. जर तुम्हाला संस्कृती मान्य नसेल तर नसूंदेत पण इतरांना कशाला नावे ठेवता?
बाकी संघावरील माझा मूळ प्रतिसाद (विनायक पाचलगच्या चर्चेतील) आपण वाचला असेलच. त्यातील फक्त शेवटचे वाक्य येथे "ब्रेन वॉशिंगच्या" संदर्भात सांगतो: "म्हणूनच संघावर टिका करत बसण्याऐवजी जसे हवे तसे, वाटते त्या विचारधारेचा आधार घेऊन आपण समाजाला परत काही देतो का, याचा विचार करायला हवा इतकेच म्हणावेसे वाटते." आणि तसे प्रामाणिक काम करणारे सर्व विचारधारेत असतात आणि त्यांना असल्या फुटकळ काड्या करायला वेळ नसतो. त्यांचे ब्रेन वॉश करायचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांच्याकडून तुम्हीआम्ही शिकण्यासारखे बरेच काही असते. आणि इतरांची अवस्था ही कच्च्या मडक्याप्रमाणे... ते ही उलटे ठेवलेले. आणि तुम्हाला माहीत असेलच की त्याला एक मराठीत चांगली म्हण आहे: पालथ्या घड्यावर पाणी!
मी ब्रेन वॉशिंग करतो असे म्हणणे हा यातीलच एका अर्थी प्रकार वाटतो...
हे मलाच वाटत नाही, तर इतर सदस्यांनाही वाटते. आणि हे एक निव्वळ निरिक्षण आहे. "तू वेडा आहेस'" असे मी कुठेही म्हंटलेले नाही. त्यामूळे तू दिलेले उदाहरण मला मान्य नाही.
बाकी संघावरील माझा मूळ प्रतिसाद (विनायक पाचलगच्या चर्चेतील) आपण वाचला असेलच.
नाही वाचला. मूळ लेखा पेक्षा प्रतिसादच मोठा असेल तर मी सहसा वाचायचे टाळतो. बुवा वितभर आणि दाढी हात भर असे होण्याची शक्यता असते.
आणि तसे प्रामाणिक काम करणारे सर्व विचारधारेत असतात आणि त्यांना असल्या फुटकळ काड्या करायला वेळ नसतो..
साम्यवादी सुडो सेक्युलर विचारसरणीतही असे लोक असतात का?
नाही वाचला. मूळ लेखा पेक्षा प्रतिसादच मोठा असेल तर मी सहसा वाचायचे टाळतो. बुवा वितभर आणि दाढी हात भर असे होण्याची शक्यता असते.
छान! मिसळभोक्तांच्या छोट्या प्रतिसादाने पण तुमचे ब्रेन वॉशिंग होते तर... :-)
साम्यवादी सुडो सेक्युलर विचारसरणीतही असे लोक असतात का?
विचारसरणी सुडो नसते तीचा गैरवापर करणारे सुडो असतात. म्हणूनच कधी कधी "तथाकथीत" हिंदूत्ववादी असेही म्हणावे लागते. :-(
रास्वस बद्दल काय लिहिणे अपेक्षीत आहे ?
रास्वसं ची सफल झालेली उघड उद्दीष्ठ्ये.त्यांची ध्येय धोरणे नक्की काय आहेत. जर राजकीय अजेंडा नसेल तर सामाजीक अजेंडा कोणता या बद्दल माहिती हवी होती. त्याबाबत कोणीच फारसे लिहिले नाही.
हे राष्ट्र हिंदुराष्ट्र व्हावे ही अपेक्षा कधीच शक्यतेत नव्हती. आजवरच्या इतिहासात भारतभूमी वर एकसंघ कोणाचेच कधीच राज्य नव्हते. हिंदु धर्म हा त्या अर्थाने कधीच आग्रही नव्हता. या भूमीवर बाहेरुन आलेले धर्म क्षणभर बाजूला ठेवुयात. पण जे धर्म याच भूमीत उमग पावले आहेत त्यांचे काय ? बौद्ध,जैन, पुष्टीमार्गीय वैष्णव , नागर , शिवधर्म हे स्वतःला हिंदु मानत नाहीत त्यांचे काय? या धर्माना पंथ म्हणता येणार नाहीत.
शंकराचार्याना त्यांच्या वैदीक मताला विरोध करणारेही बरेच आहेत.
असो.....
या धाग्याचा हेतू संघ बदलत्या राजकीय/जागतीक परिस्थीत कसा बदलला आहे त्याची माहिती मिळावी त्यावर चर्चा व्हावी अशी आहे.
त्याबद्दल कोणीच बोलत नाहीत.
धाग्यात मांडलेले विचार कदाचित एकांगी असतील पण त्यावर वैचारीक प्रतिसाद कोणीच दिला नाही हे खेदाने म्हणावेसे वाटते.
मी सुद्धा एकेकाळी अभाविप चा कार्यकर्ता होतो. शाखेत ही जायचो.
अभाविपसाठी कोपरा सभा घेतल्या आहेत. विद्यार्थीपरिषदेत असताना मला तेथे परिषदेचा संघाशी संबन्ध नाही असेच सांगण्यात यायचे पण कोणी जरा वेगळे मत मांडले की त्याला बाजूला काडले जायचे. तेथेही सम आर मोअर इक्वल हे जाणवण्याइतपत हा अनुभव मलाही आला होता. अंधश्रद्धेवर टीका केलेली चालायची नाही.
"हिंदु मोरा भई हिंदु मोरा " या गाण्यात असणार्या "मार्कसिझम मतिमंदु" या ओळीचे एकाला स्पष्टीकरण विचारले होते. त्या दिवसापासून हा जणू कोणी छुपा हेर आहे असे वातावरण झाले होते.
असो....
लोक हे संघटनेमुळे बांधले जातात. संघटना लोकमानस घडवते. एखाद्या संघटनेतले नेते जे बोलतात तेच त्या संघटनेचे विचार असतात असे लोक मानतात.
माझ्या लिखाणात मी कोणाचीच बाजू घेतली नाही . मला फक्त माहिती हवी आहे आणि ती येथे कोणीच देत नाही.
एवढे कट्टर स्वयंसेवक येथे आहेत निदान त्यानी तरी वैचारीक मतभेद बाजूला ठेवुन संघाच्या सध्याच्या ध्येयधोरणांबद्दल माहिती द्यावी ही विनन्ती.
काँग्रेस किंवा इतर संघटना कशा आहेत यावर टीका करण्यापेक्षा जी संघटना साधनशुचितेवर विष्वास ठेवते त्या संघटनेच्या एकूणच धोरणात बदलत्या काळानुसार काय बदल झाले आहेत याची माहिती हवी होती.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
संघ ही एक फॅसिस्ट विचारसरणीची संस्था आहे. देशप्रेमाच्या नावाखाली तिरस्काराचे बाळकडू शाखांमधून पाजले जाते. भडक विचारांचे माथेफिरू लोक नेतृत्व सांभाळतात. ज्याला खरोखरंच देशप्रेमासाठी आयुष्य घालवायचे असेल त्याने सैन्यात भरती व्हावे. संघ जात पात मानत नाही असे वरुन म्हणत असला तरी संघाचा प्रभाव एका विशीष्ठ पोट जातीतील लोकांवरच असतो. (कुठल्याही शाखेतील बहुतांश स्वयंसेवक पाहा). आजकाल ग्रामीण भागात जाऊन संख्या वाढवण्यासाठी बहुजन समाजातील लोकांनाही भरती केले जात असले तरी ह्यांचा मूळ उद्देश (हिडन अजेंडा) हा वर्णव्यवस्थेवर आधारीत समाज उभा करणे हाच आहे.श्री. निमित्तमात्र
१ फॅसिस्टची व्याख्या करता कां जरा ? म्हणजे निदान सगळ्यांना कळेल कि तुमच्या मते फॅसिस्ट कुणाला म्हणतात ?
२. आणि संघामध्ये फॅसिझम कसा आहे, ते ही सांगा - उदाहरणासकट.
३. संघाचा हा जो काही 'हिडन अजेंडा' आहे तो तुम्ही कुठे वाचलात ?
जर तसे तुमच्या विचारातून आलेले असेल तर त्या विचारांना काय 'बेस' आहे ते सांगा.
उत्सुकतेपोटी संघाची वेबसाईट बघितली.तेथून...
Who can become a member of RSS?
Any Hindu male can become member of RSS.
संघाने त्यांचे हे धोरण बदलले पाहिजे असे माझे बिलकूल म्हणणं नाहीय..
फक्त मला हे विशेष वाटल्याने (आणि आधी माहित नसल्याने) इथे सांगतोय.
Any Hindu male can become member of RSS.
अहो मुळात इथेच गोची आहे ना! हिंदू म्हणजे कोण? ह्याचीच व्याख्या कुणाला माहित नाही. नाना बेरके म्हणतात भारतातले सगळे हिंदू (मिरजेतली दंगल दोन हिंदू गटांमध्येच काय हो नाना?).. विकास म्हणतो सगळे अमेरिकेतले हिंदू्. ..यशोधरा म्हणते व्याख्याच कशाला हवी?
थोडक्यात सोयीप्रमाणे कुणीही हिंदू म्हणवला जाऊ शकतो/ अपात्र ठरवला जाऊ शकतो.
अभ्यंकर
संघ पुरुषांकरीताच आहे. महिलांसाठी राष्ट्रसेविका समिती आहे.
दुसरे म्हणजे " हिंदूची व्याख्या अशी आहे कि, हिंदुस्थानात जो राहतो तो हिंदू " मग त्यात भारतातले मुस्लीम, ख्रिश्चन आणि इतर सगळे येतात.
आणि मग अमेरिकेत राहतो तो? विकास हिंदू नाही का? काय तुमची व्याख्या..
हा मुद्दा येथे स्पष्ट करण्यासाठी अवांतर आहे. मधे तुम्ही चर्चा चालू केली होती तेंव्हा लिहायला आवडले असते पण वेळेअभावी त्यात लिहू शकलो नाही. खालील स्पष्टीकरण केवळ वरील वाक्याशी मर्यादीत आहे.
भारतात जन्माला आलेला आणि भारतास पितृभू/मातृभू पुण्यभू मानणारा हिंदू अशी सावरकरांनी हिंदू या शब्दाची आणि पर्यायाने हिंदूत्वाला जन्म देणारी व्याख्या केली.
कधी काळी परकीयांनी या देशातील जनतेस "हिंदू" हे नाव दिले कालांतराने ते येथील संस्कृतीत मिळून गेले नंतर इस्लामीक आक्रमणांपासून त्याला धार्मिक छटा आली. ब्रिटीशांनी तो एक त्यांच्या व्याख्येतील धर्म, म्हणजे इंग्रजीतील रीलीजन आणि मराठीतील संप्रदाय करून टाकले.
त्यातील जन्माने आपण सर्वच भारतीय आहोत (आणि अमेरिकेत असलो तरी अजूनही मी भारतीय नागरीकच आहे :) ) म्हणून त्या अर्थाने हिंदू. जे भारताबाहेर राहूनही भारतीय वंशाचे आहेत, तसे स्वतःला मानतात आणि राष्ट्राने इतर देशाशी समरस झाले असले तरी भारतातील संस्कृती जपतात- त्या अर्थे पुण्यभू मानतात, ते देखील हिंदूच. त्या अर्थाने अमेरिका अजून नवीन आहे, पण अनेक पिढ्या असलेले द. अफ्रिका, कॅरीबिअन्स, ब्रिटन मधील अनेक जण हे सांस्कृतिक दृष्ट्या हिंदू आहेत - स्वतःच्या आचरणातून आणि इतरांच्या नजरेतून...
माझ्या "आपण सारे हिंदू" या न्यूजवीक मधील मूळ लेखाच्या चर्चेवरून आपण वर लिहीले आहे. त्यात म्हणलेले "तत्वज्ञानाने" हिंदू झालेली नवीन अ-भारतीय वंशाची माणसे येतात.
असा प्रकार केवळ "एक पुस्तक, एक प्रेषित" असा प्रकार नसलेल्या हिंदू धर्मातच होऊ शकतो कारण तो एका अर्थाने एका भूभागाशी संलग्न आहे आणि तरी देखील त्याचे तत्वज्ञान हे वैश्विक आहे.
असो.
भारतात जन्माला आलेला आणि भारतास पितृभू/मातृभू पुण्यभू मानणारा हिंदू अशी सावरकरांनी हिंदू या शब्दाची आणि पर्यायाने हिंदूत्वाला जन्म देणारी व्याख्या केली
.
भारतात जन्माला आलेला म्हणजे नक्की काय? सध्या ज्याला आपण भारत असे म्हणतो तो १९४७ साली अस्तित्वात आला. त्यापूर्वी अफगाणिस्तान पासून ते ब्रह्मदेशापर्यंत भारतच होता असे काही लोकांचे म्हणणे आहे. म्हणजे १९४७ पूर्वी जन्मलेल्या माणसाने हिंदू असण्यासाठी नक्की कोणत्या भूभागावर जन्म घेतलेला असला पाहिजे? भारत पाकिस्तान असे तुकडे स्वातंत्र्या नंतर झाले, त्यापूर्वी पाकिस्तानात जन्म घेतलेले सगळे हिंदूच काय?
जे भारताबाहेर राहूनही भारतीय वंशाचे आहेत, तसे स्वतःला मानतात आणि राष्ट्राने इतर देशाशी समरस झाले असले तरी भारतातील संस्कृती जपतात- त्या अर्थे पुण्यभू मानतात, ते देखील हिंदूच.
भारतीय संस्कृती जपण्याचे निकष काय आहेत? वर्षभरातून एकदा इंडीयन असोशिअन मधे जाऊन इंडीयन फूड हादडले म्हणजे भारताबाहेर राहूनही संस्कृती जपतात असे म्हणावे का? भारतीय संस्कृती जपणारे (म्हणजे नेमके काय ते स्पष्ट नसल्याने, मी केलेल्या व्याख्येने जपणारे) परंतू ख्रिश्चन बनलेले काही भारतीय मी पाहिले आहेत, ते ही हिंदूच का? बॉबी जिंदाल हिंदू आहे का?
आणि शेवटी.. वरील व्याख्येप्रमाणे..मिरजेतील दंगल ही हिंदूंच्या दोन गटातीलच का?
तूर्तास ह्या प्रश्नांची उत्तरे कृपया द्यावीत..
भारतात जन्माला आलेला म्हणजे नक्की काय? ... भारत पाकिस्तान असे तुकडे स्वातंत्र्या नंतर झाले, त्यापूर्वी पाकिस्तानात जन्म घेतलेले सगळे हिंदूच काय?
माझा प्रतिसाद नीट वाचलात तर समजेल. परत तेच (कारण उत्तर वेगळे असूच शकत नाही) फक्त वेगळ्या शब्दात: हिंदू हा शब्द भौगोलीक, धार्मिक आणि तत्वज्ञान या अर्थाने वापरला जातो. म्हणून भौगोलीक अर्थाने पाकीस्तानात जन्मलेले सगळे हिंदूच होते. माझे काय घेऊन बसता? ते बिचारे आम्ही पाक (शुद्ध) आणि इस्लामीक स्टेट वगैरे म्हणत जगभर ओरड करतात पण त्यांना आज देखील मध्यपुर्वेतील (मूळचे) मुस्लीम त्यांना आजही समान वागणूक देत नाहीत. कारण कधीकाळचे ते हिंदू होते...
भौगोलीक भारताशी नाते टिकवणे - त्यात व्यक्तीगत नात्याशिवाय, समाजकार्याला मदत करणे इत्यादी पण गृहीत धरले आहे. जेंव्हा २६ नोव्हेंबर नंतर धर्माचे बंधन न मानता सर्व भारतीय एकत्र येऊन निषेध करतात, त्सुनामी सारख्या आपत्तीनंतर मोकळ्या हाताने मदत करतात तेंव्हा ते सर्व भौगोलीक दृष्ट्या हिंदूच आहेत.
भारतीय संस्कृती जपण्याचे निकष काय आहेत? वर्षभरातून एकदा इंडीयन असोशिअन मधे जाऊन इंडीयन फूड हादडले म्हणजे भारताबाहेर राहूनही संस्कृती जपतात असे म्हणावे का?
भारतीय संस्कृती जपणारे म्हणजे माझ्या लेखी: जे तत्वज्ञान, (चांगले/आदर्श)आचार-विचार, भाषा वगैरे सर्व काही आले, जे भारतीय उपखंडातून तयार झाले आहेत ते जपणारे/आचरणारे कुणीही हिंदूच आहेत. मग त्यांचा संप्रदाय या अर्थाने काही असोत. म्हणूनच जेंव्हा दंगली होतात तेंव्हा त्यांना सांप्रदायीक दंगली असे अथवा जातीय दंगली असे बहुतांशी वेळेस म्हणले जाते.
तुम्ही कुठे राहता आणि काय करता हे माहीत नाही, पण, "वर्षभरातून एकदा इंडीयन असोशिअन मधे जाऊन इंडीयन फूड हादडले म्हणजे भारताबाहेर राहूनही संस्कृती जपतात असे म्हणावे का?" असे म्हणणे म्हणजे (for lack of any better word) पूर्ण अज्ञान आहे. चला! म्हणजे तुमच्या दृष्टीने संघ म्हणजे लष्करे तोयबा आणि अनिवासी भारतीय म्हणजे फक्त "इंडीयन फूड हादडणारे". या दोन गोष्टीतून कुठलाही अभ्यास न करता केवळ ठणाणा करत बसणे आणि त्यालाच मत आहे असे म्हणणे चालू आहे. तरी बरं, बाकी सगळे लांब राहूंदेत, गांधीजी पण २१ वर्षे अनिवासी भारतीय आणि स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवून घेणारे होते, इतका इतिहास तरी माहीत असावा अशी अपेक्षा आहे.
भारतीय संस्कृती जपणारे (म्हणजे नेमके काय ते स्पष्ट नसल्याने, मी केलेल्या व्याख्येने जपणारे) परंतू ख्रिश्चन बनलेले काही भारतीय मी पाहिले आहेत, ते ही हिंदूच का? बॉबी जिंदाल हिंदू आहे का?
हो त्या अर्थाने ते हिंदूच आहेत. माझे विविधधर्मीय भारतीय जवळून ओळखीचे आहेत (भारतात आणि अमेरिकेत) जे या अर्थाने हिंदूच आहेत. असे संप्रदायाने ख्रिश्चन आणि मुसलमान माझ्या जवळून ओळखीचे आहेत जे देवधर्माच्या बाबतीत हिंदूपद्धती जपत नाहीत पण बाकी जेंव्हा भाषा, सामाजीक बांधिलकी, देशाशी प्रेम आदी येते तेंव्हा भारतीत संस्कृती जपत असतात. म्हणून ते सांस्कृतीक दृष्ट्या ते हिंदूच असतात. बॉबी जिंदाल यांनी कारणे काही सांगितली तरी राजकीय महत्वाकांक्षेपोटी धर्मांतर केले आहे. त्यांचे आई-वडील हे हिंदूच आहेत आहेत आणि (ऐकीव माहीती प्रमाणे) घरातील वातावरण पण भारतीयच / हिंदूच आहे.
-------------
मूळ विषयाशी अवांतर होत असल्याने, तसेच जास्त प्रतिसाद झाल्याने ट्रॅक करणे अवघड होत असल्याने या विषयावर अधिक चर्चा करायची असेल तर कृपया खरड करा ही विनंती.
मूळ विषयाशी अवांतर होत असल्याने, तसेच जास्त प्रतिसाद झाल्याने ट्रॅक करणे अवघड होत असल्याने या विषयावर अधिक चर्चा करायची असेल तर कृपया खरड करा ही विनंती
ठीक आहे. प्रतिसादात अनेक मुद्दे अनुत्तरीत असले आणि बाकीचे मुद्दे भरकटवणारे असले तरी त्याचा उहापोह इथे नको.
पण खरडवही पेक्षा...हाच प्रतिसाद 'हिंदू कोण?' ह्या मी सुरू केलेल्या चर्चेत हलवलात तर तिथे अधिक चर्चा करता येईल आणि सर्व मिपाकरांना त्यात सामील होता येईल.
मी भागवतांच्या जागी असतो आणि मला जर कुणाही भारतीयाने संघात यावे असे वाटत असते तर मी "Any Indian can become member of RSS" असे लिहिले असते.
मग हिंदुत्वाची कोणीही कशीही काहीही व्याख्या करो....
सन्घाची समाजसेवा........ :)
[edit] Allegations by Leftist groups and rejection of charges by UK Charity commissioner
A group by name "Campaign to Stop Funding Hate" (SFH), a front for the Forum of Indian Leftists (FOIL)[89] , had accused that affiliates of the RSS had raised millions of dollars for 'relief and development work' in India and that the funds had been misused and channeled to many RSS activities, allegedly through a US based organization called the "India Development and Relief Fund" (IDRF)and other organisations[90]. The IDRF responded to these charges as "untenable and made by communist activists"[91]. The charges were investigated by the UK Charity Commissioner who after the investigations, expressed "satisfaction" at the handling of the funds by the Sangh. The Commission said that its investigations showed that all the money collected and spent could be accounted for and that "trustees have taken sufficient steps to ensure that funds have been applied in accordance with the appeal." It rejected allegations of misuse of funds[92].
[edit] Defamation case against journalist for false allegations
On January 15 2000, a daily, 'The Statesman' carried a story about the RSS by A G Noorani, which depicted the RSS as the killer of Gandhi[93]. Subsequently the Delhi unit of the RSS filed a criminal case of defamation against author of the article A G Noorani along with the cartoonist and the Managing Director of the publishing house. When two of the accused did not respond to the Court summons, non-bailable warrants were issued in their name by the Court[14]. On February 25,2002, Noorani wrote an unconditional apology to the court in which he regretted writing the defamatory article against the RSS. On March 3, 2002, 'The Statesman' also published an apology regretting the publication of the said article.[94
सन्दर्भ :
http://en.wikipedia.org/wiki/Rashtriya_Swayamsevak_Sangh
कुठल्याही विवाद्य गोष्टींमध्ये " संघाचा हात आहे " असे समीकरण अनेक वर्षांपासून मांडले जात आहे. त्यात कितपत तथ्य असते ते कुणास ठाऊक, पण त्यामुळे मने / मते बिघडवणारी चर्चा थांबते. संघाने असल्या गोष्टीना कधी भीकच घातली नाही. कारण 'संघाचा तथाकथित हात असणे' कधीही, कुठेही सिध्द झालेले नाही.
संघाबद्दलच्या ह्या तिखटजाल चर्चेमध्येसुध्दा संघाचाच हात असावा असे ( परंपरेनुसार ) विधान करणे सहज शक्य आहे. ते केले म्हणजे कदाचित चर्चा थांबेल.
नमस्कार ,
फारच सुन्दर लेख . योगायोगाने मला देखील सन्घाबद्द्ल काही दिवस आधी विशेष माहिती मिलाली .दुर्दैवाने चान्गली बाजु कधी समोर येत नाही .सदर लेखाबद्दल अभिनन्दन !!!!
विजुभाऊ
यांनी महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. उद्याच्या लोकसभा निवडणूकीत काय होइल. दिल्ली अभी एक साल दूर है.
पण
यंग आणि डायनॅमिक मनमोहनसिंग यांनी 'बचेंगे तो और भी लढेंगे' म्हटले आहे.
असो
भाजप बाबत म्हणाल तर ते कुणालाही आपलसं करु शकतात. रेखाताई पुरुषोत्तम खेडेकर किंवा
कलमाडींनाही पाठिंबा देऊ शकतात. ते फार व्यापक आणि मनाने उदार लोक आहेत.
कलमाडींना पाठिंबा दिला होता तेव्हा यांचे कलमाडीप्रेम उतू जात होते.
पुणेकर याबाबत अधिक सांगू शकतील !
>>> कलमाडींना पाठिंबा दिला होता तेव्हा यांचे कलमाडीप्रेम उतू जात होते.
शरद पवारांशी झालेल्या मतभेदांमुळे कलमाडीला १९९७ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले होते. १९९७ मध्ये गुजराल सरकारच पाठिंबा काँग्रेसने काढून घेतल्यावर कलमाडीने काँग्रेसचे तब्बल ४० खासदार आपल्या बाजूला जमवून वाजपेयींचे सरकार आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पक्षांतरबंदी कायदा व २७३ चा आकडा गाठण्यासाठी अजून काही खासदार कमी पडल्याने तो प्रयत्न फसला. नंतर मार्च १९९८ मधल्या लोकसभा निवडणुकीत कलमाडीने अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. सरकार स्थापन करण्याचे भाजपचे प्रयत्न १९९६ मध्ये फसले होते कारण खासदारांची संख्या कमी होती. आपल्याला पाठिंबा देणार्या खासदारांची संख्या वाढावी म्हणून स्थानिक भाजप नेत्यांचा व संघाचा विरोध असतानासुद्धा वाजपेयींनी पुण्यातून भाजप उमेदवार न देता कलमाडीला पाठिंबा दिला होता.
गुरुजी
> कलमाडीने काँग्रेसचे तब्बल ४० खासदार आपल्या बाजूला जमवून वाजपेयींचे सरकार आणण्याचा प्रयत्न केला होता
या गोष्टी खर्या समजता आपण
आम्ही ४० नव्हे ६० खासदार ऐकले होते जबाबदार लोकांकडून
कलमाडीला फक्त वाजपेयींच्या आग्रहामुळे पाठिंबा दिला गेला. भाजपचे स्थानिक नेते, शिवसेना व संघाचा कलमाडीला स्पष्ट विरोध होता. एका सभेत बोलताना बाळासाहेब ठाकर्यांनी कलमाडीविषयी बोलताना त्याला बेडकाची उपमा देऊन बेडकाप्रमाणे हा टुणकन उडी मारून काँग्रेसमध्ये परत जाईल हे भाकीत वर्तविले होते जे वर्षभरातच खरे झाले. मे १९९९ मध्ये शरद पवारांना काँग्रेसने काढून टाकल्यावर लगेचच कलमाडी स्वगृही परतला. स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे स्थानिक नेत्यांनी अविनाश धर्माधिकारींना अपक्ष म्हणून उभे केले होते व त्यांना ३५ हजाराहून अधिक मते मिळाली होती. ही सर्व मते कलमाडीची उमेदवारी न आवडलेल्या संघ कार्यकर्त्यांची होती.
ही सर्व मते कलमाडीची उमेदवारी न आवडलेल्या संघ कार्यकर्त्यांची होती.
३५००० मते ही कलमाडींची उमेदवारी न आवडलेल्या संघ कार्यकर्त्यांची होती हो. बाकीच्या संघ कार्यकर्त्यांना कलमाडींची उमेदवारी आवडली असावी. नाही का? सत्ताप्राप्तीसारख्या मोठ्या ध्येयासाठी विचारसरणीचा त्याग हा एवढा मोठा गुन्हा नाही. ;)
>>> बाकीच्या संघ कार्यकर्त्यांना कलमाडींची उमेदवारी आवडली असावी. नाही का? सत्ताप्राप्तीसारख्या मोठ्या ध्येयासाठी विचारसरणीचा त्याग हा एवढा मोठा गुन्हा नाही.
नाही. बाकीच्यांनी मतदान केलेच नाही.
प्रतिक्रिया
मी तक्रार
अदिती ओवीप
घेउन टाका
धाग्याचा खफ
झोप
यात आक्षेपार्ह काय आहे? खरे बोलणे हे?
अण्णा,
वरील प्रतिसादात
राष्ट्र
क्षणभर तर
अहो मग
गादीवरुन
राष्ट्रीय
जहाल आणि मादक
बाकी
म्हणूनच
विकासचे
डिसक्लेमर
विकास,
लेख-प्रतिसाद
रास्वस
धाग्यात
निमित्तमात्र ह्यांचा प्रतिसाद . .
एक चांगले वाचन.
उत्सुकतेप
एक सन्दर्भ
Any Hindu male can become
बास की ? आता तर कुठे सुरु होतय . .
आणि मग
राष्ट्र आणि संस्कृती
प्रश्नच प्रश्न!
सरळ उत्तर...
मूळ
मी
सन्घाची
मिपाच्या ह्या "दंगलीत"सुध्दा संघाचा हात ?
विकास शेठ
हा हा!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
वाह छान
विजुभाऊ
>>> कलमाडींना पाठिंबा दिला
गुरुजी
कलमाडीला फक्त वाजपेयींच्या
पुण्यात फक्त ३५००० संघ
नाही
गुरुजींच्या कलमाडी प्रतिसादा
>>> गुरुजींच्या कलमाडी
>>> बाकीच्या संघ
गुरुजी