Skip to main content

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 09/09/2009 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेत सध्या बरीच खळबळ माजली आहे. भाजप मध्ये विलीन व्हायचे/भाजप वर अंकुश ठेवायचे/ जीना चे गोडवे गायचे / तसे गोडवे गाणारांचा निषेध करायचा यावर बरेच मंथन चालू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भुमीका बरेच वेळा बदलत असते. पूर्वी जनसंघ नावाने स्वतःचे राजकीय आस्तित्व ठेवणारी ही संघटना आणीबाणीनन्तर बरीच बदलली. जनता पक्षाच्या कडबोळी सरकारच्या काळात संघाने सत्तेची चव चाखली. त्यानन्तरच्या इंदिरा गांधींच्या करिश्माच्या आणि इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानभुतीच्या लाटेत भाजप या नावाने रुपडे पालटून उतरलेला हा पक्ष वाहून जातो की काय अशी शंका होती. राजीवगांधींच्या काळात सुरुवतीला त्याना नक्की कसा विरोध करायचा हा संघीयाना एक मोठा प्रश्नच होता. त्या काळात भाजपने जाहीररित्या गांधीवादी समाजवादाचा स्वीकर करु असे जाहीरपणे सांगितले होते पण नन्तर राजकारणात मंडल आयोगाच्या अस्त्राला उत्तर देण्यासाठी तितकेच विघातक असे रामजन्मभूमीचे अस्त्र संघाने बाहेर काढले. त्या विषयावर एक राजकीय पक्ष म्हणून त्यानी नेहमीच दुटप्पी भुमीका ठेवली. भाजप म्हणजे संघ नव्हे असे म्हणताना मात्र भाजपतर्फे संघाचा अजेन्डा चालू ठेवला. भारतीय राजकारणातील बदलेल्या परीस्थीत संघाने नेहमीच धरसोड भुमीका घेतली आहे. संघ म्हणजे भाजप नव्हे. संघ म्हणजे विश्वहिन्दु परिषद नव्हे संघ म्हणजे बजरंग दल नव्हे असा प्रत्येक संघटनेशी स्वतःचा संबन्ध नाही असे संघ वारंवार म्हणत असतो. पण मग सम्घ म्हणजे नक्की कोण? असा साहजीक प्रश्न पडतो. राजकारणात यायचे नाही पण राजकारण आपल्या तालावर व्हावे असा दुटप्पी अट्टाहास कशासाठी? बाबरी मशीद पाडण्यात संघाचा हात नव्हता ( असे निदान सध्या तरी मानु यात) पण बाबरी मशीदीचा मुद्दा हा संघानेच शिजवत ठेवला होता. भाजप च्या राजकीय फायद्या साठी बाबरी मशीदीचा मुद्दा सतत तेवत रहाणे अत्यन्त आवश्यक होते . दुर्दैवाने बाबरी मशीद कारसेवकानी पाडली. ( संघाचा कारसेवकांशी संबन्ध नाही) आणि तो मुद्दा भाजपच्या हातून निसटला. मोदींचे हिटलरी स्टाईलचे हिन्दुत्व कदाचित भावले त्यामुळेच की काय स्वतःचा कट्टर शत्रु असलेल्या संजय गांधींच्या मुलाला पावन ठरवले गेले. भाजप सत्तेत असताना बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. संघाच्या बर्‍याच स्वयंसेवकानी सत्तेची चव नव्याने चाखली. पण संघाला अजूनही स्वत:ची नक्की अशी ध्येय धोरणे ठरवता अली नाहीत. कधी सोनियाना विरोध कर त्यासाठी स्वतःचे मुंडण करु असे आक्रस्तळेपणे सांगून हसे करुन घे.कधी मनमोहनसिंगांचा विरोध कर अशा फारसा पक्का पाया नसलेल्या धोरणाना हाती धरत संसदेत भाजपने आपले आस्तित्व टिकवून ठेवले. कंदहार प्रकरणात पुरती नाचक्की झाल्यानन्तर भाजपच्या सुदैवाने विरोधी पक्षानी बराच समजूतदारपणा दाखवला. संघाने त्या घटनेवर सोयीस्कर मौन पाळले. मध्यन्तरी पाकिस्तानात जाऊन अडवाणीनी जीनांची स्तुती केली. त्यावरही संघाने मौन राखले. जसवंतसिंगानी जीनांवर काहितरी लिहिले आणि अचानक खळबळ उडाली. संघाच्या नेत्याना( स्वयंसेवकाना) साक्षात्कार झाला आणि ते दोन वेगवेगळ्या बाजूने बोलु लागले. स्वातंत्र्यानन्तर साठ वर्षे उलटली. एक चांगली ध्येधोरणे ठरवून जन्माला आलेली संघटना स्वतःची ध्येयधोरणे हरवून निष्प्रभ ठरु लागली आहे. बरीच बौद्धीके/ विचार मंथन शिबीरे झाल्यानन्तरही ही संघटना आता नेतृत्वहीन बनत चालली आहे. संघाची नक्की ध्येयधोरणे काय ही स्वयंसेवकानाच आता कळेनासे झाले आहे. संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य लोकाना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंसेवक तयार होत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना ध्येयधोरणांच्या धरसोडीमुळे आता राजकीय आस्तित्वसाठी गुदमरत आहे हे लिहिताना वैचारीक /राजकीय भुमीका/ वैयक्तीक आकस म्हणून असे काही नाही . हे एक सर्वसामान्य नागरीकाचे हे मत आहे.

वाचने 63541
प्रतिक्रिया 199

प्रतिक्रिया

रास्वस बद्दल काय लिहिणे अपेक्षीत आहे ? रास्वसं ची सफल झालेली उघड उद्दीष्ठ्ये.त्यांची ध्येय धोरणे नक्की काय आहेत. जर राजकीय अजेंडा नसेल तर सामाजीक अजेंडा कोणता या बद्दल माहिती हवी होती. त्याबाबत कोणीच फारसे लिहिले नाही. हे राष्ट्र हिंदुराष्ट्र व्हावे ही अपेक्षा कधीच शक्यतेत नव्हती. आजवरच्या इतिहासात भारतभूमी वर एकसंघ कोणाचेच कधीच राज्य नव्हते. हिंदु धर्म हा त्या अर्थाने कधीच आग्रही नव्हता. या भूमीवर बाहेरुन आलेले धर्म क्षणभर बाजूला ठेवुयात. पण जे धर्म याच भूमीत उमग पावले आहेत त्यांचे काय ? बौद्ध,जैन, पुष्टीमार्गीय वैष्णव , नागर , शिवधर्म हे स्वतःला हिंदु मानत नाहीत त्यांचे काय? या धर्माना पंथ म्हणता येणार नाहीत. शंकराचार्याना त्यांच्या वैदीक मताला विरोध करणारेही बरेच आहेत. असो..... या धाग्याचा हेतू संघ बदलत्या राजकीय/जागतीक परिस्थीत कसा बदलला आहे त्याची माहिती मिळावी त्यावर चर्चा व्हावी अशी आहे. त्याबद्दल कोणीच बोलत नाहीत. धाग्यात मांडलेले विचार कदाचित एकांगी असतील पण त्यावर वैचारीक प्रतिसाद कोणीच दिला नाही हे खेदाने म्हणावेसे वाटते. मी सुद्धा एकेकाळी अभाविप चा कार्यकर्ता होतो. शाखेत ही जायचो. अभाविपसाठी कोपरा सभा घेतल्या आहेत. विद्यार्थीपरिषदेत असताना मला तेथे परिषदेचा संघाशी संबन्ध नाही असेच सांगण्यात यायचे पण कोणी जरा वेगळे मत मांडले की त्याला बाजूला काडले जायचे. तेथेही सम आर मोअर इक्वल हे जाणवण्याइतपत हा अनुभव मलाही आला होता. अंधश्रद्धेवर टीका केलेली चालायची नाही. "हिंदु मोरा भई हिंदु मोरा " या गाण्यात असणार्‍या "मार्कसिझम मतिमंदु" या ओळीचे एकाला स्पष्टीकरण विचारले होते. त्या दिवसापासून हा जणू कोणी छुपा हेर आहे असे वातावरण झाले होते. असो.... लोक हे संघटनेमुळे बांधले जातात. संघटना लोकमानस घडवते. एखाद्या संघटनेतले नेते जे बोलतात तेच त्या संघटनेचे विचार असतात असे लोक मानतात. माझ्या लिखाणात मी कोणाचीच बाजू घेतली नाही . मला फक्त माहिती हवी आहे आणि ती येथे कोणीच देत नाही. एवढे कट्टर स्वयंसेवक येथे आहेत निदान त्यानी तरी वैचारीक मतभेद बाजूला ठेवुन संघाच्या सध्याच्या ध्येयधोरणांबद्दल माहिती द्यावी ही विनन्ती. काँग्रेस किंवा इतर संघटना कशा आहेत यावर टीका करण्यापेक्षा जी संघटना साधनशुचितेवर विष्वास ठेवते त्या संघटनेच्या एकूणच धोरणात बदलत्या काळानुसार काय बदल झाले आहेत याची माहिती हवी होती. पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

In reply to by विजुभाऊ

धाग्यात मांडलेले विचार कदाचित एकांगी असतील पण त्यावर वैचारीक प्रतिसाद कोणीच दिला नाही हे खेदाने म्हणावेसे वाटते.
विजुभाऊ, तुम्हीही मिभोकाकांच्या पावलावर पाऊल ठेवून विकासचे प्रतिसाद दुर्लक्षित केलेत का? अदिती

संघ ही एक फॅसिस्ट विचारसरणीची संस्था आहे. देशप्रेमाच्या नावाखाली तिरस्काराचे बाळकडू शाखांमधून पाजले जाते. भडक विचारांचे माथेफिरू लोक नेतृत्व सांभाळतात. ज्याला खरोखरंच देशप्रेमासाठी आयुष्य घालवायचे असेल त्याने सैन्यात भरती व्हावे. संघ जात पात मानत नाही असे वरुन म्हणत असला तरी संघाचा प्रभाव एका विशीष्ठ पोट जातीतील लोकांवरच असतो. (कुठल्याही शाखेतील बहुतांश स्वयंसेवक पाहा). आजकाल ग्रामीण भागात जाऊन संख्या वाढवण्यासाठी बहुजन समाजातील लोकांनाही भरती केले जात असले तरी ह्यांचा मूळ उद्देश (हिडन अजेंडा) हा वर्णव्यवस्थेवर आधारीत समाज उभा करणे हाच आहे. श्री. निमित्तमात्र १ फॅसिस्टची व्याख्या करता कां जरा ? म्हणजे निदान सगळ्यांना कळेल कि तुमच्या मते फॅसिस्ट कुणाला म्हणतात ? २. आणि संघामध्ये फॅसिझम कसा आहे, ते ही सांगा - उदाहरणासकट. ३. संघाचा हा जो काही 'हिडन अजेंडा' आहे तो तुम्ही कुठे वाचलात ? जर तसे तुमच्या विचारातून आलेले असेल तर त्या विचारांना काय 'बेस' आहे ते सांगा.

In reply to by नाना बेरके

ते बहुजन वगैरे मुद्दा पण तितका कळला नाही. पण ह्याच संदर्भात एक अतिशय चांगलं पुस्तक आहे. पुस्तक वर टिचका. शक्यतो मराठी मिळालं तर आवर्जून वाचा.

उत्सुकतेपोटी संघाची वेबसाईट बघितली.तेथून... Who can become a member of RSS? Any Hindu male can become member of RSS. संघाने त्यांचे हे धोरण बदलले पाहिजे असे माझे बिलकूल म्हणणं नाहीय.. फक्त मला हे विशेष वाटल्याने (आणि आधी माहित नसल्याने) इथे सांगतोय.

In reply to by शाहरुख

Any Hindu male can become member of RSS. अहो मुळात इथेच गोची आहे ना! हिंदू म्हणजे कोण? ह्याचीच व्याख्या कुणाला माहित नाही. नाना बेरके म्हणतात भारतातले सगळे हिंदू (मिरजेतली दंगल दोन हिंदू गटांमध्येच काय हो नाना?).. विकास म्हणतो सगळे अमेरिकेतले हिंदू्. ..यशोधरा म्हणते व्याख्याच कशाला हवी? थोडक्यात सोयीप्रमाणे कुणीही हिंदू म्हणवला जाऊ शकतो/ अपात्र ठरवला जाऊ शकतो.

अभ्यंकर संघ पुरुषांकरीताच आहे. महिलांसाठी राष्ट्रसेविका समिती आहे. दुसरे म्हणजे " हिंदूची व्याख्या अशी आहे कि, हिंदुस्थानात जो राहतो तो हिंदू " मग त्यात भारतातले मुस्लीम, ख्रिश्चन आणि इतर सगळे येतात.

In reply to by निमीत्त मात्र

आणि मग अमेरिकेत राहतो तो? विकास हिंदू नाही का? काय तुमची व्याख्या.. हा मुद्दा येथे स्पष्ट करण्यासाठी अवांतर आहे. मधे तुम्ही चर्चा चालू केली होती तेंव्हा लिहायला आवडले असते पण वेळेअभावी त्यात लिहू शकलो नाही. खालील स्पष्टीकरण केवळ वरील वाक्याशी मर्यादीत आहे. भारतात जन्माला आलेला आणि भारतास पितृभू/मातृभू पुण्यभू मानणारा हिंदू अशी सावरकरांनी हिंदू या शब्दाची आणि पर्यायाने हिंदूत्वाला जन्म देणारी व्याख्या केली. कधी काळी परकीयांनी या देशातील जनतेस "हिंदू" हे नाव दिले कालांतराने ते येथील संस्कृतीत मिळून गेले नंतर इस्लामीक आक्रमणांपासून त्याला धार्मिक छटा आली. ब्रिटीशांनी तो एक त्यांच्या व्याख्येतील धर्म, म्हणजे इंग्रजीतील रीलीजन आणि मराठीतील संप्रदाय करून टाकले. त्यातील जन्माने आपण सर्वच भारतीय आहोत (आणि अमेरिकेत असलो तरी अजूनही मी भारतीय नागरीकच आहे :) ) म्हणून त्या अर्थाने हिंदू. जे भारताबाहेर राहूनही भारतीय वंशाचे आहेत, तसे स्वतःला मानतात आणि राष्ट्राने इतर देशाशी समरस झाले असले तरी भारतातील संस्कृती जपतात- त्या अर्थे पुण्यभू मानतात, ते देखील हिंदूच. त्या अर्थाने अमेरिका अजून नवीन आहे, पण अनेक पिढ्या असलेले द. अफ्रिका, कॅरीबिअन्स, ब्रिटन मधील अनेक जण हे सांस्कृतिक दृष्ट्या हिंदू आहेत - स्वतःच्या आचरणातून आणि इतरांच्या नजरेतून... माझ्या "आपण सारे हिंदू" या न्यूजवीक मधील मूळ लेखाच्या चर्चेवरून आपण वर लिहीले आहे. त्यात म्हणलेले "तत्वज्ञानाने" हिंदू झालेली नवीन अ-भारतीय वंशाची माणसे येतात. असा प्रकार केवळ "एक पुस्तक, एक प्रेषित" असा प्रकार नसलेल्या हिंदू धर्मातच होऊ शकतो कारण तो एका अर्थाने एका भूभागाशी संलग्न आहे आणि तरी देखील त्याचे तत्वज्ञान हे वैश्विक आहे. असो.

In reply to by विकास

भारतात जन्माला आलेला आणि भारतास पितृभू/मातृभू पुण्यभू मानणारा हिंदू अशी सावरकरांनी हिंदू या शब्दाची आणि पर्यायाने हिंदूत्वाला जन्म देणारी व्याख्या केली
. भारतात जन्माला आलेला म्हणजे नक्की काय? सध्या ज्याला आपण भारत असे म्हणतो तो १९४७ साली अस्तित्वात आला. त्यापूर्वी अफगाणिस्तान पासून ते ब्रह्मदेशापर्यंत भारतच होता असे काही लोकांचे म्हणणे आहे. म्हणजे १९४७ पूर्वी जन्मलेल्या माणसाने हिंदू असण्यासाठी नक्की कोणत्या भूभागावर जन्म घेतलेला असला पाहिजे? भारत पाकिस्तान असे तुकडे स्वातंत्र्या नंतर झाले, त्यापूर्वी पाकिस्तानात जन्म घेतलेले सगळे हिंदूच काय?
जे भारताबाहेर राहूनही भारतीय वंशाचे आहेत, तसे स्वतःला मानतात आणि राष्ट्राने इतर देशाशी समरस झाले असले तरी भारतातील संस्कृती जपतात- त्या अर्थे पुण्यभू मानतात, ते देखील हिंदूच.
भारतीय संस्कृती जपण्याचे निकष काय आहेत? वर्षभरातून एकदा इंडीयन असोशिअन मधे जाऊन इंडीयन फूड हादडले म्हणजे भारताबाहेर राहूनही संस्कृती जपतात असे म्हणावे का? भारतीय संस्कृती जपणारे (म्हणजे नेमके काय ते स्पष्ट नसल्याने, मी केलेल्या व्याख्येने जपणारे) परंतू ख्रिश्चन बनलेले काही भारतीय मी पाहिले आहेत, ते ही हिंदूच का? बॉबी जिंदाल हिंदू आहे का? आणि शेवटी.. वरील व्याख्येप्रमाणे..मिरजेतील दंगल ही हिंदूंच्या दोन गटातीलच का? तूर्तास ह्या प्रश्नांची उत्तरे कृपया द्यावीत..

In reply to by निमीत्त मात्र

भारतात जन्माला आलेला म्हणजे नक्की काय? ... भारत पाकिस्तान असे तुकडे स्वातंत्र्या नंतर झाले, त्यापूर्वी पाकिस्तानात जन्म घेतलेले सगळे हिंदूच काय? माझा प्रतिसाद नीट वाचलात तर समजेल. परत तेच (कारण उत्तर वेगळे असूच शकत नाही) फक्त वेगळ्या शब्दात: हिंदू हा शब्द भौगोलीक, धार्मिक आणि तत्वज्ञान या अर्थाने वापरला जातो. म्हणून भौगोलीक अर्थाने पाकीस्तानात जन्मलेले सगळे हिंदूच होते. माझे काय घेऊन बसता? ते बिचारे आम्ही पाक (शुद्ध) आणि इस्लामीक स्टेट वगैरे म्हणत जगभर ओरड करतात पण त्यांना आज देखील मध्यपुर्वेतील (मूळचे) मुस्लीम त्यांना आजही समान वागणूक देत नाहीत. कारण कधीकाळचे ते हिंदू होते... भौगोलीक भारताशी नाते टिकवणे - त्यात व्यक्तीगत नात्याशिवाय, समाजकार्याला मदत करणे इत्यादी पण गृहीत धरले आहे. जेंव्हा २६ नोव्हेंबर नंतर धर्माचे बंधन न मानता सर्व भारतीय एकत्र येऊन निषेध करतात, त्सुनामी सारख्या आपत्तीनंतर मोकळ्या हाताने मदत करतात तेंव्हा ते सर्व भौगोलीक दृष्ट्या हिंदूच आहेत. भारतीय संस्कृती जपण्याचे निकष काय आहेत? वर्षभरातून एकदा इंडीयन असोशिअन मधे जाऊन इंडीयन फूड हादडले म्हणजे भारताबाहेर राहूनही संस्कृती जपतात असे म्हणावे का? भारतीय संस्कृती जपणारे म्हणजे माझ्या लेखी: जे तत्वज्ञान, (चांगले/आदर्श)आचार-विचार, भाषा वगैरे सर्व काही आले, जे भारतीय उपखंडातून तयार झाले आहेत ते जपणारे/आचरणारे कुणीही हिंदूच आहेत. मग त्यांचा संप्रदाय या अर्थाने काही असोत. म्हणूनच जेंव्हा दंगली होतात तेंव्हा त्यांना सांप्रदायीक दंगली असे अथवा जातीय दंगली असे बहुतांशी वेळेस म्हणले जाते. तुम्ही कुठे राहता आणि काय करता हे माहीत नाही, पण, "वर्षभरातून एकदा इंडीयन असोशिअन मधे जाऊन इंडीयन फूड हादडले म्हणजे भारताबाहेर राहूनही संस्कृती जपतात असे म्हणावे का?" असे म्हणणे म्हणजे (for lack of any better word) पूर्ण अज्ञान आहे. चला! म्हणजे तुमच्या दृष्टीने संघ म्हणजे लष्करे तोयबा आणि अनिवासी भारतीय म्हणजे फक्त "इंडीयन फूड हादडणारे". या दोन गोष्टीतून कुठलाही अभ्यास न करता केवळ ठणाणा करत बसणे आणि त्यालाच मत आहे असे म्हणणे चालू आहे. तरी बरं, बाकी सगळे लांब राहूंदेत, गांधीजी पण २१ वर्षे अनिवासी भारतीय आणि स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवून घेणारे होते, इतका इतिहास तरी माहीत असावा अशी अपेक्षा आहे. भारतीय संस्कृती जपणारे (म्हणजे नेमके काय ते स्पष्ट नसल्याने, मी केलेल्या व्याख्येने जपणारे) परंतू ख्रिश्चन बनलेले काही भारतीय मी पाहिले आहेत, ते ही हिंदूच का? बॉबी जिंदाल हिंदू आहे का? हो त्या अर्थाने ते हिंदूच आहेत. माझे विविधधर्मीय भारतीय जवळून ओळखीचे आहेत (भारतात आणि अमेरिकेत) जे या अर्थाने हिंदूच आहेत. असे संप्रदायाने ख्रिश्चन आणि मुसलमान माझ्या जवळून ओळखीचे आहेत जे देवधर्माच्या बाबतीत हिंदूपद्धती जपत नाहीत पण बाकी जेंव्हा भाषा, सामाजीक बांधिलकी, देशाशी प्रेम आदी येते तेंव्हा भारतीत संस्कृती जपत असतात. म्हणून ते सांस्कृतीक दृष्ट्या ते हिंदूच असतात. बॉबी जिंदाल यांनी कारणे काही सांगितली तरी राजकीय महत्वाकांक्षेपोटी धर्मांतर केले आहे. त्यांचे आई-वडील हे हिंदूच आहेत आहेत आणि (ऐकीव माहीती प्रमाणे) घरातील वातावरण पण भारतीयच / हिंदूच आहे. ------------- मूळ विषयाशी अवांतर होत असल्याने, तसेच जास्त प्रतिसाद झाल्याने ट्रॅक करणे अवघड होत असल्याने या विषयावर अधिक चर्चा करायची असेल तर कृपया खरड करा ही विनंती.

In reply to by विकास

मूळ विषयाशी अवांतर होत असल्याने, तसेच जास्त प्रतिसाद झाल्याने ट्रॅक करणे अवघड होत असल्याने या विषयावर अधिक चर्चा करायची असेल तर कृपया खरड करा ही विनंती
ठीक आहे. प्रतिसादात अनेक मुद्दे अनुत्तरीत असले आणि बाकीचे मुद्दे भरकटवणारे असले तरी त्याचा उहापोह इथे नको. पण खरडवही पेक्षा...हाच प्रतिसाद 'हिंदू कोण?' ह्या मी सुरू केलेल्या चर्चेत हलवलात तर तिथे अधिक चर्चा करता येईल आणि सर्व मिपाकरांना त्यात सामील होता येईल.

In reply to by विकास

मी भागवतांच्या जागी असतो आणि मला जर कुणाही भारतीयाने संघात यावे असे वाटत असते तर मी "Any Indian can become member of RSS" असे लिहिले असते. मग हिंदुत्वाची कोणीही कशीही काहीही व्याख्या करो....

सन्घाची समाजसेवा........ :) [edit] Allegations by Leftist groups and rejection of charges by UK Charity commissioner A group by name "Campaign to Stop Funding Hate" (SFH), a front for the Forum of Indian Leftists (FOIL)[89] , had accused that affiliates of the RSS had raised millions of dollars for 'relief and development work' in India and that the funds had been misused and channeled to many RSS activities, allegedly through a US based organization called the "India Development and Relief Fund" (IDRF)and other organisations[90]. The IDRF responded to these charges as "untenable and made by communist activists"[91]. The charges were investigated by the UK Charity Commissioner who after the investigations, expressed "satisfaction" at the handling of the funds by the Sangh. The Commission said that its investigations showed that all the money collected and spent could be accounted for and that "trustees have taken sufficient steps to ensure that funds have been applied in accordance with the appeal." It rejected allegations of misuse of funds[92]. [edit] Defamation case against journalist for false allegations On January 15 2000, a daily, 'The Statesman' carried a story about the RSS by A G Noorani, which depicted the RSS as the killer of Gandhi[93]. Subsequently the Delhi unit of the RSS filed a criminal case of defamation against author of the article A G Noorani along with the cartoonist and the Managing Director of the publishing house. When two of the accused did not respond to the Court summons, non-bailable warrants were issued in their name by the Court[14]. On February 25,2002, Noorani wrote an unconditional apology to the court in which he regretted writing the defamatory article against the RSS. On March 3, 2002, 'The Statesman' also published an apology regretting the publication of the said article.[94 सन्दर्भ : http://en.wikipedia.org/wiki/Rashtriya_Swayamsevak_Sangh

कुठल्याही विवाद्य गोष्टींमध्ये " संघाचा हात आहे " असे समीकरण अनेक वर्षांपासून मांडले जात आहे. त्यात कितपत तथ्य असते ते कुणास ठाऊक, पण त्यामुळे मने / मते बिघडवणारी चर्चा थांबते. संघाने असल्या गोष्टीना कधी भीकच घातली नाही. कारण 'संघाचा तथाकथित हात असणे' कधीही, कुठेही सिध्द झालेले नाही. संघाबद्दलच्या ह्या तिखटजाल चर्चेमध्येसुध्दा संघाचाच हात असावा असे ( परंपरेनुसार ) विधान करणे सहज शक्य आहे. ते केले म्हणजे कदाचित चर्चा थांबेल.

विकास शेठ तुम्हारा पुरा प्रतिसादच चुक्याच. तुम कायकु इदर गीता पढ रहेला है? अनाडि. ब्दुल नारायण डिसुझा.

In reply to by अनाडि

तुमचे (मिपा) नाव हे आमचे विशेषण असावे म्हणून असे झाले असावे! :-) बाकी संपुर्ण नाव एकदम मस्त आहे.

नमस्कार , फारच सुन्दर लेख . योगायोगाने मला देखील सन्घाबद्द्ल काही दिवस आधी विशेष माहिती मिलाली .दुर्दैवाने चान्गली बाजु कधी समोर येत नाही .सदर लेखाबद्दल अभिनन्दन !!!!

विजुभाऊ यांनी महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. उद्याच्या लोकसभा निवडणूकीत काय होइल. दिल्ली अभी एक साल दूर है. पण यंग आणि डायनॅमिक मनमोहनसिंग यांनी 'बचेंगे तो और भी लढेंगे' म्हटले आहे. असो भाजप बाबत म्हणाल तर ते कुणालाही आपलसं करु शकतात. रेखाताई पुरुषोत्तम खेडेकर किंवा कलमाडींनाही पाठिंबा देऊ शकतात. ते फार व्यापक आणि मनाने उदार लोक आहेत. कलमाडींना पाठिंबा दिला होता तेव्हा यांचे कलमाडीप्रेम उतू जात होते. पुणेकर याबाबत अधिक सांगू शकतील !

>>> कलमाडींना पाठिंबा दिला होता तेव्हा यांचे कलमाडीप्रेम उतू जात होते. शरद पवारांशी झालेल्या मतभेदांमुळे कलमाडीला १९९७ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले होते. १९९७ मध्ये गुजराल सरकारच पाठिंबा काँग्रेसने काढून घेतल्यावर कलमाडीने काँग्रेसचे तब्बल ४० खासदार आपल्या बाजूला जमवून वाजपेयींचे सरकार आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पक्षांतरबंदी कायदा व २७३ चा आकडा गाठण्यासाठी अजून काही खासदार कमी पडल्याने तो प्रयत्न फसला. नंतर मार्च १९९८ मधल्या लोकसभा निवडणुकीत कलमाडीने अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. सरकार स्थापन करण्याचे भाजपचे प्रयत्न १९९६ मध्ये फसले होते कारण खासदारांची संख्या कमी होती. आपल्याला पाठिंबा देणार्‍या खासदारांची संख्या वाढावी म्हणून स्थानिक भाजप नेत्यांचा व संघाचा विरोध असतानासुद्धा वाजपेयींनी पुण्यातून भाजप उमेदवार न देता कलमाडीला पाठिंबा दिला होता.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी > कलमाडीने काँग्रेसचे तब्बल ४० खासदार आपल्या बाजूला जमवून वाजपेयींचे सरकार आणण्याचा प्रयत्न केला होता या गोष्टी खर्‍या समजता आपण आम्ही ४० नव्हे ६० खासदार ऐकले होते जबाबदार लोकांकडून

In reply to by आशु जोग

कलमाडीला फक्त वाजपेयींच्या आग्रहामुळे पाठिंबा दिला गेला. भाजपचे स्थानिक नेते, शिवसेना व संघाचा कलमाडीला स्पष्ट विरोध होता. एका सभेत बोलताना बाळासाहेब ठाकर्‍यांनी कलमाडीविषयी बोलताना त्याला बेडकाची उपमा देऊन बेडकाप्रमाणे हा टुणकन उडी मारून काँग्रेसमध्ये परत जाईल हे भाकीत वर्तविले होते जे वर्षभरातच खरे झाले. मे १९९९ मध्ये शरद पवारांना काँग्रेसने काढून टाकल्यावर लगेचच कलमाडी स्वगृही परतला. स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे स्थानिक नेत्यांनी अविनाश धर्माधिकारींना अपक्ष म्हणून उभे केले होते व त्यांना ३५ हजाराहून अधिक मते मिळाली होती. ही सर्व मते कलमाडीची उमेदवारी न आवडलेल्या संघ कार्यकर्त्यांची होती.

In reply to by नितिन थत्ते

ही सर्व मते कलमाडीची उमेदवारी न आवडलेल्या संघ कार्यकर्त्यांची होती.
३५००० मते ही कलमाडींची उमेदवारी न आवडलेल्या संघ कार्यकर्त्यांची होती हो. बाकीच्या संघ कार्यकर्त्यांना कलमाडींची उमेदवारी आवडली असावी. नाही का? सत्ताप्राप्तीसारख्या मोठ्या ध्येयासाठी विचारसरणीचा त्याग हा एवढा मोठा गुन्हा नाही. ;)

In reply to by आजानुकर्ण

गुरुजींच्या कलमाडी प्रतिसादा वरुन भाजप हा संघपरिवारचा बॅड बॉय आहे हे पुन्हा अधोरेखित होत आहे का ; )

In reply to by पिंपातला उंदीर

>>> गुरुजींच्या कलमाडी प्रतिसादा वरुन भाजप हा संघपरिवारचा बॅड बॉय आहे हे पुन्हा अधोरेखित होत आहे का ; ) ते कसे काय बुवा?

In reply to by आजानुकर्ण

>>> बाकीच्या संघ कार्यकर्त्यांना कलमाडींची उमेदवारी आवडली असावी. नाही का? सत्ताप्राप्तीसारख्या मोठ्या ध्येयासाठी विचारसरणीचा त्याग हा एवढा मोठा गुन्हा नाही. नाही. बाकीच्यांनी मतदान केलेच नाही.

गुरुजी डू नॉट मेक राँग अ‍ॅजंप्शन्स एवढच म्हणेन

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्या प्रतिसादात हे अध्याहृत आहे की भाजपा आणि संघपरिवार हे एकमेकांशी संबंधित आहेत. हे मिपावर आम्ही जे काही शिकलो आहोत त्याच्याशी विसंगत आहे. मिपावरील माहितीनुसार मुळात भाजपा आणि संघपरिवार या अगदी वेगळ्या संघटना असून अटलबिहारी वाजपेयी यांची भाजपाकडून पंतप्रधानपदासाठी झालेली निवड व त्यांचे सरकार टिकवण्यासाठी कलमाडींनी केलेले प्रयत्न याच्याशी संघपरिवाराचा काही संबंध असू शकत नाही. पुण्यात अधिकृत भाजपा उमेदवाराऐवजी कलमाडींना पाठिंबा दिल्याने संघस्वयंसेवकांना काही फरक पडू नये कारण संघ व भाजपा हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे तुमचा मुद्दा रॉंग आहे. आता संघ व भाजपा वेगवेगळे आहेत मात्र संघस्वयंसेवक व भाजपा कार्यकर्ते एकच असू शकतात असा काहीसा युक्तिवाद तुम्हाला करता येईल.

In reply to by आजानुकर्ण

>>> कारण संघ व भाजपा हे वेगवेगळे आहेत. नक्कीच. संघ अराजकीय संघटना आहे तर भाजप राजकीय पक्ष आहे. संघाचा स्वतःचा अजेंडा आहे व स्वतःची विचारसरणी आहे. भाजपचा स्वतःचा अजेंडा आहे व भाजपची स्वतःची विचारसरणी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

संघाचा स्वतःचा अजेंडा आहे व स्वतःची विचारसरणी आहे. भाजपचा स्वतःचा अजेंडा आहे व भाजपची स्वतःची विचारसरणी आहे.
धन्यवाद. थोडेथोडे कळत आहे. कदाचित या विचारसरणी व अजेंडे योगायोगाने सारखे असल्याने काँग्रेसपुरस्कृत मीडियामुळे आमचा गैरसमज होत आहे. मिपावरील स्पष्टीकरणांमुळे हे गैरसमज दूर होतात ही मोठीच मिळकत आहे.

>> भाजप हा संघपरिवारचा बॅड बॉय आहे बाकी भाजप माहीत नाही पण पुण्यापुरते म्हणायचे तर ते मनाने अतिशय उदार असल्याने कुणालाही आपलेसे करु शकतात. बा द वे साठ खासदार एकत्र केले होते(?) अहो ५४ खासदारवाले देवीगौडा पंतप्रधान होतात मग साठ खासदारवाला स्वतःच पी एम झाला नसता का आज पवारसाहेबांच्या पक्षाचा आकडा ११ च्या वर जात नाही तेव्हा ६० खासदार यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. भर सभेत अटलजींच्या तोंडून सुरुवातीला कलमाडी नव्हे तर धर्माधिकारींचे नाव बाहेर पडते आणि सगळी खेळी उघडी पडते. त्या वेळचे काही युक्तिवाद पहा १. स्वतःच्या मुलावर काय कुणीही प्रेम करेल ? दुसर्‍याच्या मुलावर प्रेम करायला मोठं मन लागतं २. आपद्धर्म आहे ३. घराला आग लागली आहे शुद्ध पाण्याचा आग्रह कशाला ? गटारातील पाणीही चालेल. या सगळ्या आत्मघातकी प्रचाराचा उलटा परीणाम झाला त्यात धर्माधिकारींनी चालवलेली मोहीम. अनेकांनी त्यांना मत दिले नाही तरी कुठला उमेदवार नको हे त्यांच्यामुळे मनाशी स्पष्ट झाले आणि मग नकोशा उमेदवाराला कोण पाडू शकेल त्याच्या पारड्यात मत टाकले गेले नव्वद हजाराने पराभव झाला तेव्हा या लोकांचा आनंद गगनात मावेना.

In reply to by आशु जोग

>>> साठ खासदार एकत्र केले होते(?) अहो ५४ खासदारवाले देवीगौडा पंतप्रधान होतात मग साठ खासदारवाला स्वतःच पी एम झाला नसता का देवेगौडाला २७३ पेक्षा अधिक खासदारांनी पाठिंबा दिला होता. साठवाल्याला तितका पाठिंबा मिळविता आला असता तर तो पंतप्रधान झाला असता. >>> आज पवारसाहेबांच्या पक्षाचा आकडा ११ च्या वर जात नाही तेव्हा ६० खासदार यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. मग नका ठेवू विश्वास. >>> त्या वेळचे काही युक्तिवाद पहा १. स्वतःच्या मुलावर काय कुणीही प्रेम करेल ? दुसर्‍याच्या मुलावर प्रेम करायला मोठं मन लागतं २. आपद्धर्म आहे ३. घराला आग लागली आहे शुद्ध पाण्याचा आग्रह कशाला ? गटारातील पाणीही चालेल. हे कोण व कधी बोलले याची कल्पना नाही. पण यातले क्र. (३) वाक्य वाचून चर्चिलच्या खालील वाक्याची आठवण आली. "हिटलरचा नाश करायला मला सैतानाची मदत सुद्धा चालेल"

हा धागा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी असल्यामुळे पुरुष विभागात आहे असं समजावं का? तसं असेल तर इथे प्रतिसाद लिहू दिल्याबद्दल धागालेखक श्री. विजुभाऊ आणि अन्य पुरुष आयडींचे मी आभार मानते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

When you get in to the fight with pig , it is the pig who enjoys.. you only get dirty ! असा प्रसाद या धाग्यावर तुम्हाला मिळाला होता. त्याला तुम्ही उत्तर दिलं नव्हतत. नेहमीप्रमाणे लिहिताना तुम्ही लाइन ऑफ कंट्रोल क्रॉस करण्यापूर्वीच सागून ठेवतो. बाकी आपली मर्जी...

In reply to by आशु जोग

When you get in to the fight with pig , it is the pig who enjoys.. you only get dirty !
सल्ल्याचं तंतोतंत पालन केलेलं होतंच की!
त्याला तुम्ही उत्तर दिलं नव्हतत.
त्यातून आमच्या भागात गेली दोन वर्ष दुष्काळ सुरू आहे. "पाणी वाचवा" असं स्थानिक सरकार वारंवार विनवून सांगतं आहे, तर कुठे डुकरांशी मस्ती करून घाण व्हायचं आणि पुन्हा शुचितेखातर पाणी वाया घालवायचं? म्हणून उत्तर दिलं नाही. बाकी माझं खर्र खर्र प्रेम आहे हो तुमच्यावर. आय लौ यू! त्या प्रेमाला कधी प्रतिसाद देणार?

In reply to by आशु जोग

खरं म्हणजे तुम इतना जो मुस्करा रहे हो...

In reply to by आशु जोग

तुम इतना जो मुस्करा रहे हो...
तुम्ही एवढ्या प्रेमाने विचारतंय. माझ्या डोळ्यात बै टचकन पाणीच आलं हे वाचून. कुण्णी, कुण्णी मला कधी एवढ्या आपुलकीने विचारलं नव्हतं हो आत्तापर्यंत. प्रेमाला असा प्रतिसाद दिला की किती भरून येतं यावर मी तर बै एक कविताच लिहीणार आहे.

> मी लिहिले त्यात नक्की कोणते असम्पशन आहे आणि, असल्यास, त्यातले कोणते राँग आहे? श्रीगुरुजी कुणीतरी स्थानिक पातळीवर कलमाडींशी समेट केला. त्यासाठी अटलजींचे नाव वापरले आणि साठ खासदार इ. गोष्टी सांगितल्या या त्या गोष्टी

In reply to by आशु जोग

>>> कुणीतरी स्थानिक पातळीवर कलमाडींशी समेट केला. त्यासाठी अटलजींचे नाव वापरले आणि साठ खासदार इ. गोष्टी सांगितल्या यात असम्प्शन कोणते आहे व असल्यास त्यात काय राँग आहे?

श्रीगुरुजी > यात असम्प्शन कोणते आहे व असल्यास त्यात काय राँग आहे ? यात केवळ माझे अंदाज नव्हे प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत. पुन्हा वाचा म्हणजे कळेल > "हिटलरचा नाश करायला मला सैतानाची मदत सुद्धा चालेल" धिस इज नॉट अ‍ॅप्लिकेबल हियर ना ! बा द वे तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी ऐकीव दिसताहेत हे उघड आहे

>>> तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी ऐकीव दिसताहेत हे उघड आहे तुम्ही स्वतःची अशी (गैर)समजूत करून घेण्यास माझी अजिबात हरकत नाही.

रास्वस हा कायमच स्फोटक विषय आहे. इतके समाजकार्य, शिस्तपालनाची आवड, संघटन वगैरे अनेक चांगल्या बाबींचा एककल्ली विचारसरणीने केलेला चुथडा म्हणजे रास्वसं. मुसलमान द्वेष, गुजरात दंगलीच्यावेळी मतदार याद्या वापरुन मुसलमानांची घरे शोधण्याचा केलेला घॄणास्पद वापर, ओरिसातल्या ख्रिश्चनांविरुद्ध केलेल्या दंगली , हिटलर सारख्या लोकांचे आदर्श आणि त्यायोगे येणारे हिंसेचे आकर्षण इ.इ. अनेक गोष्टी शाखा/संघ इत्यादींपासुन दूर रहाणेच चांगले मानायला लावतात.

In reply to by कवितानागेश

+१०००० घोर अज्ञान.. मी राष्ट्र सेविका समितीची लहानपणापासून सेविका आहे. आणि भाऊ आणि बाबांबरोबर संघाच्या शाखेवर लहानपणी गेले आहे. बाकी एवढे अज्ञान पाजळणार्‍यांनी संघाबद्दल कितीही तारे तोडले तरी संघाला काही फरक पडत नाही. कुणा चार-पाच विचारवंत म्हणवणार्‍यांची मते वाचून संघाबद्दल खूप काही माहीत असल्याचा आव आणणार्‍यांची कीव येते.

In reply to by पिशी अबोली

मग तुमच्यासाठी मला कधीचे पडलेले प्रश्न आहेत: १. राष्ट्रसेविका समितीचं नक्की काम काय? (ओन्व्हलोप, गोळाबेरीज माहिती आहे ... धर्म, संस्कृती रक्षण वगैरे. मला थोडे तपशील हवे आहेत.) २. सेविकांना भाजपमधे कितपत रस असतो? समितीमधे भेटल्यावर सेविका राजकारणाबद्दल चर्चा करतात का? ३. समिती कितपत स्त्रीवादी आहे? आधुनिक स्त्रीवादी मूल्यांसंदर्भात समितीची (आणि/किंवा सेविकांची) मतं कुठे वाचायला मिळतील? ४. समितीची एक आदर्श झाशीची राणी आहे असं त्यांच्या संस्थळावर लिहीलेलं आहे. ती पारंपरिक लिंगसंकल्पना मोडून काढणारी होती. तिचे यजमान साड्या गुंडाळत, पाळी आल्यासारखं महिन्यातले चार दिवस बाजूला बसत आणि राणी मात्र पुरुषी कपडे घालून तलवारबाजी करत असे. तिचा उल्लेख ह्यू रोजनेसुद्धा '१८५७ च्या युद्धातला एकमेव मर्द' असा (काहीसा अतिशयोक्तपूर्ण असला तरी) पुरुषी समजले जाणारे गुण (लढाई, नेतृत्त्व) दाखवणारी असा केला आहे. (लैंगिकतेचं असं दर्शन परदेशी लोकांना चक्रावणारं होतं.) अशा प्रकारचे गुण वाढीस लागावेत, स्त्रियांना संधी मिळाव्यात अशा प्रकारचं काही काम समितीमधे होतं का? ५. समिती आणि संघाचं कितपत इंटरॅक्शन आहे. त्यांचं काम परस्परपूरक असं असतं का? असल्यास त्याचे तपशील? ६. समितीशी संबंधित इतर काही माहिती तुम्हाला द्यावीशी वाटली तर ती ही द्याल का? इथे अवांतर वाटत असेल तर वेगळा धागा किंवा व्यनी/खरडीतून कळवलंत तरी चालेल. या आणि अशा प्रश्नांची उत्तरं समितीच्या संस्थळावर आणि विकीपानावरही मिळाली नाहीत. असे प्रश्न पडल्यापासून भारताबाहेर असल्यामुळे प्रत्यक्ष समितीत जाऊन माहिती मिळवणंही जमणें नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जमेल तेवढा प्रयत्न करते. १. राष्ट्र सेविका समितीचं काम संघाच्या धर्तीवर चालतं. पूर्,भूकंप अशा ठिकाणी मदतकार्य तर बरंच चालतं. पण स्त्रियांचे काही वेगळे प्रश्न असतात. अशा ठिकाणी सेविका आवर्जून काम करतात. याव्यतिरिक्त अनेक सेवाकार्ये समितीत होतात. हे मोठ्या पातळीवरचं काम झालं. आमच्या शाखेने छोट्या पातळीवर केलेले काही प्रयत्न म्हणजे झोपडपट्टीतील मुलींसाठी शाखा लावणे. रोजच्या किचकिचाटातून दूर होऊन शाखेत येण्यासाठी त्या मुली खूप उत्सुक असायच्या. सगळ्या मुलींसोबत राहिल्याने,चर्चा केल्याने त्यांच्यात खूप फरक पडला. तसेच शाखेवरच्या आम्हा अन्य मुलींनाही त्यांच्याकडून काही ना काही शिकता आले. दुसरा प्रयत्न कॉलेज तरुणींचं साप्ताहिक मेलन. या मुलींचा संघाशी काही संबंध नव्ह्ता. पण शाखेपूर्वीच्या तासाभराच्या भेटीत एखादा सामाजिक विषय घेऊन त्यावर चर्चा व्हायच्या. हे असे अनेक छोटे छोटे उपक्रम समितीच्या शाखांवर चालतात. मुलींनी नेहमीच्या जगातून बाहेर पडून सामाजिक भान जपावं अशी एक गोष्ट यातून नक्कीच साधली जाते. २. भाजप आणि संघपरिवार या स्वतंत्र गोष्टी आहेत. माझ्या लहानपणापासून मी अनेक पक्षातील महिलांना समितीत येताना पाहिलं आहे. समितीचे उद्दिष्ट राजकारण नसून समाजकारण आहे. अर्थात राजकारणाविषयी भान आणि जागरुकता सेविकांना नक्कीच असते. ३ व ४ याचं उत्तर एकत्र द्यायचा प्रयत्न करते. समिती तीन स्त्रियांना आदर्श मानते. जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई व देवी अहिल्याबाई होळकर. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व असे हे तीन आदर्श आहेत. आधुनिक राहूनही हे तिन्ही आदर्श जपता येऊ शकतात असं माझं स्वतःचं मत आहे. बाकी मते वाचण्यासाठीचे जमतील तसे संदर्भ मी व्यनी/खरडीतून कळवेन. 'स्त्रियांना संधी' म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे ते मला नीटसं कळलेलं नाही. जे कळलं त्याला उत्तर देते. समितीच्या शिबिरांमधे कराटे,लाठी इ.सहजपणे उपलब्ध असलेल्या शस्त्रांचा व पद्धतींचा वापर शिकवला जातो. अचानक आलेल्या संकटांना तोंड कसं द्यावं याची तयारीही काही पद्धतींनी,काही प्रमाणात करून घेतली जाते. सकाळी हे प्रशिक्षण, संध्याकाळी मैदानी खेळ व मधल्या वेळात चर्चा, बौद्धिक इ. असा साधारण साचा असतो. स्वसंरक्षणाची शारीरिक तसेच मानसिक तयारी शाखेवरही करुन घेतली जाते. ५.समिती आणि संघाचं काम समांतर चालतं. समिती संघाचा भाग नाही. पण वर म्हटल्याप्रमाणे मदतकार्य इ.करताना परस्परपूरक काम आपोआप होतं. ६.

In reply to by पिशी अबोली

प्रतिसाद मोठा दिसला तरी अजून थोडेसेच प्रश्न आहेत: समितीच्या साधारण किती सदस्या/सेविका आहेत? (अंदाजे आकडा असेल तरी चालेल. म्हणजे दोन लाख, दीड कोटी अशा प्रकारचा. दोनाच्या जागी एक असेल किंवा चार असतील, त्याने फार फरक पडणार नाही.)
समितीचे उद्दिष्ट राजकारण नसून समाजकारण आहे.
हे असं असेल तर (झाशीची) राणी या साच्यात कुठे बसते ते लक्षात येत नाहीये. झाशीच्या राणीचा मुख्य वारसा आपले (भारतीय) आणि बाहेरचे (ब्रिटीश) हे लक्षात घेऊन त्यासंदर्भात राजकारण (तिच्या बाबतीत राजनैतिक तह, ते न जमल्यास युद्ध) असा आहे. तेव्हा भारत असा काही देश नसूनही राणीला हे 'आपलं' आहे असं लक्षात आलं आणि ते टिकवून ठेवण्याचा तिने प्रयत्न केला असा तिचा राजकारणाचा वारसा आहे. समितीचं उद्दीष्ट राजकारण नसल्यास समितीची राणीसंदर्भात काय मतं आहेत याबद्दल मला अधिक कुतूहल आहे. (दोन महायुद्धांच्या मधल्या काळात जर्मनीमधे जर्मन विज्ञान आणि ज्यू विज्ञान अशी विभागणी होत असे. क्वांटम मेकॅनिक्स, सापेक्षतावाद यांना ज्यू विज्ञान समजलं जात असे. अशा प्रकारची विभागणी अयोग्य, अग्राह्य आहे असं विज्ञानात सरसकट समजलं जातं.) इतिहास हा विषय विज्ञानासारखा स्वच्छ, स्पष्ट नाही. शिवाय इतिहासाची मांडणी आपापल्या दृष्टीकोनातूनही करता येते. त्यामुळे इतिहास-संशोधकांचं राणीबद्दल, तिच्या वारशाबद्दल काही एक मत असलं तरी ते सगळ्यांनाच ग्राह्य वाटेल असंही नाही. तसा समितीचा इतिहास कशा प्रकारे मांडलेला आहे? 'स्त्रियांना संधी' यात मला राजकारण या पैलूबद्दलच कुतूहल आहे. महिला आरक्षण, एखाद्या ठिकाणी महिला आरक्षण असेल तर तिच्या घरातल्या पुरुषांनी तिला प्रॉक्सी म्हणून वापरून घेणं वगैरे विषय आजच्या, स्त्रियांसंबंधीच्या राजकारणासंबंधीचे आहेत. सुषमा स्वराज, वृंदा करात किंवा सोनिया गांधी यांच्यासारख्या नाही तर सामान्य स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी राजकारण हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. नर्मदा बचाव किंवा काश्मीरमधे चालणार्‍या घटनांमधे महिला सक्षमीकरण मोठ्या प्रमाणावर होताना दिसतं. या महिला मोठ्या प्रमाणात राजकारणात सहभागी होताना दिसतात. आधुनिक होऊनही समितीच्या तीन आदर्शांबद्दल मला फार प्रश्न नाहीत; प्रश्न तपशीलांसंदर्भात आहेत. आधुनिक जगात येणार्‍या अडचणींसंदर्भात आहेत. उदाहरणार्थ: १. स्त्रियांवरच मूल वाढवण्याची जबाबदारी असेल तर आधुनिक जगात जी लिंग समानता मानली जाते ती तिथे मोडते. त्यासंदर्भात समिती सेविका किंवा संपर्कात येणार्‍या इतर स्त्रियांना काय शिकवते? २. आधुनिक जगात स्त्रियांना शिक्षण, कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचारांना सामोरं जावं लागतं. प्रत्येक वेळेस कराटे शिकून नाहीतर पाच-सात किलोची वजनं उचलून फायदा होईलच असं नाही. अनेकदा डोकं लढवून परिस्थितीतून सुटका करून घ्यावी लागते. कोणी समोर चाकू नाहीतर पिस्तूल घेऊन आला तर कराटे किंवा पुष्ट स्नायूंचा फायदा होत नाही. कधी सुटका झालीच नाही तर मानसिक तयारी असणं महत्त्वाचं समजलं जातं. एखादी दुर्दैवी घटना घडली तरीही त्याबद्दल व्यापक विचार करावा लागतो. (सोहेल अब्दुलाली हे एक उदाहरण.) एकेकाळी बलात्कार झाला तर बायका बहुतांशी आत्महत्या करत असत. आता तसं होत नाही, होऊ नये यासाठी समाज प्रयत्नशील आहे. पण अजूनही "आता या मुली/स्त्रियांचं लग्न कसं होणार?" याच चिंतेत समाज अडकलेला दिसतो. पीडीतेला त्रास होतो पण बलात्कार करणार्‍याचं जगणं समाज मुश्कील करत नाही. या संदर्भात समितीचे विचार आणि/किंवा काम काय आहेत? धर्म, संस्कृती, परंपरेत योनीशुचितेला फार महत्त्व आहे. पण आधुनिक जगात योनीशुचितेला महत्त्व नाही. दुसर्‍या एका धाग्यावर लग्न ठरवण्याच्या परंपरेत मुलीची अन्याय्य पद्धतीने अधिक चिकीत्सा होते असा एक मुद्दा आलेला आहे. पारंपरिकरित्या स्त्रियांना पुरुषापेक्षा खालचं स्थान दिलेलं आहे; धार्मिक विधींमधे एकटी स्त्री धर्मकार्य करू शकत नाही, विधवा तर नाहीच नाही. अशा अडचणीच्या प्रसंगांमधे जिथे धर्म, परंपरा, संस्कृती सरळसरळ आधुनिक मूल्यांच्या आड येतात तिथे समितीची भूमिका काय असते?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वरच्या प्रतिसादात सोहेल अब्दुलाली या जागी सोहेला अब्दुलाली असे वाचणे. तिचे हे दोन लेखः भाग १, भाग २

संघ परीवाराला आपल्या निष्ठा अर्पण केलेल्यांना दुसरी बाजू मांडली की राग येणे स्वाभाविक आहे. मग कुणाला तो प्रोपागंडा वाटेल कुणाला खोटारडे पणा. पण ज्यांना तटस्थ वृत्तीने विचार केल्यास संघ परीवाराची ही दुसरी बाजू कुणाच्याही लक्षात येईल. संघ परीवाराला मुसलमान/ख्रिश्चन धर्मांविषयी प्रतिकुल मते आहेत हे कुणीही शाखा अटेंड केलेला किंवा अ‍ॅक्टीव संघ कार्यकर्त्याच्या संपर्कात आलेला सांगू शकेल. त्यासाठी ओरिसा दंगलींचे दाखले, नानावटी रिपोर्ट, किंवा संघ परीवारातल्या बाबू बजरंगीचे कारनामे असले संदर्भ द्यायची काही गरज नाही. संघाला कायमच हिटलर सारख्यांचे आकर्षण होते/आहे हे ही छुपे रहस्य नाही. माधव गोळवलकरांचे त्यावरील विवेचन प्रसिद्ध आहेच. शिवाय अनेक लेखकांनी नाझीझम/फॅसीझमशी संघाच्या विचारसरणीशी केलेली तुलना बिनबुडाची म्हणून उडवुन लावण्याइतकी पोकळ नाही. (संघनिष्ठांना मात्र ती तशीच जाणवणार कारण त्यांचा उघड बायस) अर्थात त्यामुळे संघाने केलेले समाजकार्य (विशेषतः नैसर्गिक आपत्ती प्रसंगी) आणि त्यांचे चांगले गुण नाहिसे होत नाहीत जे मी ही माझ्या प्रतिसादात नाकारलेले नाहीत.

In reply to by बंडा मामा

खोटारडेपणा आहे कारण कुठलाही पुरावा नाही. उगाच मंथरेने चार चार वेळातीच गोष्ट सांगायची आणि रामायण घडवायचे, त्यातलाच हा प्रकार आहे.
संघ परीवाराला मुसलमान/ख्रिश्चन धर्मांविषयी प्रतिकुल मते आहेत हे कुणीही शाखा अटेंड केलेला किंवा अ‍ॅक्टीव संघ कार्यकर्त्याच्या संपर्कात आलेला सांगू शकेल.
तुम्ही आला असला तर तसे सांगा. मी संपर्कात आलो आहे आणि मला कधीच असे जाणवले देखील नाही. त्यामुळे तुमचे मुद्दे खोटे आहेत असे म्हणण्याशिवाय पर्याय नाही. त्यातही एखाद्या व्यक्तीने तसे म्हणले असे वादासाठी गृहीत धरले तरी ती व्यक्ती त्या संघटनेत नक्की कुठे आहे हे देखील सांगा.
संघाला कायमच हिटलर सारख्यांचे आकर्षण होते/आहे हे ही छुपे रहस्य नाही. माधव गोळवलकरांचे त्यावरील विवेचन प्रसिद्ध आहेच.
पुरावा द्या, उत्तर मिळेल. पुरावा नसल्यास खोटेपणा आहे हे सिद्ध होईलच.
शिवाय अनेक लेखकांनी नाझीझम/फॅसीझमशी संघाच्या विचारसरणीशी केलेली तुलना बिनबुडाची म्हणून उडवुन लावण्याइतकी पोकळ नाही. (संघनिष्ठांना मात्र ती तशीच जाणवणार कारण त्यांचा उघड बायस)
परत तेच जे लेखक म्हणता त्याचे पुरावे द्या. मी देखील असे लेखक वाचले आहेत. त्यांनी त्यांना काय वाटते ते लिहीले आहे, पण ते सिद्ध करण्यासाठी ना धड तळटीप, ना धड संदर्भ.

In reply to by विकास

+१

In reply to by विकास

खोटारडेपणा आहे कारण कुठलाही पुरावा नाही. हा तर अतिरेक झाला. मिपावर येणारे ९०%च्या वर प्रतिसाद हे कुठल्याही तळ्टीपा आणि संदर्भ ह्याशिवाय येतात. ह्या सर्व लेखनाला तुम्ही खोटारडेपणा म्हणता का? खाली श्रीगुरुजींनी संघांवर स्तुतीसुमने उधळणारा भला मोठा प्रतिसाद दिला आहे. पण कसलाही संदर्भ न दिल्याने त्याला खोटारडेपणा म्हंटले तर चालेल का? थोडा शोध घेतला असतात तर, गोळवलकारांचे हिटलरची स्तुती करणारे विधान तुम्हाल सहज सापडले असते. To keep up the purity of the Race and its culture, Germany shocked the world by her purging the country of the Semitic races—the Jews. Race pride at its highest has been manifested here. Germany has also shown how well nigh impossible it is for Races and cultures, having differences going to the root, to be assimilated into one united whole, a good lesson for us in Hindustan to learn and profit by" — M. S. Golwalkar