Skip to main content

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 09/09/2009 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेत सध्या बरीच खळबळ माजली आहे. भाजप मध्ये विलीन व्हायचे/भाजप वर अंकुश ठेवायचे/ जीना चे गोडवे गायचे / तसे गोडवे गाणारांचा निषेध करायचा यावर बरेच मंथन चालू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भुमीका बरेच वेळा बदलत असते. पूर्वी जनसंघ नावाने स्वतःचे राजकीय आस्तित्व ठेवणारी ही संघटना आणीबाणीनन्तर बरीच बदलली. जनता पक्षाच्या कडबोळी सरकारच्या काळात संघाने सत्तेची चव चाखली. त्यानन्तरच्या इंदिरा गांधींच्या करिश्माच्या आणि इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानभुतीच्या लाटेत भाजप या नावाने रुपडे पालटून उतरलेला हा पक्ष वाहून जातो की काय अशी शंका होती. राजीवगांधींच्या काळात सुरुवतीला त्याना नक्की कसा विरोध करायचा हा संघीयाना एक मोठा प्रश्नच होता. त्या काळात भाजपने जाहीररित्या गांधीवादी समाजवादाचा स्वीकर करु असे जाहीरपणे सांगितले होते पण नन्तर राजकारणात मंडल आयोगाच्या अस्त्राला उत्तर देण्यासाठी तितकेच विघातक असे रामजन्मभूमीचे अस्त्र संघाने बाहेर काढले. त्या विषयावर एक राजकीय पक्ष म्हणून त्यानी नेहमीच दुटप्पी भुमीका ठेवली. भाजप म्हणजे संघ नव्हे असे म्हणताना मात्र भाजपतर्फे संघाचा अजेन्डा चालू ठेवला. भारतीय राजकारणातील बदलेल्या परीस्थीत संघाने नेहमीच धरसोड भुमीका घेतली आहे. संघ म्हणजे भाजप नव्हे. संघ म्हणजे विश्वहिन्दु परिषद नव्हे संघ म्हणजे बजरंग दल नव्हे असा प्रत्येक संघटनेशी स्वतःचा संबन्ध नाही असे संघ वारंवार म्हणत असतो. पण मग सम्घ म्हणजे नक्की कोण? असा साहजीक प्रश्न पडतो. राजकारणात यायचे नाही पण राजकारण आपल्या तालावर व्हावे असा दुटप्पी अट्टाहास कशासाठी? बाबरी मशीद पाडण्यात संघाचा हात नव्हता ( असे निदान सध्या तरी मानु यात) पण बाबरी मशीदीचा मुद्दा हा संघानेच शिजवत ठेवला होता. भाजप च्या राजकीय फायद्या साठी बाबरी मशीदीचा मुद्दा सतत तेवत रहाणे अत्यन्त आवश्यक होते . दुर्दैवाने बाबरी मशीद कारसेवकानी पाडली. ( संघाचा कारसेवकांशी संबन्ध नाही) आणि तो मुद्दा भाजपच्या हातून निसटला. मोदींचे हिटलरी स्टाईलचे हिन्दुत्व कदाचित भावले त्यामुळेच की काय स्वतःचा कट्टर शत्रु असलेल्या संजय गांधींच्या मुलाला पावन ठरवले गेले. भाजप सत्तेत असताना बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. संघाच्या बर्‍याच स्वयंसेवकानी सत्तेची चव नव्याने चाखली. पण संघाला अजूनही स्वत:ची नक्की अशी ध्येय धोरणे ठरवता अली नाहीत. कधी सोनियाना विरोध कर त्यासाठी स्वतःचे मुंडण करु असे आक्रस्तळेपणे सांगून हसे करुन घे.कधी मनमोहनसिंगांचा विरोध कर अशा फारसा पक्का पाया नसलेल्या धोरणाना हाती धरत संसदेत भाजपने आपले आस्तित्व टिकवून ठेवले. कंदहार प्रकरणात पुरती नाचक्की झाल्यानन्तर भाजपच्या सुदैवाने विरोधी पक्षानी बराच समजूतदारपणा दाखवला. संघाने त्या घटनेवर सोयीस्कर मौन पाळले. मध्यन्तरी पाकिस्तानात जाऊन अडवाणीनी जीनांची स्तुती केली. त्यावरही संघाने मौन राखले. जसवंतसिंगानी जीनांवर काहितरी लिहिले आणि अचानक खळबळ उडाली. संघाच्या नेत्याना( स्वयंसेवकाना) साक्षात्कार झाला आणि ते दोन वेगवेगळ्या बाजूने बोलु लागले. स्वातंत्र्यानन्तर साठ वर्षे उलटली. एक चांगली ध्येधोरणे ठरवून जन्माला आलेली संघटना स्वतःची ध्येयधोरणे हरवून निष्प्रभ ठरु लागली आहे. बरीच बौद्धीके/ विचार मंथन शिबीरे झाल्यानन्तरही ही संघटना आता नेतृत्वहीन बनत चालली आहे. संघाची नक्की ध्येयधोरणे काय ही स्वयंसेवकानाच आता कळेनासे झाले आहे. संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य लोकाना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंसेवक तयार होत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना ध्येयधोरणांच्या धरसोडीमुळे आता राजकीय आस्तित्वसाठी गुदमरत आहे हे लिहिताना वैचारीक /राजकीय भुमीका/ वैयक्तीक आकस म्हणून असे काही नाही . हे एक सर्वसामान्य नागरीकाचे हे मत आहे.

वाचने 63541
प्रतिक्रिया 199

प्रतिक्रिया

व्वा.... चांगला वैचारिक (?) लेख. "हे लिहिताना वैचारीक /राजकीय भुमीका/ वैयक्तीक आकस म्हणून असे काही नाही . हे एक सर्वसामान्य नागरीकाचे हे मत आहे." हे मात्र सर्वात विनोदी वाक्य. झोपलेल्यालाच उठवता येईल, झोपेचे सोंग घेणा-याला कसे काय उठवणार? सबब ह्या लेखावर जास्त प्रतिक्रिया देउ इच्छित नाही. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

In reply to by अभिज्ञ

सहमत! स्पष्टच बोलायचे तर हे वाचुन हसावे की रडावे तेच कळत नाहीय! :-( असो, ज्याची त्याची मते! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by विशाल कुलकर्णी

१०० वा प्रतिसाद ! धाग्याचा खफ झालेला असुन संपादक मात्र डाराडुर झोपा काढत आहेत. असो ! नशीब असते एकेका लेखकाचे.. आमचे साले नशीबच गांडु.. ! दिसला धागा की खचाक करुन उडवला जातो.. असो. चालु द्या ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

१०० वा प्रतिसाद ! अहो "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" असे म्हणले की हळू हळू विस्तारच होणार! याला म्हणतात नामाचा महीमा! तुम्हाला पण असे हवे असेल तर एखादा संघावर/हिंदूत्वावर टिकात्मक लेख टाकून बघा. अभ्यासाची अथवा माहीतीची काही गरज नाही. वास्तवाला धरून नसले तर अधिक उत्तम... टंकायला सुरवात करायची आणि झोडपून काढायचे :-) बघा कसे दणादण प्रतिसाद मिळतात ते - बाजूने, विरुद्ध वगैरे. आपण तर खुद्द अवलिया, त्यामुळे याहून अधिक सांगायची काय गरज? ;)

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् । महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।। -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

वरील लेख हा वैचारिक दिवाळखोरी दाखवतो असेच मी म्हणेन. लेख वाचायला सुरूवात केल्यावर सविस्तर उत्तर द्यावे असा विचार होता. मात्र जस जसा लेख वाचत गेलो तेव्हा ह्या सामान्य नागरिकाचे ( नागरिक एकवचनी म्हणून एकेरी उल्लेख , लेखकाचा नाही.) असामान्य जावाईशोध आणि आधीच ठरवलेले मत काही घटनांचा संदर्भ देऊ चिकटवण्याची घाई पाहिली आणि ह्या लगबगीची चिड येण्या ऐवजी किव आली. भाजप मध्ये विलीन व्हायचे/भाजप वर अंकुश ठेवायचे/ जीना चे गोडवे गायचे / तसे गोडवे गाणारांचा निषेध करायचा यावर बरेच मंथन चालू आहे. ह्या वाक्यावर तर ठार उडालोच. धम्या इस्टाईलने म्हणायचे झाल्यास फुटलो.... धन्य धन्य ! ज्यांना संघ काय? संघाची रचना काय? आदींची प्राथमिक जरी माहिती असेल त्यांना सुध्दा वरील वाक्यातील विनोदाने हसू येईल. अशी वाक्ये हिंदीभाषी न्यूज चॅनेलमध्ये शोभून दिसतात हो ! कोट बदलला आणि आवाजाची पट्टी बदलली की त्या निवेदकांना जगातील कुठल्याही विषयावर बोलण्याचा अधिकार मिळतो. तुमचा तसा काही ग्रह झालाय का? :) असो... लेखकाला आपलं मत मांडायला अधीक भरपुर वाव आहे. माझं मत एवढंच की पुर्वग्रहदूषीत मत मांडतांना उगाच संघाचा आणि परिवारातील संघटनांचा आणि सोबतच गेल्या ६० वर्षांचा अभ्यास असल्याचा आव कशाला आणता? वर अभिज्ञ ने म्हटल्या प्रमाणे झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे उठवणार? - नीलकांत

एका सामान्यनागरीकाने ही मते व्यक्त केली आहेत. त्या नागरीकाला संघ नक्की काय कार्य करतो ते ठाऊक व्हावे ही अपेक्षा आहे. त्या नागरीकाची मते जशीच्यातशी दिली आहेत. संघाची भूमिका स्पष्ट करु शकत असाल तर बरे होईल अशी त्या नागरीकाची अपेक्षा आहे. त्या नागरीकाची मते ही वैचारीक दिवाळखोरी असू शकेल पण त्याबद्दल आपण त्याला नीट महिती सांगु शकतो. पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

In reply to by विजुभाऊ

माफ करा मात्र ही एका सामान्य नागरीकाची मते नाहीतच. सामान्य नागरीक हे बिरूद येथे केवळ आपली तटस्थता जाणवावी म्हणून घेतलेलं आहे. लेखाच्या सुरूवातीच्या परिच्छेदात जसे संदर्भ दिलेले आहेत त्यावरून संघाच्या समग्र वाटचालीचा अभ्यास (?) करून केलेले विधानं दिसतात. संघसंबंधीत काही घटनांचा अभ्यास करून मग संघात कसा संभ्रम आहे आदींचे विश्लेशन करणार्‍या व्यक्तीला जेव्हा हे लक्षात येतं की हे फारच एककल्ली होतंय तेव्हा "ही सामान्य मानसाची मते आहेत" अशी झुल पांघरली की झालं. फारच सोईची वाक्ये आहेत ना? संघाबाबत येथे आणि इतरत्र आधीच अनेक लोकांनी खुप उत्तम लिहून ठेवलं आहे. सामान्य मानसाने केवळ शीर्षक लिहून गुगललं असतं तरी सर्व संभ्रम (?) दूर झाले असते. त्याच विषयावर नव्याने चर्चा करायला हरकत नाही. पण काही तर नवीन मुद्दे हवेत ना? - नीलकांत

In reply to by नीलकांत

तटस्थता वगैरे नाही. लिखाण एकांगी असु शकेल पण जे मुद्दे मला भेटलेल्या त्या इसमाने मांडले त्याचे मुद्देसूद उत्तर मला देता आले नाही हे खरे. निदान इथे त्यांची उत्तरे मिळतील म्हणून ते जसे च्या तसे लिहिले जो बोलला तो कदाचित सेवादलाचा कार्यकर्ताही असू शकेल

In reply to by विजुभाऊ

स्वातंत्र्यानन्तर साठ वर्षे उलटली. एक चांगली ध्येधोरणे ठरवून जन्माला आलेली संघटना स्वतःची ध्येयधोरणे हरवून निष्प्रभ ठरु लागली आहे. बरीच बौद्धीके/ विचार मंथन शिबीरे झाल्यानन्तरही ही संघटना आता नेतृत्वहीन बनत चालली आहे. संघाची नक्की ध्येयधोरणे काय ही स्वयंसेवकानाच आता कळेनासे झाले आहे. संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य लोकाना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंसेवक तयार होत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना ध्येयधोरणांच्या धरसोडीमुळे आता राजकीय आस्तित्वसाठी गुदमरत आहे ही वाक्ये वाचली की मनोरंजन होतं आणि शेवटी एवढ्या संख्येने सामान्य लोक संघाचं चांगलं व्हावं असं म्हणत आहेत तर संघाची काळजी करण्यासारखं काही नाही असं सुध्दा वाटतं. खरं तर संघासाठी आयुष्य अर्पण करनार्‍या लोकांपेक्षा ज्यांना संघाच्या राजकीय क्षमतेशिवाय कसलीच माहिती नाही त्या लोकांना संघाची काळजी जास्त वाटायला लागली आहे. आधीच्या उठसुठ संघाला शिव्या देऊन आपलं सेक्युलॅरिझम सिध्दं करणारे आता संघाच्या भविष्याबाबत काळजी व्यक्त करण्याचा नवा पायंडा घालू पाहताहेत की काय? :) - (आनंदीत) नीलकांत

In reply to by नीलकांत

खरं तर संघासाठी आयुष्य अर्पण करनार्‍या लोकांपेक्षा ज्यांना संघाच्या राजकीय क्षमतेशिवाय कसलीच माहिती नाही त्या लोकांना संघाची काळजी जास्त वाटायला लागली आहे
+१ फार बुवा काळजी करतात हे लोक.. काळजी करण्यात इतके मग्न की संघाने केलेलं काम डोळ्यांसमोर असूनही दिसत नाही बिचार्‍यांना..

बरेच काही नवे वाचायला मिळाले. लेख पुन्हा एकदा व्यवस्थित वाचुन सविस्तर प्रतिक्रिया देतो. तुर्तास ही पोच समजावी .. विस्तृत प्रतिक्रियेसाठी "ही जागा" राखुन ठेवत आहे ... ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

मागे विनायक पाचलग ह्यांनी ह्याच नावाने चालु केलेला काथ्याकुट आठवला आणी त्याच जोडीने पाचलगांना ९९% प्रतिसादातुन मिळालेला "अजुन लहान आहेस, भरपुर अभ्यास कर आणी मग लिही" असा मिळालेला सल्ला आठवला. चालायचेच, इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

हीहीही ... कंपूतले म्हटल्यावर लिहावं लागतं म्हणून ... नाहीतर प्रतिसाद देणारच नव्हते ... अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला पण... :D आणि हो, "अजुन लहान आहेस, भरपुर अभ्यास कर आणी मग लिही" हा सल्ला त्यांना खूपच उपयोगी ठरला म्हणे. बिपिन कार्यकर्ते

In reply to by परिकथेतील राजकुमार

पाचलगचा धागा पाहिला. तो धागा संघाची स्तुती करणारा होता. असल्या अतिरेकी संघटनेची भलवाण करणार्‍याला "अजुन लहान आहेस, भरपुर अभ्यास कर आणी मग लिही"असे सांगणे जरुरी होते. त्यामुळे अश्या प्रतिक्रिया आल्यास ते योग्यच आहे. पाचलग जसजसा मोठा होत जाई/ भरपूर वाचन करेल तसतसे त्याचे विचार बदलतील अशी आशा करुया.

In reply to by निमीत्त मात्र

>>>असल्या अतिरेकी संघटनेची भलवाण करणार्‍याला बरं बरं... खान साहेब... समजला तुमचा अभ्यास :)

In reply to by दशानन

खान साहेब? पहा धर्मांध विचारसरणीचा परीणाम. राजेंनी लगेच मला मुसलमान पर्यायाने देशाचा शत्रु इ.इ. ठरवुन टाकले असेल.

In reply to by निमीत्त मात्र

>>धर्मांध विचारसरणीचा परीणाम =)) बरं बरं ! >>राजेंनी लगेच मला मुसलमान पर्यायाने देशाचा शत्रु इ.इ. ठरवुन टाकले असेल. टोमणा कळाला नसावा.. त्यामुळे होतं असे कधी कधी... चालू दे ! >>मुसलमान पर्यायाने देशाचा शत्रु =)) च्यामायला तुम्ही संघामधे असलेल्या एका विशीष्ठ धर्माशी संबधीत लोकाच्यावर लिहले तर तुम्ही .. काय म्हणात तुमच्या भाषेत... सेकुलर... च्यामायला आम्ही नुस्तं खान म्हणालो की धर्मांधं :? लै भारी... ! जरा चष्मा काढा... नाही तर... दवाची मात्रा वाढवा मात्र साहेब ;)

In reply to by दशानन

टोमणा कळाला नसावा.. त्यामुळे होतं असे कधी कधी... चालू दे !
टोमणा व्यवस्थित कळला. आणि बरोबर उत्तर दिले आहे. तुम्ही हसुन लोळणाररी चित्रे टाकून त्याकडे दुर्लक्ष केलेत. हरकत नाही.

In reply to by निमीत्त मात्र

पाचलग साहेबानी आधी सन्घावर चिखल्फेक सुरु केली होती... आधी मोठा हो बाळा, असा घाऊक सल्ला मिळाल्यावर मग त्यानी नमस्ते सदा वत्सले सन्घभूमे सुरु केलं होतं............ :)

असे विचार कोणाचे कां असेनात, पण ते दळभद्री आहेत हे मात्र खरे. ज्यांचा पक्ष भारतात जवळपास ६०-६२ ( मधली काही भाजपा आणि जनता सरकारची वर्षे सोडून) वर्षे सरकार स्थापून आहे ( पक्षी : काँग्रेस पक्ष ) त्यांनी देशाला पुरते नागवले. "अजूनही पोटापाण्याचे प्रश्न नीटपणे सुटत नसलेल्या लोकांचा देश " अशी अवस्था ज्यांनी केली त्यांच्या बद्द्ल कोणी काही लिहित नाही. पण कुणाचे, कधीही, कुठल्याही प्रकारचे नुकसान केले नाही आणि करणार देखील नाही अश्या संघासारख्या संघटनेने जरा राजकारणात- अलिप्त किंवा सक्रीय काय असेल ते राहून - जरा डोके वर काढले कि बोंब मारायला सुरवात. खरोखरी, आपल्या अंतर्मनात जावून संघाच्या सुरवातीपासूनच्या वाटचालीचा त्रयस्थपणे आढावा घ्या आणि संघाने देशाचे, देशवासियांचे काही नुकसान केले आहे कां, ते पहा आणि मग विचार मांडा.

In reply to by नाना बेरके

असे विचार कोणाचे कां असेनात, पण ते दळभद्री आहेत हे मात्र खरे. हे अतीअवांतर वैयक्तीक मत झाले. साधन्शुचितेबाबत चोखंदळ ,परखड असणारे लोक जेंव्हा वेगळे वागु लागतात तेंव्हा खटकते. याअ लेखात संघाबद्दल कोणतीच टीका केलेली नाही. फक्त बदलत्या राजकीय /आर्थीक्/जागतीक संदर्भात संघाची ध्येयधोरणे कशा प्रकारे आखली/बदलली/टिकवली आहेत. आणि ती नक्की काय आहेत हे विचारले आहे. कावीळ झालेल्याना म्हणे जग फक्त पिवळेच दिसते तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या बद्दल कोणी काही विचारले की त्याना थेट दळभद्री विचारांचे म्हणवले जाते.कोणतिही चिकित्सा नाकारायची आणि स्वप्रेमात मग्न व्हायचे या वृत्तीला नार्सीसस असे म्हंटले जाते. त्यामुळे कोणतीच प्रगती सुधारणा मात्र होत नाही. असो......... पवित्र डबक्यातले पाणी ......... त्यात शेवाळ आणि आणखी कायकाय साठून वास मारत असला तरी त्याबद्दल विचारायचे नसते...... पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

संघ ही एक फॅसिस्ट विचारसरणीची संस्था आहे. देशप्रेमाच्या नावाखाली तिरस्काराचे बाळकडू शाखांमधून पाजले जाते. भडक विचारांचे माथेफिरू लोक नेतृत्व सांभाळतात. ज्याला खरोखरंच देशप्रेमासाठी आयुष्य घालवायचे असेल त्याने सैन्यात भरती व्हावे. संघ जात पात मानत नाही असे वरुन म्हणत असला तरी संघाचा प्रभाव एका विशीष्ठ पोट जातीतील लोकांवरच असतो. (कुठल्याही शाखेतील बहुतांश स्वयंसेवक पाहा). आजकाल ग्रामीण भागात जाऊन संख्या वाढवण्यासाठी बहुजन समाजातील लोकांनाही भरती केले जात असले तरी ह्यांचा मूळ उद्देश (हिडन अजेंडा) हा वर्णव्यवस्थेवर आधारीत समाज उभा करणे हाच आहे.

संघाची बाजू घेऊन लिहावे की विरोधात लिहावे, हे ठरविता येईना. स्टार खेळाडु कोणत्या बाजूने उतरतात ते पाहून रणनिती ठरवेन. तो पर्यंत ही केवळ पोच. :) -दिलीप बिरुटे (दक्ष)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संघाची बाजू घेऊन लिहावे की विरोधात लिहावे, हे ठरविता येईना. स्टार खेळाडु कोणत्या बाजूने उतरतात ते पाहून रणनिती ठरवेन. तो पर्यंत ही केवळ पोच.
अगदी प्रा.डॉ. प्रतिसाद. ;-)

In reply to by श्रावण मोडक

बिरूटे सरांच्या प्रतिसादास उत्तर देण्यास तब्बल साडेतीनवर्षांचा कालावधी! नशीब तुम्ही त्यांचे विद्यार्थी नाही आहात आणि हा गृहपाठ नव्हता! ;)

In reply to by विकास

हाहाहा... धागाच आत्ता वाचतोय... आता लॉग काढून पाहू नका, की किती वेळेस 'श्रावण मोडक' या आयडीनं या धाग्यावर भेट दिलीये... ;-) कारण तसा अनेकदा उघडला, पण वाचलेला नाहीये.

In reply to by श्रावण मोडक

आम्हाला असले लॉग वगैरे बघण्याचे हक्क नाहीत. :( पण नाही आहेत तेच बरे आहे. :) कारण तसा अनेकदा उघडला, पण वाचलेला नाहीये. हे तुम्ही कसे करू शकता? शिकले पाहीजे तुमच्याकडून! तसे करू शकलो तर भरपूर वेळ वाचेल आणि जरा मनःशांती देखील लाभेल. :)

संघ ही एक फॅसिस्ट विचारसरणीची संस्था आहे. देशप्रेमाच्या नावाखाली तिरस्काराचे बाळकडू शाखांमधून पाजले जाते. भडक विचारांचे माथेफिरू लोक नेतृत्व सांभाळतात. ज्याला खरोखरंच देशप्रेमासाठी आयुष्य घालवायचे असेल त्याने सैन्यात भरती व्हावे. संघ जात पात मानत नाही असे वरुन म्हणत असला तरी संघाचा प्रभाव एका विशीष्ठ पोट जातीतील लोकांवरच असतो. (कुठल्याही शाखेतील बहुतांश स्वयंसेवक पाहा). आजकाल ग्रामीण भागात जाऊन संख्या वाढवण्यासाठी बहुजन समाजातील लोकांनाही भरती केले जात असले तरी ह्यांचा मूळ उद्देश (हिडन अजेंडा) हा वर्णव्यवस्थेवर आधारीत समाज उभा करणे हाच आहे. काय बोलणार?? आलाय हातात कळफलक, टंका हवा ते आणि करा प्रकाशीत. चालु द्या. सुजय

ह्म्म .. लेखाबद्दल बोलण्यासारखे माझ्याकडे काही नाही. संघाबद्दलची वाईट मते प्रतिसादांतून वाचूनही वाईट वाटले. -- लिखाळ. आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?

अतिशय एकांगी लेख आहे. संघाबद्दल काही जास्ती माहिती नसली तरी जे लिहिले आहे ते नक्कीच चुकीचे आहे... बाकी चालूद्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

लेख एकांगी आहे असं गृहित धरलं तरी मग ह्याची दुसरी बाजू वाचायला आवडेल. 'संघ म्हणजे नक्की काय', 'संघ नक्की काय करतो', 'संघाने केलेली काही ठळक विधायक कामे', 'संघात गेल्याचे काय व्यक्तिगत फायदे / तोटे आहेत' अशा स्वरूपाची माहिती संघाच्या जाणकारांनी दिली तर खर्‍या अर्थाने चांगली चर्चा होईल अन्यथा बहुतांश प्रतिसाद भरकटताना दिसतील. --------- अवांतरः मी स्वतः शाळेत असताना काही वर्षं संघात जायचो. 'संघात जाऊन संस्कारांच्या दृष्टीने नक्की काय मिळवलं / गमावलं ते आठवायचा प्रयत्न करतोय.

In reply to by संदीप चित्रे

लहानपणी मी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचो. एकूणात शिस्त, वेळेचे महत्त्व, लोकसंग्रह इत्यादी शिकलो. आमच्या शाखेत धार्मिक शिक्षण नव्हते. देशप्रेमावर व्याख्याने व्हायची. गुरू-शिष्य नात्यावरही बौद्धीकं व्हायची. ह्याचा बर्‍यापैकी फायदा पुढील आयुष्यात झाला.

In reply to by प्रभाकर पेठकर

लहानपणी मी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचो.
मग मोठे झाल्यावर ते बंद करावेसे का वाटले तेही कृपया लिहा.

In reply to by निमीत्त मात्र

माझ्यामते लहानपणी असलेली एखादी चांगली सवय मोठेपणी बंद पडली म्हणजे ती आपण त्याज्य ठरवली किंवा टाळली असे नाही होत. मोठेपणी संसाराचे व्याप वाढले की आपोआप बाकी सगळे कमी होत जाते, पण त्याचा अर्थ जुने सगळे त्याज्य ठरवले आहे किंवा सोडले आहे असा होत नाही. कॉलेजमध्ये असताना मी ही संघात जायचो, विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे कार्य करायचो, जे आता इतर व्यापामुळे नाही जमत. पण याचा अर्थ आज मला स्वामी विवेकानंदांची किंवा कै. हेडगेवारांची , कै. गोळवलकर गुरुजींची मते पटत नाहीत असा नाही होत. माझ्या दुर्दैवाने त्या कार्याला मी तेवढा वेळ देवु शकत नाही एवढाच याचा अर्थ होतो. काय पेठकरकाका? चुकत असेन तर सांगा. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by विशाल कुलकर्णी

मला उत्तर पेठकरांकडून हवे होते. त्यांनी दिले नाही, त्यातच सगळे आले. तुमचा प्रतिसाद तुमच्या ख्यातीप्रमाणेच आहे..असो..

In reply to by निमीत्त मात्र

आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझी ख्याती काय आहे ते पण सांगा ना राव! मला पण कळु दे मी ख्यातनाम आहे की कुख्यात? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by निमीत्त मात्र

श्री. निमित्त मात्र, लहानपणी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जायचो म्हणजे त्यांच्या कुठल्या आदर्शांनी प्रेरित होऊन जात होतो अशातला भाग नाही. मला स्वयंसेवकांचा गणवेश, ते खेळ, तो दंड आणि ती एकसुरात गाईलेली प्रार्थना आवडायची. त्यामुळे मी शाखेत जाऊ लागलो. पुढे त्यात रस वाढू लागला. पण दुर्दैवाने, शाखेच्या मैदानावर एका इमारतीचे बांधकाम सुरू झाले आणि शाखा एका दूरच्या मैदानावर भरू लागली. तिथेही मी सुरूवातीला जात होतो. पण ते मैदान मला लांब पडायचे. त्याकाळातच आमच्या गल्लीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची शाखा सुरू झाली . तिथे मला वाचनाची आवड लागली. आमच्या गल्लीतच एका सेवाभावी डॉक्टरांनी एक मोफत वाचनालय सुरू केले होते. तिथेही मी जायचो. वाचनाच्या आवडीतून माझी 'पुलं'च्या साहित्याशी ओळख झाली तसेच काही प्रवासवर्णने , वासू मेहेंदळ्यांचे 'विचित्र विश्व', कुमार, नवनीत, विज्ञानयुग अशी काही नियतकालिके वाचावयास मिळाली. मधुनमधुन वेळ मिळाला आणि मनात आलं की मी शाखेवर चक्कर टाकायचो. पण वाचन, माफक प्रमाणात टेबलटेनिस, बॅडमिन्टन आणि काही तारूण्यसुलभ आकर्षणांच्या प्राधान्य क्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मागे पडत गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मी काही फार प्रेमात होतो अशातला भाग नाही आणि त्यांचा मी कधी तिरस्कारही केला नाही. शाखेमुळे आयुष्यात जे माझे फायदे झाले त्याचे श्रेय मी त्यांना का नाकारू? ते मी त्यांना देतो आणि कायम देत राहीन. मला वाटते पुरेसे सविस्तर उत्तर मी दिले आहे. आपली जिज्ञासा शमली असेल असे मी मानतो. धन्यवाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रांजळ प्रतिसाद आवडला. सहज विचार डोक्यात आला, शाखेच्या जागी वाचनालय! मला वाटतं, तुमच्याकडं असलेला समतोल दृष्टिकोन ही त्या वाचनालयाची देणगी असावी, आणि तुमच्यातली शिस्त शाखेची देणगी असावी.

खरं सांगायचं तर विजूभाऊना खूप सांगायचं/लिहायचं होतें पण जसजसा तो लेख मोठा होत गेला तसतसा त्यांना बहुदा अस्वस्थ वाटू लागलं असावं व त्यांनी तो घाईघाईने आटोपता घेतला. त्यामुळे या लेखाद्वारे त्यांना काय म्हणायचे आहे तेच समजत नाहीं. भरपूर 'डाटा' दिलाय, पण निष्कर्ष काढायचा राहून गेलाय असे मला वाटले. माझा त्यांना सल्ला आहे कीं त्यानी हा लेख स्वतःच एकदा नीट वाचावा व पुन्हा लिहावा. नक्कीच मस्त होईल. बघा पटते का. एक अशाच विषयांवरचा लेखक या नात्याने मी या चक्रव्युहात कधी-कधी सापडलो आहे. अशा वेळी एकाद्या मित्राला सल्ला विचारावा. मी असे खूपदा करतो. गैरसमज नसावा ही कळकळीची विनंती. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

संघाचे वास्तविक स्वरुप सांगणारा माझा प्रतिसाद का उडवला कळेल का? मी मिपाच्या संचालक, संपादक किंवा सदस्यांसह कोणावरही काही वैयक्तिक आरोप केले नव्हते. कोणत्याही जातीवर-धर्मावर टीका केली नव्हती तरीही हा प्रकार संतापजनक आहे. वर उदाहरणार्थ नाना बेरके यांचा दळभद्री विचार वगैरे शब्द असलेला प्रतिसाद मात्र तसाच आहे. काल मी म्हटले होते की ब्राम्हण विरोधी काहीही लिहिले की ते ताबडतोब संपादित होते त्याचा पुरावा एका संपादकाला हवा होता. जर त्या संपादकानेच माझा प्रतिसाद उडवला नसेल तर त्याला पुरावा मिळाला असे मानण्यास प्रत्यवाय नसावा.

In reply to by आण्णा चिंबोरी

असे खरंच झाले असेल तर ते चुकिचे आहे. विचारांची मुस्कटदाबी होते आहे. शक्य असल्यास सदर संपादकांने खुलासा केल्यास गैर समज होणार नाहीत.

In reply to by निमीत्त मात्र

मिपावर नवीन(पक्षी: हल्लीच जास्त कार्यरत झालेले) दिसता.. मागे मिपा मुखपृष्ठावर कोल्हापुरी चपलांचे चित्र होते. असो. चांदणी भयामुळे इथे जास्त काही लिहीत नाही. :) वरील लेख प्रतिक्रिया देण्यायोग्य वाटला नाही म्हणून प्रतिसादाला अवांतर प्रतिसाद देत आहे. पुण्याचे पेशवे हा मोनॅकोपॉवर्ड प्रतिसाद आहे. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मिपावर नविन असणे, हल्लीच कार्यरत असणे हा गुन्हा आहे का? मला दुसर्‍यांदा ह्यावरुन डिवचले जाते आहे म्हणून विचारले. कृपया तात्या किंवा संपादक ह्यांनी खुलासा करावा. चप्पल घालून चालते व्हा म्हणून तुम्ही दिलेला सल्ला आवडला. आपल्या विचारांपेक्षा वेगळे विचार असणार्‍याच्या विचारांचा पराभा करण्याचा याहून सोपा मार्ग कोणता?

In reply to by निमीत्त मात्र

हा प्रतिसाद मूळ चर्चेशी पूर्ण अवांतर असून विनाकारण वैयक्तिक रोख ठेउन दिलेला आहे. संपादकांनी कृपया कारवाई करावी. संदर्भः याच चर्चेवर सध्या पुढच्या पानावर बिल्ला क्र: २५८० यांनी दिलेला प्रतिसाद. प्रतिसाद मात्र

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कोणाचा प्रतिसाद माझा की पेशव्यांचा? आधी पेशव्यांचा प्रतिसाद वाचा. हा कसला पेशवा? हा तर चांदणीला घाबरणारा पळपुटा बाजीराव!! असले सवंग मलाही लिहिता आले असते. त्यावर तुमची ही प्रतिक्रिया योग्य ठरली असती.

In reply to by निमीत्त मात्र

हा प्रतिसाद मूळ चर्चेशी पूर्ण अवांतर असून विनाकारण वैयक्तिक रोख ठेउन दिलेला आहे. संपादकांनी कृपया कारवाई करावी. संदर्भः याच चर्चेवर सध्या पुढच्या पानावर बिल्ला क्र: २५८० यांनी दिलेला प्रतिसाद. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी तक्रार केलेला जो प्रतिसाद दाखला म्हणून देत आहात तो आत दिसत नाही कारण मूळ प्रतिसादच साफ झाला आहे. तुम्ही तुमची जळ्जळ उगाळत राहा.मला हरकत नाही. इनो हवे असेल तर सांगा..

In reply to by निमीत्त मात्र

अदिती ओवीपेक्षा ओवाच जास्त उपयोगी पडतो. संदर्भ "...गाळीव इतिहास" - पुलं अवांतरः ग्लॅक्सोपण विदेशी कंपनीच आहे ना? ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

घेउन टाका बघू पटकन आता..म्हणजे शांत झोप लागेल!

In reply to by निमीत्त मात्र

आम्हा कष्टकरी माणसांना झोप लागण्यासाठी इनोची गरज नसते. इतर कोणाला हवं असेल तर परोपकार म्हणून दिलं, शिवाय ओव्याचा "देशी" मार्गही सुचवला. ;-) असो. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

झोप लागण्यासाठी नव्हे जळजळ कमी करण्यासाठी इनो घ्या म्हणालो.

यात आक्षेपार्ह काय आहे? खरे बोलणे हे? अतिशय सुरेख व समतोल लेख. विजुभाऊंचे अभिनंदन करावेसे वाटते. बंद पडलेल्या मिपा संपादकीय या सदराला पुनरुज्जिवीत करण्यासाठी हा उत्तम लेख आहे. संघ ही फॅसिस्ट विचारसरणीचीच संघटना आहे. घातपात करण्यासाठी, दंगली पसरवण्यासाठी त्यांना बजरंग दल, विहिंप, आक्रस्ताळी दुर्गा वाहिनी, त्याचबरोबर एकमेकांचा पायपोस नसलेल्या पतित पावन संघटना, वंदे मातरम संघटना अशा दहशतवादी संघटना लागतात. ही संघाचीच वेगवेगळी रुपे. पुराणात रावणाला जशी दहा तोंडे पण एकच शरीर आणि आत्मा होता तसाच हा दहा तोंडाचा एक राक्षस आहे. सिमी, तालिबान लष्कर ए कायदा आणि संघ यांच्या कार्यपद्धतीत फरक असला तरी विचारसरणीचे सूत्र मात्र एकच आहे. किंबहुना अधिक संभावित आणि चलाख असल्याने संघ तुलनेने धोकादायक आहे. सावरकरांनी केलेले दलितांसाठीचे कार्य, आंबेडकरांच्या चळवळी याच्याशीही संघाचा काहीही संबंध नाही. संघ प्रसिद्धीसाठी हपापलेला नाही असे म्हणत ठिकठिकाणच्या चर्चांमध्ये वनवासी कल्याण आश्रमाचे पिलू सोडून स्वतःच स्वतःच्या टे-या बडवायच्या यातही संघ सराईत आहे. वास्तविक पाहता देशभरात निस्पृहतेने कार्य करणा-या अनेक संघटना आहेत. राष्ट्र सेवा दलापासून वैयक्तिक पातळीवर अथक काम करणारे अवचट, दलवाई, बंग, बाबा आढाव, बावस्कर अशी अक्षरश: आकाशाएवढे कर्तृत्व असणारी माणसे कोणताही राजकीय अजेंडा न घेता निरलसपणे कार्य करत होती, आहेत. त्यांच्याशी संघाची तुलना कशी करायची हा प्रश्नच पडतो. संघाचे मुख्य कार्यालय नागपूर, महाराष्ट्र येथे आहे. गोळवलकर गुरुजींपासून ते करंदीकर, दाते, देवरस, भागवत ही मराठी माणसे या जातीयवादी संघटनेच्या प्रमुखपदी विराजमान असल्याने आणि गांधींच्या खुनात संघिष्ठांचा हात असल्याने मराठी माणसांबाबत इतर देशवासीयांच्या मनात अप्रीती, अविश्वास आणि भीती निर्माण करण्यासाठीही संघच जबाबदार आहे.

In reply to by निमीत्त मात्र

वरील प्रतिसादात 'संघाची फारशी माहिती नाही पण जे लिहिले आहे ते नक्कीच चुकीचे आहे' छाप प्रतिक्रिया वाचून हसू आले'. हेही लिहिले होते. कदाचित त्यामुळे प्रतिसाद उडाला असावा.

In reply to by आण्णा चिंबोरी

राष्ट्र सेवा दलापासून वैयक्तिक पातळीवर अथक काम करणारे अवचट, दलवाई, बंग, बाबा आढाव, बावस्कर संघाचे मुख्य कार्यालय नागपूर, महाराष्ट्र येथे आहे. गोळवलकर गुरुजींपासून ते करंदीकर, दाते, देवरस, भागवत पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

क्षणभर तर मला सुमार साहेबांचे "लोकसत्तेचे" संपादकीयच वाचतोय असा भास झाला. सर्वसामान्यांच्या नावावर खपवलेली वैचारिक दिवाळखोरी मात्र चांगलीच करमणूक करून गेली ह्यात काहि वाद नाहि. पुढील लेखनास शुभेच्छा. देव (मानत असा/नसा) तुम्हाला चांगले लेख लिहिण्याबद्दल सदबुध्दी देवो एवढीच इच्छा. मुत्सद्दि.

In reply to by मुत्सद्दि

अहो मग त्यातल्या मुद्द्यांचा वैचारिक प्रतिवाद करा ना. मलाही वाचायला आवडेल. नुसतीच चीड चीड कशासाठी?

गादीवरुन डायरेक्ट संघ? अतिशय एकांगी लेख. वैचारिक गोंधळ उडाला आहे लेखकाचा.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भुमीका बरेच वेळा बदलत असते. संघाची मूळ भुमिका (संघटन आणि कार्यकर्ता निर्माण) बदलत असताना दिसत नाही. राष्ट्रासाठी आणि समाजासाठी काम करताना कालानुरूप बदल घडवण्याची लवचिकता नक्कीच संघाने दाखवलेली आहे. नाहीतर उद्या म्हणाल की आता इंटरनेट वापरतात, फोनवरून एसएमएस करतात वगैरे...संघातून प्रेरणा घेऊन जर कोणी कामे करत असले तर ती वेगळी संघटना असते आणि त्यात त्या संघटनेच्या उद्दीष्टांप्रमाणे त्या संस्थे संघटक भुमिका ठरवणार... राजीव गांधींच्या काळात सुरुवतीला त्याना नक्की कसा विरोध करायचा हा संघीयाना एक मोठा प्रश्नच होता. त्या काळात भाजपने जाहीररित्या गांधीवादी समाजवादाचा स्वीकर करु असे जाहीरपणे सांगितले होते गांधीवादी समाजवाद हा इंदिरागांधींच्या अखेरच्या काळात आला होता. ते वाजपेयींचे विचार होते. त्यातून एक नक्की दिसते की संघाचे विचार काही असले (अथवा वाटले) तरी भाजपाने स्वतंत्र भुमिका घेतली होती. आणि अर्थातच त्या आधी म्हणजे बांग्लादेश मुक्तीयुद्धाच्या वेळेस इंदीरा गांधींची भुमिका पाहून तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरसांना त्यांना "दुर्गा" असे कौतुकाने म्हणत संघाचापाठींबा देण्यास कमी वाटले नव्हते. पण नन्तर राजकारणात मंडल आयोगाच्या अस्त्राला उत्तर देण्यासाठी तितकेच विघातक असे रामजन्मभूमीचे अस्त्र संघाने बाहेर काढले. त्या विषयावर एक राजकीय पक्ष म्हणून त्यानी नेहमीच दुटप्पी भुमीका ठेवली. भाजप म्हणजे संघ नव्हे असे म्हणताना मात्र भाजपतर्फे संघाचा अजेन्डा चालू ठेवला. रामजन्मभूमीचा प्रश्न मंडलच्या आधी नवा नव्हता. तो आधीपासूनच होता, जरी मधल्या काळात निद्रीस्त झाला असला तरी. तो परत जागृत होण्याचे कारण हे शहाबानो प्रकरणात अल्पसंख्यांकाचे लांगुलचालन करत जी घटनादुरूस्ती करून सर्वोच्च न्यायालयाला देखील कमी पणा आणताना काही वाटले नव्हते, ते होते. भारतीय राजकारणातील बदलेल्या परीस्थीत संघाने नेहमीच धरसोड भुमीका घेतली आहे. उदाहरण दिल्यास समजेल की यात तथ्य किती आहे. ४२ च्या आंदोलनात करा अथवा मरा म्हणताना गांधीजींनी स्वत:ची भुमिका बदलली असे म्हणतात. वास्तवीक ती परिस्थितीनुरूप होती असे म्हणायला हवे. तीच कथा कदाचीत आपण उदाहरण दिल्यास स्पष्ट करता येईल. नाहीतर उगाच पोकळ वल्गना आहे. संघ म्हणजे भाजप नव्हे. संघ म्हणजे विश्वहिन्दु परिषद नव्हे संघ म्हणजे बजरंग दल नव्हे असा प्रत्येक संघटनेशी स्वतःचा संबन्ध नाही असे संघ वारंवार म्हणत असतो. पण मग सम्घ म्हणजे नक्की कोण? असा साहजीक प्रश्न पडतो. अहो गांधीटोपी घालणारी प्रत्येक व्यक्ती गांधीवादी असते का? (असते असे जरी कोणी म्हणाले तरी ते गांधीवाद किती पाळतात आणि "पुरूष" नाटकात दाखवल्याप्रमाणे आवाज उठवण्याऐवजी, तोंडात कोंबून बंद करायला किती लावतात हा अजूनच वेगळा प्रश्न आहे). विहिंप, बजरंगदल आदी संघटनांपैकी किमान काही (सगळ्याच असतील असे नाही) या संघाच्या सहकार्यातून तयार नक्कीच झाल्या. मात्र त्या स्वतंत्र संघटना आहेत. त्यात अनेक जण किंबहूना बहुतेक जणांनी कधी खाकीचड्डी घातली नाही की "नमस्ते सदा" म्हणले नाही. थोडक्यात जो शाखास्थानी आला नाही, ध्वजप्रणाम केला नाही तो स्वयंसेवक नाही आणि तशी संस्था म्हणजे संघ ही नाही...कायद्याने नाही असे नाही तर वैचारीक आणि आचारानेपण. गांधीजी स्वतःला काँग्रेसचे चार आण्याचे सदस्य पण नाही असे म्हणायचे पण त्यांचा प्रभाव काँग्रेसवर होताच की. भाजपा जर चालू करण्यात स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला तर त्यात संघाच्या वैचारीक छटा दिसल्या तर आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. मोदींचे हिटलरी स्टाईलचे हिन्दुत्व कदाचित भावले त्यामुळेच की काय स्वतःचा कट्टर शत्रु असलेल्या संजय गांधींच्या मुलाला पावन ठरवले गेले. अजूनही मोदी लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. तसेच टाटा-अंबानीसकट त्यांच्या राज्यात आणि सरकारबरोबर धंदा करायला कोणालाही कमीपणा वाटत नाही. आणि सगळ्यात महत्वाचे, गेली पाच+ वर्षे विरुद्ध सरकार केंद्रस्थानी असूनही मोदींच्या विरोधात अजून काहीच आरोपपत्र नाही. हा मुद्दा मांडायचे कारण मोदी बरोबर की चूक हे नसून जे विरोधकांकडूनही सिद्ध झालेले नाही ते होई पर्यंत हिटलर वगैरे म्हणणे अयोग्य वाटते. संजय गांधी जरी कट्टर शत्रू होता तरी मनेका गांधी या अनेक वर्षे भाजपात आहेत आणि मंत्रीही होत्या. तरी देखील राहून राहून एक वाटते की जेंव्हा आपण अजूनही त्याचे आई-बाप काढून मुलाची ओळख करावी का? कुठेतरी आपण घराणेशाहीत रमून जातो... भाजप सत्तेत असताना बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. संघाच्या बर्‍याच स्वयंसेवकानी सत्तेची चव नव्याने चाखली. पण संघाला अजूनही स्वत:ची नक्की अशी ध्येय धोरणे ठरवता अली नाहीत. संघाच्या बर्‍याच स्वयंसेवकांनी सत्तेची चव चाखली असेल पण जे स्वयंसेवक सतेत गेले त्यांना संघात काहीच दायीत्व राहीलेले नव्हते. संघाचे ध्येयधोरण म्हणाल तर एकच राष्ट्राला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी संघटन करणे आणि त्यासाठी कार्यकर्ता निर्माण करून तो राष्ट्रप्रवाहात सोडून देणे. त्यापासून ते कधीच ढळले नाहीत. आणि हा काय प्रकार आहे हे कधी त्याचा अनुभव जाउंदेत पण अभ्यास न केलेल्याला समजले नाही... कधी सोनियाना विरोध कर त्यासाठी स्वतःचे मुंडण करु असे आक्रस्तळेपणे सांगून हसे करुन घे. असे विधान सुषमा स्वराज यांनी केले होते. रा.स्व.संघ ही जन्मापासून केवळ "पुरूषांची" संघटना होती/आहे. त्यात सुषमा स्वराज नव्हत्या... मध्यन्तरी पाकिस्तानात जाऊन अडवाणीनी जीनांची स्तुती केली. त्यावरही संघाने मौन राखले. जसवंतसिंगानी जीनांवर काहितरी लिहिले आणि अचानक खळबळ उडाली. संघाच्या नेत्याना( स्वयंसेवकाना) साक्षात्कार झाला आणि ते दोन वेगवेगळ्या बाजूने बोलु लागले. बातम्या पाहील्यातर यात तथ्य नाही हे समजेल.... आत्ताच्या बातम्यात तर माजी सरसंघचालक काय म्हणाले हे वाचले नसेल तरच आश्चर्य... संघाची नक्की ध्येयधोरणे काय ही स्वयंसेवकानाच आता कळेनासे झाले आहे. याला काही आधार नसावा. कारण जर ध्येयधोरणे समजत नसतील तर स्वयंसेवक संघापासून फारकत घेतील. तशी ते घेताना दिसत नाहीत. संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य लोकाना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंसेवक तयार होत नाहीत. या दोन्ही वाक्यांचा एकमेकांशी संबंध नाही. संघ संघटना काय आहे हे मला सामान्य असून आणि (लहानपणी कधीपण न जाता) अभ्यास, निरीक्क्षण करून समजू शकते. ते जर इतरांना समजू शकले नाही तर एकतर आधीच डोक्यात काहीतरी आहे तसेच संघातील ज्या व्यक्तींशी संबंध आला त्या हे सांगायला कमी पडल्या असा अर्थ होऊ शकतो. "त्यामुळे नवे प्रभावी स्वयंसेवक तयार होत नाहीत" या वाक्यातून पुर्वीचे स्वयंसेवक प्रभावी होते असे आपल्याला म्हणायचे आहे असे दिसते. चांगले आहे... बाकी आत्ताची काळजी करू नये, अनेकजण प्रभावी आहेत. पण ते प्रसिद्धीसाठी काम करत नसल्याने एकतर माध्यमांमधे दिसत नाहीत आणि त्यांच्यावर टिका झाली तरी ते खचत नाहीत. बाकी तेहलका मधील हा लेख काहीतरी सनसनाटी असेल असे वाटले पण त्यातून काहीच उलटसुलट ते लिहू शकलेले नाहीत असे वाटले...एक केवळ संघ भाजपाला झोडपतोय इतकेच काय ते. आता त्यातील किती खरे ठरते त्यावरून तेहलकाची वृत्तपत्रीय आचारसंहीता समजेल नाहीतर नसतेच सनसनाटी आणि कुणाच्या तरी बाजूने कुणाच्या तरी विरुद्ध ओरडणारे इतकेच काय ते...

सध्या आम्ही जहाल आणि मादक पेयाचा आस्वाद घेतो आहोत. सर्वसामान्य नागरीकांच्या वैचारिक दिवाळखोरीकडे नंतर वळू. बाकी सगळ्यांचे प्रतिसाद त्यांच्या त्यांच्या ख्यातीनुसारच आहेत. (एक्सेप्ट फॉर वनः नीलकांतचा नेहमीचा सौम्यपणा कुठे गेला?) -- मिसळभोक्ता

In reply to by मिसळभोक्ता

बाकी सगळ्यांचे प्रतिसाद त्यांच्या त्यांच्या ख्यातीनुसारच आहेत
बाकी सर्वांचे माहित नाही, पण विकासचा प्रतिसाद मात्र त्याच्या (ब्रेन वॉशींग) ख्यातीनुसारच आहे ;) असो..जोक्स अपार्ट, विकासने आण्णा चिंबोरींच्या प्रतिसादाचाही प्रतिवाद करावा अशी विनंती. तो पर्यंत त्याचा वरील प्रतिसाद नीट वाचून घेतो.

In reply to by निमीत्त मात्र

विकासचे प्रतिसाद मी वाचत नाही. एक तर चार ओळी पेक्षा मोठे प्रतिसाद मी वाचतच नाही. (कुणी लिहिला आहे ते बघून फक्त +१ म्हणतो.) दुसरे म्हणजे असे प्रतिसाद वाचून स्वतःची विचार करण्याची शक्ती नष्ट होण्याची भीती असते. विकासचे प्रतिसाद वाचण्याचे काम मी विकी ला आउटसोर्स केलेले आहे. -- मिसळभोक्ता

In reply to by मिसळभोक्ता

विकासचे प्रतिसाद वाचण्याचे काम मी विकी ला आउटसोर्स केलेले आहे.
हाहाहाहा मीही तेच करावे म्हणत आहे. वाचायला वेळ पुरत नाही तिथे इतके टंकायला कसा काय वेळ मिळतो ह्याचाच विचार करत होतो. असे प्रतिसाद वाचून स्वतःची विचार करण्याची शक्ती नष्ट होण्याची भीती असते. हे मात्र अगदी लाखमोलाचे बोललात.

In reply to by निमीत्त मात्र

बाकी सर्वांचे माहित नाही, पण विकासचा प्रतिसाद मात्र त्याच्या (ब्रेन वॉशींग) ख्यातीनुसारच आहे तुम्ही जरी विनोद म्हणून लिहीले असले आणि त्याअर्थाने मी जरी हलके घेत असलो तरी डिसक्लेमर करावासा वाटला. लहान मुले भांडताना एकाचे मुद्दे संपतात आणि मग उत्तर देता आले नाही की तो म्हणतो, "तू वेडा आहेस" आणि मग वाद दुसरीकडेच भरकटतो. मी ब्रेन वॉशिंग करतो असे म्हणणे हा यातीलच एका अर्थी प्रकार वाटतो... मी माझा वरील प्रतिसाद हा संघाचा प्रचार करायला लिहीला नसून मूळ लेखातील तृटी आणी कमतरता दाखवण्यासाठी लिहीला होता. इतके दिवस गांधीचे मारेकरी असे बोंबलत त्यांच्या विरोधकांनी स्वतःचे (चुकीचे) शस्त्र बोथट केले, परीणामी आता जनतेला त्याचा काही फरक पडत नाही. याचा अर्थ सर्व स्वयंसेवक झाले अथवा संघाचे झाले असा नसून साम्यवादी आणि तथाकथीत समाजवादी यांची खरी प्रतिमा आता जनतेला समजून चुकू लागली आहे. मग आता बाकी कशावरून तरी झोडा असा हा प्रकार आहे. असे विचार पसरवणार्‍या संस्था/विचारवंत, काही न करता बोटे मोडत आणि कागाळ्या करत बसतात आणि वास्तवीक इतरांचे ब्रेनवॉशींग करण्याचा प्रयत्न करतात. केवळ संघाच्या संदर्भातच नाही तर एकूणच समाज, राष्ट्र, संस्कृती सगळ्याच्याच संदर्भात. जर तुम्हाला संस्कृती मान्य नसेल तर नसूंदेत पण इतरांना कशाला नावे ठेवता? बाकी संघावरील माझा मूळ प्रतिसाद (विनायक पाचलगच्या चर्चेतील) आपण वाचला असेलच. त्यातील फक्त शेवटचे वाक्य येथे "ब्रेन वॉशिंगच्या" संदर्भात सांगतो: "म्हणूनच संघावर टिका करत बसण्याऐवजी जसे हवे तसे, वाटते त्या विचारधारेचा आधार घेऊन आपण समाजाला परत काही देतो का, याचा विचार करायला हवा इतकेच म्हणावेसे वाटते." आणि तसे प्रामाणिक काम करणारे सर्व विचारधारेत असतात आणि त्यांना असल्या फुटकळ काड्या करायला वेळ नसतो. त्यांचे ब्रेन वॉश करायचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांच्याकडून तुम्हीआम्ही शिकण्यासारखे बरेच काही असते. आणि इतरांची अवस्था ही कच्च्या मडक्याप्रमाणे... ते ही उलटे ठेवलेले. आणि तुम्हाला माहीत असेलच की त्याला एक मराठीत चांगली म्हण आहे: पालथ्या घड्यावर पाणी!

In reply to by विकास

विकास, सर्वप्रथम हलके घेतल्याबद्दल आभारी आहे.
मी ब्रेन वॉशिंग करतो असे म्हणणे हा यातीलच एका अर्थी प्रकार वाटतो...
हे मलाच वाटत नाही, तर इतर सदस्यांनाही वाटते. आणि हे एक निव्वळ निरिक्षण आहे. "तू वेडा आहेस'" असे मी कुठेही म्हंटलेले नाही. त्यामूळे तू दिलेले उदाहरण मला मान्य नाही.
बाकी संघावरील माझा मूळ प्रतिसाद (विनायक पाचलगच्या चर्चेतील) आपण वाचला असेलच.
नाही वाचला. मूळ लेखा पेक्षा प्रतिसादच मोठा असेल तर मी सहसा वाचायचे टाळतो. बुवा वितभर आणि दाढी हात भर असे होण्याची शक्यता असते.
आणि तसे प्रामाणिक काम करणारे सर्व विचारधारेत असतात आणि त्यांना असल्या फुटकळ काड्या करायला वेळ नसतो..
साम्यवादी सुडो सेक्युलर विचारसरणीतही असे लोक असतात का?

In reply to by निमीत्त मात्र

नाही वाचला. मूळ लेखा पेक्षा प्रतिसादच मोठा असेल तर मी सहसा वाचायचे टाळतो. बुवा वितभर आणि दाढी हात भर असे होण्याची शक्यता असते. छान! मिसळभोक्तांच्या छोट्या प्रतिसादाने पण तुमचे ब्रेन वॉशिंग होते तर... :-) साम्यवादी सुडो सेक्युलर विचारसरणीतही असे लोक असतात का? विचारसरणी सुडो नसते तीचा गैरवापर करणारे सुडो असतात. म्हणूनच कधी कधी "तथाकथीत" हिंदूत्ववादी असेही म्हणावे लागते. :-(