माझे आई-बाबा दर शनिवारी मारुतीला जातात. मी Agnostic Theist या categoryत मोडत असल्यामुळे मला कधी आग्रह करत नाहीत ते! पण आज म्हटलं, जाऊया आपणपण, तेवढंच सकाळी लवकर उठणं होईल!
हे मंदिर अक्कलकोट तालुक्यातल्या गौडगाव (बु.) या गावात आहे. सोलापूरपासून बसने पाऊण तासावर. दर शनिवारी-रविवारी सकाळी ६:२० पासून दर अर्ध्या तासाने बसेस असतात. बरोबर ७ ला पोचलो आम्ही गावात. ४:३० लाच उठावे लागले होते! माझ्या मानाने फ़ार म्हणजे फारच लवकर! पण सकाळच्या ताज्या हवेत बाहेर पडल्यावर सगळा कंटाळा पळून गेला. बसमध्ये पण खिडकीची जागा मिळाल्यामुळे आपण तर बाबा खूष होतो!
या मंदिराबद्दल महत्वाच्या गोष्टी म्हणजे स्वत: समर्थ रामदासांनी मारूतीची प्रतिष्ठापना केली आहे आणि (त्यामुळे) जाग्रुत आणि नवसाला पावणारा म्हणून याची ख्याती आहे. शनिवार असल्यामुळे साहजिकच गर्दी बरीच होती. आणि त्यात भर म्हणून गावातले लोक "आम्ही काय इथलेच" म्हणून रांगेत घुसत होते! मानवबळाच्या कमतरतेमुळे गर्दीचे नियोजन नीट होऊ शकत नव्हते. काळाबरोबर ते सुधारेल अशी आशा आहे.
मूर्ती अतिशय सुंदर आहे. गाभार्यात आतपर्यंत जाता येते. सतत ध्वनिक्षेपकावर हनुमान चालिसा, स्तोत्रे चालू असल्यामुळे वातावरण प्रसन्न असते. साधारण एक तास लागला आम्हाला दर्शनाला. बाहेर आलो तर बस उभीच होती. ९:३० पर्यंत घरी पोचलोसुद्धा.
थोडक्यात, सोलापूरकडं कुठं आलात तर या मंदिराला भेट द्यायला हरकत नाही!
ता. क.: Camera नेला नसल्यामुळे छायाचित्रे टाकता आली नाहीत.
वाचने
3846
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा!
कौतुकाबद्
In reply to व्वा! by प्राजु
चला...
धन्यवाद
In reply to चला... by प्रमेय
मारुतिला
व्हय
In reply to मारुतिला by दवबिन्दु
काय सांगता ?
(विषय दिलेला नाही)
In reply to काय सांगता ? by मिसळभोक्ता
छान पण त्रोटक
माफ करा,
In reply to छान पण त्रोटक by सुनील
हेमाडपंथी मंदिरे
In reply to माफ करा, by सनविवि
अरे वा!
In reply to हेमाडपंथी मंदिरे by प्रदीप
गौडगावचा
असं
In reply to गौडगावचा by परिकथेतील राजकुमार
फोटो टाकला