सवाल-जवाब..मी आणि "II राजे II"

नाटक्या's picture
नाटक्या in जनातलं, मनातलं
24 Apr 2009 - 3:02 am

मंडळी,

आपले लाडके मिपाकर "II राजे II" यांनी मला खरडीतुन एक कविता पाठवली.

तुमचा बार आहे काय
जर नसेल बार
तर कसे करता तुम्ही
कॉकटेल तयार?
जळवता आम्हाला फार
कळतात नाटक्या तुमची
थेरं अपरंपार !
व्हिस्की नसेल तर
ज्युस देता करुन तयार
तुमच्या लेखामध्ये
जिव जडला निरंतर यार !

आता एव्हढे आम्हाला हरभर्‍याच्या झाडावर चढवल्यावर (आम्हाला चढल्यावर नव्हे!!) आम्ही कसले मागे हटतो. त्याच चालीवर त्या खरडीला आम्ही देखील एकदम जोशात येवून उत्तर धाडले:

बार आमचा सदा तय्यार
करतो कॉकटेल सदाबहार!
नसता व्हिस्की आणिक मद्याची धार
पडतो नुसते गार!
पडल्या-पडल्या नाटके करतो
आणि म्हणतो आज चढली फार!!!
जर खरोखरच असती वारूणी
झाली असती काय बहार
दोस्त असते तुमच्या सारखे
तर दारूत रोज आंघोळ
केली असती ना यार

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

दशानन's picture

24 Apr 2009 - 3:09 am | दशानन

=))

तुमचा आमचा
एकच साथी
तुम्ही चाखता
नेहमी विदेशी
आम्हाला तर
मीठ-चटणी बरोबर
चालते देशी
तुमचे कॉकटेल
तर कधी मॉकटेल
दिसते लै भारी
तुम्ही पिता
घोट घोट
आम्ही बाटली
एकवारी ;)

* एकवारी = एकसाथ !

थोडेसं नवीन !

सँडी's picture

24 Apr 2009 - 7:00 am | सँडी

तुमचा कॉकटेल बार|
आवडाबै चा लावणी बार||
होउन जाऊ द्या बार बार|
उडवत रहा बार वर बार||

अवांतरः आपला सवाल-जवाब चालु द्यावा.

-सँडी
काय'द्याच बोला?

विसोबा खेचर's picture

24 Apr 2009 - 7:33 am | विसोबा खेचर

सवालजवाब मस्तच! :)

नसता व्हिस्की आणिक मद्याची धार
पडतो नुसते गार!

सहमत.. :)

तात्या.

विनायक प्रभू's picture

24 Apr 2009 - 7:47 am | विनायक प्रभू

कुठले

प्रकाश घाटपांडे's picture

24 Apr 2009 - 7:56 am | प्रकाश घाटपांडे

दोस्त असते तुमच्या सारखे
तर दारूत रोज आंघोळ
केली असती ना यार

नशा शराब मे होती तो नाचती बोतल
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

दशानन's picture

24 Apr 2009 - 7:59 am | दशानन

>>>नशा शराब मे होती तो नाचती बोतल

दोन बाटल्या
दोन दोस्त
टांगा पटली
घोडी फरार
नाचवा बाटली
ही चढते फार

=))

थोडेसं नवीन !

प्रकाश घाटपांडे's picture

24 Apr 2009 - 9:45 am | प्रकाश घाटपांडे
नाचवा बाटली
ही चढते फार

नाच नाच नाच राधे उडवु या रंग
अंगामधे भिजल तुझ गोर गोर अंग
ही पण एक नशाच. जगायला नशा लागते. मिपा पण नशाच . कधी कधी तोल सुटायच्या भयाने नशा चढत नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

दशानन's picture

24 Apr 2009 - 9:48 am | दशानन

+१

१००% सहमत.

थोडेसं नवीन !

सूहास's picture

24 Apr 2009 - 5:10 pm | सूहास (not verified)

"नही छोडे॑गे हम"
"कभी व्हिस्की कभी रम"

सुहास
बस झाला वाद....

सूहास's picture

24 Apr 2009 - 5:10 pm | सूहास (not verified)

"नही छोडे॑गे हम"
"कभी व्हिस्की कभी रम"

सुहास
बस झाला वाद....

पर्नल नेने मराठे's picture

25 Apr 2009 - 4:15 pm | पर्नल नेने मराठे

एव्धे ह्या दारुत अस्ते तरि काय :T
चुचु

अनंता's picture

25 Apr 2009 - 5:02 pm | अनंता

तुम्ही दिवाळीत शोभेचे दारुकाम करत नाही वाट्ट.
ह.घ्या.

हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

निशिगंध's picture

25 Apr 2009 - 5:11 pm | निशिगंध

शहाण्याने कोर्टाची पायरी चढु नये..
तशेच बारची ही चढु नये.....

_______ निशिगंध_________

मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!