Skip to main content

सवाल-जवाब..मी आणि "II राजे II"

लेखक नाटक्या यांनी शुक्रवार, 24/04/2009 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, आपले लाडके मिपाकर "II राजे II" यांनी मला खरडीतुन एक कविता पाठवली. तुमचा बार आहे काय जर नसेल बार तर कसे करता तुम्ही कॉकटेल तयार? जळवता आम्हाला फार कळतात नाटक्या तुमची थेरं अपरंपार ! व्हिस्की नसेल तर ज्युस देता करुन तयार तुमच्या लेखामध्ये जिव जडला निरंतर यार ! आता एव्हढे आम्हाला हरभर्‍याच्या झाडावर चढवल्यावर (आम्हाला चढल्यावर नव्हे!!) आम्ही कसले मागे हटतो. त्याच चालीवर त्या खरडीला आम्ही देखील एकदम जोशात येवून उत्तर धाडले: बार आमचा सदा तय्यार करतो कॉकटेल सदाबहार! नसता व्हिस्की आणिक मद्याची धार पडतो नुसते गार! पडल्या-पडल्या नाटके करतो आणि म्हणतो आज चढली फार!!! जर खरोखरच असती वारूणी झाली असती काय बहार दोस्त असते तुमच्या सारखे तर दारूत रोज आंघोळ केली असती ना यार - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3958
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

=)) तुमचा आमचा एकच साथी तुम्ही चाखता नेहमी विदेशी आम्हाला तर मीठ-चटणी बरोबर चालते देशी तुमचे कॉकटेल तर कधी मॉकटेल दिसते लै भारी तुम्ही पिता घोट घोट आम्ही बाटली एकवारी ;) * एकवारी = एकसाथ ! थोडेसं नवीन !

तुमचा कॉकटेल बार| आवडाबै चा लावणी बार|| होउन जाऊ द्या बार बार| उडवत रहा बार वर बार|| अवांतरः आपला सवाल-जवाब चालु द्यावा. -सँडी काय'द्याच बोला?

सवालजवाब मस्तच! :) नसता व्हिस्की आणिक मद्याची धार पडतो नुसते गार! सहमत.. :) तात्या.

कुठले

दोस्त असते तुमच्या सारखे तर दारूत रोज आंघोळ केली असती ना यार
नशा शराब मे होती तो नाचती बोतल प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

>>>नशा शराब मे होती तो नाचती बोतल दोन बाटल्या दोन दोस्त टांगा पटली घोडी फरार नाचवा बाटली ही चढते फार =)) थोडेसं नवीन !

In reply to by दशानन

नाचवा बाटली ही चढते फार
नाच नाच नाच राधे उडवु या रंग अंगामधे भिजल तुझ गोर गोर अंग ही पण एक नशाच. जगायला नशा लागते. मिपा पण नशाच . कधी कधी तोल सुटायच्या भयाने नशा चढत नाही. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

"नही छोडे॑गे हम" "कभी व्हिस्की कभी रम" सुहास बस झाला वाद....

"नही छोडे॑गे हम" "कभी व्हिस्की कभी रम" सुहास बस झाला वाद....

एव्धे ह्या दारुत अस्ते तरि काय :T चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

तुम्ही दिवाळीत शोभेचे दारुकाम करत नाही वाट्ट. ह.घ्या. हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

In reply to by पर्नल नेने मराठे

शहाण्याने कोर्टाची पायरी चढु नये.. तशेच बारची ही चढु नये..... _______ निशिगंध_________ मी शोधत आहे स्वत:हाला!!!! सापडलो की कळवेन सर्वांना!!!!