बळ दे.....!
दोन हात जोडून माझं एकंच मागणं देवा ,
दु:ख दूर करू नकोस , ते सोसायचं बळ दे !
कोण तसा जीवनांत सुखासीन असतो?
स्व दु:खात आणि पर सुखात हसायचं बळ दे !
जीवनाच्या जुगारांत हार्-जीत असणारच !
एकदा तरी सुंदरशी खेळी फसायचं बळ दे !
दिवसा ढवळ्या भले कितीही पापं लपू देत !
पण अंधारातही स्वत:च्या चुका दिसायचं बळ दे !
कुणीतरी जीव लावलंच ना या वेड्याला?
थकून कधी ते अश्रू ढाळील , तर ते पुसायचं बळ दे !
स्वप्नं ऊरी कवटाळून रमी खेळत रहाणारा मी !
सरते शेवटी "प्लस" व्हावं , इतकं पिसायचं बळ दे !
स्वप्नं पूर्तीनंतर फारसं जगावसं वाटत नाही , पण ;
राहिलोच तसा , तर.....सर्वांत असूनही नसायचं बळ दे !
-----उदय गंगाधर सप्रेम, ठाणे
कवितेची तारीख : २३ फेब्रुवारी २००६.....रात्री ८ वाजतां
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1439
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है..!
फार छान ...
खुपच आवडली
सुरेख!
सुरेख!!
अप्रतिम