पूर्वसंदर्भ -१) रौशनी..१
रौशनी..२
रौशनी..३
रौशनी..४
रौशनी..५
(अपूर्ण..)
२) ए मालिक तेरे बंदे हम! (रौशनी - अवांतर..!)
खूप वर्ष झाली फोरास रोड सोडल्याला! तेथील मी नौकरी करत असलेला झमझम देशी दारू बार, रोजच्या मारामार्या, गुंड, पोलिस, दारुवाले, मटकेवाले, आसपासच्या रांडा अन् त्यांचे भडवे, ती रौशनीची चाळ, ती रौशनी, रौशनीच्याच परिचयातली अजून एक कुणीशी मावशी (आम्ही तिला परवीनदिदी म्हणत असू,) आणि परकर पोलक्यात पाहिलेली आमच्या रौशनीची मुलगी नीलम!
एकदा केव्हातरी फॉकलंड रोडवरील दिल्ली दरबार हॉटेलच्या बाहेर मन्सूर भेटला होता. रांडांकरता बिर्याणी पॅक करून घेऊन चालला होता! मला तिथे पाहताच,
"अरे तात्यासाब आप? कैसे है?"असं ओरडत आनंदाने गळ्यात पडला होता.
"साला भोसडिके मन्सूर तू! कितने सालो बाद मिल रहा है?! चल, बिर्यानी खायेंगे..!" असं म्हणून मी मन्सूरला बिर्याणी खिलवली. रौशनीच्या आठवणी निघाल्या.
"तात्यासाब, नीलम अब परवीनदिदीके कोठेपे नाचती है. अपने बनारसी चालमैइच लगता है परवीनका कोठा!"
"अल्ला की मेहेरबानीसे नीलम अब बडी हो गई है, अच्छी खानेखिलाने लायक हो गई है! गातीभी अच्छा है!" असं म्हणून भडवा छद्मीपणे हसला होता!
"और ठुमकेभी भोत सही लगाती है! साला, यू पैसा उडता है..!" मन्सूर.
अच्छी खानेखिलाने लायक हो गई है! ??
पण दोष मन्सूरचा नव्हता! तो अजून त्याच वस्तीत रांडांच्या पाठीला साबण चोळण्याचं काम करत होता. मी तेथून बाहेर पडलो होतो! पुन्हा माझ्या पांढरपेशा, सुसंस्कृत, सभ्य समाजात!
नीलम!
आमच्या रौशनीची पोर. एका जमान्यात मी त्या पोरीचे खूप लाड केले होते! लहानपणीची "तात्यासाब..." म्हणून गळ्यात पडणारी नीलम मला आठवली. तेव्हा मन्सूरपासून ते रौशनीपर्यंत सर्वजण मला "तात्यासाब" याच नावाने ओळखत असत. त्यामुळे भाबडी लहानगी नीलमही मला 'तात्यासाब'च म्हणे! :)
आज काही कामानिमित्त मुंबई सेन्ट्रलला गेलो होतो आणि अचानक जुन्या आठवणी जाग्या झाल्या! डेअरी मिल्कचं एक चॉकलेट खरेदी केलं आणि सरळ एक टॅक्सी पकडली आणि म्हटलं,
"चलो बनारसी चाल. फोरास रोड!"
बनारसी चाळ जवळच होती. माझं सुसंस्कृत, पांढरपेशा मन पुन्हा एकदा चरकलं! आज कित्येक वर्षांनी पुन्हा त्या कोठ्याच्या पायर्या चढत होतो! बनारसी चाळ हा कोठा आहे, जिथे मुजरा होतो, गाणंबजावणं होतं. तिथे शरीरविक्रय तेव्हाही होत नसे, आजही होत नाही!
पहिल्या मजल्यावरील परवीनदिदीच्या कोठ्यावर गेलो. परवीनही आता हयात नसल्याचं समजलं.
खोलीत शिरलो. दोनचार तरण्याताठ्या नर्तिकांनी माझं स्वागत केलं, या बसा म्हटलं! त्यांना वाटलं कुणी पाहुणा आला आहे मुजरा बघायला!
"नीलम कहा है? यहीपे रेहती है ना?"
असं विचारलं तितक्यात आतल्या खोलीतून नीलमच बाहेर आली! रौशनीची मुलगी! खूप वर्षांनी तिला पाहात होतो. रंगरुपाने रौशनीसारखीच गोरी दिसत होती, सुरेख दिसत होती!
"पेहेचाना??"
क्षणभर विचार करून "तात्यासाब.." असं म्हणत तेव्हा जशी पडायची तशी आताही गळ्यात पडली! मीच क्षणभर हबकलो. तेव्हाची नीलम खूप लहान होती, परकर-पोलक्यातली होती!
खूप आनंद झाला होता पोरीला. मी खिशातनं डेअरी मिल्कचं चॉकलेट काढलं आणि तिला दिलं! पाणी आलं पोरीच्या डोळ्यात!
चहा झाला.
"तात्यासाब क्या सुनोगे?"
"मन्सूर बोल रहा था की तुम बहोत अच्छा गाती हो!"
मी तिला थोडं गायचा आग्रह केला. मलाही तिथे फार वेळ बसायचं नव्हतंच! तसं म्हटलं तर आता तिथे काय संबंध माझा??
"बस मुझे अब जाना है दो-पाच मिनिटमे. कुछभी सुनाओ, लेकीन पुराना..!"
"पुराने गाने तो मै बहोत कम जानती हू. फिरभी आपके लिये एखाददुसरा गा दुंगी! अभी मुजरा शुरू होनेमे वक्त है. बाजिंदे-साजिंदे नही है!"
अस म्हणून 'जीवन डोर तुम्ही संग बांधी..' या लतादिदीच्या एका सुरेख गाण्याची दोन कडवी तिने गुणगुणली! आपल्या उत्सुकतेकरता लतादिदीचं मूळ गाणं इथे ऐकता येईल. छान गायली पोरगी. आईने तिला थोडंफार गाणं शिकवलं होतं!
"बस अब चलुंगा!"
"तात्यासाब दुबारा कब आओगे? आओगे ना? जरूर आना..!"
तिच्या त्या 'आओगे ना?' या प्रश्नाच्या टोनमध्ये मला तिची ममत्वाची भूक जाणवली! अगदी विलक्षण जाणवली! कारण तिच्या ठुमक्यांकडे हावरेपणाने बघणारा मी कुणी तिचा गिर्हाईक नव्हतो! मी तिथे गेलो होतो तो तिच्या आईच्या ओळखीचा कुणीतरी होतो म्हणून..!
असो..
काय साला जमना असतो पाहा! काही वर्षांपूर्वी मी त्याच खोलीत रौशनीकडून 'ए मालिक तेरे बंदे हम..' ऐकलं होतं आणि आज तिच्या पोरीकडून त्याच खोलीत 'जीवन डोर तुम्ही संग बांधी..' ऐकलं!
पुन्हा तिथे जाईन की नाही हे मला माहीत नाही!
-- तात्या अभ्यंकर.

वाचने
45109
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर!!!
+१
In reply to सुंदर!!! by पिवळा डांबिस
+२
In reply to +१ by दशानन
शापीत अप्सराच ह्या ...
In reply to सुंदर!!! by पिवळा डांबिस
तात्या, अरे काय हे!
असेच म्हणतो
In reply to तात्या, अरे काय हे! by चतुरंग
सहमत!!!
In reply to तात्या, अरे काय हे! by चतुरंग
खूप दिवसांनी..
+१
पटले
In reply to +१ by मुक्तसुनीत
+१ +१
In reply to पटले by बेसनलाडू
शब्द खुंटले!
फारच सुंदर
तात्या
जी नीलमचे
In reply to तात्या by सहज
हे काय
In reply to जी नीलमचे by विसोबा खेचर
सहजराव, वेक अप अँड स्मेल द कॉफी
In reply to हे काय by सहज
सहमत-असहमत
In reply to जी नीलमचे by विसोबा खेचर
लाचार सूर्य
In reply to जी नीलमचे by विसोबा खेचर
बर्याच
अप्रतीम !!
वाह वाह.
अभी मुजरा शुरू होनेमे वक्त है.
असेच
उत्तम
आओगे ना?
सुरेख
+१
In reply to सुरेख by यशोधरा
+२
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
सरळ साधे
काय बोलु?
लायन हार्ट
In reply to काय बोलु? by स्मिता श्रीपाद
बहोत आच्छे
अतिशय प्रामाणिक!
सहमत!
In reply to अतिशय प्रामाणिक! by साती
सहमत...
In reply to सहमत! by प्रमोद देव
+१
In reply to सहमत... by बिपिन कार्यकर्ते
अतिशय प्रामाणिक!
तात्या..
एकदा ती
In reply to तात्या.. by नाटक्या
तात्या, माझ
In reply to एकदा ती by विसोबा खेचर
आपल्या
In reply to तात्या, माझ by नाटक्या
तात्या,
In reply to तात्या.. by नाटक्या
सुंदर....
+
++
In reply to + by अवलिया
लेखन आवडलं
अप्रतिम लेख
तात्या,
सुंदर लेखन !!!
उघडे पुस्तक
तात्या
दुबारा?
वरील
ह्रदयस्पर
रौशनी
एक प्रश्न
In reply to रौशनी by विसोबा खेचर
या लोकांचे
या लोकांचे
In reply to या लोकांचे by विजुभाऊ
सुंदर लेख
तात्या,, ,, =d>
गुलजारचा
सौंदर्य
सलाम ! हट्स ऑफ ! ! !
åभाई
पुन्हा
नीलम आणि तुम्हाला मानल
तात्या,
In reply to नीलम आणि तुम्हाला मानल by शशिकांत ओक
आणि
In reply to तात्या, by मृगनयनी
नव्याने