मिपाच्या खरडफळ्यावर अनेकदा अत्यंत छान चर्चा रंगतात. एखाद्या विषयावर सविस्तर माहिती, अनुभव, संदर्भ, किस्से मतमतांतरे आणि कधी कधी मुख्य धाग्यापेक्षाही अधिक उपयुक्त चर्चा खरडीतून पुढे येते. विशेष म्हणजे, अनेक खरडी अगदी सहज, अनौपचारिक वातावरणात लिहिल्या जात असल्यामुळे त्यातला माहितीचा ओघही छान असतो आणि भाषाही बहुतेक वेळा संयत असते.
पण खरडफळ्याची एक अडचण आहे, खरडी कायमस्वरूपी जतन होत नाहीत. काही काळानंतर त्या मागे पडतात आणि नंतर त्या पुसल्या जातात. त्यामुळे एखाद्या चर्चेतून निर्माण झालेली एखादी उत्कृष्ट, माहितीपूर्ण आणि अभिनिवेशरहित खरड पुढे शोधूनही सापडत नाही.
म्हणून खरड फळ्यावरच काल मी एक कल्पना मांडली होती "मिपा खरडफळा" किंवा अशा एखाद्या नावाचा एक स्वतंत्र धागा काढायचा का?
या धाग्यावर खरडफळ्यावर आलेल्या अशा निवडक खरडी किंवा चर्चांचे संकलन करता येईल. अर्थात, त्या त्या खरडींच्या लेखकांच्या सहमतीनेच हे करता येईल. याचा फायदा असा की खरडफळ्याची सुलभता आणि मोकळेपणा कायम राहील, पण त्यातून निर्माण होणारी चांगली माहिती अक्षरशः "क्षणभंगुर" राहणार नाही. एका अर्थाने ती "अक्षय" राहील!
हे मी काल माझ्या नोटपॅडमध्ये लिहुन ठेवलं होतं. आता (तात्पुरता की कायमचा?) खरडफळा उडाला आहे. म्हणून हा धागा काढत आहे.
चला, इथे खरडी लिहूयात. इथे राजकीय हाणामाऱ्या, एकमेकांची उणीदुणी काढणं, लिखाणावर चर्चा करण्यापेक्षा आयडीला टार्गेट करणे असे प्रकार टाळावेत. सकारात्मक प्रकारे लिहावे ही अपेक्षा.
गरज वाटल्यास या धाग्याला इतर कोणते, अधिक चांगले शीर्षक सुचवावे.
- (खफ पंखा) कांदा लिंबू
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरडफळा पूर्ण गायब झालेला आहे…
खरडफळा पूर्ण गायब झालेला आहे.
मिपाच्या सुरवातीच्या काळातल्या जुन्या खरडफळ्यात धम्या - डान्या - विनायक - आनंदयात्री यांच्या लैच भारी चर्चा व्हायच्या.
तो मजकूर आठवला तरी अजून हसू येते
माझे खोबार- बिपीन कार्यकर्ते…
माझे खोबार- बिपीन कार्यकर्ते चे सगळे लेख अचानक वर आले आहे. कोणताही नवीन प्रतिसाद न येताच.
हो. हे आजचे वर आलेले धागे…
In reply to माझे खोबार- बिपीन कार्यकर्ते… by विजुभाऊ
हो. हे आजचे वर आलेले धागे फक्त मलाच दिसतात की काय अशी शंका येत होती.
जुना खरडफळा खाजगी होता.
फक्त लॉगिन केलेल्या सभासदांनाच तो वाचता येत असे.
नवीन drupal 11 मध्ये खरडफळा नाही पण नीलकांत यांनी तो मिपासाठी आणला. Drupal web resources open structure असल्याने कुणीही त्यात काटछाट करू शकतो.
खरडफळा
आला तर आनंद न आला तरी आनंद, कारण सोय तर कांदा लिंबू भौ ह्यांनी लावलेली दिसत आहे ! . होऊ द्या चर्चा इथेच नायतरी काय गोविंद घ्या गोपाळ घ्याच करायचे आहे, तिथे किंवा इथे कोणीही engage व्हायला तयार नाही त्यामुळे आम्ही काय बसून बघणार, वाचणार, प्रसंगी स्वखुशीसाठी दोन चार मते ठोकणार अन् बहिष्काराची मजा घेत राहणार
(इन्व्हिजिबल मॅन) खोंडे
खरडफळा आहे म्हणून मिपाची ताजी घडामोड
श्री. अभ्या.. ह्यांचे लेखन बंप अप होते आहे/ झाले आहे. त्यातील मजकूर गायब होऊन तिथे फक्त "धन्यवाद" असा एकच शब्द लिहिलेला आढळतो आहे.
बहुतेक व्यावसायिक कार्यबाहुल्य आणि जर्मनी मधे नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी त्यांनी मिसळपाव प्रशासनाला विनंती करून आपले लेखन इथून रद्द करण्याचा निर्णय घेतला असावा (श्रीगुरुजी ह्यांच्या लॉजिकनुसार)
मला वाटते, अभ्या.. ह्यांना इथे पण काही प्रमाणात कॅन्सल कल्चरला तोंड द्यावे लागले असावे ज्यामुळे पट्टीचे मिपाकर (आणि एका विशिष्ट राजकीय विचारसरणीचे समर्थक) ह्यांनी अभ्या.. ह्यांचे बरेच परखड विचार वाचून त्यांना इग्नोर करण्याचे योजले असावे (भुक्तभोगी अनुभवी शक्यता फक्त)
खरेखोटे परमेश्वर, मिपा चालक मालक आणि श्रीयुत अभ्या.. जाणोत.
(विश्लेषक) खोंडे
माझ्या आकलनानुसार अभ्या…
In reply to खरडफळा आहे म्हणून मिपाची ताजी घडामोड by वृषभ खोंडे
माझ्या आकलनानुसार अभ्या यांचे लॉजिक गंडलेले होते... कशाचाही संबंध कशाशीही लावत होते.. कदाचित जर्मन भाषा शिकण्याचे दडपण आणि डिप्रेशन !
@राजो
In reply to माझ्या आकलनानुसार अभ्या… by राज जोशी
ज्याचे त्याचे आकलन, बाकी लेखकू मंडळी आणि कलाकार लोक ह्यांचे काय खरे असते ! आले त्याच्या मना तिथे कोणाचेच चालेना.
मागे मी सोन्याबापू एपिसोड वर पण बोललो होतो, त्यांच्याशी जास्त इंटरेक्शन नव्हते, पण माझ्या बोलीत लिहायचे म्हणून वाचन नक्कीच करत असे. सेम अभ्या.. ह्यांच्याबद्दल आहे, बोली वेगळी होती, थोडीशी पश्चिम महाराष्ट्रीय धाटणीची पण उत्तम लिहायचे अनुभव समृद्ध होते, त्यामुळे वाचत असे. अभ्या.., सोन्याबापू, आदूबाळ, हे आणि त्यांच्यासारखे कैक लेखकु लोक मिसळपाव वर लिहायचे त्यामुळे वाचनात मजा होती.
(मिपा लायब्ररी आजीवन सभासद) खोंडू
ही आजची गोष्ट नाही
In reply to माझ्या आकलनानुसार अभ्या… by राज जोशी
माझ्या आकलनानुसार अभ्या यांचे लॉजिक गंडलेले होते...
ही आजची गोष्ट नाही तर अनेक वर्षांपासून तसेच चालू होते. त्या माणसाबरोबर एक वाईट अनुभव मला आहे त्यामुळे अभ्या.. हे नाव दिसले तरी खाली काय गरळ ओकली आहे ते वाचायचोच नाही. असा मनुष्य मिपा सोडून गेला असेल तर त्याचे अजिबात वैषम्य मला नाही.
अभ्या.. आइडी उडाला?
In reply to खरडफळा आहे म्हणून मिपाची ताजी घडामोड by वृषभ खोंडे
मला ते पान दिसत नाही.
मिपा गलेमा २०२६
गणेशोत्सव येऊ घातला आहे, अजून महिना सुद्धा राहिला नाही. मिसळपाव गणेश लेखनमाला २०२६ यंदा होणार आहे का?
मागच्या वर्षी झाली नव्हती; यावर्षी व्हावी अशी अपेक्षा आहे.
- (गलेमाप्रेमी) कांदा लिंबू
ज्या हिशेबाने
In reply to मिपा गलेमा २०२६ by कांदा लिंबू
जुनी लेखक मंडळी मिसळपावला "आम्ही जातो आमच्या गावा" पद्धतीने टाटा करत सुटली असताना असे काही उपक्रम केल्यास नक्की फायदा होईल.
ह्या निमित्ताने मी मिसळपाव प्रशासनाला सहकार्य करण्याच्या हेतूने जर गणेशोत्सव विशेषांक काढला तर त्यात सहभागी होऊन माझ्या मिसळपावीय ललित लेखनाचा पण श्रीगणेशा करेन अशी ग्वाही देतो.
विषय जो तुम चुनो लेखणी जो हम घिसे,
आपके विशेषांक का इंतजार रहेगा ठुकराल साहब,
इस गरीब का वादा रहा.
मिपा गलेमा २०२६
श्रीगुरुजींनी पोह्याची रेसिपि वाचली. माझ्या काही आवडत्या मिपाखरांनी तिथे आपले प्रतिसादरूपी पंख पसरलेले आहेत. त्यातली काही पाखरे आता उडून गेली आहेत. काही घरट्यात जाऊन बसली आहेत. अनेक नवी पिल्ले आता मोठी झाली आहेत आणि मिपा-आकाशात विहंग उड्डाण करू लागली आहेत. मीही मिपाच्याच घरट्यात कवच फोडून बाहेर आलो. इतरांनी आणलेला चारा खात खात वाढत गेलो, आधी मूक असायचो नंतर बारीक चिवचिव करू लागलो. आधी धडपडलो नंतर छोट्यामोठ्या भराऱ्या घेऊ लागलो... अजून सावरलो की नाही माहित नाही!
अर्थात माझे हे प्रकट चिंतन काही "गेले ते दिन गेले, मधुभावाचे वेड जयांनी जिवा लाविले" अश्या सुराचे नाही. पण मिपावरचे खेळीमेळीचे वातावरण अधिकच बहरावे असे वाटते. मिपा गलेमा २०२६ आकारात यावी, मिपाखरांनी आपापल्या भराऱ्यांच्या कहाण्या सांगाव्यात, चिमण्या पाखरांना, घारींना, गरुडांना सर्वांनाच नवनवीन पाककृती, विनोदी लेखन, प्रवासवर्णने, विज्ञानकथा, कविता, माहितीपूर्ण गद्य लिहायला-वाचायला मिळावे असे वाटते.
संबंधितांना विनंती - "मिपा गलेमा २०२६" चे मनावर घेऊन सुरुवात करावी. काही तांत्रिक, संपादकीय, संयोजकीय वगैरे सहाय्य हवे असल्यास मी स्वयंसेवक म्हणून तयार आहे; इतरही अनेक मिपाखरे तयार होतील अशी खात्री आहे.
- (मिपा गलेमाप्रेमी) कांदा लिंबू