Skip to main content

मिपा खरडफळा

लेखक कांदा लिंबू यांनी मंगळवार, 18/08/2026 10:23 या दिवशी प्रकाशित केले.

मिपाच्या खरडफळ्यावर अनेकदा अत्यंत छान चर्चा रंगतात. एखाद्या विषयावर सविस्तर माहिती, अनुभव, संदर्भ, किस्से मतमतांतरे आणि कधी कधी मुख्य धाग्यापेक्षाही अधिक उपयुक्त चर्चा खरडीतून पुढे येते. विशेष म्हणजे, अनेक खरडी अगदी सहज, अनौपचारिक वातावरणात लिहिल्या जात असल्यामुळे त्यातला माहितीचा ओघही छान असतो आणि भाषाही बहुतेक वेळा संयत असते.

पण खरडफळ्याची एक अडचण आहे, खरडी कायमस्वरूपी जतन होत नाहीत. काही काळानंतर त्या मागे पडतात आणि नंतर त्या पुसल्या जातात. त्यामुळे एखाद्या चर्चेतून निर्माण झालेली एखादी उत्कृष्ट, माहितीपूर्ण आणि अभिनिवेशरहित खरड पुढे शोधूनही सापडत नाही.

म्हणून खरड फळ्यावरच काल मी एक कल्पना मांडली होती "मिपा खरडफळा" किंवा अशा एखाद्या नावाचा एक स्वतंत्र धागा काढायचा का?

या धाग्यावर खरडफळ्यावर आलेल्या अशा निवडक खरडी किंवा चर्चांचे संकलन करता येईल.‌ अर्थात, त्या त्या खरडींच्या लेखकांच्या सहमतीनेच हे करता येईल. याचा फायदा असा की खरडफळ्याची सुलभता आणि मोकळेपणा कायम राहील, पण त्यातून निर्माण होणारी चांगली माहिती अक्षरशः "क्षणभंगुर" राहणार नाही. एका अर्थाने ती "अक्षय" राहील!


हे मी काल माझ्या नोटपॅडमध्ये लिहुन ठेवलं होतं. आता (तात्पुरता की कायमचा?) खरडफळा उडाला आहे. म्हणून हा धागा काढत आहे. 

चला, इथे खरडी लिहूयात. इथे राजकीय हाणामाऱ्या, एकमेकांची उणीदुणी काढणं, लिखाणावर चर्चा करण्यापेक्षा आयडीला टार्गेट करणे असे प्रकार टाळावेत. सकारात्मक प्रकारे लिहावे ही अपेक्षा.‌ 

 

गरज वाटल्यास या धाग्याला इतर कोणते, अधिक चांगले शीर्षक सुचवावे. 

 

- (खफ पंखा) कांदा लिंबू


वाचने 1185
प्रतिक्रिया 73

प्रतिक्रिया

खरडफळा पूर्ण गायब झालेला आहे.

मिपाच्या सुरवातीच्या काळातल्या जुन्या खरडफळ्यात  धम्या - डान्या - विनायक - आनंदयात्री यांच्या लैच भारी चर्चा व्हायच्या.

तो मजकूर आठवला तरी अजून हसू येते


माझे खोबार- बिपीन कार्यकर्ते चे सगळे  लेख अचानक वर आले आहे. कोणताही नवीन प्रतिसाद न येताच.


In reply to by विजुभाऊ

हो. हे आजचे वर आलेले धागे फक्त मलाच दिसतात की काय अशी शंका येत होती. 


फक्त लॉगिन केलेल्या सभासदांनाच तो वाचता येत असे.

नवीन drupal 11 मध्ये खरडफळा नाही पण नीलकांत यांनी तो मिपासाठी आणला. Drupal web resources open structure असल्याने कुणीही त्यात काटछाट करू शकतो.


आला तर आनंद न आला तरी आनंद, कारण सोय तर कांदा लिंबू भौ ह्यांनी लावलेली दिसत आहे ! . होऊ द्या चर्चा इथेच नायतरी काय गोविंद घ्या गोपाळ घ्याच करायचे आहे, तिथे किंवा इथे कोणीही engage व्हायला तयार नाही त्यामुळे आम्ही काय बसून बघणार, वाचणार, प्रसंगी स्वखुशीसाठी दोन चार मते ठोकणार अन् बहिष्काराची मजा घेत राहणार 

 

(इन्व्हिजिबल मॅन) खोंडे


श्री. अभ्या.. ह्यांचे लेखन बंप अप होते आहे/ झाले आहे. त्यातील मजकूर गायब होऊन तिथे फक्त "धन्यवाद" असा एकच शब्द लिहिलेला आढळतो आहे. 

 

बहुतेक व्यावसायिक कार्यबाहुल्य आणि जर्मनी मधे नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी त्यांनी मिसळपाव प्रशासनाला विनंती करून आपले लेखन इथून रद्द करण्याचा निर्णय घेतला असावा (श्रीगुरुजी ह्यांच्या लॉजिकनुसार) 

 

मला वाटते, अभ्या.. ह्यांना इथे पण काही प्रमाणात कॅन्सल कल्चरला तोंड द्यावे लागले असावे ज्यामुळे पट्टीचे मिपाकर (आणि एका विशिष्ट राजकीय विचारसरणीचे समर्थक) ह्यांनी अभ्या.. ह्यांचे बरेच परखड विचार वाचून त्यांना इग्नोर करण्याचे योजले असावे (भुक्तभोगी अनुभवी शक्यता फक्त) 

 

खरेखोटे परमेश्वर, मिपा चालक मालक आणि श्रीयुत अभ्या.. जाणोत.

 

(विश्लेषक) खोंडे


In reply to by वृषभ खोंडे

माझ्या आकलनानुसार अभ्या यांचे लॉजिक गंडलेले होते... कशाचाही संबंध कशाशीही लावत होते.. कदाचित जर्मन भाषा शिकण्याचे दडपण आणि डिप्रेशन ! 


In reply to by राज जोशी

ज्याचे त्याचे आकलन, बाकी लेखकू मंडळी आणि कलाकार लोक ह्यांचे काय खरे असते ! आले त्याच्या मना तिथे कोणाचेच चालेना.

 

मागे मी सोन्याबापू एपिसोड वर पण बोललो होतो, त्यांच्याशी जास्त इंटरेक्शन नव्हते, पण माझ्या बोलीत लिहायचे म्हणून वाचन नक्कीच करत असे. सेम अभ्या.. ह्यांच्याबद्दल आहे, बोली वेगळी होती, थोडीशी पश्चिम महाराष्ट्रीय धाटणीची पण उत्तम लिहायचे अनुभव समृद्ध होते, त्यामुळे वाचत असे. अभ्या.., सोन्याबापू, आदूबाळ, हे आणि त्यांच्यासारखे कैक लेखकु लोक मिसळपाव वर लिहायचे त्यामुळे वाचनात मजा होती

 

(मिपा लायब्ररी आजीवन सभासद) खोंडू 


In reply to by राज जोशी

माझ्या आकलनानुसार अभ्या यांचे लॉजिक गंडलेले होते... 

ही आजची गोष्ट नाही तर अनेक वर्षांपासून तसेच चालू होते. त्या माणसाबरोबर एक वाईट अनुभव मला आहे त्यामुळे अभ्या.. हे नाव दिसले तरी खाली काय गरळ ओकली आहे ते वाचायचोच नाही. असा मनुष्य मिपा सोडून गेला असेल तर त्याचे अजिबात वैषम्य मला नाही. 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

मला स्मरलं ते. तुमच्या बरोबरीने माझीही टिंगल टवाळी केली होती. येथील धुणी एका दुसऱ्या संकेतस्थळाच्या घाटावर जाऊन धुतली होती. हे सद्गृहस्थ व बापट म्हणून अजून कोणीतरी होते ज्यांनी माझा उल्लेख श्रीगु असा केला होता. त्यावर या सद्गृहस्थांनी माझी संभावना जगदीप, असरानी, केश्तो मुखर्जी अशी केली होती. एकाअर्थी तो माझा सन्मान होता असे म्हणावे लागेल कारण हे नट आपल्या मर्यादा ओळखून मर्यादेत राहून 

प्रामाणिकपणे मिळेल ते काम करून मनोरंजन करीत होते. यातील कोणीही आपली मर्यादा सोडून नायकाची भूमिका किंवा स्वकेंद्रित मोठी भूमिका अशी झेप घेण्याचा प्रयत्न केला नाही.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

अभ्या नामक आयडीचे गायब होणे, सोन्याबापू यांचे सगळे लिखाण अचानक गायब होणे , त्यांच्या सारखेच लिखाण करणारा एक आयडी अचानक नव्याने उपटणे, जुने लिखाण वर काढले जाणे किंवा स्वतःचे लिखाण डिलीट करून फक्त डॉट टाकून ठेवणे ह्या सगळ्या गोष्टी योगायोग आहेत असे मानणे चुकीचे आहे. 
असो.
बीएसएफ मधल्या अनुभवांवर आधारित अकादमी ही लेखमाला सोन्याबापू यांनी लिहिली होती. फारच जिवंत लिखाण होते ते. निदान ती डिलीट व्हायला नको होती.


गणेशोत्सव येऊ घातला आहे, अजून महिना सुद्धा राहिला नाही. मिसळपाव गणेश लेखनमाला २०२६ यंदा होणार आहे का? 

मागच्या वर्षी झाली नव्हती; यावर्षी व्हावी अशी अपेक्षा आहे. 

 

- (गलेमाप्रेमी) कांदा लिंबू 


In reply to by कांदा लिंबू

जुनी लेखक मंडळी मिसळपावला "आम्ही जातो आमच्या गावा" पद्धतीने टाटा करत सुटली असताना असे काही उपक्रम केल्यास नक्की फायदा होईल. 

 

ह्या निमित्ताने मी मिसळपाव प्रशासनाला सहकार्य करण्याच्या हेतूने जर गणेशोत्सव विशेषांक काढला तर त्यात सहभागी होऊन माझ्या मिसळपावीय ललित लेखनाचा पण श्रीगणेशा करेन अशी ग्वाही देतो. 

 

विषय जो तुम चुनो लेखणी जो हम घिसे

 

आपके विशेषांक का इंतजार रहेगा ठुकराल साहब,

 

 इस गरीब का वादा रहा.


श्रीगुरुजींनी पोह्याची रेसिपि वाचली. माझ्या काही आवडत्या मिपाखरांनी तिथे आपले प्रतिसादरूपी पंख पसरलेले आहेत. त्यातली काही पाखरे आता उडून गेली आहेत. काही घरट्यात जाऊन बसली आहेत. अनेक नवी पिल्ले आता मोठी झाली आहेत आणि मिपा-आकाशात विहंग उड्डाण करू लागली आहेत. मीही मिपाच्याच घरट्यात कवच फोडून बाहेर आलो. इतरांनी आणलेला चारा खात खात वाढत गेलो, आधी मूक असायचो नंतर बारीक चिवचिव करू लागलो. आधी धडपडलो नंतर छोट्यामोठ्या भराऱ्या घेऊ लागलो... अजून सावरलो की नाही माहित नाही!

अर्थात माझे हे प्रकट चिंतन काही "गेले ते दिन गेले, मधुभावाचे वेड जयांनी जिवा लाविले" अश्या सुराचे नाही. पण मिपावरचे खेळीमेळीचे वातावरण अधिकच बहरावे असे वाटते. मिपा गलेमा २०२६ आकारात यावी, मिपाखरांनी आपापल्या भराऱ्यांच्या कहाण्या सांगाव्यात, चिमण्या पाखरांना, घारींना, गरुडांना सर्वांनाच नवनवीन पाककृती, विनोदी लेखन, प्रवासवर्णने, विज्ञानकथा, कविता, माहितीपूर्ण गद्य लिहायला-वाचायला मिळावे असे वाटते.

संबंधितांना विनंती - "मिपा गलेमा २०२६" चे मनावर घेऊन सुरुवात करावी. काही तांत्रिक, संपादकीय, संयोजकीय वगैरे सहाय्य हवे असल्यास मी स्वयंसेवक म्हणून तयार आहे; इतरही अनेक मिपाखरे तयार होतील अशी खात्री आहे.

- (मिपा गलेमाप्रेमी) कांदा लिंबू 
 


In reply to by कांदा लिंबू

पण मिपावरचे खेळीमेळीचे वातावरण अधिकच बहरावे असे वाटते. 

 

अतिशय स्तुत्य विचार आहे तुमचा, आणि मी सहमत आहे कचकून, तितकी गुरुजी अन् चंद्रसूर्यकुमार ह्यांची समजूत काढा. ते लिस्ट काढत बसले आहेत अमक्याशी बोलणार, तमक्याशी बोलणार नाही

विषय त्याज्य करणे, व्यक्ती त्याज्य करणे ह्याने मिपा खेळीमेळीत ठेवणे कसे जमेल सांगा बरं आपणच !.

 

- (जगमित्र नाम्या) खोंडे


In reply to by वृषभ खोंडे

विषय त्याज्य करणे, व्यक्ती त्याज्य करणे ह्याने मिपा खेळीमेळीत ठेवणे कसे जमेल सांगा बरं आपणच !.

व्यक्तीविषयी आधीच लिहून झाले आहे त्यामुळे परत लिहित नाही. 

माझ्यासाठी बरेच विषय त्याज्य का? सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो की मी एक अत्यंत रूक्ष आणि अरसिक मनुष्य आहे. माझ्या आवडीचे काही ठराविक विषय आहेत त्यातच माझा वावर असतो. कविता, ललित लेखन वगैरे माझे प्रांत नाहीत त्यामुळे त्यातील घंटा काही समजत नाही. इतक्या वर्षात मिपाचे किमान १२-१४ दिवाळी अंक आले असतील. त्यातील फार तर दोनेक लेख वाचले असतील. एक लेख होता (कोणी लिहिला होता हे आता लक्षात नाही) बाहरेनविषयी. माझी बहिण बाहरेनमध्ये काही वर्षे वास्तव्याला होती तेव्हा मी तिथे गेलो होतो. त्यामुळे बाहरेन हे नाव शीर्षकात दिसल्यावर तो लेख वाचला होता आणि प्रतिसादही दिला होता. दुसरा लेख होता २०२१ मध्ये ज्ञानोबाचे पैजार यांनी लिहिलेला. आदल्या वर्षी दिवाळीपासून त्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत मिपावर किती लेख आले, किती प्रतिसाद आले वगैरे आकडेवारीचे विश्लेषण होते. आकडेवारीत रस असल्यामुळे तो लेख वाचला होता. दिवाळी अंकात इतर कोणता लेख वाचल्याचे लक्षातही नाही. २०१६ मध्ये स्रुजा आणि पिलिअन रायडर यांनी संपादित केलेली एक लेखमाला होती. २०-२५ लेख त्यात होते. त्यातील लेखही माझा प्रांत नाही म्हणून वाचले नव्हते. माझे प्रांत राजकारण, अर्थकारण, इतिहास आणि साधारण २००० सालपर्यंत क्रिकेट फॉलो करायचो म्हणून तोपर्यंतचे क्रिकेट. त्यापलीकडे इतर कोणत्याही विषयाच्या चुकूनही वाट्याला जात नाही. समजा फिनीश भाषेतील असामान्य साहित्यिक असा कोणी लेख लिहिला तर त्यावर मी काय कप्पाळ प्रतिक्रिया देणार? बोंबलायला फिनीश भाषा येते कोणाला? आणि दोन-चार सोडले तर मराठीतीलही असमान्य साहित्यिक माहिती नसतील तर फिनीश भाषेतील साहित्यिकांविषयी काय लिहिणार? त्याचप्रकारे मला माझे विषय सोडून इतर सगळे विषय वाटतात. जर ललित लेखन, साहित्य, कविता वगैरे मधील घंटा काहीही माहित नाही, काहीही समजत नाही तर मग अशा विषयांवरील धाग्यांवर प्रतिक्रिया दिलीच पाहिजे हा अट्टाहास का?

 

अर्थात श्रीगणेश लेखमाला यावीच. ज्यांना लिहायची इच्छा आहे आणि ज्यांना चांगले लिहिता येते ते त्यात लिहितील तसेच ज्यांना असे लेखन वाचायला आवडते, ते समजते ते त्यावर प्रतिक्रिया देतील. त्यातून मिपावरील खेळीमेळीचे वातावरण वाढत असेल तर जरूर तसे व्हावे. पण माझा त्यात काहीही हातभार नसेल कारण तो माझा प्रांत नाही.
 


In reply to by वृषभ खोंडे

- (जगमित्र नाम्या) खोंडे 

तुमच्या सदस्यनामात अनुस्वार आहे, माझ्याही सदस्यानामात अनुस्वार आहे, त्यानुसार आपण अनुस्वार बंधू आहोत असे म्हणायला हरकत नाही! 

 

अस्माकं बदरीचक्रं युष्माकं बदरीतरुः । 

बादरायणसम्बन्धो यूयं यूयं वयं वयम् ॥

 

बाकी, मिपाघरट्यातली मिपाखरे म्हणजे थोडीफार चिवचिव, कावकाव चालायचीच, मिपा गलेमा २०२६ आकारात येऊ द्या तिथे आपण सगळी मिपाखरे भराऱ्या घेऊयात! 

 

- (मिपा गलेमाप्रेमी) कांदा लिंबू  


In reply to by वृषभ खोंडे

विषय त्याज्य करणे माझ्यासाठी राजकारण विषयावर द्वेषमूलक प्रतिक्रिया देणे मी त्याज्य ठेवले आहे. सर्वपक्षीय राजकारणी आतून सगळे एक असतात यावर माझी दृढ श्रद्धा आहे. 😑


अभ्या यांनी जायला नको होते.मिपासाठी त्यांनी खुप काही केले हे ऐकुन,जाणुन होते.पण जेव्हा एखाद्याला गोष्टी कटकट,अपमान म्हणुन वाट्तिल तेव्हा तो तेथुन जाणारच.असो,चांगला मिपाकर गेला.

आपला अबा च ग्रेट मिपाकर आहे हे दिसत आहे.उड्वला तरी परत येतो त्याच नावाने 😆😃

बाहुबली ...जस्ट जोकिंग ह 😂


In reply to by Bhakti

@बाहुबली, तुम्ही मिथुन रास आहात का हो? अर्थात उत्तर द्यायला तुम्ही बांधील नाही. 🙂


In reply to by चंद्रसूर्यकुमार

तुम्ही कुंभ आणि श्रीगुरुजी धनु असावेत असं वाटलं होतं. 😇


In reply to by श्वेता व्यास

माझी मकर  आहे. 

म्हातारपण कसे जाणार...

सर्वांची रास विचारताय, वाटले ,लगे हाथ, आपले पण भविष्य विचारून घेऊ.

हल्केच घ्या.


In reply to by श्वेता व्यास

माझी मकर  आहे. 

म्हातारपण कसे जाणार...

सर्वांची रास विचारताय, वाटले ,लगे हाथ, आपले पण भविष्य विचारून घेऊ.

हल्केच घ्या.


In reply to by कर्नलतपस्वी

सध्या तरी राशी ओळखण्याचाच छंद जडलाय, तुमचे म्हातारपण छान मजेतच जाईल हो कर्नलसाहेब, स्वतःला छान बिझी ठेवता, ते सांगण्यासाठी राशीची काय गरज 😄 बाकी ते जी वगैरे नका म्हणू तेवढं 😀


In reply to by श्वेता व्यास

मिपावर  हा एक लोचा आहे, आयडी  लहान आहे की मोठा हे कळत नसल्याने योगिराज चांगदेव यांची माऊलींनी पत्राचा मायना लिहीताना जी अवस्था झाली होती तसेच काहीसे वाटते. 

 

Linda Goodman's Sun Signs (1968) वाचले नसल्यास वाचा. चांगले आहे.


In reply to by कर्नलतपस्वी

 

लिंडा गुडमनचे पुस्तक सूर्य राशीनुसार (सायन) म्हणजे जन्मदिनांकानुसार आहे. भारतीय ज्योतिषशास्त्र निरयन म्हणजे चंद्र राशीनुसार आहे. 


In reply to by श्रीगुरुजी

लिन्डा गुडमनची 'लव्ह साईन्स' तसेच 'सन साईन्स' ही दोन्ही पुस्तके वाचली आहेत. दोन्ही पुस्तकांत भविष्य वर्तवलेले नसून इंग्रजी तारखेनुसार जन्मलेल्या व्यक्तींची स्वभाव वैषीष्टये सांगीतली आहेत.


In reply to by सौन्दर्य

तुमच्या दोघांच्या मताशी सहमत आहे.

 

मी वाचले आहे आणी बर्‍याच गोष्टींव बारी निरीक्ष  नोंदवले आहे. वाचताना मजा येते.    


In reply to by कर्नलतपस्वी

मकरांना वेळ कसा घालवायचा ही समस्याच नसते. ते दीर्घोद्योगी असतात व सतत बागकाम, किरकोळ सुतारकाम, घरातील रद्दी आवरणे अश्या कामात स्वतःस व्यग्र ठेवतात. 


In reply to by श्रीगुरुजी

मी पण मकरच असल्याने इथे घुसखोरी करत आहे. 

मकरांना वेळ कसा घालवायचा ही समस्याच नसते.

हे बरोबर वाटले.

मात्र... मी बागकाम, सुतारकाम करत आहे किंवा घरातील रद्दी आवरत आहे हे चित्रच डोळ्यासमोर उभे राहत नाही 😀


In reply to by श्वेता व्यास

म्हणजे अंदाज फार चुकला नाही असे म्हणायचे का? मकर आणि कुंभ- दोन्ही शनीच्याच राशी आहेत ना?


In reply to by चंद्रसूर्यकुमार

होय दोन्ही शनीच्याच राशी, दोन्ही राशी कष्टाळू आणि बुद्धिमान आहेत. पण त्यातही मकर जास्त कष्टाळू आणि कुंभ जास्त बुद्धिमान असा थोडा फरक मानतात. श्रीगुरुजी लग्नराशी धनु म्हणजे तिकडेही थोडा अंदाज आलाय बरोबर 😎


In reply to by कंजूस

होय, आवड आहे, पण सध्या विरंगुळा म्हणून. अभ्यास नाही. घरी पणजोबा पत्रिका तयार करून देऊन भविष्यही सांगायचे, पण त्या काळी फार कमी लोकांना आपली अचूक जन्मवेळ माहिती असायची. आजोबांकडे लोक हरवलेली वस्तू विचारण्यासाठी यायचे, ते हरवलेल्या वेळेप्रमाणे पंचांग बघून कुठे शोधायला हवं ते सांगायचे, बऱ्याच लोकांना फायदा व्हायचा. आईला आवड आहे. असं घरामध्ये ऐकून जितकं माहिती झालंय त्याला अभ्यास म्हणता येणार नाही.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

मकर व कुंभ या दोन्हींचा राशीस्वामी शनी असला तरी दोन्ही खूप वेगळ्या आहेत.‌ साम्य कमी आहे.


In reply to by श्रीगुरुजी

गेली कित्येक वर्षे मला एक संभ्रम आहे कि माझी राशी कोणती?

जन्म जुलै चा आहे त्याप्रमाणे कर्क रस येते आणि पत्रिकेत वृश्चिक रास आहे. मग नक्की रास कोणती?

हे एकदा नक्की झाले कि त्या राशीप्रमाणे कसे वागायचे हे ठरवता येईल.

उगाच थोरामोठ्यांना  खोट्यात पाडायला नको     


In reply to by श्रीगुरुजी

मला सुद्धा चंसुकु कुंभ वाटतात. 


कुंभ कसला? कुंभकर्ण आहे लंकेचा नुसता.

 

 

 


मिपाच्या नविन द्रुपल व्हर्जन मधे युट्युब व्हिडीयो एम्बेड करता येत नाही का? कोणी युट्युब व्हिडिओ एम्बेड केला आहे का नुकताच? 

- (याचक) सोकाजी 


In reply to by सोत्रि

प्रतिसाद लिहिण्याच्या खिडकीवर सर्वात उजव्या बाजूला source बटन दाबा आणि तिथे iframe कोड पेस्ट करा.

 

 

 


In reply to by कांदा लिंबू

धन्यवाद! जमलं.

 

iframe कोड पेस्ट केला होता पण एडीटरमघे जावास्क्रिप्ट एरर दाखवत होता.  नंतर लक्षात आलं की  प्रिव्हु मोडमधे व्हिडीयो दिसतोय बरोबर!

 

- (आभारी) सोकाजी


खरडफळा परत सुरू करा या मागणीसाठी मिपाच्या मुख्यालयावर आज मोर्चा आला होता असे कळले आहे.

मोर्चा

In reply to by गवि

जेन झी नसावेत. अर्थात हल्ली ४१ वर्षांचे लडाखला जाणारे पर्यटकही स्वत:ला जेन-झी म्हणवत असतील तर कोणीही तसे म्हणू शकेल ही तांत्रिकता वेगळी.

त्यातील एक तर मिशी नसेल तर काहीसा माझ्यासारखाच दिसेल. 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

व्वा, आला का फोटू मिपावर! पण माझा शर्ट लाल रंगाचा का दिसतोय? आजच्या मोर्चात मी तर पांढरा शर्ट घातला होता! 😉
 


In reply to by कांदा लिंबू

काय सांगताय. अहो, मी तर अल्ट्रा व्हायोलेट रंगाचा सदरा परिधान करून मोर्चास आलेलो. म्हंटलं की अल्ट्रा व्हायोलेट अदृश्य रंग असल्याने सदरा न दिसता थेट मीच दिसेन. अशा रीतीने मला जनरेशन ट्रिपल एक्स चा प्रतिनिधी बनून नंगानाच घालता येईल. पण हाय रे कर्मा, सदऱ्यासकट मीच नाहीसा झालो अन अवघं जग एका क्रांतिकारी निदर्शनास मुकलं.

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

तुम्ही तुमचा जनरेशनल नंगा नाच कोटा हिप्पी आंदोलनात पोलका डॉट्स छापलेली बेलबॉटम पॅन्ट, ती धरायला चार बोटे जाड चामडी बेल्ट व अंगात जवळपास सगळी बटणे उघडी सोडून परिधान केलेला गर्द गडद गुलाबी/लाल/पिवळा सदरा घालून पूर्ण केलेला आहे अशी अविश्वनीय सूत्रे सांगतात. - 

 

(तहलका) खोंडे.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

डाव्या आणि उजव्या बाजूच्या पुढच्या दोघी भक्तीताई आणि मी आहोत 😃मोर्च्याला फुल सपोर्ट 👍️


In reply to by श्रीगुरुजी

अरे बापरे! नशीब, आमचं लग्न २०१४ च्या आधी उरकलं!

- (आम्ही दाम्पत्य) सौ लसूण पाकळी व श्री कांदा लिंबू 
 


नीलकांत ऑनलाईन दिसत असल्याने खरडफळ्याविषयी काहीतरी घोषणा होईल अशी अपेक्षा आहे.