पाभे की बात©® नं ७
मितरों,
गेल्या काही दिवसांत एक फसलेली पत्रकार परिषद बघितलीत का? माइक चालत नव्हता, टेलीप्रॉम्टरवर अक्षरे दिसत नव्हती, प्रश्न विचारणारा पत्रकार हरवला, आणि उत्तर देणार्या आय ए एस साहेबाचा घसा बसला अन “आमच्या देशाने पूर्वी...” म्हणताच टेबलावरची फाइल पडली. एकदम फोटोजेनीक अगदी आपल्या ठरवून काढलेल्या फोटोंसारखे!
मग काय, आता सरकारने नवीन नियम काढला आहे – फसलेल्या पत्रकार परिषदेला “क्रिएटिव्ह प्रेस ब्रीफ” म्हणायचं. ज्यांना काही समजलं नाही त्यांना “डीप स्टेट” समजावं. आणि जे काही चुकीचं बोलले गेलं त्याला “कॉन्टेक्स्ट” म्हणायचं.
मिटरों,
गलगोटीया युनिव्हर्सिटीने या अशा प्रकारच्या पत्रकार परिषद घेण्यावर एक अभ्यासक्रम सुरू केला आहे. प्राध्यापिका आहेत - ओरीऑन रोबोटच्या नेहा सिंघ. आपण सर्वांनी या कोर्सचा फायदा घेतला पाहीजे.
मिटरों,
मागच्या काही पाभे की बातेंवर काही मंडळींच्या हुरूप वाढवणार्या प्रतिक्रिया आल्या आहेत. मिपा नावाच्या गावातील एक सदस्य सुक्या यांनी "पाभे की बातें" चे हजारो एपीसोड करण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. त्यांना "मेलोडी" चॉकलेटचे एक पाकीट पाठवले जाईल.
तेथीलच दुसरे सदस्य विजुभाऊ यांचे या बातें ऐकाव्यात की नको याबाबत बहूदा दुमत होते आहे. त्यांनी पायओढू सदस्यांचे न ऐकता त्यांच्या मन की बातेंचे एकले पाहीजे.
खरे तर पाभे की बातें तली मते बहूतेक सदस्यांना मान्य असतात किंवा ते त्यावर मार्मीक हसत असतात. पण येथे प्रतिक्रिया देतांना त्यांना त्यांचा इगो आडवा येतो. मी मोठा आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, प्राध्यापक आहे, वेब डिजायनर आहे, प्रोग्रामर आहे, प्राध्यापक डॉक्टर आहे, प्रोग्रामर आहे, डेव्हलेपर आहे, कवी आहे, लेखक आहे, तर मग मला ही बाते मान्य असूनही मी तेथे प्रतिक्रिया का द्यावी? हा कोण मोठा तत्वज्ञ वाया चाललाय? असे त्यांना वाटत असते. पण मितरों, आपण कमीतकमी १० हजार करोड एपीसोड पूर्ण करणार किंवा १ रुपयाला १ डॉलर किंमत मिळेपर्यंत आपण पाभे की बाते लिहीत राहणार. श्वान भुंकत असूनही रस्त्याने हत्ती चालतच असतो. त्याच न्यायाने कोणी कितीही आरडाओरड केली तरी आपण बातें करतच राहणार.
देशासाठी काहीतरी करायचे म्हटले तर केवळ मनीपुरकडेच लक्ष देणे (मणीपुर नव्हे) महत्वाचे नसते.
असो.
तर पुन्हा पत्रकार परिषद या विषयावर येतो. वरील नव्या तंत्राने आता प्रत्येक परिषद यशस्वी ठरेल. फक्त माइक बंद ठेवा, प्रश्न विचारू नका, उत्तर देऊ नका – पूर्ण यश!
भेपुपाकीबा त.
#पाभे_की_बात
पाभे की बात©® नं ७
वाचने
227
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
१ रुपयाला १ डॉलर किंमत ह्या…
१ रुपयाला १ डॉलर किंमत ह्या आशावादासाठी प्रतिसाद देतो आहे. 😊
- (इगो बाजूला ठेवून प्रतिसाद दिलेला) सोकाजी
बातें का विषय बाजूला ठेवला…
In reply to १ रुपयाला १ डॉलर किंमत ह्या… by सोत्रि
बातें का विषय बाजूला ठेवला तर असे म्हणावे लागेल की, जगाने किमान भारताने इतर देशांच्या फंद्यात न पडता गुमान (कुणाला न समजता) चीनची बरोबरी करण्याचा ध्यास घ्यावा.
भाजपाने मिळणार्या पाठिंब्याचा विधायक विनियोग करावा.
बाकी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
त्यांना "मेलोडी" चॉकलेटचे एक…
त्यांना "मेलोडी" चॉकलेटचे एक पाकीट पाठवले जाईल.
त्यांना ' सुकडी ' चे पाकीट पाठवा असे भारताचा एक सर्वसामान्य नागरीक म्हणून मी आपणास सुचवतो .
माननीय आग्या१९९० महोदय…
In reply to त्यांना "मेलोडी" चॉकलेटचे एक… by आग्या१९९०
माननीय आग्या१९९० महोदय,
आपणांकडून प्रेषित करण्यात आलेल्या सूचनात्मक निवेदनाचे आम्ही अवलोकन केले आहे.
आपल्या सूचनात्मक अभिप्रायाचा आवश्यक त्या प्रशासकीय स्तरावर गंभीरतापूर्वक विचारविनिमय करण्यात येईल.
आपले सूचनापत्र आम्ही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सचिवीय प्राधिकरणाकडे अग्रेषित केलेले आहे.
पीबीओ (पाषाणभेद कार्यालय) आपणांस प्रति कृतज्ञताभिव्यक्ती अर्पण करीत आहे.
धन्यवाद.
कसलाही सामना करण्यासाठी…
कसलाही सामना करण्यासाठी पत्रकार परिषद कशी घ्यावी याचे क्लासेस श्री श्री श्री अनेकश्री राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले आहेत. त्याचा लाभ घ्यावा. ( क्लासेस ला येण्या अगोदर वाय झेड, नॉटी , आणि तत्सम शब्दांसाठी सामना अपशब्द्कोष सत्ताविसावी आवृत्ती प्रगाढ अभ्यासली असणे जरुरीचे आहे.
माननीय विजुभाऊ महोदय…
In reply to कसलाही सामना करण्यासाठी… by विजुभाऊ
माननीय विजुभाऊ महोदय,
आपणांकडून प्रेषित करण्यात आलेल्या सूचनात्मक निवेदनाचे आम्ही अवलोकन केले आहे.
पीबीओ कार्यालयाकडून मिळालेल्या माहीतीनुसार राजकीय पत्रकार परिषद घेण्यासाठी गलगोटीया युनिवर्ससीटीच्या प्राध्यापिका यांनी तयार केलेला कोर्स अगदी योग्य आहे.
आपण पुरविलेली माहीती आम्ही आमच्या कार्यालयाकडे सुपुर्द करत आहोत.
आपल्या सूचनात्मक अभिप्रायाचा आवश्यक त्या प्रशासकीय स्तरावर गंभीरतापूर्वक विचारविनिमय करण्यात येईल.
आपले सूचनापत्र आम्ही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सचिवीय प्राधिकरणाकडे अग्रेषित केलेले आहे.
पीबीओ आपणांस प्रति कृतज्ञताभिव्यक्ती अर्पण करीत आहे.
धन्यवाद.
गलगोटिया चालणार नाही…
In reply to माननीय विजुभाऊ महोदय… by पाषाणभेद
गलगोटिया चालणार नाही. त्यासाठी भांडूप किंवा वांद्रे पूर्व येथूनच मान्यता मिळते
खिक्क!
खिक्क!