Skip to main content

बंंगालची झालमूरी अन एका मिपाकराची मनकी बात.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी मंगळवार, 05/05/2026 19:17 या दिवशी प्रकाशित केले.

पश्चिम बंगालच्या राजकारणात बदल हा अपवाद नसून परंपराच आहे. या भूमीने नेहमीच सत्तेला प्रश्न विचारले, विचारसरणींना आव्हान दिले आणि आवश्यक वाटल्यास प्रस्थापितांना नाकारण्याचे धाडस दाखवले. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीने हा वारसा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. या निकालाकडे केवळ सत्तांतर म्हणून पाहणे म्हणजे बंगालच्या राजकीय मानसशास्त्राचा अपमान ठरेल; कारण इथे मतपेटीतून उमटलेला कौल हा नेहमीच अधिक खोल, अधिक सूक्ष्म आणि अधिक बहुपदरी असतो, असे म्हणता येते.

बंगालचा मतदार, जादूगर आहे. रोसगुल्लावरुन ‘झालमुरी’वर कधी आला कळणार नाही. बंगालचा मतदारही अनेक भावनांचा, विचारांचा आणि अपेक्षांचा संगम असतो. तो कधी अस्मितेच्या नावाने मतदान करतो, कधी विचारधारेच्या, तर कधी अगदी व्यावहारिक पातळीवर आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या योजनांच्या आधारे निर्णय घेतो. २०२६ मध्ये या सर्व घटकांची नवी रचना दिसून आली आहे,ज्यात राष्ट्रीय राजकारणाशी जोडले जाण्याची एक स्पष्ट इच्छा प्रकर्षाने जाणवते.

स्वातंत्र्योत्तर काळात डॉ. बिधान चंद्र राय यांनी आधुनिक बंगालची पायाभरणी केली, तेव्हा विकास आणि संस्थात्मक बांधणी हे घटक केंद्रस्थानी होते. राय यांच्या कालखंडात बंगाल हे औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जात असे. पण काळाच्या ओघात काँग्रेसचा प्रभाव कमी होत गेला आणि १९७७ मध्ये डाव्या आघाडीने सत्ता हस्तगत करत एक नवा प्रयोग सुरू केला. या प्रयोगाने ग्रामीण भागातील सत्तासंबंध बदलले, भूमिहीनांना अधिकार दिले आणि सामाजिक न्यायाची एक वेगळी चौकट उभी केली. मात्र, याच काळात औद्योगिक विकासाला आलेला अडथळा आणि गुंतवणुकीचा अभाव हळूहळू जाणवू लागला. ३४ वर्षांच्या या दीर्घ सत्ताकाळानंतर २०११ मध्ये ममता बॅनर्जी यांनी ‘परिवर्तन’चा नारा देत माटी आणी मानुष च्या मदतीने डाव्यांचा किल्ला उद्ध्वस्त केला, तेव्हा तो केवळ राजकीय विजय नव्हता, तर एका नव्या सत्तेचा उदय होता.

मात्र,सत्तेबरोबर अपेक्षांची एक मोठी शृंखलाही निर्माण होते. ममतांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला निर्माण झालेली ऊर्जा आणि जनसंपर्काची ताकद कालांतराने प्रशासनाच्या प्रश्नांमध्ये अडकू लागली. सरकार ऐवजी ‘समांतर व्यवस्था’ सरकार चालवू लागली, त्यात वाढ होत गेली. पंधरा वर्षाच्या सत्तेने, अपेक्षा आणि त्याच्या पूर्ततेबरोबर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, भरती प्रक्रियेतले घोटाळे, महिला सुरक्षेचे प्रश्न आणि स्थानिक स्तरावरील दडपशाही—या सर्वांनी मिळून जनतेच्या मनात एक हळूहळू साचणारी अस्वस्थता निर्माण केली. ही अस्वस्थता तत्काळ बंडात परिवर्तित झाली नाही; पण ती शांतपणे वाढत राहिली आणि योग्य क्षणाची वाट पाहत राहिली.

२०२१ च्या निवडणूकीत भाजपच्या वतीने इतकाच फौजफाटा होता. पंतप्रधान, गृहमंत्री, केंद्रीय सत्ताधारी, मंत्री, पैसा, निवडणूक आयोग, सगळे सोबतीला होते. अबकी बार दोसो पार, आणि दो मई आणि दिदी गई, हे सगळं नाटक तेव्हाही, झालं होतं. तरीही, ममता बॅनर्जी निवडून आल्या. लोकांचा पाठींबा. लोकांचा विश्वास आणि लोकांनी एक संधी पून्हा दिली. या सर्व गोष्टी होत्या तरीही, त्यांच्या कार्यकाळातली ताकद वाढवता आली नाही. संधीचं सोनं करता आलं नाही. सतर्क राहता आलं नाही. भाजपच्या पराभवाने केलेली घुसखोरी ही भविष्यातली सत्तेची नांदी होती, याकडे ममता पक्षाचे दुर्लक्ष झाले. २०२६ ची निवडणूक तोच क्षण ठरली. या निवडणुकीत आकडेवारी ही केवळ गणित नसून मानसशास्त्राचा आरसा ठरते.

२०२१ मध्ये प्रचंड बहुमत मिळवणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या मतांमध्ये झालेली घसरण ही केवळ टक्केवारीतील बदल नाही, तर विश्वासातील कमी होण्याचे प्रतीक आहे. त्याउलट विरोधकांच्या मतांमध्ये झालेली वाढ ही केवळ प्रचाराची फलश्रुती नसून नव्या सामाजिक गटांचा पाठिंबा मिळाल्याचे द्योतक आहे. ग्रामीण भागातील गरीब, महिलावर्ग आणि पहिल्यांदाच मतदान करणारे तरुण—या सर्वांनी मिळून या सत्तांतराला आकार दिला.

या प्रक्रियेत प. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या योजनांनी महत्त्वाची भूमिका बजावली वगैरे, प्रभाव पडला वगैरे अशा भ्रामक गोष्टीला बंगाली अडकले वगैरे समजण्याचे कारण नाही. कायम रेवडी संस्कृतीत प.मोदी सरकार कायम टीका करतात. पण, काही राज्यांचा अनुभव पाहता काही काळासाठी रेवड्यांची घोषणा करायची. निवडून आल्यानंतर, त्यात कपात करायचीम, हा फार्म्युला इकडेही लागू झाला.

ममता बॅनर्जी कार्यकाळातील योजनांचा विचार केला, तर ‘कन्याश्री’, ‘रूपश्री’, ‘लक्ष्मी भंडार’, ‘सबूज साथी’ यांसारख्या योजनांनी निश्चितच सामाजिक स्तरावर काही सकारात्मक परिणाम घडवले. महिलांचे सक्षमीकरण, मुलींचे शिक्षण आणि थेट आर्थिक मदत या बाबतीत बंगालने काही प्रमाणात प्रगती केली. परंतु, या योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेचा अभाव, स्थानिक नेत्यांकडून होणारी हस्तक्षेपशाही आणि लाभार्थ्यांच्या निवडीतील राजकीय पक्षपात यामुळे या योजनांची प्रतिमा मलिन होत गेली.

भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात भाषणात रेवड्याची उधळण केली. तृणमूलच्या 'लक्ष्मी भंडार'ला उत्तर म्हणून भाजपने महिलांना दरमहा ३,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले. पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींना ५०,००० रुपयांची एकरकमी मदत करु सांगितले. ४० वर्षांवरील महिलांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग आणि सर्व मुली/महिलांसाठी मोफत HPV लस देऊ अशा बाता मारल्या. राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३% आरक्षण, सर्व सरकारी बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवास. पुढील पाच वर्षांत १ कोटी नवीन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आश्वासन. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दरमहा ३,००० रुपये आर्थिक मदत, डिसेंबर २०२६ पर्यंत राज्य सरकारमधील सर्व रिक्त पदे पारदर्शक पद्धतीने भरण्याचे उद्दिष्ट, सत्ता आल्यानंतर ४५ दिवसांच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन, मच्छीमारांना वार्षिक ६,००० रुपये मदत, अशा बाता मारल्या आहेत. येत्या काळात त्याची पूर्तता कशी होईल, ते दिसणार आहे.

निवडणुकीच्या निकालामागे एक महत्त्वाचा पण फारसा चर्चेत न आलेला घटक म्हणजे निवडणूक आयोग (भारत) यांनी केलेल्या मतदार यादीतील दुरुस्त्या. लाखो नावांची वगळणी किंवा सुधारणा हा केवळ प्रशासकीय उपक्रम नव्हता; त्याने प्रत्यक्ष मतदानाच्या समीकरणांवर परिणाम केला. विशेषतः सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये या बदलांचा प्रभाव अधिक जाणवला, जिथे पारंपरिक मतदान पॅटर्न अचानक बदलताना दिसला. या प्रक्रियेबद्दल मतभेद असू शकतात, पण तिचा परिणाम नाकारता येणार नाही, ही गोष्ट सत्य आहे. दुसरीकडे, विरोधकांनी केवळ सत्ताविरोधी लाटेवर स्वार होऊन विजय मिळवलेला नाही. त्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे दीर्घकालीन संघटनकार्य, बूथस्तरावर उभे केलेले मजबूत जाळे आणि काटेकोर नियोजन आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांंनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना बचावात्मक भूमिका घ्यावी लागली, केंद्रीय तपास यंत्रनांनी ममता बॅनर्जी यांच्या  शंभर पेक्षा अधिके निवडणुक सांभाळणारी माणसं नेते-कार्यकर्ते ऐन निवडणूकीत नजर कैदेत टाकली, त्या विरोधात कल्याण बॅनर्जी यांना न्याय मिळाला नाही, या ज्याचा अप्रत्यक्ष परिणाम जनमतावर झाला.

तिकडे, भाजपचं प्रत्येक मतदारसंघात केलेले सूक्ष्म व्यवस्थापन, स्थानिक पातळीवरील समीकरणांची अचूक मांडणी आणि प्रचारातील सातत्या आणि हींदू मुस्लीम द्वेषाचं ब्रॅंड, शेतक-याला पहिले ‘राम बादमे वाम’ यावर टीकवून ठेवलं. या सर्वांनी मिळून विजयाचा झालमूरीच्या विजयाचा पाया भक्कम केला. इथे कोणतीही सत्ता कायमस्वरूपी नसते, पण लोकशाहीवरील विश्वास कायम असतो. आणि कदाचित म्हणूनच, बंगाल प्रत्येक निवडणुकीत एक नवी ‘जादू’ घडवतो—जी केवळ डोळ्यांना नव्हे, तर इतिहासालाही चकित करून जाते. एकीकडे तृणमूल काँग्रेसची मतांची टक्केवारी अंदाजे ४०–४१ % पर्यंत खाली आली, तर भाजपने ४५–४६% च्या आसपास मजल मारत आघाडी घेतली. मतांच्या टक्केवारी फार मोठा फरक वाटत नसला तरी, आमदारांची संख्या वाढली. काँग्रेस आणि डावे मिळूनही दुहेरी आकड्यांच्या पुढे जाऊ शकले नाहीत. या आकड्यांमधील बदल केवळ निवडणुकीचा परिणाम नसून, गेल्या पंधरा वर्षांतील सामाजिक आणि राजकीय बदलांचे परिपाक आहे. वगळलेल्या मतदारांमुळे प्लॅनिंगचा अभाव यांनी ममतांचा पराभव केला हे आता स्पष्ट आहे. पण, तरीही जिंकून येऊ अशा भरवशावर असलेल्या वगळलेल्या मतांसाठी न मिळालेला ‘न्याय’ यात पराभवाची सुरुवात केव्हाच झाली होती.

ममता बैनर्जी याच काळात विविध अत्याचारांच्या घटनांनीही जनतेच्या मनावर परिणाम केला. महिला सुरक्षेचे प्रश्न, राजकीय हिंसा, विरोधकांवरील हल्ले आणि ‘संदेशखाली’सारख्या घटनांनी शासनाच्या प्रतिमेला धक्का दिला. अनेक ठिकाणी स्थानिक तृणमूल नेत्यांची गुंडगिरी, जमीन बळकावणे, आणि प्रशासनावरचा अनधिकृत प्रभाव या गोष्टी सामान्य नागरिकांच्या दैनंदिन अनुभवाचा भाग बनल्या. या पार्श्वभूमीवर ‘भीतीमुक्त मतदान’ हा मुद्दा स्वतःच एक मोठा राजकीय अजेंडा बनला. दुसरीकडे, भाजपने या असंतोषाला संघटित राजकीय शक्तीत रूपांतरित करण्याचे काम केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकास’ आणि ‘राष्ट्रवाद’ या दोन प्रमुख ( थापांवर ) आधारांवर प्रचार उभा करण्यात आला. हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण हा या निवडणुकीतील एक संवेदनशील पण प्रभावी घटक ठरला. सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये लोकसंख्यात्मक बदल, घुसखोरीचा मुद्दा आणि धार्मिक ओळखींचे राजकारण यामुळे मतदारांमध्ये स्पष्ट विभागणी दिसून आली. भाजपने या मुद्द्यांना आक्रमकपणे पुढे आणले, तर तृणमूलने ‘धर्मनिरपेक्षता’ आणि अल्पसंख्याकांच्या संरक्षणाचा मुद्दा मांडला—आणि याच संघर्षातून ध्रुवीकरण अधिक तीव्र झाले. याशिवाय, आर्थिक बळ आणि संसाधनांचा प्रभावही प्रचारासाठी वापरलेला प्रचंड निधी, डिजिटल मोहिमा, सोशल मीडियाचा प्रभाव आणि व्यापक जनसंपर्क कार्यक्रम सरकारी यंत्रणा या सर्वांनी भाजपच्या प्रचाराला एक वेगळी धार दिली. निवडणूक व्यवस्थापनातील व्यावसायिकता आणि डेटा-आधारित रणनीती यामुळे प्रत्येक मतदारसंघात अचूक नियोजन करता आले. याउलट, तृणमूलचा प्रचार अधिक पारंपरिक आणि स्थानिक नेत्यांवर अवलंबून राहिला, ज्यामुळे व्यापक स्तरावर संदेश पोहोचण्यात काही मर्यादा जाणवल्या.

या सत्तांतराकडे पाहताना एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की, हा विजय पूर्णतः सकारात्मक मतदानाचा आहे की नकारात्मकतेचा परिणाम ? उत्तर कदाचित दोन्हींच्या मधोमध आहे. एका बाजूला ममतांविरोधातील नाराजी, भ्रष्टाचार आणि प्रशासनातील त्रुटी होत्या; तर दुसऱ्या बाजूला भाजपने दिलेल्या आश्वासनाच्या खैराती, मजबूत भितीमूक्त नेतृत्वाची (आभासी)  प्रतिमा आणि राष्ट्रीय स्तरावरील योजनांचा स्वप्नाळू प्रभाव राहिला असे म्हणता येते.  या दोन प्रवाहांच्या संगमातून २०२६ चा निकाल घडला. तसंही, आता बंगालच्या जनतेची 'हौस" पूर्ण होण्याची सुरुवात झाली आहे. भविष्यात बंगालमधे हिंदू-मुस्लीम हा राडा अधिक तीव्र होईल, विकासाच्या गोष्टी, बाता मागे पडतील यात नवल वाटण्याचं कारण नाही. मात्र, या सर्वांमध्ये लोकशाहीचा एक मूलभूत धडा पुन्हा अधोरेखित होतो—कोणतीही सत्ता कायमस्वरूपी नसते आणि कोणताही पराभव अंतिम नसतो. ममता बॅनर्जी यांचे पुढील राजकीय अस्तित्व आणि असलेला जनाधार, विरोधी पक्ष म्हणून जवाबदारी त्या कशा पार पाडतात ते पाहावे लागणार आहे. त्याचप्रमाणे भाजपसमोरही आता सत्तेची जबाबदारी आहे, ही सत्ता पुढे किती काळ टीकवून ठेवतील हे आव्हान असेल, ज्यात अपेक्षांची पूर्तता करणे, समांतर सरकारचा दबाव मोडून काढणे, प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि सामाजिक सलोखा टिकवणे हे मोठे आव्हान असेल. बंगालच्या नव्या बदलास आणि अच्छे दिनासाठी त्यांना खूप खू शुभेच्छा.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1429
प्रतिक्रिया 63

प्रतिक्रिया

हंऽ.

ममता बॅनर्जी कार्यकाळातील योजनांचा विचार केला, तर ‘कन्याश्री’, ‘रूपश्री’, ‘लक्ष्मी भंडार’, ‘सबूज साथी’ यांसारख्या योजनांनी निश्चितच सामाजिक स्तरावर काही सकारात्मक परिणाम घडवले.

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दरमहा ३,००० रुपये आर्थिक मदत, डिसेंबर २०२६ पर्यंत राज्य सरकारमधील सर्व रिक्त पदे पारदर्शक पद्धतीने भरण्याचे उद्दिष्ट, सत्ता आल्यानंतर ४५ दिवसांच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन, मच्छीमारांना वार्षिक ६,००० रुपये मदत, अशा बाता मारल्या आहेत.

याला मिपाकर आपला तो बाबुराव, दुसऱ्याचं ते कारटं असं म्हणतात! बाकी, "या मनुवाद्यांनी बंगालचासुद्धा गोबरपट्टा करून टाकला" हे उद्विग्नपणे लिहायचं राहिलं का? 
 


अहो

महाराष्ट्राचा सुद्धा गोबर पट्टा झाला आहे.


बंगाल चं काय घेऊन बसला आहात? 

 

बाकी झालमुडी श्री मोदींनी खाल्ली

 

त्याची मिरची "मोरू" लोकांना काल हि लागली आणि आजही लागते आहे.  


In reply to by सुबोध खरे

डॉक्टर धाग्यावर आले. संयमाने ( प्रतिसादात भाषा संयम टक्केवारी ६७.१७ % ) व्यक्त झाले.  

भरुन पावलो. बाकी, ते गोबरयूग, गोबरसंस्कृती, गोबरपट्टा त्यावर फिर कभी. 

>>> बंगाल चं काय घेऊन बसला आहात ? 

आपला मुद्दा बिंदुगामी आहे.  फक्त बंगालचीच निवडणूक झाली. 
अशा पद्धतीचं गोदीमिडियाकडून वार्तांकन झालं. ते अन्याय करणारे आहे. 
 

तामिळनाडूत भाजपच्या वतीने  अनेक राष्ट्रीय नेत्यांनी मिळून सुमारे पन्नास पेक्षा जास्त सभा घेतल्या खरं आहे का ? आणि जागा एक मिळाली म्हणे ?  पण, तरीही मतांची टक्केवारी बरी वाटली.  अभिनेता विजय यांच्या पक्षाच्या  यश पाहता.  आज ना उद्या तिकडे ते  द्वेषाचं राजकारण चालेल की नाही, ते माहिती  नाही पण,   आपल्या समर्थक पक्षात   एखादा सिनेमाचा  हिरो तिकडे लोकप्रिय करावा लागतो बघा.  आपला तो,  एक काय,  त्यांचं नाव विसरलो.  अभिनेता चांगला आहे, पण यश कितपत मिळेल यावर साशंक आहे. 

-दिलीप बिरुटे

 


मतदार यादीत नाव असूनही मतदान करण्याच्या हिम्मत नसलेल्या लाखो लोकांनी यावेळी पहिल्यांदा मतदान केले. बाकी जिथे जास्त नावे दिलेत झाली.  त्या भागात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जास्त जिंकले आहेत. https://indianexpress.com/article/political-pulse/bengal-sir-tmc-won-13-of-20-seats-with-highest-voter-deletions-10672965/.    2021 निवडणुकीत पन्नास होऊन जास्त भाजप कार्यकर्त्यांची  आणि इतरां त्या झाली होती.  या निवडणुकीत केंद्रीय भरपूर असल्याने निवडणूक शांत पूर्ण झाले आणि लोकांनी न भिता मतदान केले.  

बाकी ९० क्के अल्पसंख्याक मतदार काधीवभाजपाला मतदान करत नाही तो फक्त इमानसाठी मतदान करतो.


In reply to by कंजूस

एखाद्या प्रादेशिक पक्षाचं  कार्यकर्तुत्व जमाखर्च पाहून तेथील जनतेने  लोकशाहीच्या माध्यमाने बदल करणे लोकशाहीसाठी अगदी योग्य असतं.  सध्याच्या राजकारणात तसं होतंय का ? असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नकारात्मक येतं.  पश्चिम बंगालमधील निवडणूक ही केवळ बंगालची निवडणूक नव्हती भाजपासाठी विरोधक संपवण्याची निवडणूक होती. आणि ते ती निवडणूक कटकारस्थान करुन जिंकले आहेत.  आपला पक्ष वाढवायचा पण तो लोकशाही मार्गाने तसं आता होत नाही. देशभर असलेले प्रादेशिक पक्ष म्हणजे भाजपा सत्तेच्या लालसेने आणि सत्तेच्या यंत्रणेचा कळस गाठून प्रादेशिक पक्ष संपवत आहेत. ममता बैनर्जी त्याचं उत्तम उदाहरण आहे. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बैनर्जी जिथे जमले तिथे भाजपच्या केंद्रीय सरकारला अडचणीच्या होत्या, जिथे तिथे त्या यांचा पान उतारा करीत होत्या. आपल्या मागे असलेल्या ताकदीच्या जोरावर भाजपाला ममता पक्षाने थकवून टाकलं होतं. ममता जिंकल्या असत्या तर, केंद्रीय राजकारणात त्रास वाढला असता विरोधकांना बळ मिळालं असतं, तेव्हा त्यांच्या निवडणूक  कार्यपद्धतीच्या  विजयी मार्गाला नजरकैदेत ठेवले. मतदार वगळले इथेच त्यांचा पराभव सुरु झाला होता. कमी जास्त फरकाने निवडणूक हार जीत झाली असती तर, समजू शकले असते, पण इथे तसं घडले नाही. 

सकाळपासून मिडिया शंभरपेक्षा अधिक जागांवर आघाडी दाखवत होती तेव्हा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दहा जागा आणि ममता यांच्या चार जागा असे दाखवत असताना विकलेला गोदी  मिडिया आपलं काम करीत होती. पण,   निवड्णूक आयोगाने ज्या संथ पद्धतीने निवडणूक निकाल लावला ते संशयास्पद आहे. अधिकृत संस्थळावर सायंकाळपर्यंत निकाल घोषित नव्हता, इकडे विजयी सभा होत होत्या. ममता बैनर्जी यांनी शंभर पेक्षा अधिक जागांवर जो संशय व्यक्त केला त्यावर काळ उत्तर देईल. आज जरी ममता म्हणत असल्या की राजीनामा देणार नाही तरी, विधानसभेचा कार्यकाळ संपला की विधानसभा विसर्जीत होते, आता त्यांच्या हट्टाला अर्थ नाही. अर्थात, विरोधी पक्ष आणि भाजपाविरोधात केंद्रात विरोधी आघाडी  मजबूत करु असे ते म्हणत असल्या तरी, सत्तेत नसतो तेव्हा ताकद कमी होते असे वाटते. 

भाजपा सत्तेला जे जे आव्हान देतील त्यांना त्यांना कटकारस्थान करुन घरी बसवू आणि पक्ष वाढवू ही  निती भाजपाची आहे. प्रादेशिक पक्ष आणि त्यांचं नेतृत्त्व  संपवण्याचा घाट सध्याच्या भाजप प्रणित सरकारचा आहे.  महाराष्ट्रात युतीकरुन फोडाफोडी करुन महाराष्ट्राची वाट लावली. महाराष्ट्रात आता आश्वासक चेहरा ठेवला नाही.    प.बंगालमधी ममता यांचा पराभव करुन बंगालची वाट लावली विरोधक संपवले. ओडीशामधे नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाची वाट लावली. भाजपाला वाटले की आपली सत्ता आणू शकतो त्यांच्या युतीतील नेत्यांचा पत्ता कट होतो. आंद्रप्रदेशात जगनमोहन रेड्डी, तेलंगणात के.चंद्रशेखर या प्रादेशिक पक्षांचा वापर करुन त्यांनाही देशोधडीला लावले.  कर्नाटकात  देवेगौडा यांच्या पक्षाची अशीच वाट लावली.  ताजं उदाहरण, म्हणजे आप पक्षाचे सहा खासदार फोडून आम आदमी पार्टीची वाताहात सुरु केली. हा यांचा पक्ष विस्तार असतो. 

सारांश, भाजपाला प्रादेशिक पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचा किती त्रास होतो आणि ते त्यांच्या मुळावर कसे उठतात त्याची अनेक उदाहरणे आहेत. भाषा, प्रांत, धर्मद्वेष, पक्ष फोडाफोडी, नेतृत्व पळवणे या सर्व मार्गांना आणि त्यांच्य  पद्धतीला लोकशाही मार्गाने जिंकलो असे म्हणायचे  असेल तर त्यामागे किती कटकारस्थाने असतात आणि ती निवडणूक सरकारी यंत्रणेचा वापर करुन कशी जिंकायची  हेच त्यांच्या यशाचे गमक आहे, दुसरं काही नाही, असे व्यक्तीगत मत आहे. 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुर्ची टिकवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे राजकाऱण अलिकडे खुपच खालच्या पातळीवर आले आहे. समान्य माणूस यात आधी भरड्ला जात नव्हता. आता ते सर्रास होते आहे. घराघरात भिंती उभ्या रहात आहेत. तासन तास आवडीच्या विषयांवर गप्पा मारणारे मित्र आता राजकीय मत जुळत नाही म्हणून संपर्क बंद करत आहेत. हे लोकशाही साठी घातक चित्र आहे. मार्मिक विष्लेषण. आवड्ले!


मराठी राजकारणात कोणी एकेकाळी शिव वडापाव गाजला होता... आता बंगाल में बाजी मारली.. झालमरी जोरात आहे... महाराष्ट्रात पण पर्याय शोधायला पाहिजे 


पश्चिम बंगालच्या राजकारणात बदल हा अपवाद नसून परंपराच आहे

प्रथम ग्रासे मक्षिका पात:

प्रथम १९४७  ते १९७७ सलग ३० वर्षे काँग्रेस ची सत्ता होती.  

मग १९७७ ते २०११ अशी सलग चौतीस वर्षे कम्युनिस्ट पक्षाची राजवट होती.

मग सलग १५ वर्षे तृणमूल काँग्रेसची.

काय बिरुटे मास्तर?

७९ वर्षे फक्त तीन पक्षांची सत्ता आणि दोन वेळेस सत्ता बदल झाला असताना  

येथे राजकारणात बदल हि परंपरा कशी काय होते?     

पहिल्याच घासाला खडा लागला 


In reply to by सुबोध खरे

बरं... कुठं आणि कशामुळे खडा लागतोय ते लक्षात येतंय. =))

 

बाय द वे,  डाक्टर सायब, लिहिते राव्हा. मला शिकवायला विरेचनाचा सिद्धांत होता. मानसिक संतुलनासाठी मनात उचंबळून आलेल्या भावनांचे मत प्रदर्शन झाल्यामुळे  भावनिक विरेचन होते. यामुळे मनाला सुखद, शांत आणि संतुलित अनुभूती मिळते.

 

मला आपली एक मिपाकर म्हणून काळजी आहे. लिहीते राहा... प्लीज. :)

 

-दिलीप बिरुटे


In reply to by सुबोध खरे

>>> ७९ वर्षे फक्त तीन पक्षांची सत्ता आणि दोन वेळेस सत्ता बदल झाला असताना. येथे राजकारणात बदल हि परंपरा कशी काय होते?     

 

विप्रा म्हणतात ते १०० टक्के खरे आहे. कोणत्याही पक्षाची राजवट बंगालमध्ये ३४ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकलेली नाही. म्हणजे बदल हीच बंगालची परंपरा आहे. 


In reply to by सुबोध खरे

७९ वर्षे फक्त तीन पक्षांची सत्ता आणि दोन वेळेस सत्ता बदल झाला असताना येथे राजकारणात बदल हि परंपरा कशी काय होते?    

 

डाव्या लोकांचा असाच अतर्क्य तर्कविरोधी तर्क असतो. मुळात त्यांना "तर्काशी काय खातात हेच माहीत नसते"*.

*हे वाक्य डाव्यांबद्धल आहे कारण शुद्ध मराठीत त्यांना "तर्क कशाशी खातात हेच माहीत नसते"! 
;-) 
 


 

पहिल्याच घासाला खडा लागला 

आम्हाला तर बहुतेक सगळेच खडे लागले! थोडीशीच भाताची शिते होती!

 

 


रोसगुल्लावरुन ‘झालमुरी’वर कधी आला कळणार नाही.

 

हायला

दोन्ही पदार्थ शुद्ध बंगालीच आहेत.

हे म्हणजे महाराष्ट्र श्रीखंडावरून पुरणपोळीवर कसा आला विचारल्यासारखे आहे.   


In reply to by सुबोध खरे

काही जणांना झालमुरीतील मिरची जोरदार लागलीये आणि पुढील ५ वर्षे झोंबत राहणार आहे. असो. आपण केवळ मजा पहायची. 

 

मतयंत्रातील लबाडीवरून नंतर मतचोरीवरून आता मतदारयादी शुद्धीकरणावर आले. पुढील निवडणुकात कोणतातरी नवीन मुद्दा आणून नाचत बसतील. 

 

दरम्यान उडाणपप्पू, मतदारयादी शुद्धीकरण या विषयावर, पॉवरपॉइंट सादरीकरण तयार करतोय म्हणे. 


पंतप्रधान मोदींच्या भेटीमुळे चर्चेत आलेल्या विक्रम साहू या झालमुडी विक्रेत्याला राजकीय संघर्षाचा फटका बसला. भाजप नेत्यांकडून मदत न मिळाल्याने आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर त्याने आपल्या दुकानाचे नाव 'जुमलामुडी' ठेवले अशा बातम्या आहेत. =))

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंतप्रधान मोदींच्या भेटीमुळे चर्चेत आलेल्या विक्रम साहू या झालमुडी विक्रेत्याला राजकीय संघर्षाचा फटका बसला. भाजप नेत्यांकडून मदत न मिळाल्याने आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर त्याने आपल्या दुकानाचे नाव 'जुमलामुडी' ठेवले अशा बातम्या आहेत. =))

 

बातमी खरीखोटी जी काही असेल ती असेल पण -

 

केवळ एक राजकीय नेता आपल्या दुकानात येऊन गेला म्हणून हिंदूंना तृणमूलच्या कार्यकर्त्यांच्या त्रासाला कंटाळून जावे लागत असेल तर पहा मागच्या १५ वर्षांत असंख्य हिंदूंना किती त्रास झाला असेल ते!

 


In reply to by कांदा लिंबू

>>> हिंदूंना किती त्रास झाला असेल ते!

वाढत्या महागाईचा, बेकारीचा, व्यवसायिक आणि तत्सम गोष्टीचा  मतदार म्हणून  सगळ्यात जास्त त्रास हिंदुनाच आहे बघा... हिंदू म्हणून गोबरयुगात हिन्दूचा काही विशेष फायदा झाला नाही. 

 

व्यवसायिक / घरगुती  सिलेंडर हिन्दू, मुस्लिम, ख्रिश्चन यांना एकच भाव. सगळ्यांना सारखाच तोटा.

बस, रेलवे विमान, सगळ्यांनाच सारख्या बसायला सीट्स. हिंदू म्हणून विशेष ट्रीटमेंट नाही.

 

=)) 

 

-दिलीप बिरुटे

 

 


In reply to by कांदा लिंबू

मणिपूर च्या हिंदूंना २ वर्षे जळत ठेवणारे भाजपच होते. तेव्हा हिंदूंचा पुळका का येत नाही? की नॉर्थ इस्ट एशियन दिसतात म्हणुन त्या हिंदुंवर होणारे अत्याचार क्षम्य आहेत? 

एक निरिक्षण : भाजप ज्या ज्या राज्यांत सत्तेत आले आहे ती ती राज्ये हिंसेनी पेटलेली आहेत आणि बेरोजगारांना रेवड्या वाटत आहे. शांतता आणि रोजगार दोन्ही आघाड्यांवर चिंताजनक स्थिति आहे. महागाई चा आलेख एवढ्या वेगात गेल्या १२ वर्षात केव्हाही वाढला नव्ह्ता. 


पुढचा लेख इतका भंपक, एकांगी आणि पूर्वग्रहदूषित आहे कि एखाद्या डाव्या भंपक विचारवंताने आशियातील लायब्ररीतील वातानुकूल खोलीत बसून आपल्या कल्पनाशक्तीने लिहिलेला लेख आहे आणि त्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेची फोडणी आहे असे स्पष्ट जाणवते.

ममता दीदी च्या तृणमूल चा एवढा दारुण पराभव का झाला? त्यांचे मुस्लिम लांगुलचालन, तृणमूलच्या गुंडांची गुंडगिरी, मतदारांना धमकावणे, स्त्रियांवर झालेले अनन्वित अत्याचार, आर्थिक आघाडीवर बंगालची झालेली  घसरण सारखे अत्यंत महत्वाचे मूलभूत मुद्दे सोडून इतरच फालतू मुद्दे  दिसतात      

 

याला फोलपटांचा चिवडा हि उपमा सार्थ ठरेल.

फोलपटांचा चिवडा -- पाककृती

फोलपटे ( भुईमुगाच्या शेंगांची साले).

प्रथम दोन वाट्या फोलपटे घ्यावीत, ती मंद आचेवर कुरकुरीत भाजून घ्यावीत.

त्यात डाळं, शेंगदाणे, बेदाणे, काजू घालून परत थोडं भाजून घ्यावं.

मग त्याला , हिरवी मिरची, सुंठ, लवंग, दालचिनी, मिरी ची खमंग फोडणी द्यावी.            

शेवटी एक करून त्यातली डाळं, शेंगदाणे, बेदाणे, काजू काढून टाकावीत म्हणजे हा फोलपटांचा चिवडा सार्थ होतो.  

 

जाता जाता- राजकीय विश्लेषण हा अभ्यासाचा भाग आहे नाक्यावरच्या गप्पा नव्हेत.    

 

 


In reply to by सुबोध खरे

पुढचा लेख इतका भंपक, एकांगी आणि पूर्वग्रहदूषित आहे कि एखाद्या डाव्या भंपक विचारवंताने आशियातील लायब्ररीतील वातानुकूल खोलीत बसून आपल्या कल्पनाशक्तीने लिहिलेला लेख आहे आणि त्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेची फोडणी आहे असे स्पष्ट जाणवते.

 

पुढचा लेख तसा आहे म्हणजे? आधीचा लेख एकदम विद्वत्ताप्रचुर आहे असे म्हणायचे आहे का?


In reply to by चंद्रसूर्यकुमार

पुढचा लेख तसा आहे म्हणजे? आधीचा लेख एकदम विद्वत्ताप्रचुर आहे असे म्हणायचे आहे का?

 

आज मिपावर फारच फटाके फुटताना दिसत आहेत! 

 

lol
 


In reply to by सुबोध खरे

 

आत्ताशी कुठं मजा येत आहे. आपला प्रतिसाद आनंद देणारा आहे, म्हणजे लेखनातले काही तरी आहे जे एक भक्त आणि फॉलोअर म्हणून आपणास झोंबत आहे. 

 

मजा आ रहा है,  बाय द वे, डॉक्टर साहेब. गोबरयुगात ज्या रेवड्या संस्कृतीवर गाव गप्पा मारल्या जात आहे आपल्या नेतृत्वाकडून त्या बंगालमधील उधळळ्या गेलेल्या रेवड्यावर पण बोला ना प्लीज. =))

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दीदी ने रेवड्या दिल्या होत्या त्या फारशा चांगल्या नव्हत्या त्यापेक्षा  बंगाल मधील लोकांना भाजप ने दिलेल्या आश्वासनांचा जास्त भरवसा वाटला स्त्रियांची सुरक्षा, उद्योगधंदे आणून कायमस्वरूपी रोजगार, मुस्लिम लांगुलचालन, तृणमूलच्या गुंडगिरीपासून सुरक्षा आणि बंगालचे बांग्लादेशीकरण थांबवणे.

 

 हे काहीच आपल्याला दिसलं नाही.

 

मुळात  रेवडी संस्कुती भारत अगोदर पासून आहे तामिळनाडू मध्ये साड्या टीव्ही सेट, आंध्र मध्ये लॅपटॉप वाटणे. 

 

या भ्रष्टाचाराला शिष्टाचाराचे रूप केजरीवाल सारख्या हलकट आणि पाताळयंत्री माणसाने दिले. 

 

फुकट वीज देणे हा अधिकार आहे असे सांगून सत्ता मिळवली आणि अत्यंत अनिष्ट पायंडा पाडला.

 

लाडकी बहीण सारख्या योजना आणून निवडणूक जिंकता येतात हे केजरीवाल ने दाखवून दिले आणि आता सर्वच पक्ष त्याचा वापर करत आहेत.

 

कुणाला तरी काही तरी फुकट देण्यासाठी ते अगोदर कुणाकडून तरी घ्यावे लागते हे मुलतत्व आहे.

ज्याला  युगपुरुष समजणारे  "डावे फूरोगामी" याना आता निवडणूक हरल्यावर याची आठवण झाली. त्यांना हेच विचारावेसे वाटते  

राधासुता तेंव्हा कुठे होता तुझा धर्म                 


In reply to by सुबोध खरे

'रेवडी' अर्थव्यवस्थेसाठी घातक असेल, तर ती सर्वच राज्यांसाठी आणि सर्वच पक्षांसाठी, देशासाठी घातक असायला हवी. लोकांचा पैसा असा उधळणे बरा नव्हे.

 

बाकी खोटारडेपणा, थापा, दुटप्पीपणा, यांचं आपल्याला बॉ गोबरयुगात अजिबात आश्चर्य वाटत नाही. एवढेच निदर्शनास आणून द्यायचे होते. 

 

बाकी चालू द्या..

 

-दिलीप बिरुटे

 

 

 

 

 


लेख आवडला, मात्र लिहिताना कृबूचा खूप उपयोग केल्याचे जाणवले. तामिळनाडू, केरळमवरील आपले मतप्रदर्शनही जाणून घेण्यास आवडेल.


In reply to by प्रचेतस

>>> लेख आवडला,

धन्यवाद.

>>> तामिळनाडू, केरळमवरील आपले मतप्रदर्शनही जाणून घेण्यास आवडेल.

आपला लिहिणे आनंदाचा भाग आहे. आपल्या लिहिण्यामुळे वाचकांना आनंद वाटला पाहिजे. 

 

असा आपला शुद्ध हेतु असतो.  ;)

 

प्रयत्न करतो, तरी, आपल्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे.

 

-दिलीप बिरुटे


 


चांगला लेख लिहिला आहे.केरळ,आसम,तामिळ्नाडु या ठिकाणच्या निकालाविषयीही अवश्य लिहा.

बंगाल निकालानंतर हिन्दु मोकळा श्वास घेउ शकतील,बांगलादेश घुसखोरी थांबेल हा एक मतप्रवाह 

तर....

आता व्यापारी यथेच्छ जंगलतोड ,खाणकाम करत खनिजे काढणार हा दुसरा मत प्रवाह ....अभ्यासायला मिळाले.


In reply to by कंजूस

कटकारस्थान करुन  विरोधातील मतदार वगळून निवडणूक आयोगाच्या मदतीने  मिळवलेला विजय. 
ही पद्धत पुढे अनेक विरोधी पक्षासाठी  धोक्याची सुचना आहे, ही आता सुरुवात आहे. 

आता महाराष्ट्राच्या  नव्या मतदार नोंदणी यादीत आपलं नाव  आहे की नाही पाहून घ्या. 

-दिलीप बिरुटे
 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यापूर्वी मतयंत्राचा विजय, मतचोरीचा विजय असा कांगावा करून झाला. आता मतदारयादी शुद्धीकरणाचा विजय हा नवीन कांगावा मिळालाय. भविष्यातील निवडणुकीत कोणता कांगावा शोधायचा याचे संशोधन लवकरात लवकर सुरू करा. 


In reply to by श्रीगुरुजी

मतदार यादीतुन फक्त विरोधी मतदार वगळले? कसे काय बॉ?

यादी करताना विचारत होते वाट्टे की तुम्ही बॉ कुणाला मतदान करणार ? मला वाटत होते की मतदान हे गुप्त असते.


In reply to by गवि

पश्चिम बंगालमध्ये २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४५.८ टक्के तर, तृणमूल काँग्रेसला ४१.१ टक्के मते मिळाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी भाजपच्या मतांमध्ये ७.१ टक्के वाढ झाली. तर तृणमूल काँग्रेसची मते ४.७ टक्क्यांनी कमी झाली. भाजपला ५६ लाख मते जास्त मिळाली तर 'तृणमूल'ला १७ लाख मते कमी मिळाली. पण, समजा, निवडणूक आयोगाने वगळलेले २७ लाख मतदारांनी मतांची हक्क बजावला असता तर 'तृणमूल'च्या मतांचा वाटा कमी झाला नसता. साधा तर्क आहे, बघा पटत असेल तर... ;)

 

आता हे वगळलेले मतदार कोणते होते  ? सांगायचं का की शोधून घ्याल.. =)) 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तर्क क्र. १) वगळलेल्या सर्व १०० टक्के मतदारांनी केवळ तृणमूललाच मत दिले असते कारण निवडणूक आयोगाने वगळलेला प्रत्येक मतदार तृणमूललाच मत देणार होता हे पूर्णपणे ओळखले होते.

 

तर्क क्र. २) मतदारयादीतील वगळलेले सर्व मतदार जिवंत होते. पण ते तृणमूलचे मतदार असल्याने जाणूनबुजून त्यांचे नाव वगळले. 

 

तर्क क्र. ३) वगळलेले सर्व मतदार भारताचे अधिकृत नागरिक होते. एकही बांगडा नव्हता. 

 

कांगावा म्हणतात तो हाच. 

 

जाता जाता . . . माझ्या घरातील ३ वृद्ध व्यक्ती २०१७ ते २०२० या काळात गेल्या. त्यांची नावे अजूनही मतदारयादीत आहेत. त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या जानेवारीतील महापालिका निवडणुकीसाठी घरी आल्या होत्या. माझी कन्या व जावई अनेक वर्षांपासून परदेशात स्थायिक आहेत. त्यांच्याही नावाच्या चिठ्ठ्या आल्या होत्या. 

 


In reply to by श्रीगुरुजी

चलो भवानीपूर...

 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भवानीनगर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेमुळे या मतदारसंघातून ४७,००० हून अधिक मतदारांची नावे वगळली होती.

वगळण्यात आलेल्या मतदारांपैकी सुमारे ४०.१% मतदार हे मुस्लिम समाजातील होते. याव्यतिरिक्त सुमारे १४,००० मतदारांची नावे  तपासणीखाली प्रक्रियेत होती. निकालावर झालेला परिणाम ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला.  भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा १५,११४ मतांनी पराभव केला.

समजा, त्यापैकी दहा हजार  मुस्लिम मतदारांनी भाजपला मतदान केले असते तरी तिथे ममता बॅनर्जी निवडून येत होत्या असे वाटते त्यामुळे याद्यांवरचा ममता आक्षेप योग्य वाटतो.

 

-दिलीप बिरुटे

 

 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ममता २०२१ मध्ये सुद्धा सुवेंदू अधिकारी विरोधात पराभूत झाली होती. 

 

या ४७,००० मतदारांपैकी ४० टक्के मुस्लिम होते हे कसे समजले? यातील एकही बांगडा नव्हता हे कसे समजले? 

 

असेही म्हणता येईल की उर्वरित ६० टक्के मुस्लिम नव्हते. ते वगळले नसते तर सुवेंदू अधिकारीचे मताधिक्य किमान २८,००० मतांनी वाढले असते. 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता हे वगळलेले मतदार कोणते होते  ? सांगायचं का की शोधून घ्याल.. =)) 

कसे शोधून घ्यायचे.  तुम्हीच सांगा ना कोण कोण होते ते.  😃

 

डार्क नेट वर यादी लीक झालीय का?


सध्या इंडिया टुडे साप्ताहिकाचे पत्रकार आहेत. काही वेळा निषप्क्ष असतात. कारण रोशगुल्ले.

राजदीप निष्पक्ष पत्रकार 
https://youtube.com/shorts/kfX4xhSQfJE?si=RZ52X777kaGzOOHi

 


सर्वोच्च न्यायालयाने एसआयआर अंतर्गत मतदार पात्रतेबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप ऐकण्यासाठी 19 ट्रिब्युनल नेमले होते. गेल्या महिन्यापासून, म्हणजे हे ट्रिब्युनल स्थापन झाल्यापासून, त्यांच्याकडे म्हणे, 34 लाखांहून अधिक अपील दाखल झाले आहेत. परंतु, यापैकी किती अपीलांवर प्रत्यक्ष सुनावणी झाली, हे स्पष्ट नाही.  ( अधिक माहिती दुवा )

आयोगाच्या मतदार यादी शुद्धीकरणाच्या गौड'बंगाला'बद्द्दल भविष्यात जेव्हा जेव्हा निवडणूका होतील त्याची  कायम चर्चा होत राहतील. 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरील वृत्तावरून - 

 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी, मंगळवारी (२८ एप्रिल) निवडणूक आयोगाने मतदार यादीत पुन्हा समाविष्ट करण्यात आलेल्या १,४६८ मतदारांची अतिरिक्त यादी जाहीर केली.

यादी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्यायाधिकरणांच्या (ट्रिब्यूनल) निर्णयांवर आधारित आहे. स्पेशल इंटेन्स रिव्हिजन (एसआयआर) अंतर्गत मतदार यादीत करण्यात आलेल्या बदलांविरोधात दाखल अपिलांवर सुनावणी करून हे निर्णय देण्यात आले होते.

मंगळवारी जाहीर झालेली ही दुसरी अतिरिक्त यादी आहे. पहिली यादी २२ एप्रिल रोजी, म्हणजे पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी प्रसिद्ध करण्यात आली होती.

पश्चिम बंगाल एसआयआरशी संबंधित डेटाचं विश्लेषण करणाऱ्या सबर इन्स्टिट्यूटचे मुख्य संशोधक साबीर अहमद यांनी बीबीसी बांगलाला सांगितलं की, ज्यांची नावे यादीतून काढली गेली आहेत, अशा मतदारांकडून त्यांना दररोज १५० ते २०० फोन कॉल्स येत आहेत.

सबर इन्स्टिट्यूटने मतदारांना अपील दाखल करण्यासाठी मोफत मदत मिळावी म्हणून एक कायदेशीर कक्षही सुरू केला आहे.

 

_______________

 

म्हणजे असं दिसतंय की ट्रिब्यूनलचे काम व्यवस्थित सुरू आहे.  वगळलेल्या मतदारांना कायदेशीर मदतही देण्यात येत आहे. 

 

उगाच कांगावा करण्यात अर्थ नाही.

 

 

 

 

 

 


In reply to by श्रीगुरुजी

>>>>>   म्हणजे असं दिसतंय की ट्रिब्यूनलचे काम व्यवस्थित सुरू आहे. 

अगदी खरं आहे. 

म्हणजे, 34 लाखांहून अधिक अपील दाखल झाले आहेत.  1,607 मतदारांची नावे वाढवली आणि 14 काढली, हा बदल पाहता. काम अगदी व्यवस्थितच सुरु होतं. =)) 


-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हणजे एकूण दाखल झालेली अपील आणि अपील तपासून नाव पुन्हा समाविष्ट करणे याचे काही प्रमाण ठरले आहे का? एखादा विद्यार्थी सर्व १० विषयात अनुत्तीर्ण झाला आणि त्याने सर्व १० विषयांच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्तपासणीसाठी अर्ज केला तर निदान ४ विषयात तरी गुण वाढवावे असे काही प्रमाण ठरले असते का?

 

३४ लाखांहून अधिक अपील आली म्हणजे किमान ५-६ लाख तरी मान्य केली पाहिजे असे काही प्रमाण असायला हवे का? 

 

मुळात २७ लाख मतदार वगळले असताना ३४ लाख अपील आली म्हणजे अपील करण्यातच जोरदार गडबड दिसते. 


साधी गोष्ट आहे. काहीही झालेले नसतानाही खतरेमे ची बांग मधूनमधून उठत असते. अमेरिकेत कोणी जेरी फालवेल काही बोलला तर त्याविरूध्द सोलापूरात दंगली होतात आणि त्यात काही कारण नसताना हिंदूंची घरे जाळली जातात, आसामात काही रोहिंग्यांविरोधात काही झाले तर त्याची प्रतिक्रिया मुंबईत उठते आणि अमर जवान ज्योतीवर हल्ला केला जातो. जी काही ९०-९५ लाख नावे मतदारयादीतून काढली त्यातील बरेचसे वैध भारतीय मुस्लिम मतदार असते (म्हणजे एकूण मुस्लिम मतदारांच्या ३०-४०%) तर त्याची केवढी प्रतिक्रिया आली असती. ती आली नाही. कशी येणार? रस्त्यावर उतरायला ते लोक हयात असायला लागतात- वरून खाली येऊन माणूस रस्त्यावर उतरू शकत नाही, हयात असले तर ते त्या भागात वास्तव्याला असायला लागतात आणि त्या भागात वास्तव्याला असले तरी मुळात भारतीय असायला लागतात- बांगलादेशी नाही. याचाच अर्थ हा की मतदार मरण पावलेला असणे, तिथे वास्तव्याला नसणे अथवा मुळात भारतीयच नसणे- बांगलादेशी असणे अशा विविध कारणांमुळे जी नावे मतदारयादीत मुळात असायला नको होती- पूर्वीच काढली जायला हवी होती ती आता काढली गेली आहेत. त्यात आक्षेप घेण्यासारखे काय हेच समजत नाही. इतकी वर्षे ईव्हीएम घोटाळा मग व्होटचोरी या आरोपांना मतदारांनी कचऱ्याच्या टोपलीत टाकल्यानंतर डापु गॅंग उर्फ जमात-ए-पुरोगामींना आता एस.आय.आर हा नवा काल्पनिक मुद्दा सापडला आहे. बाकी काही नाही.    


''प. बंगाल, गुजरात, तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात होऊ घातलेल्या मतदारयाद्यांच्या सखोल विशेष फेरतपासणीदरम्यान सरकारी (एसआयआर) कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने भाजपही आपल्या कार्यकर्त्यांची फळी नि उतरवून समांतर मोहीम राबविणार आहे. बुधवारी वसंत स्मृती येथील कार्यालयात ५०० हून अधिक आमदार-खासदार, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांची कार्यशाळा आयोजित करून भाजपने पक्षाच्या वतीने होणाऱ्या या समांतर फेरतपासणीचे संकेत दिले'' 

 

उत्तरप्रदेश, प.बंगाल, गुजरात, तामिळनाडु या राज्यात भाजपची अशी यंत्रणा होतीच त्याचा योग्य फायदा झाला. 

 

वाह ! छान उपक्रम. 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्या पक्षाने सुद्धा अशीच समांतर मोहीम सुरू करावी आणि भाजपचा डाव हाणून पाडावा. नाहीतर परत रडारड करायची वेळ येईल.


मतदार यादीतील मुस्लीम मतदार वगळल्यामुळे जसा भाजपाला विजयाकडे धाव घेता आली हा एक मोठा भाग झाला. 
दुसरा भाग, आता काही आकडे पाहात होतो. मुस्लीम मतांचे झालेले विभाजन ज्यात ममता यांच्या पराभवास कॉंग्रेस, डावे, आम जनता उन्नयन पक्ष
यांनीही चांगलाच हातभार लावला. 


फोकलीचे साले, आपल्या शत्रुपक्षाविरोधात एक व्हायचं तर, आपल्यामुळे शत्रुपक्षास मदत कशी झाली त्याचा जराही विचार करीत नाही. 😑

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कसे काय? 

मतदार का वगळले? तर घरोघरी तपासणीच्या वेळी एकाच खोलीचा पत्ता वीस पंचवीस जणांचा आणि भाड्याने राहणारे नेपाळी दुसरेच हा प्रकार मुंबईत झाला होता. ते विडिओ यूट्यूबवर पाहिले आहेत. 

आता बंगालमधले असे मतदार असू शकतात. पण त्यांना मुस्लीम मतदार म्हणून यादीतून वगळले असे म्हणणे चूक आहे. 


In reply to by कंजूस

मतदार का  वगळले ? कसे वगळले. 


सुरवातीच्या काळात एखाद्या मतदाराने स्वत:ची किंवा कुटूंबातल्या कोणा एकाची नोंद २००२ च्या यादीत दाखवली तर त्याला पात्र मानल्या जात गेलं. पण, यांना वाटलं अशाने आपला हेतू सिद्ध होणार नाही, म्हणून निवड्णूक आयोगाने 'तार्किक विसंगती' (Logical Discrepancy) प्रकरण पुढे केलं. कागदपत्र अपूर्ण, नावात घोळ, स्पेलींग मधे चूक,  संशयास्पद मतदार, असे लय दळण यात आणलं आणि अशांची संख्या जवळ जवळ साठ लाख झाली. मग त्या नोटीसा, ते नाटक. सत्तावीस लाख नाव शेवटी हटवली. अर्रर्र, डोकं बंद पडतं याचे कारनामे पाहून.  गुगलला कामाला लावलं तर,  उदा. म्हणून समसेरजंग विधानसभेचा मतदार हरवल्याच्या आणि गहाळ मतदारांच्या कथा सापडतील. कोलकोत्यात मोठं आंदोलनही झालं होतं.  पण, आजकाल अशा आंदोलकांना विचारतं कोण म्हणा. आता पुढच्या वेळी बघू म्हणुन न्याय देणा-यांनी कलटी मारली. 

तर, मी म्हणत होतो काहीही करा पण राज्य आणा.  आज लोकसत्तात ॲड. हर्षल प्रधान यांचा चांगला लेख आहे. 'आयात नेत्यांमुळे भाजपा पुन्हा एकदा सत्तेत' 'रेवड्यांच्या उधळणीमुळे भाजपशासित राज्यांची आर्थिक अवस्था गंभीर आहे. भाजपने सत्ता मिळवली, मात्र त्यांचे सुबत्तेचे दावे फोल ठरले आहेत. ( प्रवक्ता आणि जनसंपर्कप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) पुढे ते लिहितात- 

''भारतीय जनता पक्षाने गेल्या एका दशकात देशाच्या राजकीय नकाशावर जे वर्चस्व प्रस्थापित केले आहे, ते पाहून कोणीही थक्क होईल. परंतु ही कहाणी खऱ्या जनाधाराची नाही, तर सत्तेच्या लालसेपोटी झालेल्या आयातीची, फोडाफोडीची आणि अभद्र तडजोडींची आहे. प्रश्न साधा आहे मोदींचे कर्तृत्व म्हणजे काय? विचारधारा रुजवणे, की इतरांच्या खांद्यावर बसून सिंहासन टिकवणे ?


भाजप ज्या राज्यांत सत्तेत आहे, तेथील बहुतेक लोकप्रतिनिधी अन्य पक्षांतून आलेले आहेत. महाराष्ट्राचा विचार करता, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना यंत्रणांचा धाक दाखवून जनतेच्या मनात प्रतिमावर्धन झालेले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार भाजपाने उलथवले. बिहारमध्येदेखील नितीश कुमार यांच्या प्रतिमेचा लाभ घेत दोनदा सरकार स्थापन केले आणि त्यांनाच मुख्यमंत्री पदावरून पदच्युत केले. हाच प्रकार जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीबाबत केला. आसाममध्ये डॉ. हिमंता बिस्वा सरमा हे तर काँग्रेसचे लोकप्रिय नेते त्यांनाही जाळ्यात ओढले, पण ते मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी झाले. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंना तुरुंगात जाऊन यावे लागले होते आता ते एनडीएबरोबर आहेत. नागालँडमध्ये नेफेयू रिओ एनपीएफचे नेते, पुदुच्चेरीमध्ये एन. रंगास्वामी हे मूळ काँग्रेस विरोधातील एआयएनआरसीचे नेते, पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी हे मूळ तृणमूल काँग्रेसचे, अरुणाचल प्रदेशमधील पेमा खंडू हे मूळ काँग्रेसचे नेते, मणिपूरमधील एन. बिरेन सिंग हे मूळ काँग्रेसचे नेते, सिक्कीममधील पी. एस. गोले हे एसडीएफ या स्थानिक आघाडीचे नेते असे अर्ध्याहून अधिक नेते हे भाजपाने उधारी-उसनवारीवर घेतले. भाजपाच्या विचारांची मुळे त्यांच्या मनात रुजली कशी? या सगळ्यांनी आपापल्या मूळ विचारधारेकडे परतायचे ठरवले तर भाजप २३ पैकी किमान १५-३० राज्ये सहज गमावेल ! मग यात मोदींचा करिष्मा आहेच कुठे? हा करिष्मा आहे ईडी, सीबीआय आणि आयटीचा. 'तोडा फोडा पण राज्य आणा' उर्वरीत लेखही छानच आहे.  ( छापील आवृत्ती- लोकसत्ता- दि. ८-०५-२०२६ ) 

तर, कंजुसकाका तुम्ही आणि मी पडलो साधी भोळी माणसं. आपल्याला जो वरवर तवंग दिसतो,  तो तसा नसतो. आपलं काय ? सामान्य माणसाचे जगण्या-मरण्याचे प्रश्न सुटले पाहिजे. आज आमच्याकडे सकाळी पुन्हा डिझेल-पेट्रोल पंपावर रांगा. आता पुन्हा घरगुती गॅसचे दर वाढतील. काय सांगायचं...? 

-दिलीप बिरुटे

 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाराष्ट्राचा विचार करता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना यंत्रणांचा धाक दाखवून जनतेच्या मनात प्रतिमावर्धन झालेले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार भाजपाने उलथवले.

 

शिंदे-पवारांना ठाकरेंनी धाक दाखवला? पडवळदिगारांनी? आणि पडवळदिगारांचे जनतेच्या मनात प्रतिमावर्धन झाले? काहीही हं श्री!

 

भाजप २३ पैकी किमान १५-३० राज्ये सहज गमावेल !

 

२३ पैकी ३०? मनुवाद्यांच्या गणितात किमान ३५ पैकी ३० तरी असतात! पण ज्यांच्या बटाट्यातून सोन्याच्या लगडी बाहेर पडतात त्यांच्या गणितात २३ मधून ३० सुद्धा काढता येतात!


हे वर वानगीदाखल दोन मसाले घेतले आहेत. लेखक हे प्रवक्ता आणि जनसंपर्कप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहेत त्यामुळे या लेखनाला, खरंतर लोकसत्तेलाच फार काही गांभीर्याने कुणी घेत नाही.

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बरं ते २७ लाख मतदारांची नावे वगळली आणि ३४ लाख अपीले आली हे गणित जरा समजावून सांगता का? 

 

म्हणजे मतदारयादी घोटाळा म्हणून उर बडवताना अपील घोटाळा झाला का? 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हिंदू मते एकवटल्याने भाजप जिंकला. वगळलेल्या मतांचा कणभरही संबंध नाही कारण ते मतदारच नव्हते.


पश्चिम बंगालच्या झालमूरीच्या गोष्टी पुढे वेळ मिळेल तशा येत राहतील. आता चला चॅप्टर एककडे:  गोष्ट आहे २०१६ ची, विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान आपल्या देशाचे सर्वांचे लाडके पं. प्रधान यांनी सद्य मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले सुवेंदू अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आणि त्यांना नारदा स्टींग ऑपरेशनच्या वेळी टीव्ही कॅमे-यासमोर कितना लाए हो ? अच्छा लाओ लाओ अशी मिमिक्री करत मोदींनी त्यावेळी सुंवेदू अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत टीका केली होती. 

भाजपच्या वाशिंगमशीन मधून त्यांना स्वच्छ करुन २०२० मधे एकदम चकाचक करुन टाकले. आता ते एक स्वच्छ पारदर्शी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करणार आहेत. शुभेच्छा. 


-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सगळेच तसे करतात. 

 

१९९७ मध्ये कॉंग्रेसने गुजराल सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता व सरकार पाडल्याने लोकसभेची मध्यावधी निवडणूक झाली होती. त्यामागे कारण होते करूणानिधी. 

 

त्या सरकारमध्ये करूणानिधींच्या द्रमुक पक्षाचा समावेश होता व सुमारे २० महिने त्या सरकारला कॉंग्रेसने पाठिंबा दिला होता (आधी देवेगौडा आणि नंतर गुजराल). २० महिन्यांनंतर कॉंग्रेसला साक्षात्कार झाला की राजीव गांधीची हत्या ज्या एलटीटीईने केली होती त्या दहशतवादी संघटनेशी द्रमुकचे संबंध आहेत व राजीव गांधींच्या सुरक्षेकडे तत्कालीन मुख्यमंत्री करूणानिधींनी दुर्लक्ष केल्याने त्यांची हत्या झाली होती.

 

द्रमुकला सरकारमधून काढा ही मागणी गुजराल व इतर घटक पक्षांनी मान्य न केल्याने कॉंग्रेसने गुजराल सरकार पाडले व त्यामुळे मध्यावधी निवडणूक घ्यावी लागली होती.

 

त्यानंतर २००४ मध्ये कॉंग्रेसने द्रमुकशी युती केली व ती आजतागायत सुरू होती. 

 

हे एकमेव उदाहरण नाही. सर्व पक्ष आपण शिव्या दिलेल्यांशी नंतर युती करतात हे असंख्य वेळा घडले आहे.

 

उडदामाजि काळे गोरे. 


In reply to by श्रीगुरुजी

अजून एक.

 

स्थळ - कर्नाटक 

वेळ - विधानसभा निवडणूक २०१८

 

जागतिक कीर्तिचे विचारवंत प्रचारात सातत्याने सांगत होते की देवेगौडांचा पक्ष भाजपचा ब संघ आहे व कुमारस्वामींने प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. 

 

निकाल - २२४ पैकी भाजप १०४, कॉंग्रेस ८०, देवेगौडा - ३८

 

बहुमतासाठी आवश्यक ११३.

 

कॉंग्रेसने तात्काळ देवेगौडा पक्षाशी युती केली व कुमारस्वामीला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देऊन मंत्रीमंडळात सामील झाले.