अभंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जे न देखे रवी...
15 Feb 2026 - 10:13 am

संसदेत नाही । फिरकले पायी ।
महिलांच्या ठायी । धाक वाटे ।।१।।

जुने मढे सारे । काढिले बाहेरी ।
नाव नेहरूंचे । घेती सदा ।।२।।

एपस्टिन यादी । येईल बाहेरी ।
हीच भीती उरी । दाटलेली ।।३।।

शिक्षण, बेकारी । तशी महागाई ।
बोलणेच नाही । विषयांवर ।।४।।

आत्महत्या करी । राजा शेतकरी ।
जंगले व्यापारी । लुटविती ।।५।।

निवडणुकीवेळी । गोड गोड बोली ।
वचनांची झोळी । रिकामीच ।।६।।

सेवा तीर्थ नाव । ध्यानी नाही भाव ।
जनहिती ठाव । फेकीला हा ।।७।।

संसदेचा वेळ । वायाचि गेला हा ।
'दिलीप' म्हणे पाहा । कुणाकडे? ।।८।।

कविता

प्रतिक्रिया

एक काव्य / रचना म्हणुन मस्त जमलं आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Feb 2026 - 10:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाकृ श्रेष्ठ अशा गणपाची दाद मिळाली.
अभंग सार्थकी लागले.

धन्स गंपा.

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

15 Feb 2026 - 3:12 pm | अभ्या..

अहाहा,
.
बुडताचि वह्या । येई ते विमान ।
'अभ्या' विनवी सरा । दीनवाणे ।।७८६।।

सोत्रि's picture

15 Feb 2026 - 3:42 pm | सोत्रि

।।७८६।।

🤣 🤣 🤣

- (rofl झालेला) सोकाजी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Feb 2026 - 3:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्यासेठ.. भारी.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Feb 2026 - 6:14 pm | अमरेंद्र बाहुबली

हाहा! एक नंबर!

'दिलीप' म्हणे पाहा । कुणाकडे? ।।८।।

मला वाटलं ‘दिलीप’ काहीतरी उपाय दाखवून त्याकडे पाहा म्हणेल ;)

- (हलकेच घ्या असे म्हणणारा) सोकाजी

भक्त म्हणे विसरा नाव ते एपिस्टना
पाहा आता आणला हा टिपू सुलताना!!
:) :)
प्लीज भक्त ऐवजी भक्ती चुकूनही वाचू नका,_/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Feb 2026 - 4:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै फॉर्मूले आणतात हे लोक.
तर अभंगातील चरण असे.

भक्त म्हणे नाव । सोडा एपिस्टन ।
आणला टिपू हा । सुलतान ।।९!!

-दिलीप बिरुटे
( अभंगात रमलेला )

श्वेता२४'s picture

15 Feb 2026 - 5:36 pm | श्वेता२४

अभंग आणि प्रतिसाद दोन्ही भारी..

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Feb 2026 - 6:15 pm | अमरेंद्र बाहुबली

:) आवडला!:)

चामुंडराय's picture

15 Feb 2026 - 7:36 pm | चामुंडराय

व्वा, भारीच की बिरुटे सर.

'दिलीप' म्हणे पाहा । 'राहुल'कडे !

प्रचेतस's picture

15 Feb 2026 - 9:24 pm | प्रचेतस

लै हसलो, चपखल आहेत :)

गवि's picture

15 Feb 2026 - 9:41 pm | गवि

आवडले. भारी.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

15 Feb 2026 - 10:47 pm | हणमंतअण्णा शंकर...

असेच म्हणतो!

@दिलीपराव

मन की बात | असो मना आत |
सांगाया सुरुवात | करो नये ||

काही मेंबर | जणू इको चेंबर |
जाने ते डिसेंबर | भुंकिताती ||